इथे लेखन करायचे नियम बदलले आहेत का?

मुक्त विहारि's picture
मुक्त विहारि in काथ्याकूट
30 Dec 2024 - 7:23 am
गाभा: 

ह्या आधी पण मी, बातम्यांचे संकलन करून लेख लिहिले होते. सगळ्या बातम्या, तेंव्हा देखील छापील स्वरूपात होत्या आणि ह्या आठवड्यातील लेखात पण होत्या.

पूर्वी लिहिलेल्या आणि आत्ता देखील उपलब्ध असलेले लेख खालील प्रमाणे...

1. संदेशखालीतील शहाजहानची मोगलाई!

(ह्या लेखात पण बातम्यांचे संकलन जास्त होते.)

2. लव जिहाद, सत्य की मनाचे खेळ?

(ह्या लेखात पण बातम्यांचे संकलन होते.)

-----

पण, मी गेल्या ३-४ दिवसांत, ३ लेख लिहिले.ते लेख म्हणजे बातम्यांचे संकलन होते.ते लेख मात्र उडाले. म्हणून हा प्रश्न विचारावासा वाटतो की, "इथे लेखन करायचे नियम बदलले आहेत का?"