मे नाही. दिवाळीच्या थोडं आधी फुलं यायला लागतात.
मस्त सडा पडतो त्यांचा.
आमच्या शाळेत २ मोठ्ठी झाडं होती त्याची. मधल्या सुट्टीत सगळ्या जणी ढीगभर फुलं गोळा करायच्या आणि मग त्याचे देठ गुंफून त्याची वेणी तयार करणे, केसात माळणे (मराठी शाळा असल्यामुळे केसात गजरे बिजरे घालण्यावर येडचाप बंदी नव्हती) इत्यादी रोजचे रोज चालू असायचं. सगळ्या वर्गात बुचाच्या फुलांचा घमघमाट.
घरून लायब्ररीत जातानाच्या वाटेवर झाड होतं. त्यामुळे दिवाळीच्या सुट्टीत लायब्ररी ५ मिनिटांवर असली तरी लायब्ररीमधे अर्धा तास आणि वाटेत फुलं गोळा करायला अर्धा तास असा कार्यक्रम करून मग मी घरी पोचायचे. रोजचे रोज घरभर छोट्या छोट्या पेल्यांमधे पाणी भरून बुचाच्या फुलांचे गुच्छ करून ठेवायचे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
बुचाच्या झाडाला गगनजाई पण म्हणतात. पण अजून तरी त्याला फुलं नाही आली.
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com
हेच फुल वाटतेय फोटोवरुन तरी. शाळेत असताना सगळ्या मुली धडपडायच्या एक एक फूल मिळवायला. याचा देठ लांब असल्यामुळे सुईदो-याशिवायही याचा गजरा करता येतो. फुलांचा वास दुरवरुनही येतो पण काही लोकांना उग्रही वाटु शकतो.
प्रतिक्रिया
कुठल्या
अरे फोटो
वा वा!!
आमच्या ईथे
ह्म्म... मला
मे नाही.
आणखी एक
गगनजाई
गगनजाई..
ह्म्म
हेच का ते?
हेच वाटतेय
बरोबर! अजुन
वा....दिल
संदीप ही
हेच ते.. -
तुम्हाला
दचकलोच!