प्रजासत्ताक दिन आणि सन्मान

तात्यालबाड's picture
तात्यालबाड in काथ्याकूट
26 Jan 2009 - 4:13 pm
गाभा: 

आज प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री, पद्मभूषण, अशोकचक्र आणि यांसारखे पुरस्कार प्रदान करण्यात आले. नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर बहुतेक सगळ्या शहिदांना मरणोत्तर अशोकचक्र देण्यात आले. पण शशांक शिंदे यांना मात्र यातून वगळण्यात का आले ? दुसरीकडे ऐश्वर्या राय, अक्षय कुमार यांना पद्मविभूषण देण्यात आले. या दोघांनी पद्मविभूषण मिळावे असे काय भरीव सामाजिक कार्य केले आहे ? निदान माझ्या तरी वाचनात नाही. ऐश्वर्या राय तर १) कान्स चित्रपट महोत्सवाला हजेरी लावणे, २) आयकर बुडवणे, ३) कमीत कमी कपडे घालून अंगप्रदर्शन करणे ४) कोटींच्या घरात पैसे घेऊन चित्रपट काढणे या व्यतिरीक्त काही करताना दिसत नाही. या लोकांना पद्मविभूषण देऊन सरकारने त्या पुरस्काराचा अपमान केला आहे. एकीकडे देशाकरता लढत वीरमरण पत्करणार्‍यांना आर्थिक मदत आणि शौर्य पुरस्कार प्राप्तीकरता सुद्धा लढावंच लागतं तर दुसरीकडे लायकी नसताना पुरस्कार मिळतो. सरकारने नेमका काय न्याय लावला हे पुरस्कार प्रदान करताना ? की अमरसिंगांनी त्यांचे वजन खर्ची घालून बच्चन कुटुंबातल्या सूनबाईंना हा पुरस्कार देववला ?
२६/११ नंतर मेणबत्त्या घेऊन शोक प्रकट करणार्‍या समस्तांना मला हे विचारावेसे वाटते की शशांक शिंदे यांना अशोकचक्र देण्याबाबत हे का नाही रस्त्यावर उतरत ? सहाजिकच आहे म्हणा, त्याकरता त्यांना कोणताही मोठेपणा मिळाला नसता, कोणतेही मिडीयावाले हे प्रसारण करण्याकरता आले नसते, आय लव्ह इंडीया वाले टीशर्ट छापून आणि मेणबत्त्या विकून तर स्वत:ची तुंबडी भरून झालेली आहे. बाकिच्यांचे काहीही होवो.
तुम्हाला काय वाटते ?

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

26 Jan 2009 - 4:22 pm | विसोबा खेचर

तात्यालबाडांशी आम्ही सहमत आहोत!

तात्या.

शंकरराव's picture

26 Jan 2009 - 4:42 pm | शंकरराव

सहमत
की अमरसिंगांनी त्यांचे वजन खर्ची घालून बच्चन कुटुंबातल्या सूनबाईंना हा पुरस्कार देववला ?

अमितभ बच्चन ब्लॉगवर कसे उत्तर देतो बघूया

दुसरीकडे ऐश्वर्या राय, अक्षय कुमार यांना पद्मविभूषण देण्यात आले.
मला वाटते या दोघांना पद्मश्री दिली आहे...
... तसाही काय फरक पडतो म्हणा...
..
तुमचं चालूद्या

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

हेरंब's picture

26 Jan 2009 - 8:48 pm | हेरंब

स्त्रियांमधे शबाना आझमी, मेधा पाटकर, अरुंधती रॉय, मायावती, जयललिता, जया बच्चन तर पुरुषांमधे लालूप्रसाद, शिवराज पाटील, अमरसिंग, मुलायमसिंग, भैरोसिंग शेखावत, अडवाणी वगैरे मंडळींना भारतरत्न देऊन टाकावे.
बाकी नांवेही बरीच आहेत, पण सहज जी आठवली ती लिहिली आहेत.

मला अशोकचक्र बद्दल काही बोलायचे नाही. परंतु बाकी पद्म वर्गातील पुरस्कार कशाकरिता देतात व त्यामुळे काय फरक पडतो?
वेताळ

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Jan 2009 - 10:47 pm | llपुण्याचे पेशवेll

सहमत. आणि याबाबतीत मी असे म्हणेन आमच्या भीमण्णाना 'भारतरत्न' काय १० वर्षापूर्वी देता आले नसते? का १० वर्षापूर्वी त्यांचे भरीव कार्य पोकळ होते. आता त्याना त्यांची गात्रं थकल्यावर भारतरत्न दिले ते.
आणि ऐश्वर्याचे असे काय भरीव कार्य आहे पद्मश्री देण्याइतके? अर्थात भरीव काय आहे ते सर्वाना ठाऊक आहेच.
पुण्याचे पेशवे
Since 1984

सकाळी सकाळी धक्का बसला.
पं. हृदयनाथ मंगेशकरांना पण इतक्या उशीरा याच वर्षी आणि अक्षय कुमारला पण याच वर्षी !
ऐश्वर्या मिस वर्ल्ड तरी होती. भारताचं नाव थोडं तरी मोठं केलं ... अक्षय कुमार !!
यावर कणेकरांची प्रतिक्रिया विचारायला पाहिजे.

महेंद्र's picture

27 Jan 2009 - 12:05 pm | महेंद्र

अक्षय म्हणजे राजेश खन्नाचा जावई ना...
म्हणुन असेल कदाचित..
जरी ऐश्वर्या मिस वर्ल्ड जिंकली असेल तरी त्याचं एवढं अवडंबर कशाला?
तिच्या पेक्षा साधना ताई आमटे.. ज्यांच्या संपुर्ण सहयोगामुळेच "बाबा आमटे" घडु शकले.
तसेच प्रकाश आमटे, आणि अण्णा हजारे.............

परिकथेतील राजकुमार's picture

27 Jan 2009 - 12:09 pm | परिकथेतील राजकुमार

या खुदा ! हमारे अफजल गुरुको एक खिताब भी नही दिया ! करमजलो , बुरा हो, किडे पडे तुम लोगोंको...

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य

ब्रिटिश's picture

27 Jan 2009 - 12:14 pm | ब्रिटिश

लंबी जुबानवाले ! क्या बोल रहा हय ? तुमसे मीलना मांगता हय.

मिथुन काशिनाथ भोईर
(जल्ला सगला काय नावानच हाय)