कविता.

विवेकवि's picture
विवेकवि in जनातलं, मनातलं
30 Jan 2008 - 12:37 pm

मैत्री ठरवून होत नाही हाच मैत्रीचा फ़ायदा आहे,

मैत्रीला कुठले नियम नाहीत हा मैत्रीचा पहिला कायदा आहे....

मैत्रीची वाट आहे कठिण पण तितकीच छान आहे,

आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....

मैत्रीमध्ये जरुरी नाही दररोजची भेट,

ह्रदयाचा ह्रदयाशी संवाद असता थेट....

तुझी मैत्री म्हण्जे आयुष्याचा ठेवा,

मुखवट्यांच्या गर्दीमधला खात्रीचा विसावा .......................

माझी स्वताची कविता.

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

30 Jan 2008 - 12:58 pm | विसोबा खेचर

आयुष्याच्या कुडीचा मैत्रीच तर प्राण आहे....

वा! मिनूताई, तुमची कविता छान आहे. मिपावर स्वागत. अजूनही अश्याचा छान छान कविता येऊ द्या, ही विनंती...

अवांतर -

मिनूताई, कृपया हे वाचावे!

धन्यवाद,

आपला,
(मराठी) तात्या.