आजच्या मुली

छत्रपति's picture
छत्रपति in जे न देखे रवी...
14 Jan 2008 - 11:17 am

इश्श…" म्हणुन मान खाली
घालतच नाहित,
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

"नविन ड्रेस का ग?" विचारले तर
ह्यांना येतो संशय
"नाहि रे जुनाच आहे", म्हणुन
बदलतात विषय
नकट्या नाकावर लटका राग
दिसतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

मी घा-या डोळ्यांचे कौतुक करावे
मग तिनेही खुदकन हसावे
कशाचे काय….आजकाल गालांना
खळ्या कशा पडतच नाहि
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

उद्या घोड्यावर होऊन स्वार
येईल एक उमदा तरूण
होशिल का माझी राणी विचारेल
हात हातात घेऊन
गोड गॊड स्वप्ने यांना आता
पडतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

पोर लग्नाची झाली म्हणुन,
घरी आई-बाप काळजीत
"माझा नवरा मी कधीच शोधलाय"
त्या डीक्लअर करतील ऎटित
घरून होकारासाठी कधी
थांबतच नाहित
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत.....

वाङ्मयसमीक्षा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

14 Jan 2008 - 11:32 am | विसोबा खेचर

नकट्या नाकावर लटका राग
दिसतच नाही
हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

क्या बात है.. :)

तात्या.

ऋषिकेश's picture

14 Jan 2008 - 7:54 pm | ऋषिकेश

कविता छान आहे.
परंतू ही आधी ढकलपत्रात वाचली होती. ही तुमची स्वतःची आहे का? नसल्यास स्पष्टकरावे

-(ढकलपत्रही आवडीने वाचणारा)ऋषिकेश

इनोबा म्हणे's picture

14 Jan 2008 - 8:02 pm | इनोबा म्हणे

सहमत...मी सुद्धा ही कविता या आधी ऑर्कुटमधे वाचलेली आहे.

(काव्यप्रेमी) -इनोबा

सुनील's picture

14 Jan 2008 - 9:03 pm | सुनील

हल्लीच्या पोरी मुळी लाजतच नाहीत

या वरून एक पूर्वी कधितरी वाचलेला विनोद आठवला.

आजकाल मुलींची वेषभूषा आणि केशभूषा मुलांसारखीच असते तेव्हा ओळखायचे कसे की मुलगा की मुलगी?

जवळ जाऊन एक अश्लिल विनोद करायचा. लाजला तर मुलगा !!!!!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विवेक विद्वास's picture

15 Jan 2008 - 2:02 pm | विवेक विद्वास

फार सुरेख आहे .