✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

सांज स्वीकारली

क — क्रान्ति, Fri, 05/08/2009 - 20:00

प्रतिक्रिया द्या
4376 वाचन

💬 प्रतिसाद (25)

तुफान कविता आहे.

प्राजु
Fri, 05/08/2009 - 20:31 नवीन
सुरेख!! प्रचंड अर्थ आहे कवितेत. फारच सुंदर! उषा किलबिलणारी, निशा दरवळणारी मागे घुटमळणारी, मीच सांज स्वीकारली! उषा भैरव वहाते, निशा मालकौंस गाते, माझे मारव्याशी नाते, मीच सांज स्वीकारली! सुप्पर्ब!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

क्या बात है !!

चन्द्रशेखर गोखले
Fri, 05/08/2009 - 21:18 नवीन
खूप खूप आवडलेली कविता ! तुमच्या प्रतिभेला दंडवत !!!
  • Log in or register to post comments

फारच सुरेख

मानस
Fri, 05/08/2009 - 21:28 नवीन
कवितेचा आशय आवडला. तुमची प्रतिभा अशी सदैव फुलत राहो हीच इच्छा .... उषा भैरव वहाते, निशा मालकौंस गाते, माझे मारव्याशी नाते, मीच सांज स्वीकारली! क्या बात है!!!!
  • Log in or register to post comments

चांदणसोहळे हा शब्द

बेसनलाडू
Fri, 05/08/2009 - 22:34 नवीन
आणि तो असलेली द्विपदी विशेष आवडली. (आस्वादक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

+ १ असेच म्हणतो

चतुरंग
Fri, 05/08/2009 - 22:44 नवीन
चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

सुंदर!!

घाटावरचे भट
Fri, 05/08/2009 - 23:55 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments

खुप सुंदर

जागु
Sat, 05/09/2009 - 00:19 नवीन
खुप सुंदर कविता आहे. खुप आवडली.
  • Log in or register to post comments

कल्पक मांडणी

धनंजय
Sat, 05/09/2009 - 00:46 नवीन
अजून विचार करतो आहे. निरागस-अल्लड उषा एकीकडे, रसिक-प्रौढ निशा, पण कवयित्री निवडते ती विचलित करणारी थोडीशी करुण संध्या. संध्या ही दिवस आणि रात्र यांच्या मध्ये घुटमळणारी (हेलकावणारी) वेळ. पण तशीच उषा ही रात्र आणि दिवस यांच्यामधली संधिकालीन वेळ... उषा ही गाढ निद्रेपासून जागृतीकडे जाणारी म्हणून उमलणारी-प्रसन्न म्हणावी, तर इथे रात्र प्रत्येक कडव्यात सौदर्य लेऊन आलेली आहे. फारफारतर उषा एका धुंद आनंदातून दुसर्‍या धुंद आनंदाकडे नेणारा सांधा आहे. पण मग संध्यासुद्धा उलट्या दिशेने तसाच सांधा आहे. पण कवयित्रीला तो संधिकाल मग्न-करुण करतो. कवयित्री असे म्हणते ते पटते, पण "असे कारुण्य का?" हा विचार गुलदस्त्यात आहे. अजून विचार करायला लावणार्‍या कवितेबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

संध्याकाळ करुणच (असावी) का?

बेसनलाडू
Sat, 05/09/2009 - 01:34 नवीन
या कवितेच्या बाबतीत तरी कवयित्री स्वतःच अपेक्षित उत्तर देऊ शकेल; पण सामान्यतः हा नियम नसावा असे (मला) वाटते. सांज ये गोकुळी सावळी सावळी, संधिकाली या अशा यांसारखी गीते आठवतात (जोडीलाच 'सांज ढले गगनतले हम कितने एकाकी' सुद्धा आठवतेच!) (स्मरणशील)बेसनलाडू अवांतर - जवळपास दररोजची संध्याकाळ व्यायामशाळेतच व्यतीत होत असल्याने (शक्यतो) करुणबिरुण वाटत नाही; प्रसन्नच वाटते :) (हट्टाकट्टा)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

माझी अत्यंत आवडती वेळ!

क्रान्ति
Sat, 05/09/2009 - 08:37 नवीन
संध्याकाळ ही माझी अत्यंत आवडती वेळ! ती कातरवेळ असते, हुरहूर लावणारी, अंतर्मुख करणारी. तशी नेहमीच ती उदास नसते, पण बरेचदा असं होतं. 'संध्याछाया भिवविती हृदया' ही भावना कैकदा जागी होते संध्याकाळी. आयुष्याच्या एका ठराविक वळणावर एकाकीपणा, रितेपणा जेव्हा जास्त सलतो, तेव्हा असं काहीतरी मनातून कागदावर उतरतं. [मारवा थाटातला पूरिया शिकतेय, तोही संध्याकाळी, त्याचा परिणाम असेल कदाचित!] तशी माझी संध्याकाळ कधी कधी अशी सुन्दरही असते. http://www.misalpav.com/node/6781 क्रान्ति {तापलो रामराया!} अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो! www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

"असे कारुण्य का?"

प्रदीप
Mon, 05/11/2009 - 20:14 नवीन
ह्या कवितेवरून नकळत कैफी आजमींचे गीत आठवले :"ऐ बेक़रार दिल, हो चुका है मुझ को आसूओं से प्यार, मुझे तू खुशी न दे, नयी जिंदगी न दे"
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय

सुंदर!

सायली पानसे
Sat, 05/09/2009 - 01:36 नवीन
फारच सुंदर आणि अर्थपुर्ण कविता. खुप आवडली.
  • Log in or register to post comments

सुरेख आहे

यशोधरा
Sat, 05/09/2009 - 08:38 नवीन
सुरेख आहे कविता!
  • Log in or register to post comments

अप्रतिम

समिधा
Sat, 05/09/2009 - 08:52 नवीन
खरचं खुप सुंदर कविता लिहीली आहेस. समिधा (चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
  • Log in or register to post comments

मीच सांज स्वीकारली

मनीषा
Sat, 05/09/2009 - 08:57 नवीन
सुंदर कविता .. नको किरण कोवळे, नको चांदणसोहळे माझे आभाळ वेगळे, मीच सांज स्वीकारली! ... खूपच छान
  • Log in or register to post comments

सहसा कविता

नितिन थत्ते
Sat, 05/09/2009 - 16:08 नवीन
सहसा कविता वाचत नाही. पण कशी कोण जाणे आज वाचली. खूप आवडली. प्रत्येक कडव्यातील सकाळ आणि रात्र यांतील वेगळेपण आणि स्वीकारलेले/निवडलेले तिसरेच. छान कल्पना. खराटा (रंग माझा वेगळा)
  • Log in or register to post comments

अप्रतिम...

मैत्र
Sat, 05/09/2009 - 16:58 नवीन
उषा भैरव वहाते, निशा मालकौंस गाते, माझे मारव्याशी नाते, मीच सांज स्वीकारली! खूप सुंदर कविता!!
  • Log in or register to post comments

आवडली कविता !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sat, 05/09/2009 - 17:50 नवीन
कवितेत आलेले शब्द आणि कविता केवळ सुंदर...!!! चांदण्याचे दिवे, चांदण सोहळे, रम्य लावण्याची उषा, भुपाळी सुर उषा, भैरव वाहते उषा, आवडले ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

सुंदर..

स्वाती दिनेश
Sat, 05/09/2009 - 19:09 नवीन
नको किरण कोवळे, नको चांदणसोहळे माझे आभाळ वेगळे, मीच सांज स्वीकारली! वा .. आवडले. स्वाती
  • Log in or register to post comments

हेच

सँडी
Sat, 05/09/2009 - 20:26 नवीन
हेच म्हणतो. प्रभाती किरण नवे, रात्री चांदण्यांचे दिवे पुसता तू, 'काय हवे?' मीच सांज स्वीकारली! मस्तच! पहिल्याच चेंडुवर षटकार! -संदीप. काय'द्याच बोला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

छान!

राघव
Mon, 05/11/2009 - 09:08 नवीन
मस्त कविता.. प्रभाती किरण नवे, रात्री चांदण्यांचे दिवे पुसता तू, 'काय हवे?' मीच सांज स्वीकारली! नको किरण कोवळे, नको चांदणसोहळे माझे आभाळ वेगळे, मीच सांज स्वीकारली! हे विशेष आवडले. राघव
  • Log in or register to post comments

सुंदर कल्पना ..

अश्विनि३३७९
Mon, 05/11/2009 - 11:06 नवीन
मस्तच क्रान्ति ताई ... उषा भैरव वहाते, निशा मालकौंस गाते, माझे मारव्याशी नाते, मीच सांज स्वीकारली! या ओळी सुंदरच..
  • Log in or register to post comments

क्या बात

जयवी
Mon, 05/11/2009 - 16:43 नवीन
क्या बात है क्रान्ति........ !! अप्रतिम !! मीच सांज स्वीकारली...... अहा !! जियो !!
  • Log in or register to post comments

सुरेख

नंदन
Mon, 05/11/2009 - 20:42 नवीन
आणि अर्थगर्भ कविता. अतिशय आवडली.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

वा!

सुवर्णमयी
Tue, 05/12/2009 - 01:01 नवीन
कविता आवडली. शुभेच्छा
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा