इ.स. २१७९ - लॉस अँजलिसवर परग्रहवासीयांचा हल्ला

घाटावरचे भट's picture
घाटावरचे भट in कलादालन
31 Jan 2009 - 10:08 am

परवा ग्रिफिथ ऑब्झर्व्हेटरी नावाच्या एका जागेवरून लॉस अँजलिस डाऊनटाऊनचा फोटो काढला. त्या फोटोवरून मला ही कल्पना सुचली. मूळ फोटो आणि संपादित केलेला फोटो खाली देत आहे. संपादनासाठी जिंप ही मुक्तस्रोत प्रणाली वापरली आहे. कृपया आपले अभिप्राय कळवावेत.

मूळ चित्र -

बदल केलेले चित्र -

-भटोबा

कलाछायाचित्रणस्थिरचित्र

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

31 Jan 2009 - 10:10 am | आनंदयात्री

असे वाटले की परग्रहवासी विज चोरुन नेतायेत !!

बोका's picture

31 Jan 2009 - 11:11 am | बोका

>>असे वाटले की परग्रहवासी विज चोरुन नेतायेत !!
=))

नीट बघा, यानात परग्रह वासी नसून, वीजटंचाईग्रस्त महाराष्ट्राचे नागरीक आहेत का ?

बाकी, भटांचे काम सुरेख !

लिखाळ's picture

31 Jan 2009 - 11:23 pm | लिखाळ

भटोबा,
दोन्ही चित्रं छान.

असे वाटले की परग्रहवासी विज चोरुन नेतायेत !!
हा हा .. हे ही मस्त :)
-- लिखाळ.

यशोधरा's picture

31 Jan 2009 - 10:11 am | यशोधरा

झकास!

पिवळा डांबिस's picture

3 Feb 2009 - 12:08 am | पिवळा डांबिस

(प्रतिक्रियांची लाइन खूप मोठी आंसा म्हणान रांग तोडून मधेच घुसलंय याबद्दल एस डबल ओ आर ई!!!)
रे मेल्या भटोबा,
काय तुका अवदसा आठवली ही....
निदान शहर तरी कुठला दुसरां निवडूचांस!!!!!
आदीच लासएंजेलिसात काय कमी उत्पात म्हणान ही द्रिष्ट लावतंय?
आता आणिक येक काम कर...
या हल्ल्यात भस्मसात झालेल्या मयंक आणि डांबिसकाकाचे पण फोटो छाप!!!!!
नाय ते धंदे करता, वशाड मेलो!!!
:)

निवेदनः
आमची आणि यशोधरेची ३० जानेवारी २००९ रोजांक अशी पैज लागलेली आंसा की आमी दोघां यापुढे मिपावर फक्त कोकणी/ मालवणीत्सूनच बोलतोलोंव! तेंव्हा समस्त मिपाकरहो, कृपा करून समजान घ्या! आणि ती यशोधरा जर कोकणीखेरीज इतर भाषेत गजाली करतांना दिसली तर माकां कळवा

घाटावरचे भट's picture

3 Feb 2009 - 6:30 am | घाटावरचे भट

काकानु, साल २१७९ आहे....तोपर्यंत आपले फक्त फोटोच उरले असतील. राहिले काय जळून गेले काय, काय फरक पडतो? ;)

पिवळा डांबिस's picture

3 Feb 2009 - 10:39 am | पिवळा डांबिस

असां काय? मग ठीक आसां...
बरो नॉस्ट्रॅडेमस की रे तू!!!!!
:)

घाटावरचे भट's picture

3 Feb 2009 - 10:51 am | घाटावरचे भट

कसचं कसचं.... ;)

दशानन's picture

31 Jan 2009 - 10:12 am | दशानन

मस्तच !
छान प्रयोग आहे... मी पण फोटो शॉप वर काय तरी उचापती करत बसतोच नेहमी !

अजून थोडी प्रखरता दाखवू शकला असता असे मनातून वाटले... जो आगडोंब उसळायला हवा तो व्यवस्थीत व्यक्त होत नाही आहे....

*******

वाटते खरडावे इतके की कंटाळा तुला यावा
वाचता वाचता एकाएकी तोल तुझा जावा
धुमसत संतापाने लाखोली तू मला वहावी
त्या शिव्यांची ती खरड मी
जणू स्मृतीचिन्हांपरी जपावी -

सहज's picture

31 Jan 2009 - 10:15 am | सहज

भविष्यात शिलालेखायत्री, दुर्बीटणे, अवलिया आपल्या हापीसातुन टिपी करत आहेत याचे यथार्थ चित्रण भटोबांनी केले आहे.

अतिअवांतर - कलाकुसर आवडली भटोबा.

आनंदयात्री's picture

31 Jan 2009 - 10:17 am | आनंदयात्री

व्यक्तिगत प्रतिसाद !!
मुळ कलाकृतीबद्दल काहीही न लिहता लेखकाने व्यक्तिगत टिप्पण्या केल्या आहेत. :D

बाकी चित्र आवडले भटोबा. (म्हणजे आता हा प्रतिसाद अवांतर नाही)

अघळ पघळ's picture

31 Jan 2009 - 10:34 am | अघळ पघळ

अतीअवांतर वाचले नाहीत का लांडगोबा? ;)

अघळ पघळ

अश्वत्थामा's picture

31 Jan 2009 - 1:55 pm | अश्वत्थामा

बर्‍याच दिवसांनी दिसलास रे हांडगोबा! ;)

अश्वत्थामा

अवलिया's picture

31 Jan 2009 - 10:59 am | अवलिया

च्यामारी... आमच्या मागचे तीन तिळाचे लाडु दिसले नाही का पाध्यांनी फेकलेले? बघा नीट.

अवांतर - भटोबा मस्त.

--अवलिया

काय तुम्ही संपर्कासाठी व्यनी वापरता? खव नाही? अरेरे!!! मग मिपाच्या गुढ इतिहासात कशी भर टाकणार?
व्यनी सोडा खव वापरा.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

2 Feb 2009 - 4:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

सहजकाकांचा निशेद. व्यक्तीगत उल्लेख केल्याबद्दल आणि तेही मी फक्त हापिसातूनच टीपी करते अशा अर्थाचं काहीसं लिहिल्यामुळे.

भटोबा, आज तुमच्याशी मैत्री केल्याचा सार्थ अभिमान वाटला ... झ का स

मैत्रीण अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

बोका's picture

31 Jan 2009 - 11:12 am | बोका

प्र का टा आ

नंदन's picture

31 Jan 2009 - 1:49 pm | नंदन

दोन्ही फोटोज मस्त!

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

महेंद्र's picture

31 Jan 2009 - 6:16 pm | महेंद्र

जबरी काम केलंस गड्या...
चाबुक.. एकदम कडक!

टारझन's picture

31 Jan 2009 - 9:59 pm | टारझन

चौर्यकर्म ... हे चित्र आमचे परम मित्र "मयंक देव" ह्यांच्या लॅपटॉप वरून चोरण्यात आले आहे .. भटांचा णिषेध ..

असो .. थट्टा पुरे .. भटोबा ... कल्पणा मस्तच .. पण तु २१७९ हेच्च साल का णिवडलं ?आणि कितवा महिणा आहे ? (गैर अर्थ णकोय) ... आणि रात्रीच्या किती वाजता झालाय हल्ला ? ह्याच्या डिटेल्स द्याव्यात .

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jan 2009 - 11:43 pm | बिपिन कार्यकर्ते

भटा, चित्रं एकदम फट्याक...

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

1 Feb 2009 - 11:03 am | विसोबा खेचर

जबरा कारागिरी रे भटा‍!

घाटावरचे भट's picture

1 Feb 2009 - 11:31 am | घाटावरचे भट

सर्व प्रतिसाद देणार्‍यांचे मनापासून आभार.

- भटोबा

मुक्ता's picture

2 Feb 2009 - 6:04 am | मुक्ता

मला खुप आवडले.

संध्यानंदन's picture

2 Feb 2009 - 1:36 pm | संध्यानंदन

मी अहिंसावादी असल्याने दुस-या चित्रापेक्षा पहिले जास्त आवडले.

शंकरराव's picture

2 Feb 2009 - 4:03 pm | शंकरराव

व्वा भटा
दोन्ही चित्रं छान. :-)

वाटाड्या...'s picture

2 Feb 2009 - 11:45 pm | वाटाड्या...

संगीत गायन/वादन कला सोडुन इथे कुठे वळलास?? छायाचित्र सुरेख...त्याचं रुपांतरही.....बर्‍याच दिवसात तुझा संगीतावरचा लेख आला नाही?? कुठे आहेस??

चतुरंग's picture

3 Feb 2009 - 12:03 am | चतुरंग

चित्रावरची करामत लईच भारी केली आहेस की; फारच खटपट्या बुवा तू! :)

चतुरंग

प्राजु's picture

3 Feb 2009 - 12:06 am | प्राजु

मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

छोटा डॉन's picture

3 Feb 2009 - 7:15 am | छोटा डॉन

च्यामारी, तुम्हाला एवढं भारी कसं काय जमतं बॉ, अम्हाला साधं मिपावर फोटो चढवायचा म्हणजे देव पाण्यात घालुन बसावे लागतात.
एकदम क्लास जमले आहे एडिटिंग ...!
भटोबा फार हरहुन्नरी कलाकार आहेत ह्यात शंका नाही ...!
( ही झाली फॉर्मल प्रतिक्रीया ...)

अवांतर :
हे छायाचित्र पाहुन मनात काही प्रश्न आले आहेत, जमल्यास त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करावा ...!

१. सन २१७९ साली लॉस अँजलिस हे भारत देशातले एक राज्य म्हणुन ओळखले जात होते का ?
कारण इथे फक्त परग्रहवासियांचा हल्ला दिसतो आहे, त्याला पॄथ्वीवासियांनी दिलेले प्रत्युत्तर दिसले नाही. जर हा देश भारत असेल तर "निषेध खलिते" पाठविले आहेत असे समजुन घेणे तर्कसंगत आहे.

२. परग्रहवासियांच्या हल्ल्याचे लाईव्ह कव्हरेज करण्यासाठी आकाशात उडणार्‍या "मिडीयाच्या ओबी व्हॅन्स" का दिसत नाहीत ?
सदर प्रक्षेपणास त्या काळी कायद्याने बंदी घातली होती का ?

३. आख्ख्या फ्रेममध्ये एकही "राजकीय नेत्याच्या फोटोचे भव्य कट-आउट अगर होर्डिंग" दिसत नाही, जरी झुम लेव्हल कमी आहे असे मानले तरीही ही परिस्थीती असंभव आहे, किमान ८-१० तरी असायलाच हव्यात.
ह्यावरुन त्या काळी भारतात "आणिबाणी अथवा हुकुमशाही" होती असा तर्क निघु शकतो का ?

------
छोटा डॉन

घाटावरचे भट's picture

3 Feb 2009 - 7:30 am | घाटावरचे भट

१. सन २१७९ साली लॉस अँजलिस हे भारत देशातले एक राज्य म्हणुन ओळखले जात होते का ?
कारण इथे फक्त परग्रहवासियांचा हल्ला दिसतो आहे, त्याला पॄथ्वीवासियांनी दिलेले प्रत्युत्तर दिसले नाही. जर हा देश भारत असेल तर "निषेध खलिते" पाठविले आहेत असे समजुन घेणे तर्कसंगत आहे.

ही परिस्थिती कदाचित लॉस अँजलिसमधे भारतीयांची संख्या जास्त झाल्यामुळे असेल.

२. परग्रहवासियांच्या हल्ल्याचे लाईव्ह कव्हरेज करण्यासाठी आकाशात उडणार्‍या "मिडीयाच्या ओबी व्हॅन्स" का दिसत नाहीत ?
सदर प्रक्षेपणास त्या काळी कायद्याने बंदी घातली होती का ?

मीडियाच्या ओबी व्हॅन्स कदाचित जमिनीवरूनच कव्हरेज देत असतील. कॅमेरावर कितीही आम्ही जान की बाजी़ लावणारे असा आव आणला तरी मीडियावालेसुद्धा शेवटी *डूच.

३. आख्ख्या फ्रेममध्ये एकही "राजकीय नेत्याच्या फोटोचे भव्य कट-आउट अगर होर्डिंग" दिसत नाही, जरी झुम लेव्हल कमी आहे असे मानले तरीही ही परिस्थीती असंभव आहे, किमान ८-१० तरी असायलाच हव्यात.
ह्यावरुन त्या काळी भारतात "आणिबाणी अथवा हुकुमशाही" होती असा तर्क निघु शकतो का ?

इ.स २१७९ मधे इंटरनेटादि माध्यमांचा प्रसार आणि त्यांचा आयुक्षातला सहभाग एवढा वाढला असेल की कटाउट्स वगैरे लावायची गरजच नाही. इंटरनेटावरून नेत्याच्या जाहिरातींचा भडिमार केला की झालं (आजकाल आपल्या मराठी वाहिन्यांवर करतात तसा, मागे दुप्पट नायतर चौपट स्पीडला ऑडियो वाजवून), कसें?

मला आशा आहे की मी आपल्या सर्व शंकांचे समाधान केले आहे. प्रतिसादाबद्दल धन्यवाद. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Feb 2009 - 10:56 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

डॉन आणि भट यांच्या प्रश्नोतरांमुळे शॉल्लेट्ट धमाल आली.

=))

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.