ती संध्याकाळ

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
13 Jan 2009 - 9:28 pm

तु बोललीस ते मी ऐकले नाही

मी बोललो काही ते तू ही ऐकले नाही

जरूर नव्हतीच तेंव्हा त्याची

शब्द मुके झाले होते

हातात हात तुझा घेता

स्पर्ष भाषा उमगले होते

ती संध्याकाळ थोडी आगळीच होती

प्रकाश रंगांची सुगंधी उधळण वेगळीच होती

असतो मी एकटाच जेंव्हा

ते सारे गूज आठवते तेंव्हा

तो सोन प्रकाश धावून येतो

रंगांची ती पखरण

पुन्हा सवे घेऊन येतो

मी मोहोरतो , बावरतो

तू नाहीस म्हणून कावरा बावरा ही होतो.

मग काय अचानक जादू होते;

मला तुझ्या स्पर्षाची जाणीव होते

मी माझीच बोटे चुंबतो

डोळे मिटुनी तुला अनुभवतो

कविताविरंगुळा

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

13 Jan 2009 - 10:04 pm | सखाराम_गटणे™

ही कविता भाउ, टाकली कधी?

काही माहीत पण नाही.

शब्द मुके झाले होते
अशा वेळी शब्द नेहेमी मुकेच असतात.
----
सखाराम गटणे
© २००९,
लेखकाच्या पुर्व लेखी परवानगीशिवाय ही प्रतिक्रिया वापरता येणार नाही.

बट्टू's picture

13 Jan 2009 - 10:15 pm | बट्टू

तु बोललीस ते मी ऐकले नाही

मी बोललो काही ते तू ही ऐकले नाही

दोघे बहिरे होते काय?

अवलिया's picture

13 Jan 2009 - 11:14 pm | अवलिया

हम्म. मिपावर केली आहे का ही कविता?
नाही, हल्ली मिपाच्या विरहामुळे तुम्हाला सहन होत नाही आणि सांगता येत नाही असे झाले आहे असे कळते.
होईल सगळे नीट. बाकी आपल्याला कवितेतले काही कळत नाही हे जगजाहिर...

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

पिवळा डांबिस's picture

14 Jan 2009 - 1:35 am | पिवळा डांबिस

पण आम्हा अडाण्यांच्या काही शंका....

तु बोललीस ते मी ऐकले नाही
मी बोललो काही ते तू ही ऐकले नाही
दोघे बहिरे होते काय?
नाय रे बट्टू! ते लगीन झालेले होते....
लगीन झाल्यावर होतं असं....
कळेल तुला...
:)

तू नाहीस म्हणून कावरा बावरा ही होतो.
इथे शंका आली...
(आमचे अंदाज.....आणि आमची प्रतिक्रिया!!)
ती देवाघरी गेली असावी..... अरेरे!! बिच्चारा!!!
ती ह्याला सोडून गेली असावी........आरं तिच्या!! ह्ये काय झेंगाट!!!!
ती माहेरी गेली असावी........सोडा आणायला हवा आज बाजारातून!!!!
ती बाळंतपणासाठी माहेरी गेली असावी......आग्गो बया!!! कांग्राच्युलेशन, विजुभाऊ!!!!!
यातलं काय?
:)

विजुभाऊ's picture

14 Jan 2009 - 9:27 pm | विजुभाऊ

आग्गो बया!!! कांग्राच्युलेशन, विजुभाऊ

बापरे..........अगदी वाढदिवसाच्या शुभेछ्चा........
शन्का : अशी एखादी बातमी ऐकल्यावर "बापरे" हाच शब्द आठवला तर काय करावे ?

आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच

अवलिया's picture

14 Jan 2009 - 10:43 pm | अवलिया

डॉक्टर कडे जावे.

(हा प्रतिसाद जर मिपाच्या धोरणात बसत नसेल तर सभ्य आणि सज्जन संपादकांनी सोवळेपण नष्ट झाले या कारणाखाली उडवला तरी चालेल)

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

पिवळा डांबिस's picture

15 Jan 2009 - 9:25 am | पिवळा डांबिस

अशी एखादी बातमी ऐकल्यावर
अभिमानाने छाती फुगली असेल तर पेढे आणावयास धावावे....
"बापरे" हाच शब्द आठवला तर काय करावे ?
तुम्ही केले आहेत तेच करावे!! कांग्राच्यूलेशन देणार्‍याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात!!!! (मग हे कसे निस्तारावे याचा विचार करावा!!!!)
:)))))

अनिता's picture

14 Jan 2009 - 6:01 am | अनिता

माझ्या वडिला॑नी माझी स्कूटी परि़क्षेत वापरायला ब॑दी केली होती, तेव्हा मला या कवितेतल्या सारखेच वाटले होते...
ह. घ्या.

पिवळा डांबिस's picture

14 Jan 2009 - 9:24 am | पिवळा डांबिस

हे काय असतं?
आम्हाला स्कूटर माहिती आहे, बजाज चेतक, व्हेस्पा वगैरे....
पण स्कूटी माहिती नाही...
ती लहान मुलांची तिनचाकी स्कूटर असते तिला हल्ली स्कूटी म्हणतात का?
(ही चेष्टा नसून खरोखरच एक स्वत:चे नॉलेज वाढवायचा प्रयत्न आहे, तेंव्हा राग नसावा!!!)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Jan 2009 - 9:57 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

ही बघा स्कूटी!

साधारणपणे कॉलेजातल्या मुली ही स्कूटर चालवतात. (पुढे बहुदा गाडीला त्यांचं वजन पेलवत नाही). ;-)

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, गोड बोलण्यासाठी संक्रांतीची आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

पिवळा डांबिस's picture

15 Jan 2009 - 11:22 pm | पिवळा डांबिस

थॅन्क्यू अदिती!
नवीन माहिती मिळाली! आभार!!

विसोबा खेचर's picture

15 Jan 2009 - 10:13 am | विसोबा खेचर

अरेच्या! या कवितेवरचा माझा प्रतिसाद कुणा संपादकाने उडवला? :)

असो..

विजूभाऊ, कविता छान!

मला तुझ्या स्पर्षाची जाणीव होते
मी माझीच बोटे चुंबतो
डोळे मिटुनी तुला अनुभवतो

अरे वा! छानच..! :)

आम्हीही असे डोळे मिटून काही स्वानुभव घेत असतो..! ;)

आपला,
(स्वानुभवी) तात्या.

टारझन's picture

15 Jan 2009 - 12:54 pm | टारझन

अरेच्या! या कवितेवरचा माझा प्रतिसाद कुणा संपादकाने उडवला

=)) =)) =))
काय पब्लिक्स आहे ... तात्यालाच कात्री लावली ... =))

पिवळा डांबिस's picture

15 Jan 2009 - 11:27 pm | पिवळा डांबिस

आम्हीही असे डोळे मिटून काही स्वानुभव घेत असतो..!
आपला,
(स्वानुभवी) तात्या.
गेल्या जन्मी बोका होतात का हो तुम्ही?
:)

घाटावरचे भट's picture

16 Jan 2009 - 1:31 am | घाटावरचे भट

>>गेल्या जन्मी बोका होतात का हो तुम्ही?
=))

ते कधीतरी स्वतःचं नाव लिहितातही 'तात्याबोका' म्हणून....

विनायक प्रभू's picture

15 Jan 2009 - 11:14 am | विनायक प्रभू

कविता आवडली.
अहो पण लेख पण लिहा की.
कविता मला कळत नाही.

पिवळा डांबिस's picture

15 Jan 2009 - 11:24 pm | पिवळा डांबिस

अहो पण लेख पण लिहा की.
थोडे दिवस थांबा हां मास्तर!
आता एप्रिल महिना जवळ येतोय!!
एकदा एप्रिल सुरु झाला की मग बघा गंमत!!!

-अनुभवी मिपाकर

चतुरंग's picture

16 Jan 2009 - 12:54 am | चतुरंग

अहो मागल्या 'एप्रिलच्या आंब्यांच्या रसाचे' हात अजून वाळताहेत तोवर नवा एप्रिल आला सुद्धा? :T

(खुद के साथ बातां : रंगा, गाढवा आढ्याकडे काय बघत बसलास? फळांची आढी लागेलच आता, तयार रहा! ;) )

चतुरंग

स्वाती राजेश's picture

16 Jan 2009 - 12:54 am | स्वाती राजेश

मस्त लिहिली आहे..

आता एप्रिल महिना जवळ आला. मागच्या वर्षी एप्रिल फळ होते..
यावर्षी एप्रिल फुल(फूल) का?