आपल्या देशावर येऊन गेलेल्या मोठ्या संकटानंतर 31st celibration कितपत योग्य ठरले?

उर्मिला००'s picture
उर्मिला०० in काथ्याकूट
4 Jan 2009 - 2:34 pm
गाभा: 

नमस्कार मित्रमैत्रिणिंनो,
२६नोव्हेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर सारा देश दु:खाच्या खाईत लोटला गेला.आपण आपल्या खुप देशवासीयांना गमावले.मुंबईकरांनी तर हे दहशतवादाचे तांडव उघड्या डोळ्यांनी पाहिले.प्रत्यक्ष अनुभवले. हे सर्व घडुन जेमतेम १महिना पुर्ण होतो न होतो तोच ३१ डिसेंबरची जल्लोशी वाहिन्यांवर आणि प्रत्यक्ष पाहिली.मन हळहळले.आपल्या कुटुंबातील नव्हे अगदी भावकीतील व्यक्ती गेली तरी आपण त्यावेळचे सण-समारंभ साजरे करत नाही.मग'हे विश्वचि माझे घर' असा थोर वारसा असणार्‍या या मायभुमीत नेमके काय चालले आहे?या विचाराने मन उद्विग्न झाले.ते कुठे तरी व्यक्त करावे वाटले.म्हणुन हा लेखन प्रपंच.
मित्रांनो,याबद्दल आपली मते जाणुन घेण्यास मी उत्सुक आहे.

प्रतिक्रिया

वेताळ's picture

4 Jan 2009 - 2:46 pm | वेताळ

पण जे वाईट होऊन गेले त्यावर उपाय शोधणे चालु आहे. तसा दहशतवादी हल्ला परत होऊन नये म्हणुन सरकार काहीतरी करते आहे(तसे निदान मला वाटते).पण जे झाले ते उगाळत बसण्यात काय अर्थ आहे का? महागाई,आर्थिक मंदी,दहशतवादी हल्ले,भ्रष्टाचार इत्यादी दु:खातुन सुखाचे चार क्षण जर जनतेला ३१ डिसेंबरच्या रुपाने मिळत असतील तर हरकत काय आहे? का सतत दु:ख,दु:ख म्हणत आसवे गाळत बसावे?निदान येणारे नवीन वर्ष सुखसमाधानाचे येवो म्हणुन लोक नववर्ष आरंभ आनंदाने साजरा करित असावेत.
वेताळ

देवदत्त's picture

4 Jan 2009 - 2:51 pm | देवदत्त

वेताळाशी सहमत....

पर्नल नेने मराठे's picture

4 Jan 2009 - 2:46 pm | पर्नल नेने मराठे

:| ह्म्म्......मला हि आशचर्य वाटले. मी ज्या देशात आहे.......त्या राजाने प्यालेस्तिन वर हल्ला होउन त्यान्च्या धर्मचे लोक मारले गेले म्हनुन 31st celibration थाम्ब्वले...आणी आपल्याक्दे जिक्दे लोक शहिद झाले तिक्देच ताज मधे शाम्पेन ओतुन celibration केले गेले. :|
चुचु :S

देवदत्त's picture

4 Jan 2009 - 2:49 pm | देवदत्त

तुमचा रोख फक्त ३१ डिसें वर का?
गेल्या वर्षात केवढे बाँबस्फोट झालेत. ज्यांची जाणीव झाली असे... दर दोन महिन्यांनी. बाकीचे नेहमीच होतात ते वेगळे. पण आपण सर्वांनी गणेशोत्सव, दिवाळी साजरे केलेच ना?

बाकी सविस्तर नंतर....

वेताळ's picture

4 Jan 2009 - 2:50 pm | वेताळ

कोणत्या देशात राहता तुम्ही?
वेताळ

पर्नल नेने मराठे's picture

4 Jan 2009 - 2:52 pm | पर्नल नेने मराठे

मी दुबइत राहाते.........इक्दे सग्लि होतेल बूकिन्ग्स क्यनस्ल करावि लाग्लि.
चुचु

उर्मिला००'s picture

4 Jan 2009 - 2:51 pm | उर्मिला००

आपण शुभेच्छा नक्कीच द्याव्यात,पण त्यासाठी celibration करायची गरज आहे का?

पर्नल नेने मराठे's picture

4 Jan 2009 - 2:54 pm | पर्नल नेने मराठे

उरमिला ताइ अग्दि योग्य बोल्ता अह्हात

चुचु

भ**ने कधी भारतात जे दहशतवादी हल्ले झाले त्याबद्दल साधी दिलगिरी व्यक्त केली नाही. भारताचे जितके मोस्ट वॉन्टेड गुंड दुबईत लपले आहेत त्याना कधी माणुसकी म्हणुन भारताच्या हवाली केले नाही.त्याला फक्त धर्म कळतो.असल्या माणसाचे कौतुक नका करु.बर पॅलेस्टिनवर हल्ला काही गंमत म्हणुन केला नाही तर तो हल्ला दहशतवादी ठिकाणांवर इस्त्राईल ने केला आहे. त्यात वाईट असे काय? जे आपल्याला जमत नाही ते इस्त्राईल करत आहे.
वेताळ

अविनाशकुलकर्णी's picture

4 Jan 2009 - 11:23 pm | अविनाशकुलकर्णी

ज्या वेळी मुंबई वर हल्ला झाला होता त्या वेळी युवराज राहुल गांधि दिल्लित फार्म हाउस मधे पार्टी मधे रममाण होता...आपण त्याला जाउन काहि सांगणार का?.सांगा मग हा मुद्दा चर्चेला घ्या....
हे वाचा..................Rahul Gandhi in party mood soon after attack
Rahul Gandhi in party mood soon after attack

http://indiatoday.digitaltoday.in/index.php?option=com_content&task=view...

विसोबा खेचर's picture

5 Jan 2009 - 9:05 am | विसोबा खेचर

मुद्दा पटण्याजोगा आहे.. आम्ही मित्रमंडळींनीही ३१ डिसेंबर साजरे केले परंतु साधेपणाने. नेहमीच्या धांगडधिंग्यात अथवा थाटामाटात नव्हे..

तात्या.

मेथांबा's picture

5 Jan 2009 - 10:58 am | मेथांबा

इतरांचे सोडा हो, पण मराठी माणसाचेच पहा; ज्याच्या जन्मभूमित हा प्रकार घडला तो धनंजय दातारच पहा. विमानात थाटामाटात मुलाची मुंज करतो आणि त्यासाठी लोक नटूनथटून येतात. माझा ब्राम्हणांवर राग अजिबात नाही. पण हे ब्राम्हण लोक इतर वेळी समाजसुधारणेचा ठेका घेतल्यासारखे बोलत असतात. असे असताना एकानेही त्याविषयी निषेध व्यक्त करू नये. शिव शिव. मी पुढे जाऊन म्हणेन मुंजीची प्रथाच आता कालबाह्य झाली आहे. असे असताना, मुंबई दु:खात असताना हे श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन कशासाठी?

ऋषिकेश's picture

5 Jan 2009 - 11:08 am | ऋषिकेश

चर्चेचा मुळ प्रश्न आणि तुमचा प्रतिसाद यांचा एकमेकांशी संबंध कळला नाहि
-(संबंधीत)ऋषिकेश

३१ डिसें पार्टी आणि मुलाची मुंज ह्याचा काय संबंध आहे. महिनोनमहिने आधी तयारी करुन आयत्यावेळी असे घरगुती कार्यक्रम पुढे ढकलणे कसे शक्य असेल? आणि का ढकलावेत?

चतुरंग

मेथांबा's picture

5 Jan 2009 - 11:41 am | मेथांबा

ही विमानात मुंजीची घटना ३१ डिसेंबरच्या पूर्वी घडली. ती पण मुंबई हल्ल्याला १ महिनासुद्धा पूर्ण झाला नसताना. हे दातारजी मुंबई हल्ल्याविषयी खरोखर संवेदनशील असते तर त्यांनी निदान ती मुंज १-२ महिने पुढे ढकलली असती. मला तर त्यांच्यात आणि २७ नोव्हे. ला एक पर्यटन केंद्र म्हणून ताजची लढाई पहायला जाणार्‍या टोळक्यांमध्ये फार फरक वाटत नाही.

ह्या हल्ल्यात २०० लोक मृत्युमुखी पडले. अश्यावेळी दु:ख एकवेळ मनात दाबून ठेवणे ठीक आहे पण आनंदाचे प्रदर्शन कशाला?

पर्नल नेने मराठे's picture

5 Jan 2009 - 12:57 pm | पर्नल नेने मराठे

दाताराना सुचलेच कसे हे........ माझि एक मैथिन म्ह्ननालि.....ज्यान्च्याक्दे आहे त्याना खाउ का घालाय्चे.....

चुचु

मनीषा's picture

5 Jan 2009 - 1:13 pm | मनीषा

आपल्या देशावर येऊन गेलेल्या मोठ्या संकटानंतर 31st celibration कितपत योग्य ठरले?

मला वाटतं योग्य आणि जरुरी सुद्धा आहे . कारण आपण ते दु:ख करत राहीलो तर "त्या" लोकांचा हेतु सफल होईल. त्यांना हेच पाहिजे आहे कि भारता मधे रहाणार्‍यांसाठी जगणे दु:सह करणे . जे शहीद झाले त्यांच्या साठी दु:ख आहेच .. पण जे वाचले त्यांच्यासाठी सेलिब्रेट करायलाच पाहिजे ..

छोटा डॉन's picture

5 Jan 2009 - 7:12 pm | छोटा डॉन

मस्त व कालानुसंगत प्रश्न विचारला आहे. खरचं माझ्याही मनात हा प्रश्न येऊन गेलाच.

एक किस्सा सांगतो, बर्‍याच मोठ्ठ्या सुट्टीनंतर आज हापीसात गेल्यावर एका "अ-भारतीय सहकार्‍याचे" मला नव्या वर्षाच्या शुभेच्छा दिल्या, माझे या बाबतीत थोडेसे मत वाईट/कटु असल्याने मी आपले कोरडेपणाने "हॅप्पी न्यु ईअर" केले. त्यानंतर त्याने पुढचा प्रश्न "सेलीब्रेशन कसे केले ?" हा विचारला.
बराच वेळ मनात दाबुन ठेवलेल्या भावनांचा बांध फुटल्याने मी त्याला " मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ व मनालाच लाज वाटली असल्याने मी व माझ्यासारख्या अनेक भारतीयांनी ह्यावर्षी सेलीब्रेशन केले नाही" अशी त्याला नविनच असलेली न्युज सांगितली. त्यावर त्याने आश्चर्य वाटुन स्वतः बेंगलोरमध्ये अनेक ठिकाणी मोठ्ठ्या प्रमाणावर सेलीब्रेशन केले असल्याचे दाखले दिले. मला खिन्न मनाने अजुन अनेक भारतीय "मॅच्युअर" झाले नसल्याचे कबुल करावे लागले. त्याने अनेक ठिकाणी "पोलीस बंदोबस्तात सेलीब्रेशन" झाल्याचे मला सांगितल्यावर मी त्याला "ह्या परिस्थीतीत सेलीब्रेशन करणे तुला पटते का ?" असे विचारले.
अंगात कठोर देशप्रेमाचे व कडव्या राष्ट्रभक्तीचे देशप्रेम वहात असलेल्या त्या जर्मन माणसाने "नाही, हे अयोग्य आहे. आम्ही सेलीब्रेशन करण्यापेक्षा ज्यांनी हा मुंबईचा हल्ला केला त्यांच्या पुढच्या ५ पिढ्या कसलेही सेलीब्रेशन करण्यासाठी सक्षम राहणार नाहीत असे प्रयत्न करणार्‍या कार्यात स्वतःला वाहुन घेतले असते " असे उत्तर दिले.
आता तुम्हीच ठरवा ....!

तसेही टीव्हीवर व वृत्तपत्रात वाचल्याप्रमाणे हे सेलेब्रेशन करण्यात प्रामुख्याने " धनदांडगे, नवश्रीमंत उच्च मध्यमवर्ग , कॉलेज स्टुडंट , आयटी /एम एन सी मध्ये काम करणारे व इतर व्हाईट कॉलर वर्ग " ह्यांच्या धडाक्यातल्या सेलीब्रेशनने डोळे दिपले. कॉर्पोरेट जगताने व फिल्मसृष्टीनेसुद्धा नेहमीच्याच जोषात हे साजरे केले.
मनात एक किडा आला, च्यायला अतिरेकी हल्ल्यानंतर ताजसमोर "मेणबत्त्यांची आरास " करणारा हाच वर्ग होता ना ?
ह्यांनीच फॉरीन कल्चरप्रमाणे पुचाट मेणबत्या पेटवत निषेध करण्याच्या कार्यक्रमात स्वतःला मिरवुन घेतले होते ना ?
मग ३१ ला हे सर्व धाब्यावर बसवुन ग्लासाला ग्लास भिडवत, आरोळ्या ठोकत , एकमेकांच्या बाहुपाशात पडुन "मुंबई रॉक्स , हॅप्पी न्यु ईअर " असा गजर केला ना ? क्षणात विसरलात का ते निरपराध २०० बळी व त्यांना वाचवण्यासाठी शहीद झालेले १४ पोलीस अधिकारी ? डिस्कोमधल्या चकचकाटात बळी पडलेल्यांच्या घरात लावलेल्या पणत्यांची सोईस्कर विसर सर्वांनाच पडली का ? का स्वतःला मिरवुन घेण्यापायी मेणबत्या पेटवुन नाटकी देशप्रेमाच्या बाता करणारे नंतर ४-४ पेग अप होऊन गाण्याच्या तालांवर थिरकत सेलीब्रेशन करत होते ?
आपल्याला नाही पटले बॉ ...
"जन पळभर म्हणतील हाय हाय" हेच खरे ...!

शो मस्ट गो ऑन हे जरी खरे असले तरी शो असा "धडाक्यात" नसतो करायचा हे कधी कळणार ?
मरु दे च्यायला, कुणाला काय पडले आहे ?
हा नवा सो कॉल्ड सुशीक्षित उच्च मध्यमवर्गीय धनदांडगा वर्ग अजुन "मॅच्युअर" नाही हेच खरे , ह्यांना देव लवकर सुबुद्धी देवो.

बाकी ज्यांनी काही वाटत नाही व हटकुन "सेलीब्रेशन व अतिरेकी हल्ला " ह्यांचा संबंध नाही असे वाटते त्यांच्याशी वाद घालण्याची माझी इच्छा व माझ्यात ताकद नाही.
माझे मत मी मांडले.

अवांतर : मी ३१ डिसेंबर साधी पोळी, बटाट्याची भाजी, मटकी उसळ, भात-आमटी खाऊन साधेपणाने पुढे ढकलला, साजरा केला म्हणण्याचा निर्लज्जपणा माझ्याकडुन होणार नाही. असो.

------
छोटा डॉन

विकास's picture

5 Jan 2009 - 8:00 pm | विकास

शो मस्ट गो ऑन हे जरी खरे असले तरी शो असा "धडाक्यात" नसतो करायचा हे कधी कळणार ?

एकदम बरोबर बोललात. मला या संदर्भात ९/११ नंतरची अमेरिका आठवते. जवळपास महीनाभर वर्तमानासंदर्भात विनोद करणारे अनेक टॉक शोज आणि "सॅटरडे नाईट लाईव्ह" सारखे कार्यक्रम बंद होते. नंतर चालू झाल्यावर पण त्यात बराचसा संयम होता. न्यू यॉर्कचा तत्कालीन महापौर रुडी ज्युलियानी हा सर्वांना सांगत होता की तुम्ही आनंदात रहा, परत पहील्यासारखे ("नॉर्मल") वागा, आपण तसे वागलो नाही तर अतिरेक्यांना तेच हवे आहे. लोकांनी ते ऐकले पण उस्फुर्त संयामाने.

आज आपल्याकडे मुंबई याचे निमित्त करून कशी वेगळी करता येईल यावरच चर्चा चालू आहे... "आम्हाला काही झाले नाही", "स्पिरीट ऑफ मुंबई" असल्या शेळपट गर्जना ऐकताना अतिरेक्यांचे म्होरके फिदीफिदी हसत असतील.

याचा अर्थ सुतकी चेहर्‍याने बसा असा नक्कीच नाही. आणि त्यावर स्वतःच्या हातात असलेले नागरी कर्तव्यपण न करता जरी तसे बसलात तरी त्याचा काय उपयोग? मात्र आजचे वागणे हे वर म्हणलेल्या "जन पळभर म्हणतील हाय हाय" असे म्हणायच्या ऐवजी मला, "रोज मरे त्याला कोण रडे?" असे म्हणावेसे वाटते. असल्या सातत्याने होणार्‍या हल्ल्यांनी आणि त्यात "स्पिरीट ऑफ मुंबई" वगैरे सारख्या "ब्रेनवॉशिंग" वाक्प्रयोगांनी माणसे कळत नकळत "मुर्दाड" झाली आहेत असे वाटू लागले आहे. (हे वैयक्तीक विधान म्हणून कृपया घेऊ नये. सामाजीकरीत्या निश्चितच वाटते).

शेवटी जाता मी आधीपणसांगीतलेल्या नाझी जर्मनी संदर्भातील एका कवितेतील डोळे उघडणार्‍या ओळी परत एकदा सांगतो - आपण, २६ नोव्हेंबरला, यातील चौथ्या ओळीपाशी जाऊन पोचलो आहोत असे वाटते.

"In Germany, they came first for the Communists, And I didn't speak up because I wasn't a Communist;

And then they came for the trade unionists, And I didn't speak up because I wasn't a trade unionist;

And then they came for the Jews, And I didn't speak up because I wasn't a Jew;

And then . . . they came for me . . . And by that time there was no one left to speak up."

- Martin Niemöller

छोटा डॉन's picture

5 Jan 2009 - 8:23 pm | छोटा डॉन

मला अक्षरशः वीट आला आहे "मुंबई रॉक्स , स्पिरीट ऑफ मुंबई , मुंबई पुन्हा उभी राहिली " वगैरे ऐकुन / वाचुन. किती दिवस आपण असे स्वतःचे समाधान करत राहणार ते देव जाणो.

कसल्याही आपत्तीनंतर पुन्हा उभे राहणे हे गरजेचेच नव्हे जगण्यासाठी आवश्यकच, पण ह्या कैफात आपण नकळत मुर्दाड, भावनाहीन, लाचार, मुकाट सहन करण्याची सवय असलेले होत चाललेले आहोत हे कुणाच्या लक्षात येत नाही का ?
४ दिवस जोराजोरात चर्चा करुन, तावातावात मते मांडुन, मेणबत्या वगैरे लाऊन आपले देशप्रेम दाखवणारे पुन्हा तसेच वागतात ह्याने दु:ख झाले.

२६ डिसेंबरला ताजसमोर मोठ्ठ्या तडफेने हल्ल्याला १ महिना पुर्ण झाला म्हणुन श्रद्धांजली वाहताना मिरववलेला व वर उल्लेखला वर्ग फक्त ५ दिवसांनी सर्व काही धाब्यावर बसवुन मोठ्ठ्या मोठ्ठ्या क्लबात / पबात थिरकताना पाहुन मनस्वी राग आला. झोपलेल्या जागे करता येईल हो पण स्वतःच्या पुढारलेपणाचे, कल्चर्डपणाचे सोंग घेऊन निर्ढावल्यापणाचे कातडे डोळ्यावर ओढुन झोपेचे सोंग घेणार्‍यांसमोर आम्ही हतबल आहोत.
सर्वसारासार विचारबुद्धी गहाण ठेवल्यासारखेच वागतात हे लोक. शिवाय दुसरी गोष्ट म्हणजे ह्यांच्या प्रत्येक कृतीचा मिडीयाकडुन उदोउदो होत असल्याने ह्यांना कसल्याही घटना ह्या मिरवण्यासाठीच आहेत असे वाटते, मग ते आतंकवादी हल्ला असो वा ३१ चे सेलीब्रेशन ...
काय बोलणार आम्ही ह्यांना, सर्व काही "राम भरोसे" चालु आहे हे नक्की ...

बाकी विकासरावांनी दिलेली कविता डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी ...
बघा काही शिकायला जमले तर अशी आमची कळकळीची विनंती.

माझ्या माहितीप्रमाणे मुस्लीमधर्मीयांनी ह्या हल्ल्याचा निषेध म्हणुन त्याम्चा धार्मीक सण "ईद" अत्यंत साधेपणाने साजरी केली असताना ह्या "३१ डिसेंबरचे" असे धडाक्यात सेलीब्रेशन करण्यात कसला शहाणपणा ?

अवांतर :
आजा जाता आवर्जुन उल्लेख करावा वाटतो ते "सोलापुर" शहरातल्या ३१ डिसेंबरच्या घटनेचा.
शिवसेनेच्या पुढाकाराने का होईना पण सुमारे १०००० पेक्षा जास्त लोकांनी काहीही सेलीब्रेशन न करता रात्री चौकात जमुन पोलीस अधिक्षक श्री. भुषणकुमार उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली "दहशतवादाशी लढण्याची शपथ" घेतली.
प्रत्येक्षात लढाई कितपत शक्य ही बाब जरी अलहिदा असली तरी इच्छाशक्ती महत्वाची. आम्हाला याचे कौतुक वाटते.
ह्या घटनेने स्वतःच्या प्राणांची बाजी लाऊन लढणार्‍या सैनिकांना आपले दु:ख समजणारे, पाठिंबा देणारे व सदैव साथ देणारे कोणी आहे हा विश्वास मिळाला तरी उत्तम.

------
छोटा डॉन

गौराई's picture

6 Jan 2009 - 5:11 am | गौराई

तुमच्या मताशी सहमत्......छान लेख

रेवती's picture

5 Jan 2009 - 9:28 pm | रेवती

कोणताही सण साजरा करणे व ३१ डिसेंबर हा सण नसलेला दिवस साजरा करणे ह्यात फरक आहे.
आपण ह्या ३१ तारखेला जरा ज्यास्तच महत्व देत आहोत असे वाटते.
सणवार साजरे करताना (आपले सण खरंतर घरगुती व साधेच होते पूर्वी) आपण आपली संस्कृती पुढच्या पिढीला शिकवत असतो.
ह्या धूमधडाक्यात झालेल्या सेलिब्रेशनमधून आपण काय शिकवतो आहोत आपल्या मुलांना?
संयमाने वागणे? जर हल्ला झालाय तर सण (आपण त्यात ३१ डिसेंबरही धरतो दुर्दैवानं) साजरे करूयात पण साधेपणानं.
कोण्या श्रीमंतांच्या मुलांनी, नातेवाईकांनी काय केले त्याबद्दल बोलण्यापेक्षा आपल्या भावना काय आहेत त्याप्रमाणे वागणे
महत्वाचे वाटते.

रेवती

भाग्यश्री's picture

6 Jan 2009 - 5:36 am | भाग्यश्री

मला कधीच ३१ डिसेंबर जवळ आल्याबद्दल, अथवा नवीन वर्ष सुरू होणार याबद्दल उमाळा,जिव्हाळा वाटला नाही.. सेलिब्रेट काय करायचे त्यात २००८चे २००९ झाले तर?मला तर बर्‍याचदा आश्चर्यच वाटते की एवढं लवकर संपलं वर्ष??
हा , आता अमेरीकेमधे पाहीले.. एकंदरीत थँक्सगिव्हींग पासून जे उत्साहाचे , सणाचे वातावरण तयार होते.. तो उत्साह आपल्यालाही जाणवतो, भिनतो.. खरं म्हणजे उगीचच आनंदी वाटून आपणही काहीबाही सेलेब्रेट करतो.. न केल्याने काहीच बिघडत नाही..

तसेच, त्या निर्घृण अतिरेकी हल्ल्यांने कुणाचे जीवन थांबत नाही, हे ही खरे.. आजवरच्या हल्ल्यांची इंटेन्सिटी माझ्या दृष्टीने तरी तशी कमी होती, की मला, पुण्यात राहणारीला फरक पडायचे कारण नव्हते.. मात्र या हल्ल्यावेळी अगदी आतून , मनातून भीती,असुरक्षितता जाणवली.. अजुनही डोक्यात येतोच विचार.... पण वर म्हटल्याप्रमाणे आयुष्य थांबत नाही! :|

बाकी कोणाला सेलिब्रेट करायचे असेल, तर तो ज्याचात्याचा वैयक्तिक प्रश्न..
हं, पण डॉनने उल्लेखिलेल्या, २६ ला मेणबत्त्या पेटवून ३१ ला ग्लास्स धरणार्‍या क्लास बद्द्ल मात्र न बोललेलेच बरे..

http://bhagyashreee.blogspot.com/

उर्मिला००'s picture

9 Jan 2009 - 5:39 pm | उर्मिला००

मित्रहो,
आपण दिलेल्या प्रतिक्रियांबद्दल आपली आभारी आहे.धन्यवाद