मराठी साईट्सना भेट द्या.

वडापाव's picture
वडापाव in काथ्याकूट
8 Feb 2008 - 2:44 pm
गाभा: 

सध्या मिसळपावासारख्या कित्येक विविध प्रकारच्या साईट्स इंटरनेटवर उपलब्ध होत आहेत. त्यामुळे मराठी चा प्रसार होत आहे. अशाच काही मराठमोळ्या साईट्सची नावे पुढीलप्रमाणे:
०१. www.marathiworld.com
०२. www.marathimati.com
०३. www.easymarathi.com
०४. Gadima.com
०५. Rasik.com
०६. Victorian.fortunecity.com
०७. Sanskrit.gde.to
०८. Glamsham.com
०९. Velankar.gharkul.net
१०. Balbharati.org
११. Puladeshpande.net
१२. Shayaranamusic.com
१३. Bharatiyadrama.com
१४. Mumbaicity.rediff.com
१५. www.tukaram.com

प्रतिक्रिया

माझी दुनिया's picture

8 Feb 2008 - 2:47 pm | माझी दुनिया

काही नवीन संकेतस्थळं कळली

आदरणीय वाचकहो,
सप्रेम नमस्कार.
या काथ्याकुटात एक सोय नाही. वर दिलेल्या साईट्सच्या नावांवर क्लिक करून त्या साईट्स उघड्णार नाहीत. त्या उघडण्यासाठी या साईट्सची नावे आपल्याला टाईप करावी लागतील.
गैरसोयीसाठी क्षमा असावी.
आपला नम्र,
पाणी पुरी

प्राजु's picture

8 Feb 2008 - 6:40 pm | प्राजु

पाणिपुरीताई,
नविन साईट्स समजल्या. धन्यवाद.
अहो, यात मिसळपावचेही नाव टाका. आपलीच साईट आहे ना... तेवढंच बरं वाटतं वाचायला.. :))

- प्राजु

विसोबा खेचर's picture

9 Feb 2008 - 12:01 am | विसोबा खेचर

अहो, यात मिसळपावचेही नाव टाका. आपलीच साईट आहे ना...

प्राजू, मिपाबद्दलची तुझी आपुलकी मी समजू शकतो, परंतु पाणीपुरींनी ही माहिती मिपावर दिली आहे यातच सगळे आले! :)

अवांतर -

पाणीपुरी लिहितात,

सध्या मिसळपावासारख्या कित्येक विविध प्रकारच्या साईट्स इंटरनेटवर उपलब्ध होत आहेत.

या वाक्यातल्या 'मिसळपावासारख्या कित्येक' या शब्दांना माझा किंचितसा व्यक्तिश: आक्षेप आहे! :)

मराठी संस्थळांच्या बाबतीत 'झाली बहु, होतील बहु, परंतु या सम...' असेच लोकंना मिपाच्या बाबतीत म्हणावे लागेल याची आम्हाला खात्री आहे!

असो, सर्व मराठी संस्थळांना मिपाच्या शुभेच्छा!

आपला,
(मिपाकर) तात्या.

छोटा डॉन's picture

9 Feb 2008 - 10:03 am | छोटा डॉन

"मराठी संस्थळांच्या बाबतीत 'झाली बहु, होतील बहु, परंतु या सम...' असेच लोकंना मिपाच्या बाबतीत म्हणावे लागेल याची आम्हाला खात्री आहे! "
हा हा हा ...........
अगदी खरच पटलं बर तात्या ....
मिपा. ला तोड नाही , कुठे "त्या "वरणभाताच्या, बुळबुळीत भेंडीच्या भाजीसारख्या साईट्स आणि कुठे "मिपा" चा झणझणीत , झटका देणारा तडका .....

[मिसळीची झटका देणारी 'तर्री' आवडणारा ] छोटा डॉन ...........

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2008 - 6:40 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मराठी संस्थळांच्या बाबतीत 'झाली बहु, होतील बहु, परंतु या सम...' असेच लोकंना मिपाच्या बाबतीत म्हणावे लागेल याची आम्हाला खात्री आहे! "

१००% सहमत !!!! आमी जालाची ओळख झाल्यापासून लै भटकलो, भटकून राह्यलो.
पर मिसळपाव ते मिसळपाव. :)

मिसळपावचा येडा
प्रा.डॊ....... ......

वडापाव's picture

10 Feb 2008 - 2:43 pm | वडापाव

प्राजुताई,
आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पण मी ताई नसून दादा आहे.
आपला नम्र,
पाणी पुरी

वरदा's picture

8 Feb 2008 - 7:55 pm | वरदा

बर्‍याच साईट नाहीयेत्...मायबोली नाहीये. राम राम पाव्हणं अशीही एक साईट आहे...आणि अजुन चिकार्...पण मी म्हणते पाणिपुरीताई अहो गूगल आहे की ह्या कामाला तुम्ही कशाला त्रास घेतलात?

राजे's picture

8 Feb 2008 - 8:18 pm | राजे (not verified)

अहो एक छोटेसे रोपटे आमचे देखील आहे http://mazeshabd.ekbhasha.com , प्रेमाने आम्ही पाणी देऊन वाढवत आहे, जरा तुमचा देखील हातभार लावत जा येथे देखील...
बाकी गुगल असताना हा प्रपंच कश्यासाठी ? गुगल मध्ये मराठीतून शोध घ्या शेकडो साईट भेटतील (बाय द वे.. साईटसाठी संकेतस्थळ / संस्थळ हे शब्द मराठी भाषेत रुजू झाले आहेत ह्याची नोंद असावी)

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

वरदा's picture

8 Feb 2008 - 8:21 pm | वरदा

आता मराठी सकेतस्थळ म्हणेन्...आणि हो मीही आहे तुमच्या माझे शब्द ची सदस्य...खूप सुंदर संकेतस्थळ आहे....

वरदा's picture

9 Feb 2008 - 12:04 am | वरदा

१००% अनुमोदन.....

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 6:17 pm | सुधीर कांदळकर

ही' हे पटले.

माहितीबद्दल धन्यवाद.

दीपा॑जली's picture

11 Feb 2008 - 6:13 am | दीपा॑जली

मराठी गाण्या॑साठी काही संकेतस्थळ आहेत.. माझाFM.com, dhingana.com, musicindiaonline.com

प्राजु's picture

11 Feb 2008 - 9:14 am | प्राजु

मराठी सिनेमा साठी..
www.apalimarathi.com
www.bigflicks.com

या संकेतस्थळांवर मराठी सिनेमा, नाटक, गाणी, कथाकथन, आणखी बरेच काही ऐकता- पाहता येईल.

- प्राजु

वरदा's picture

11 Feb 2008 - 5:51 pm | वरदा

प्राजु मला दुसरी साईट माहीत नव्हती...थँक्यू..

केशवराव's picture

14 Feb 2008 - 2:33 pm | केशवराव

या काथ्याकूटाबद्दल धन्यवाद. ज्ञानात खुपच भर पडली.