✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

ही चव कधी घेतलीत?

अ
अनंत छंदी यांनी
Tue, 02/03/2009 - 21:17  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5680 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

माहिती चांगली दिलीत.

प्राजु
Tue, 02/03/2009 - 23:17 नवीन
एखाद्या घरगुती खानावळीचा(तुमच्या माहितीतली) पत्ता तरी द्यायचा ना. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

वा!

नाटक्या
Tue, 02/03/2009 - 23:52 नवीन
अनंत छंदी, लाजवाब. कर्ली/मांदेली माशाची आठवण काढलीत. नुसत्या आठवणीनेच तोंडाला पाणी सुटले. अमेरिकेत हे मासे मिळत नाही ना, काय करणार!! आता भारतात आल्यावर गणपतीपुळ्याची एक तरी चक्कर होईलच तेव्हा बघू. कोंबडी-वडे हा तर माझा जीव कि प्राण, आमच्या घरी हे मात्र नियमित होत असते. प्राजूताई म्हणतात त्या प्रमाणे एखादी घरगुती खानावळ सुचवलीत तर छानच.. - नाटक्या
  • Log in or register to post comments

+१

लवंगी
Wed, 02/04/2009 - 01:15 नवीन
सहमत..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नाटक्या

वा! वा!

शोनू
Wed, 02/04/2009 - 03:18 नवीन
कर्ली अन मांदेली ची आठवण करुन दिलीत! नुस्तंआठवून सुद्धा बरं वाटलं. ओला कोलीम म्हणजेच ओला जवळा ना ? ( ज्याला सुकवलं की सुकट म्हणतात ?) त्याच्या पकोड्यांची कृती हवीये. अन शिंपल्यांच्या सुद्धा पारंपारिक कृती चालतील. मी इथे क्वचित सुरमईच्या नाहीतर बांगड्याच्या कालवणात थोड्या शिंम्पल्या घालते. बाकी प्रकार करायला आवडेल.
  • Log in or register to post comments

दोनच महिन्यांपूर्वी

संदीप चित्रे
Wed, 02/04/2009 - 03:56 नवीन
त्या भागात जाऊन मनसोक्त मासे खाल्ले.... आता हा लेख वाचून पुन्हा एकदा जावंसं वाटतंय. करलीबद्दल(ही) सहमत :)
  • Log in or register to post comments

चव घेतली आहे !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 02/04/2009 - 07:41 नवीन
मुरुडला गेलो तेव्हा एका घरगुती खाणावळीत जेवलो आहे. आमच्यातल्या एका जाणकाराने कोळंबी आणि काही मासे घेतले, संबधीत कुटूंबियांनी ते बनवले. जेवण होईपर्यंत त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या. तसे एकतर खार्‍या पाण्यातील माश्यांशी आमची फारकत असल्यामुळे, केवळ भूक लागलेली असल्यामुळे जेवण पोटात ढकलले. बाकीच्यांनी ते जेवण असे सुतले की विचारु नका ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

मस्त

सुनील
Wed, 02/04/2009 - 07:46 नवीन
मस्त लेख! या ताज्या माशांची चव एकदा घेतलीत तर पुण्यामुंबईत मिळणारे बर्फातील मासे खाण्याची आपणाला फारशी इच्छाच होणार नाही. का जखमेवर मीट चोळताय? आता वारंवार त्या भागात जाणं जमणार आहे का? दुधाची तहान ताकावर, नाही का? आपण खरे दर्दी मासेखाऊ असाल तर कर्लीसारखा जास्त काटे असलेला परंतु भलताच चवदार मासा निवडाल. +१ सहमत. कर्ली, तारली, काटेरीला उभ्या जगात तोड नाही! संध्याकाळी सोनेरी वारुणीची चव घेताना त्या सोबत चखणा म्हणून फ्राय कोलंबी खाण्यापेक्षा कुरकुरीत मांदेली किती छान लागते हे शब्दात सांगून कळणार नाही. ;) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

आयायाया...

केवळ_विशेष
Wed, 02/04/2009 - 11:23 नवीन
कर्ली आणि मांदेलीच्या आठवणीने पाणी सुटलय तोंडाला... च्या य ला शर्ट भिजला की राव... सकाळी सकाळी हापिसात आल्या आल्या हा लेख वाचला... आता आज खाल्ल्याशिवाय तळीराम शांत होणे केवळ अ श क्य :)
  • Log in or register to post comments

+१

दशानन
Wed, 02/04/2009 - 11:31 नवीन
मी मागे जेव्हा गेलो होतो, गोव्यावरुन सांवतवाडीच्या पुढे एक गाव आहे छोटेसे तेथे घरगुती पध्दतीचे मासाहारी जेवण मी व माझ्या उत्तर भारतीय मित्रांनी केले ! अक्षरशः ते पागल झाले होते त्या जेवणाची चव व थाट बघून ! आता पुन्हा फक्त जेवनासाठी म्हणून कोकण सहलीचा घाट घातला आहे ;) ******* शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं, काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात ! फक्त होकार च नाही तर, प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
  • Log in or register to post comments

मजा चख लो यार!

अनंत छंदी
Wed, 02/04/2009 - 12:02 नवीन
प्राजू, नाटक्या, लवंगी,सोनू. संदीप, बिरुटे सर, सुनील, केवळ विशेष आपण सर्वांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रियांबद्दल आभार! प्राजूताई, नाटक्याजी, लवंगीताई आपल्या सूचनेप्रमाणे त्या भागातील छानशा घरगुती खाणावळींची माहिती लवकरच टाकतो सोनूजी, करेक्ट! ओला कोलीम म्हणजेच जवळा. त्याच्या पकोड्यांची पा.कृ. ही लवकरच देतो. बिरुटे सर, काय? आपण समुद्रातले मासे खात नाही? छ्या, म्हणजे तुमचे जीवन व्यर्थ हो.. :) केवढ्या मोठ्या जिव्हानंदाला मुकताय माहीत आहे? =)) सुनीलजी आणि केवळ विशेषजी तुमच्या मत्स्यप्रेमाला सलाम! संदीपजी आपल्या बोंबील आख्यानाच्या आपणतर बुवा प्रेमात आहोत. :) राजे, मजा चख लो यार! सावंतवाडी, गोव्यापेक्षा या भागातील सागरकिनारे कमी गजबजलेले, शांत आहेत जरूर भेट द्या.
  • Log in or register to post comments

जिव्हानंद..व्यक्तीसापेक्ष :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/05/2009 - 07:59 नवीन
बिरुटे सर, काय? आपण समुद्रातले मासे खात नाही? छ्या, म्हणजे तुमचे जीवन व्यर्थ हो.. केवढ्या मोठ्या जिव्हानंदाला मुकताय माहीत आहे? खा-या पाण्यातील माश्यांची सुरुवात केली आहे, ती पापलेट पासून. तसेच चखण्याला खेकडेही चाखून झाले आहेत (फ्राय). हळुहळु मांदेलीकडे वळू...खाण्याच्या बाबतीत कोणतीच कसर राहू नये, त्याची काळजी घेतोच. पण, गोड्या माश्यांचे काय कवतुक सांगू साहेब ! फार अपवाद असेल की जे मासे आम्ही खाल्ले नाही. उसकी बाते फीर कभी ! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंत छंदी

समुद्रातल्या माशापेक्शा

दवबिन्दु
Wed, 02/04/2009 - 13:40 नवीन
नदितले मासे जास्त छान लागतात, चिन्गळ्या पण.
  • Log in or register to post comments

मस्त !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 02/05/2009 - 08:14 नवीन
>>चिन्गळ्या पण. मस्त ! जालावर अशी गावाकडच्या शब्दांची कोणी आठवण दिली की खूप बरं वाटतं ! आम्हाला पण 'चिंगळ्या'* लै आवडतात ! शब्दार्थः *चिंगळ्या= नदीतील बारके ( लहान) मासे. -दिलीप बिरुटे (गावाकडचा)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दवबिन्दु

वा!

चाणक्य
Wed, 02/04/2009 - 14:13 नवीन
नुकतंच जेवण करून मि.पा. वर बसलो. हा लेख वाचला आणि पोटभर जेवण झालं असतानाही तोंडाला पाणी सुटलं. वास्तविक आमच्या घरातले सर्वजण शाकाहारी, पण मी कोकण भागात गेलो की घरगुती खाणावळीत मासे खाण्याची संधी सोडत नाही. माझ्या ईतर मासेखाऊ मित्रांकडून मिळालेल्या ऐकीव माहीतीच्या जोरावर मासे हाणतो. आणि अनंत छंदी म्हणाल्या प्रमाणे, कोकणातल्या शांत किनार्‍यांची मजा काही औरच....
  • Log in or register to post comments

कर्ली..

ढ
Wed, 02/04/2009 - 14:32 नवीन
कुडाळच्या जुन्या बसस्टँड समोरील एका गल्लीतल्या खाणावळीतील कर्ली राईस प्लेटचा स्वाद अजुनी रेंगाळतोय जिभेवर. अनंत छंदी साहेबांनी आठवण करून दिली. आभार.
  • Log in or register to post comments

हर्णै कट्टा.....

प्रभाकर पेठकर
Wed, 02/04/2009 - 15:02 नवीन
कोकणाचा चवदार फेरफटका झाला. फार सुंदर लिहीला आहे लेख. त्यातील खालील वाक्यांना आक्षेप असला तरी लिखाणा मागील सच्च्या भावना पोहोचल्या. पुण्यामुंबईत मिळणारे बर्फातील मासे खाण्याची आपणाला फारशी इच्छाच होणार नाही मुंबईत ताजे मासे मिळत नाहीत. ही माहिती मलातरी नवीन आहे. आमच्या दहिसरात (मुंबई ४०० ०६८) मी तरी अजून 'बर्फातले मासे' बघितले नाही. पापलेट, सुरमई, कोळंबी, शेवंड हे खरेतर पट्टीच्या मासेखाऊचे खाद्य नव्हेच. आपण खरे दर्दी मासेखाऊ असाल तर कर्लीसारखा जास्त काटे असलेला परंतु भलताच चवदार मासा निवडाल. संध्याकाळी सोनेरी वारुणीची चव घेताना त्या सोबत चखणा म्हणून फ्राय कोलंबी खाण्यापेक्षा कुरकुरीत मांदेली किती छान लागते हे शब्दात सांगून कळणार नाही. चव ही व्यक्ती सापेक्ष असते. अमुक एक माशाची चव म्हणजेच 'ब्येस्ट' आणि बाकिच्या मासे खाणार्‍यांना 'चव कळलीच नाही' 'ते पट्टीचे खाणारेच नाहीत' अशा अर्थाचे वक्तव्य अन्याय कारक आहे (खाणार्‍यांवरही आणि त्या माशांवरही). पापलेट फ्राय, सुरमई - बांङड्यांचे तिरफळे घालून केलेले झणझणीत कालवण, कोलंबी भात, बांगडा एरंगेळ, तिखलं, बोंबलाचं झणझणीत, खेकड्याचे तिखटजाळ कालवण, सुकटाची चटणी ह्या पदार्थांना चवच नाही? कर्ली आणि मांदेळी मीही भरपूर हादडली आहे. ते मासे चविष्ट आहेत ह्यात शंकाच नाही पण म्हणून इतर 'मत्स्य प्रकारांना' गौण लेखणे मल तरी पटत नाही. हर्णैच्या घरगुती खानावळीच्या पत्त्याच्या प्रतिक्षेत आहे. मिपाचा एक छानसा कट्टा जमवूया शनिवार-रविवार जोडून. भरपूर माझे हादडू, शनिवार रात्र 'एन्जॉय' करू. ('एन्जॉयमेन्ट्'ची व्यवस्था मी करतो.) रविवार सकाळ 'बोनस' मासे आणि चर्चासत्र (अनुपस्थितांच्या उखाळ्यापाखाळ्या) आणि संध्याकाळी रहाटगाडग्यास परत. काय म्हणता? (सखाराम्_गटण्यांकडे नांव नोंदणी सुरू आहे.)
  • Log in or register to post comments

+१

सुनील
Wed, 02/04/2009 - 15:17 नवीन
मिपाचा एक छानसा कट्टा जमवूया शनिवार-रविवार जोडून. भरपूर माझे हादडू, शनिवार रात्र 'एन्जॉय' करू. सहमत. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सहमत प्रभाकरकाका

संदीप चित्रे
Wed, 02/04/2009 - 20:39 नवीन
'मासे' म्हटलं की दुजाभाव करू नये... सगळे चविष्ट असतात !! आम्ही ऑक्टोपसही आवडीनं खातो :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

>>(सखाराम्_ग

सखाराम_गटणे™
Wed, 02/04/2009 - 15:22 नवीन
>>(सखाराम्_गटण्यांकडे नांव नोंदणी सुरू आहे.) ठिक आहे. येउ द्या नावे
  • Log in or register to post comments

धन्यवाद..

प्रभाकर पेठकर
Wed, 02/04/2009 - 15:25 नवीन
धन्यवाद गटणे साहेब. पहिलं नांव माझं.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

रागावू नका ब्वॉ!

अनंत छंदी
Wed, 02/04/2009 - 16:04 नवीन
पेठकरशेठ नमस्कार तुम्ही फारच मनाला लावून घेता ब्वॉ! अहो >>पट्टीच्या मासेखाऊचे खाद्य नव्हेच. आपण खरे दर्दी मासेखाऊ असाल तर कर्लीसारखा जास्त काटे असलेला परंतु भलताच चवदार मासा निवडाल. ही वाक्ये दर्दी खवय्यांचा अवमान करण्यासाठी लिहीलेली नाहीत तर सर्वसामान्यपणे खवय्यांच्या नजरेतून सुटलेल्या गोष्टी नजरेस आणण्यासाठी लिहिलेली आहेत. असे करताना काहीशी सरस निरस तुलना करणेही आवश्यक असते. नाही का? तेव्हा रागावू नका बुवा. नाहीतर घशाखाली घास कसा उतरणार आमच्या? :)) आणि हो , दहीसरात ताजे मासे मिळत असतील कदाचित. पण त्यांच्या आणि येथील माशांच्या चवीत जरा फरक आहे. मुंबई भोवतालचा प्रदूषित समुद्र हे त्याचे कारण असावे का हा मला पडलेला प्रश्न आहे.
  • Log in or register to post comments

समृद्ध कोकण...

प्रभाकर पेठकर
Wed, 02/04/2009 - 23:16 नवीन
तुम्ही फारच मनाला लावून घेता ब्वॉ! असेलही. कारण तुम्ही 'हलकेच घ्या' असा सल्ला दिला नव्हतात. बेधडक विधाने मनाला लागतात हे बाकी खरे (मुद्दाम लावून घ्यावे लागत नाही). असो. चव ही व्यक्ती सापेक्ष असते. तुम्हाला कर्ली आणि मांदेळी सर्वश्रेष्ठ वाटत असेल तर माझा आक्षेप नाही. (कुणाचाच नसावा.) पण इतरांना 'खरे दर्दीच नाहीत' असे संबोधणे भावले नाही. राग नसावा. तुमच्या सारखे 'दर्दी' आणि माझ्या सारखे 'बेदर्दी' ह्यांचा कट्टा ठरवा हर्णैत आणि ज्यांना जे हवे ते खाऊन आनंद मिळवू द्या. मी 'कर्ली' आणि 'मांदेळी' पुनःपुन: ताव मारून खाईन एवढी खात्री असू द्यावी. दहीसरात ताजे मासे मिळत असतील कदाचित. पण त्यांच्या आणि येथील माशांच्या चवीत जरा फरक आहे. मुंबई भोवतालचा प्रदूषित समुद्र हे त्याचे कारण असावे का हा मला पडलेला प्रश्न आहे. हे बाकी खरेच. मुंबईकरांना प्रदूषित समुद्रातील बेचव मासेही खावे लागतात आणि असे प्रदुषण विरहीत संमृद्ध कोकण सोडून मुंबईकडे धाव घेणार्‍या कोकणवासीयांच्या मनोवृत्तीचे आश्चर्यही वाटते. निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनंत छंदी

वेगळा विषय

सुनील
गुरुवार, 02/05/2009 - 09:14 नवीन
असे प्रदुषण विरहीत संमृद्ध कोकण सोडून मुंबईकडे धाव घेणार्‍या कोकणवासीयांच्या मनोवृत्तीचे आश्चर्यही वाटते. हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. असो, गटण्या, माझं नावपण यादीत टाक बरं का! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सहमत.

गोमट्या
गुरुवार, 02/05/2009 - 10:22 नवीन
हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. सहमत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

>>असो,

सखाराम_गटणे™
गुरुवार, 02/05/2009 - 10:26 नवीन
>>असो, गटण्या, माझं नावपण यादीत टाक बरं का! ड्न
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुनील

कोकणांत

लिखाळ
Wed, 02/04/2009 - 23:25 नवीन
कोकणांत गेल्यावर घरगुती खाणावळीत मासे खाण्याचा आनंद वेगळाच. मी प्रथमच बांगडा खल्ला तो कणकवलीमध्ये. आवडला. त्यानंतर मित्रांच्या सल्ल्याने काही पदार्थ खाल्ले. बाजारातून सर्वांसाठी शिंपले/ल्या आणून त्याचा पदार्थ बनवून घेतला होता ते आठवले. बाकी माझा मत्स्याहारानुभव बेताचाच.. कोकणात गेलो असताना केलेली ही मजा आठवली.. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा