मालिका...एक अत्याचार

अ-मोल's picture
अ-मोल in काथ्याकूट
23 Apr 2009 - 2:27 pm
गाभा: 

हल्ली मराठी वाहिन्यांवर विकृत मालिकांचा सुळसुळाट झाला आहे. अतिरंजित कथानकं, मेलोड्रामा, हिंदी मालिकांचे नको तितके अनुकरण आणि बिनडोक हाताळणी यामुळे कोणतीही मालिका पाहणे उबग आणणारे आहे. काही दिवसांपुर्वीपर्यंत त्यातल्या त्यात असंभव ही मालिका चांगली वाटत होती, मात्र आता त्यातही उगाळून फेस आणणं तर सुरु झालंच आहे, पण विकृतीचं ग्लॅमरायझेशनही होत आहे. बाकी वहिनीसाहेब, अवघाचि संसार, कळत नकळत आणि काय.... यांच्याविषयी बोलायलाच नको. या मालिकांमधली पात्रं दिसायला तुमच्या आमच्यातलीच असली, तरी इतके सराईतपणे गुन्हे करतात की विचारायलाच नको. कोणतंही पात्र एकतर काळंकुटृट अथवा सदगुणांचा पुतळा असं वन डायमेन्शनलच रंगवलेलं असतं. आता असल्या फडतूस आणि भिकार मालिका पाहून काय मनोरंजन होणार?
पण घराघराला तमाम महिलावर्ग मात्र चवीनं आणि उत्सुकतेनं रोज या मालिकांची पारायणं करतो. त्यापेक्षा आमच्या लहानपणचे एक वाहिनी असलेले दूरदर्शनचे दिवस परवडले.
नुक्कड, हम हिंदुस्तानी, सर्कस, इंतजार, चिमणराव, चाळ नावाची वाचाळ वस्ती, झोपी गेलेला जागा झाला.... या मालिका कितीतरी सरस आणि आशयघन होत्या.

रंजनाच्या साधनांची संख्या वाढली, पण लोकांच्या आवडी-निवडीचा दर्जा घसरला याचेच तर हे दृयोतक नाही ना?
की "आलिया भोगासी असावे प्रेक्षक" ही माध्यमशरण वृत्ती याला कारणीभूत आहे?

प्रतिक्रिया

रम्या's picture

23 Apr 2009 - 2:33 pm | रम्या

एका मालिकेत तर इस्त्री केलेली साडी, आयब्रोज आणि तोंडाला खानदानी मेकअप केलेली भिकारीण दाखवली होती!!! अरे प्रेक्षकांना काय गाढवं समजलात का रे?
आम्ही येथे पडीक असतो!

विसोबा खेचर's picture

23 Apr 2009 - 2:33 pm | विसोबा खेचर

पण घराघराला तमाम महिलावर्ग मात्र चवीनं आणि उत्सुकतेनं रोज या मालिकांची पारायणं करतो.

अहो हाच तर खरा कळीचा मुद्दा आहे!

असो,

बाकी, टीव्हीवरच्या मालिका पाहणे हा मी माझ्या रसिकतेचा अपमान समजतो..

हल्ली फक्त मी एकच मालिका केव्हातरी पाहतो, ती म्हणजे कुलवधू. कारण त्यात काम करणार्‍या अपूर्वा गोखले नावाच्या अभिनेत्रीवर माझा जीव आहे! :)

आपला,
तात्या गोखले!

दिपक's picture

23 Apr 2009 - 4:28 pm | दिपक

:)

भडकमकर मास्तर's picture

23 Apr 2009 - 3:45 pm | भडकमकर मास्तर

अपूर्वा गोखले

की नुसतीच पूर्वा गोखले?

_____________________________
कुठे संत तुकाराम? कुठे शांताराम आठवले?

विसोबा खेचर's picture

23 Apr 2009 - 4:14 pm | विसोबा खेचर

येस! पूर्वा गोखले..!

तात्या.

मयुरा गुप्ते's picture

24 Apr 2009 - 12:03 am | मयुरा गुप्ते

तेच म्हंटल... अपूर्वा गोखले सिरीयल मध्ये काम करायला कधी सुरुवात केली.आणि आम्हाला कळलं कसं नाही.

विसोबा खेचर's picture

24 Apr 2009 - 12:06 am | विसोबा खेचर

नावाचा घोटाळा झाला!

अपूर्वा गोखले हीदेखील माझ्या चांगल्या परिचयाची आहे, माझी गुरुभगिनी आहे. आमच्या मधुभाईंची सख्खी पुतणी आणि शिष्या!

आपला,
(ग्वाल्हेर घराण्याचा प्रेमी) तात्या.

हेरंब's picture

23 Apr 2009 - 8:31 pm | हेरंब

:)) 'अ' असण्याने वा नसण्याने फार फरक पडतो.
उदा. बघा : मनमोहनसिंग व व्हिआग्रा यांत काय फरक आहे ?
एक 'सरदार' आहे तर दुसरा 'असरदार' आहे.

संदीप चित्रे's picture

24 Apr 2009 - 12:07 am | संदीप चित्रे

=D> =D>

साहेबानु,

ह्या टुकार मालिंकांच्या वेळात डीस्कव्हरी, नॅशनल जिओग्राफिक, ऍनिमल प्लॅनेट, हिस्ट्री, वगैरे चॅनेल्स लावुन बघा ना !!!

बायका ऐकत नाहीत ना, खड्ड्यात जाउदेत, तुम्हाला कोण म्हणतो बघा म्हणुन?

मॉनिटरला एक्स्टर्नल टी व्ही ट्युनर जोडा (१०००-१२००) रुपड्यात चांगल्या कंपनीचे मिळते, घरातली केबल वायर, केबल सॉकेट (६०-१००) आणि केबल वायर पट्ट्यातुन फिरवाना !! रडता कशाला ?? :S

सिरीयल बघितल्या शिवाय त्या टुकार आहेत त्या कळत नाही, म्हणुन बघुच नका ना !!

टीप : : अश्या वेळी फ टीव्ही, जास्त निर्धास्त पणे बघता येतो... ;)

स्वामि's picture

23 Apr 2009 - 8:50 pm | स्वामि

मराठी मालिकेत काम करणारे कलाकार इतक्या इमानेइतबारे आपला रोल करतात की वाटतं ही लोकं त्या मालिकेत भुमीका नाही तर नोकरी करतायत.मालीका संपल्यानंतर म्हणत असतील,अरेरे माझी नोकरी गेली.तेच चेहेरे (प्रसाद ओक,संजय मोने,बांदेकर,अ.सुभाष्,इ.इ.)सालं साधं बॅकग्राउंड म्युझीकही बदलत नाहीत वर्षानुवर्षे,आनंद झाला की काय एकु येणार,दु:खात काय,सगळं आता पाठ झालय.आणि हो,नाटकासारखं दोन पात्रांना समोरा समोर बसवायचं,आणि बोला म्हणायचं,कॅमेरा फक्त त्यांच्या तोंडासमोर ठेवला की आपलं काम झालं,स्वस्त आणि मस्त.

हरकाम्या's picture

23 Apr 2009 - 9:37 pm | हरकाम्या

माझ्या कामाच्या वेळा ह्या वेगवेगळ्या असल्याने माझ्यावर असले अत्याचार सहन करण्याची वेळ येत नाही.
पण माझी एक सुप्त इछा आहे की या सर्व मंडळींना एकदा " जोड्याने " मारावे.( निर्माते आणि चॅनेलचे अधिकारी यांच्यासकट )

क्रान्ति's picture

23 Apr 2009 - 11:17 pm | क्रान्ति

माझ्याकडे टीव्ही फक्त बातम्या [त्याही निवडक, सीरिअल टच नसलेल्या] आणि ऍनिमल प्लॅनेट पहाण्याकरताच लावला जातो. सारेगमप लिटल चाम्प्स सोडली, तर बाकी प्रकारांबाबत आम्ही बरेच अज्ञानी आहोत! मालिकांची तर नावंही माहिती नसतात. अशा वेळी कुणा मालिकाळलेल्या [?] महिलामंडळात जायची वेळ आली, तर आम्ही आपले मूक-बधिर होतो! मालिकांचा वेळ मिपासाठी राखून ठेवणं मला जास्त योग्य वाटतं. अर्थात शेवटी ज्याची त्याची मतं!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

नंदा's picture

24 Apr 2009 - 2:06 am | नंदा

गेल्या दहा-बारा वर्षांतल्या माझ्या वार्षिक भारतभेटींमधे हळू हळू आई-वडिलांचा (दोघेही सेवानिवृत्त, सत्तरीच्या पुढचे, घरात दोघेच) संध्याकाळचा टीव्हीवर सिरियल्स पाहत बसण्याचा असा बदलत चाललेला (मी एक्क्याणवच्या सुमारास भारत सोडला) दिनक्रम लक्षात येऊ लागला. सुरवातीला नव्याची नव्हाळी म्हणून मीपण आई-बाबांसोबत या सिरियल्स बघून पाहिल्या. पण लक्षात आले की अमेरिकेत साधारणपणे दुपारच्यावेळी (आपल्याकडची वामकुक्षीची, किंवा जेवेणे आटोपून, सगळी झाकपाक करून गृहिणींची जरा लवंडण्याची वेळ) जे सोप ऑपेरे येतात त्या धर्तीच्या या मराठी वाहिन्यांवरच्या संध्याकाळच्या सिरियल्स आहेत आणि यांचा प्रेक्षक हा प्रामुख्याने महिलावर्ग आहे. हे अमेरिकेतल्या सोप ऑपेरांसारखेच झाले. मग लक्षात आले की शिळोप्याच्या गप्पा, माजघरातली कुजबुज, गॉसिप हा बायकांचा जरा कामाचा ताण सैल करण्याचा, तिसरीच्यावर बारीकसारीक टीका करत आपण दोघींची मैत्री घट्ट करण्याचा जो जुनाच आणि जागतिक प्रकार आहे त्याचा हे सोप ऑपेरे किंवा सिरियल्स हा आधुनिक अवतार आहे. भारतात असे वर्षानुवर्षे चालत असलेले सोप ऑपेरे संध्याकाळी - म्हणजे साधारणपणे कामावर गेलेला पुरूष संध्याकाळी घरी असतो आणि त्याला बहुतेक बातम्या, खेळवार्ता, किंवा तत्सम पुरूषी गॉसिप हवे असते तेंव्हा का दाखवतात? कारणे अशी असू शकतीलः

- पुर्वी दूरदर्शनवर येणार्‍या हमलोग, बुनियाद वगैरे सोप ओपेरा सारख्याच पण जरा वास्तवदर्शी आणि अधिक आशयसमृद्ध असणार्‍या संध्याकाळच्या कार्यक्रमांनी हा पायंडा पाडला असावा. दूरदर्शनच्या या काळात कार्यक्रमांच्या 'सभा' असायच्या. संध्याकाळची सभा ही प्राईमटाईम! दूरदर्शनच्या एकाधिकारशाहीच्या त्या जमान्यात दूरदर्शनकडे जे काही मनोरंजनात्मक, नाट्यपूर्ण कार्यक्रम असायचे ते बातम्यांसह ('प्रधान मंत्री <रिकामी जागा भरा> गांधीने आज <रिकामी जागा भरा> प्रकल्प का उद्बघाटन किया' - पण आजकालच्या एकमेकींच्या झिंज्या ऊपटणार्‍या बायका बातम्या म्हणून दाखवल्या जातात त्यापेक्षा जरा बर्‍या) संध्याकाळच्या या वेळातच दाखवले जायचे. त्यामुळे दूरदर्शनकडून नकळत हा पायंडा पडला असावा.

- आजकाल पूर्णवेळ गृहिणी असलेल्या महिला कमीच! वाहिन्यांवरून मध्यमवर्गीयांच्या गरजा (असलेल्या आणि निर्माण केलेल्या) पूर्ण करणार्‍या घरगुती उत्पादनांच्या ज्या जाहिराती दाखवल्या जातात त्या उत्पादनांच्या खरेदीच्या निर्णयांत घरातील महिलांचा मोठा वाटा असतो. या महिला जर फक्त संध्याकाळीच घरी असणार, तर त्याचवेळी त्यांना आवडणार्‍या सिरियल्सही आणि त्यांमधे(मधे) येणार्‍या घरगुती उत्पादनांच्या जाहिरातीही दाखवल्या जाणार. पण मार्केट रिसर्च आणि त्यानुसार प्रेक्षकांना हवे ते नेमेके देणार्‍यांत आणि देत असतांना नेमक्या जाहिराती पेरणार्‍यांत आघाडीवर असणार्‍या अमेरिकी वाहिन्या (एक 'डेस्परेट हाउसवाईव्हज' अपवाद वगळता) असे का करत नाहीत? गंमत म्हणजे अमेरिकेतच दाखवल्या जाणार्‍या स्पॅनिश वाहिन्या, ज्यांचा प्रेक्षक हा साधारणपणे कामगार वर्गातील हिस्पॅनिक वंशाचा आहे, मराठी वाहिन्यांप्रमाणेच संध्याकाळी सोप ऑपेरे दाखवतात!

पाखरे उडून गेलेल्या माझ्या आई-बाबांच्या घरात, कदाचित रोज नित्यनेमाने भेटीला येणार्‍या या सिरियल्स आणि त्यांतली खरीखोटी पात्रे आईसाठी एक खात्रीलायक विरंगुळा, आणि उतारवयातल्या एकटेपणावर मात करण्याचा तिचा उपाय असावा म्हणून मी तिला 'या निर्बुद्ध सिरियल्स पाहण्याऐवजी काही चांगले पाहात जा, वाचत जा' म्हणण्याचा नाद सोडून दिला. कदाचित डिस्कव्हरी चॅनलवरच्या एकमेकांना ओरबाडून खाणार्‍या प्राण्यांपेक्षा तिला फिल्मी पार्श्वसंगीताच्या शिमग्यात एकमेकींकडे खाऊ की गिळू अश्या नजरांनी पाहणार्‍या चमक-धमक स्त्रिया अधिक जवळच्या वाटत असाव्यात! बाबा तिच्यासोबतीला म्हणून टीव्हीवर जे काय येइल ते दुसरा टीव्ही असलातरी मुकाट पाहणार! मला का ते कळायचे नाही. मग सिऍटलभागात राहणार्‍या एका गोर्‍या अमेरिकन मित्राच्या वृद्ध आई-वडिलांच्या घरी एक गंमतशीर प्रकार पाहिला आणि मला माझे उत्तर मिळाले. मित्राच्या आई-वडिलांच्या बैठकीत बाजूबाजूला ठेवलेले दोन टीव्ही होते. मी विचारले 'असे का?'. मित्र म्हणाला, 'अरे इतक्या वर्षांच्या सहवासानंतर त्या दोघांना घरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी बसून टीव्ही पाहायला आवडत नाही. पण आपल्याला आवडेल तोच कार्यक्रम पाहिल हा आडमुठेपणा पण आहे. मग डॅड त्यांना आवडतात ते कार्यक्रम त्यांच्या बाजूच्या टीव्हीवर हेडफोन्स लावून पाहतात, आणि मॉम त्याच सोफ्यावर दुसर्‍या टोकाला बसून तिच्या टीव्हीवर तिच्या आवडीचे कार्यक्रम पाहते!'.

अनुप कोहळे's picture

24 Apr 2009 - 2:11 am | अनुप कोहळे

पाखरे उडून गेलेल्या माझ्या आई-बाबांच्या घरात, कदाचित रोज नित्यनेमाने भेटीला येणार्‍या या सिरियल्स आणि त्यांतली खरीखोटी पात्रे आईसाठी एक खात्रीलायक विरंगुळा, आणि उतारवयातल्या एकटेपणावर मात करण्याचा तिचा उपाय असावा

100% सहमत

अ. को.

भाग्यश्री's picture

24 Apr 2009 - 4:00 am | भाग्यश्री

तुमचा प्रतिसाद पटला..
आपल्याला ते पटत नसले तरी त्यांच्यासाठी तो विरंगुळा असू शकतो हे मात्र खरं!
माझी आई, ऑफीस मधल्या डबा खायच्या गृपबरोबर रोज डिस्कस करते.. या सिरियल मधे काय चालूय.. सारेगमपचं काय वगैरे.. मला ते गॉसिपिंग नेहेमीच बोर वाटतं आणि बर्‍याच सिरिअल्स कंटाळवाण्या..!
पण ज्यांच्या आयुष्याची घडी अगदी इस्त्रीने करावी अशी बसली आहे, ज्यांचे रूटीन गेले अनेक वर्ष, व पुढचे अनेक वर्ष असंच सेम सेम असणारे, त्यांच्यासाठी ते सतत काहीतरी हॅपनिंग असणारे कार्यक्रम, सिरिअल्स म्हणजे खरंच विरंगुळा असतो.. नाहीतर रोज काय असं वेगळं घडतं आपल्या आयुष्यात, जेव्हढं सिरिअल्समधे घडतं!?? :)

www.bhagyashree.co.cc

अनुप कोहळे's picture

24 Apr 2009 - 2:04 am | अनुप कोहळे

ह्या मालिका जर आठवड्यातून एकदा जरी बघीतल्या तरी सगळे कथानक कळते. त्यामूळे, एखाद दोन एपिसोड जरी नाही बघीतले तरी चालतात.

अ.को.

अमोल केळकर's picture

24 Apr 2009 - 1:09 pm | अमोल केळकर

आपल्या अ-मोल विचारांशी सहमत
अमोल
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

महेश हतोळकर's picture

24 Apr 2009 - 12:16 pm | महेश हतोळकर

रीमोट कंट्रोल आपल्याच हातात असतो हो.