मिसळ्पावच्या सर्व खवय्यांना/सभासदांना नमस्कार!

नितिन बोरसे's picture
नितिन बोरसे in काथ्याकूट
3 Apr 2009 - 7:45 pm
गाभा: 

मिसळपाव हे मला मिळालेल विशेष आणि आवडीच ठिकाण आहे,कारण एखाद्या मुसाफीराने पूर्ण शहर हॉटेलमध्ये जेवणासाठी पालथ पाडाव आणि दूर कुठून तरी खमंग मिसळपावचा वास येउन मनाची ओढ तिकडे जायला भाग पादावी. पेपर रोजच वाचले जातात, बातमी देखील रोज नवीन परंतू कोठल्याही बातमीची पूर्तता नाही, अफजलची केस निकालात लागेपर्यंत कासाब कोर्टात हजर होतोय, अफजलच पुढे काय याची छोटी बातमी देखील येत नाही.....कारण निवडणूका आल्यात बातम्यांना जागा पूरणार कोठून?
आज एवढच सांगेन मिसळपाव खा आणि फ्रेश व्हा!!!

प्रतिक्रिया

प्राजु's picture

3 Apr 2009 - 8:27 pm | प्राजु

:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नितिन बोरसे's picture

9 Apr 2009 - 9:16 pm | नितिन बोरसे

माझी मिसळपावची पहिली प्रतिकिया सर्वव्यापी प्राजूसाठी!
स्वागताबद्द्ल आभारी आहे!
तुझ्या (तुझ्याचना!) कविता खूप आवडल्या
बोलत राहू!

हरकाम्या's picture

3 Apr 2009 - 9:52 pm | हरकाम्या

नितिनभाउ माझेदेखील तुझ्यासारखेच झालेले आहे रोज कमीतकमी एकदातरी या हाटेलात मिसळपाव चाखल्याशिवाय
चैन पडत नाही. बर्याचवेळा मी माझी सेकंड शिफ्ट पुर्ण झाल्यानंतर रात्री घरी आल्यानंतर या हाटेलात बसलेलो असतो.

नितिन बोरसे's picture

9 Apr 2009 - 9:21 pm | नितिन बोरसे

मित्रा! आजच आयुष्यच सिफ्ट मधल झालय!
तरी तुमचे बर कामावरून आले तरी मित्रांना प्रतिक्रिया पाठविण्यास विसरत नाही!
विचारांची देवाण घेवाण करत राहू!

नीलकांत's picture

4 Apr 2009 - 12:08 am | नीलकांत

नितीन तुमचं स्वागत आहे.

अश्या अनेक विषयांवर येथे बोलता येईल.

नीलकांत

नितिन बोरसे's picture

9 Apr 2009 - 9:27 pm | नितिन बोरसे

धन्यवाद !
मला वेळ मिळेल तसे मी लिहणार व वाचणार आहे तुमच्याकडून!

भडकमकर मास्तर's picture

4 Apr 2009 - 5:39 am | भडकमकर मास्तर

स्वगृह पहाच पण आता खरडवह्यांचाही अभ्यास करायला सुरुवात करा.
हजर सभासद असतात त्यांच्या खरडवह्या वाचा.
या अभ्यासातूनही संकेतस्थळाविषयी आणि सभासदांविषयी पुष्कळ माहिती मिळेल.
....
भरपूर वाचा आणि मग लिहा लेख...
आपले मिपावर स्वागत आणि शुभेच्छा.. :)

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

दशानन's picture

4 Apr 2009 - 7:36 am | दशानन

>>हजर सभासद असतात त्यांच्या खरडवह्या वाचा.

सहमत.

मिपाच्या एतिहासीक खरड वही असे लिहायला हवे होते ;)

स्वागत आहे बंधू !

नितिन बोरसे's picture

9 Apr 2009 - 9:33 pm | नितिन बोरसे

अजून भरपूर लिहायचे आहे!
आपल्या सुचनेचा विचार केला जाईल.

नितिन बोरसे's picture

9 Apr 2009 - 9:31 pm | नितिन बोरसे

धध्न्यवाद सर !
तुमच्या स्वागताबद्दल आणि मर्गदर्शनाबद्द्ल!

नितिन बोरसे's picture

9 Apr 2009 - 9:36 pm | नितिन बोरसे

तळ्यावर बसून कविता लिहन खूप सोप्प असत जरा पाण्यात उतरून बघा!
भेटत राहू!