तुमचे कधी फर्निचर होते का?
परवा घाजीनी बघितला. क्निव्नियंट अम्नेशिया बद्दल मला संपुर्ण माहिती आहे. रोज बघतो. टेंपररी अम्नेशिया सुद्धा माहित असावा. त्याची गरज पण होती.
एकुलती एक प्रेमळ बायको तीची आई आली रे आली की फितुर का होते हह्याचे उत्तर गेल्या २३ वर्षात मिळालेले नाही. आणि ते आता मिळेल असे वाटत नाही. तसे सासु आल्यावर जेवणाची अंमळ चंगळ असते. पण तेवढेच.
कायम केंद्रबींदु रहाण्याची सवय तशी वाईटच. सासरची माणसे घरी आल्यावर मी एकदम नॉर्मल रहातो. पण ते'जावई' 'भावोजी' 'मान' वगैरे बगैरे ची सवय त्यांना मोडवत नाही. मी कितीही सांगितले तरी. त्यामुळे घरात घुसल्यावार अगदी खडे तालीम असते. अवघडल्यासारखे होते. मी पण नाद सोडुन दिला आहे. काय करणार. चिरंजीव मात्र ही परिस्थिती ओळखुन आहेत हीच काय ती चंदेरी झालर. त्याच्या हक्काच्या वेळात काही बदल नसतो.
एका लग्नाकरता सासुबाई घरी आल्या आहेत. सात दिवस रहाणार आहेत. येते चार पाच दिवस " तुम्ही किती वाजता कामाला जाणार" हे एकच वाक्य बायको नक्की बोलणार. (वाटच बघत असते). बाकी सर्व ५ फुटावरुन. समृद्ध सहजिवनासाठी स्पेस द्यावी असे म्हणतात. पण एवढी? रात्री २.३० वाजता काय गप्पा असतात कोणास ठाउक. असो.
एकटी सासु आली तर माझा टिपॉय किंवा डायनिंग टेबल होते.(जेवण ठेवायला)
मेहुणी आली की सोफा (लक जोरदार असेल तर बायको सोफावर बाजुला बसेल)
सासु आणि मेहुणी एकत्र आली की झुंबर.(नुसताच लटकत प्रकाश द्यायचा)
आजारपणात सासु होती तेंव्हा तर पुर्ण बॅचलर्(केरसुणी)
आता घाजीनी बघितल्यावर ठरवले आहे घरात आल्यावर १२ तासाचा टेंपररी अम्नेशिया चा उपयोग करायचा. आपण कोण आहे ते संपुर्ण विसरुन जायचे. उगाच जीवाला घोर कशाला द्यायचा. बाकी साथीला तात्या,रामदास, ब्रिटीश ही मित्रमंडळी आहेतच की.
ही मंडळी बिझी असतील तर वेगवेगळे चित्रपट वाजवायचे.
ह्या वेळेला मात्र बायकोला सांगणार आहे ,कोण येणार आहेत आणि किती दिवस असणार आहेत ते दोन दिवस आधी कळाले पाहीजे.पुर्वसुचना मिळाली की खुप गोष्टीचे नियोजन करता येते. तेवढा त्रास कमी.
जाता जाता: एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टीविटी वर माझा विश्वास नाही त्यामुळे वर्षाला ३ ते ४ वेळा फर्निचर होणे होणेच आहे. बरे असते. पुर्ण वर्षाच्या न कळत झालेल्या जखमावरचा अगदी योग्य उपाय.
प्रतिक्रिया
7 Jan 2009 - 11:31 am | अवलिया
हम्म. चालु द्या...
(बिनघोर) अवलिया
अवलियाची अनुदिनी
7 Jan 2009 - 2:19 pm | पांथस्थ
हा प्रश्न मला किती तरि वेळा पडला आहे. इतर वेळि गप्पा मारु म्हटले कि ...'झोपाहो सकाळि लवकर उठायचे आहे'.
आणि असला तरी सध्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टीविटीज चे रिवॉर्डस बघता तो उपयोगाचा नाहि ;)
प्रभुजी मस्तच.
- पांथस्थ
माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
माझी छायाचित्रे - फ्लिकर
7 Jan 2009 - 7:36 pm | बट्टू
प्रभूसाहेब आपला लेखही फर्नीचरसारखा कोपर्यात पडलेला दिसला. जरा धूळ झटकावी असं वाटलं म्हणुन प्रतिसाद. :D
7 Jan 2009 - 8:17 pm | विनायक प्रभू
आस्थेबद्दल धन्यवाद.
मर्फीचा नियम कुणालाही चुकलेला नाही.
7 Jan 2009 - 8:27 pm | लिखाळ
मर्फिच्या अनेक नियमांतला न चुकलेला नियम शोधण्यात आपण यशस्वी झालात :)
(उगीच जरा शब्दच्छल)
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
7 Jan 2009 - 8:21 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
विप्रंच्या सासूबाई घरी आल्या आहेत यापुढे फारसं काही समजलं नाही.
बा ऊ न स र
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
7 Jan 2009 - 8:26 pm | मुक्तसुनीत
विप्रंच्या सासूबाई घरी आल्या आहेत यापुढे फारसं काही समजलं नाही.
मला कळलेला लेखाचा मथितार्थ :
श्री. प्रभु हे जरी सासर-माहेरच्या माणसांमधे मानपान करणे , विशेष वेगळी वागणूक देणे या गोष्टींवर विश्वास ठेवणारे नसले तरी त्यांचे सासरचे लोक जनरीतीप्रमाणे , "जावयाला मान" वगैरे देतात. या बाबतीत दोन वेगवेगळे दृष्टीकोन एकत्र आल्याने , प्रभुंना या सर्वातली विसंगती विशेषत्वाने जाणवते. ही विसंगती ते आपल्या टिपिकल क्रिप्टीक आणि उपरोधाच्या शैलीत इथे मांडतात.
चूभूद्याघ्या :-)
7 Jan 2009 - 8:47 pm | प्राजु
विप्रंच्या सासूबाई घरी आल्या आहेत यापुढे फारसं काही समजलं नाही.
बा ऊ न स र
मला समजलेले म्हणजे, विप्रंचे सासरचे लोक आले खास करून सासूबाई आणि मेव्हणी की, प्रभूसरांकडे बायकोचे थोडे दुर्लक्ष होत असावे... किंवा.. "तुम्ही रोजचेच आहात, आई-बहीण चे सध्या महत्व आहे" असा बायकोचा समज आहे असे विप्रं ना वाटले असावे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
7 Jan 2009 - 8:51 pm | विनायक प्रभू
ढण्यवाद प्राजुताई. ती दुर्बिटणे बाई जरा अंमळ मंद झाली आहे.
7 Jan 2009 - 9:59 pm | रेवती
अगं असं काय करतेस?
सासूबाई आल्या आहेत आणि प्रभूसरांची खाण्याची चंगळ आहे असं म्हटलय ना त्यांनी.
आता तूच म्हणत होतीस ना चविष्ट अंबाडे केले होते काकूंनी?
मग त्यांच्या आई किती सुगरण असतील?
रेवती
8 Jan 2009 - 6:43 am | शंकरराव
चिरंजीव मात्र ही परिस्थिती ओळखुन आहेत हीच काय ती चंदेरी झालर. त्याच्या हक्काच्या वेळात काही बदल नसतो.
लई भारी
जाता जाता: एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टीविटी वर माझा विश्वास नाही त्यामुळे वर्षाला ३ ते ४ वेळा फर्निचर होणे होणेच आहे. बरे असते. पुर्ण वर्षाच्या न कळत झालेल्या जखमावरचा अगदी योग्य उपाय.
मास्तर जर उपाय होत असेल तर ठिक... नाहीतर आगीतून फुफाट्यात.. असे तर नाही ना ??
(प्रेषक एडिसन Life is Complex, it has a Real part & an Imaginary part)
Life is Real, its Imaginary part is Complex
7 Jan 2009 - 9:49 pm | सर्वसाक्षी
पहिले - साहेबांचे सौभाग्य मिपावर येत नसावे.
पहिले चुकिचे असल्यास
दुसरे - साहेब जाम धीट आहेत.
7 Jan 2009 - 10:31 pm | भास्कर केन्डे
सरांनी नेहमी प्रमाणेच साधारण प्रसंग पण जबर उतरवला आहे! लगे रहो सर! हॅट्स ऑफ!!
लेख वाचताना मला सुद्धा साक्षीसाहेबांप्रमाणेच वाटत होते. आपण नाही बॉ हे असले धाडस करू शकत. सौभाग्यवतीने नाही पण तिच्या एखाद्या साळकाय बोळकाय सखीने जरी वाचले तरी सासू आलेली नसताना सुद्धा फर्निचर होऊन पडावे लागण्याची भिती! (आता हा प्रतिसाद तरी तिथपर्यंत पोचू नये अशी ईश चरणी प्रार्थणा! अशातच मला काही मिपाकर मित्र म्हणवणार्यांबद्दल शक यायला लागला आहे. नाहीतर नव्हे ते तिच्यापर्यंत पोचतेच कसे? ते जे कोणी आहेत त्यांना प्रभू मॅडमचा फोन नंबर माहित नाहिये की काय? ;) )
आपला,
(प्रभूसरांचा पंखा) भास्कर
7 Jan 2009 - 10:03 pm | टारझन
जगदंब जगदंब ... प्रभू साहेब ... तुमचं फर्निचर ठिक आहे णा ?
- खुंटेश्वर ) टारझन
7 Jan 2009 - 10:03 pm | लिखाळ
समृद्ध सहजीवनासाठी इतरांपासून दूर राहावे एकमेकांपासून नाही.
हा महत्वाचा संदेश मिळाला. :)
--(डेसिफरर) लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.
7 Jan 2009 - 10:13 pm | चतुरंग
प्रभूंकडे त्यांच्या सासूबाई आलेल्या असल्याने त्यांना, मनात नसूनही, सध्या 'जावई-जावई' खेळावे लागते आहे! ;)
एरवी काकू त्यांची कितीही सरबराई करीत असल्या तरी आता त्या त्यांच्या मातोश्रींच्या पाठिंब्यामुळे काकांकडे तितकेसे लक्ष पुरवीत नाहीत असा त्यांचा ग्रह झालेला आहे.
बाकी तुमच्या पुढील मुद्द्यांशी एकदम सहमत -
रात्री २.३० वा काय गप्पा असतील?
ते समजायला पुढचा जन्म काकूंचा घ्यावा लागेल! ;)
असो तुमच्या दु:खात मी सहभागी आहे काका!
(खुद के साथ बातां : रंगा, तुला किती दिवस झाले रे जावई-जावई खेळून? ;) )
चतुरंग
7 Jan 2009 - 10:26 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
प्रतिक्रिया काय देऊ? आमच्याकडे जावई-जावई हा खेळ खेळला जाणार नाही त्यामुळे थेट काहीच प्रतिक्रिया नाही.
अवांतरः आमच्या बाबतीत महिना-दोन महिन्यातून दोन दिवस दोघंही आपापल्या माहेरी गेलेलं बरं असतं. भांडणं कमी होतात, आणि एकमेकांची किंमत जास्तच कळते.
अतिअवांतरः अजूनतरी सून-सून खेळण्याचा फारसा अनुभव नाही.
अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.
8 Jan 2009 - 2:27 am | संदीप चित्रे
तुमचे आठवडाभरच फर्निचर होते.... अमेरिकेतल्यांचे तर सहा महिने... तेही सलग ;)
(अर्थात खाण्याची चंगळही वाढते हे एकदम मान्य !!)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
11 Jan 2009 - 6:03 pm | विजुभाऊ
फर्निचर झालेले एकवेळ बरे माझे काहिवेळा शोभेचे फर्निचर होते
आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
12 Jan 2009 - 2:56 am | चंबा मुतनाळ
विजूभाव,
प्रतीसाद आवडला.
शोभावैनींना दंडवत सांगा
- चंबा भावजी