कोलकोत्याच्या दादा

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जे न देखे रवी...
23 Apr 2009 - 3:34 pm

एक तरी धाव होऊ दे
कोलकोत्याच्या दादा..
मिशा तुझ्या वाढवून घे
आणि मग दाखव अदा..

बांधून घे गार्ड तु
नाहीतर सुटुन जाइल रे
बाया बापे हसतील न बघताच
'नगमा' मात्र बघून रे….

पछाडून दे लाथाडुन दे
चेंडू सगळे सोडून दे
शर्ट काढ सांभाळून
नायतर हाडांचा मुरब्बा दिसेल रे…..

फलंदाजीचा काय भरोसा
परखून घे तु जरा
आवरासावरा करुन घे
संघातून काढल तर रणजी खेळयला जायच ना रे….

पण चॅपेलच्या बाळा
इकडे काहीच सुचल नाही म्हणून
विषे कंठ काळा त्रीनेत्री ज्वाळा

होऊदे आभाळात
आता मोठ्याने गर्जना
बॅडलाईट मागून तु
कर सर्वांना तुझा मिंधा…..

एक तरी धाव होऊ दे
'दोना' च्या दादा..
मिशा जरा वाढवून घे
आणि मग दाखव अदा ..

(काळाच्या मागून येणारी कविता)

क्रीडाविरंगुळा

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

23 Apr 2009 - 4:04 pm | परिकथेतील राजकुमार

हि कवीता आधी ह्या ठीकाणी वाचनात आली होती. आपणच ती दुसर्‍या नावानी लिहिली असावीत हि अपेक्षा.

सौरव चंडीदास गांगुली, जन्म ८ जुलै १९७२ सालचा. भारताचा आजवरचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार. त्यानी ४९ पैकी २१ कसोटी जिंकुन दिल्यात. त्याच्या कारकिर्दीत जेव्हड्या संधी युवा खेळाडुंना मिळाल्या तेव्हड्या निश्चीतच आधी कधी मिळाल्या न्हवत्या. संघ निवडीत कप्तानाला अधीकार त्यानीच मिळवुन दिला.

बॅडपॅच प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच तसा दादाच्याही आला पण फिनिक्स सारखी भरारी घेउन तो परत आला आणी त्यानंतर निव्रुत्त होईपर्यंत त्याचे ऍव्हरेज हे ६३.१६ म्हणजे इतर कुठल्याही भारतीय खेळाडुपेक्षा जास्ती होते.

टिका करण्याचा अधीकार सगळ्यांनाच आहे पण ज्याच्यावर टिका करतोय तो भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे (सध्या धोनी ती जागा घेतोय) आणी 'फाईट बॅक' हा प्रकार ज्यानी भारतीय टिमला शिकवला तो दादाच होता, भारतीय संघाला विजयाची चटक लावणाराही तोच होता (सर्व खेळाडुंचा सहभाग मान्य करुन), त्याच्याच नेत्रुत्वाखाली आपण कितीहि मोठ्या लक्षाचा पाठलाग करु शकणारा संघ हा नावलौकीक मिळवला होता हे ही लक्षात असु द्यावे.

असो लिहावे तेव्हडे कमीच.

दादाचा अपमान हा स्वतःचा वैयक्तीक अपमान मानणारा
परा गांगुली
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

उमेश कोठीकर's picture

23 Apr 2009 - 6:05 pm | उमेश कोठीकर

दादा हा दादाच होता. किलिंग इंस्टिंक्ट त्याच्यामुळेच भारतीय संघात बघायला मिळाले.लॉर्ड्स वरची त्याची ती वार डांस सारखी टी शर्ट काढून फिरवण्याची पोझ, अरे ल कारे म्हण्ण्याची हिम्मत.. हे सर्व ग्रेटच.