✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

लोकसभा २०२४: अंदाज आणि निकाल

व
विवेकपटाईत यांनी
Sat, 05/25/2024 - 11:38  ·  लेख
लेख
आज सकाळी मतदान करून आलो.आता वेध निकालाचे. ४ जूनला नवीन सरकार येणार.आता मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील की राहुलची लॉटरी लागणार. कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील राजनीति या विषयाचे तज्ञ यावर प्रश्न टाकू शकतील. मोदीजी म्हणतात ४०० पार. प्रशांत किशोर म्हणतात कमीत कमी २७०. योगेंद्र यादव म्हणतात एनडीएला २७०मिळणार नाही. अखिलेश म्हणतो १४२ आणि बाकी इंडी गठबंधनला. साहेब म्हणतात महाराष्ट्रात ५०:५०. पुरोगाम्यांचे म्हणणे आहे निकाल २००४ सारखा येईल. अंधभक्त ४०० स्वप्नात दंग आहे. बाकी ४ जूनला सत्य कळेल.तो पर्यन्त आपले अंदाज...
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5375 वाचन

💬 प्रतिसाद (39)

प्रतिक्रिया

NDA ला 370 जागा मिळतील

Vichar Manus
Sat, 05/25/2024 - 12:41 नवीन
NDA ला 370 जागा मिळतील
  • Log in or register to post comments

मोशा म्हणतात चारशेपार

नठ्यारा
Sat, 05/25/2024 - 13:42 नवीन
मोदी आणि शहा यांची बोली व देहबोली ४०० पार अशी आहे. भाऊ तोरसेकर ३७० म्हणताहेत. मला वाटतं मोदीशहा यांचा अंदाज बरोबर आहे. अबकी बार चारसौ पार. -नाठाळ नठ्या
  • Log in or register to post comments

चारशे पार झाले तर मी "मुंगडा,

चौथा कोनाडा
Sat, 05/25/2024 - 17:19 नवीन
चारशे पार झाले तर मी "मुंगडा, मुंगडा" लाऊन अर्धा तास डान्स करणार !
  • Log in or register to post comments

४३० + ३५ (ए) = ४०५

शाम भागवत
Sat, 05/25/2024 - 23:41 नवीन
४३० + ३५ (ए) = ४०५
  • Log in or register to post comments

३७० + ३५ (ए) = ४०५

शाम भागवत
Sat, 05/25/2024 - 23:42 नवीन
३७० + ३५ (ए) = ४०५
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शाम भागवत

मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान

कानडाऊ योगेशु
Sun, 05/26/2024 - 11:08 नवीन
मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील की राहुलची लॉटरी लागणार
मोदीजी जरी पंतप्रधान नाही बनले तरी राहुलजींची लॉटरी लागणे अवघड दिसतेय. इथे सामना मोदीजी विरुध्द राहुलजी असा नसुन मोदीजी विरुध्द इतर आहेत.त्या इतरेतरांमध्ये बरेच जण आहेत. मोदीजी पंतप्रधान नाही झाले तर सत्तेत्सुक पक्षांमध्ये पंतप्रधान पदावरुन राजकिय हाणामारी होऊ शकते.
  • Log in or register to post comments

भाजपा ३०० -३२५

अमर विश्वास
Sun, 05/26/2024 - 11:58 नवीन
भाजपा ३०० -३२५ NDA : ३५० काँग्रेस - ५० पेक्षा कमी
  • Log in or register to post comments

अंदाज

बाबुराव
Sun, 05/26/2024 - 18:26 नवीन
भाजपा आणि आघाडी १७५ ते २६० काँग्रेस आणि आघाडी १६० ते २४० इतर ३० ते ४५
  • Log in or register to post comments

माझे अंदाज

चंद्रसूर्यकुमार
Sun, 05/26/2024 - 22:11 नवीन
माझे आकडे- भाजपः ३३३ भाजप मित्रपक्षः ६२ भाजप+ : ३९५ काँग्रेसः ४८ काँग्रेस मित्रपक्षः ५४ इंडी आघाडी: १०२ इतरः ४६ राज्यनिहाय अंदाज खालीलप्रमाणे: Image removed.
  • Log in or register to post comments

चाणक्य

चंद्रसूर्यकुमार
Mon, 06/03/2024 - 09:51 नवीन
माझे अंदाज काही एक्झिट पोल्सच्या अंदाजाच्या बरेच जवळ आहेत. त्यात २०१४ मध्ये ज्या एकमेव एक्झिट पोलचा अंदाज बरोबर आला होता त्या चाणक्य एक्झिट पोलचाही समावेश आहे- चाणक्यने दिला आहे त्याच्या बराच जवळ अंदाज मी पण व्यक्त केला आहे याचे मला समाधान आहे. आता ते समाधान उद्यापर्यंत अल्पजिवी असणार की कसे हे उद्या कळेल :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

आठवण करतोय या...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 08/19/2024 - 08:38 नवीन
लोकसभेचे भल्याभल्यांचे अंदाज चुकले. आपलेही अंदाज भक्तीभावाने फूललेले होते त्यामुळे आपणास अंदाज लावतांना तटस्था राखता आली नाही, असे वाटते. आता मागे वळुन पाहिल्यावर आपले अंदाज काहीच्या काही होते. भाजपा सरकार थोडक्यात जाता जाता राहिले. अर्थात, अनेक ठिकाणी फार कमी फरकाने भाजपाचे उमेदवार निवडून आले. खरं तर, यावेळी 'अब की बार'चा नारा फुसका ठरला आपले सामाजिक राजकीय प्रश्न आणि वास्तव याकडे दुर्लक्ष झाले. म्हणून अंदाज चुकले, असे वाटते. बाकी जाऊ द्या. आपले शब्दबंबाळ पोचा-यांना मिपावर खुप मिस करतोय. अंदाज म्हटले की बरोबर चुक चालायचंच. आपले लोकसभेचे अंदाज चुकले आणि आपण तेव्हापासून गायब आहात. आज आपली आठवण आली.आता विधानसभा निवडणूका येत आहेत. आता पुन्हा अंदाज अपना अपना खेळुया. मिपावर परत या...इकडे कोणीही आपणास रागवणार नाही. कोणीही तुम्हाला बोल लावणार नाहीत. जिथे असाल तिथून परत या.... :) -दिलीप बिरुटे (आपला मिपावरील खोडसाळ मित्र ) :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

+१

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/19/2024 - 10:53 नवीन
+१ चंद्रसुर्यकुमार ह्यानी मिपावर परत यावे एव्ही विनंती करून खाली बसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत आहे

वामन देशमुख
Mon, 08/19/2024 - 13:37 नवीन
सहमत आहे प्रोफेश्वर प्रा.डॉ.दिलीप बिरुटे हे खूप चांगलें लिहितात याना खोडसळ मित्र आहेत म्हणुन चांगलें लिहु शकता येते का ??? प्याट्रीक झेड याना सुद्धा परत आनुन द्यावे हि नम्र विनन्ति प्रोफेश्वर प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना करत आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

प्याट्रीक झेड याना सुद्धा परत

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/19/2024 - 18:18 नवीन
प्याट्रीक झेड याना सुद्धा परत आनुन द्यावे हि नम्र विनन्ति प्रोफेश्वर प्रा.डॉ.दिलीप बिरुटे याना करत आहे +१ :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

Ha ha ha !

वामन देशमुख
Mon, 08/19/2024 - 19:35 नवीन
Trapped!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

मस्त आहे सिनेमा. राजकुमार

अमरेंद्र बाहुबली
Mon, 08/19/2024 - 23:26 नवीन
मस्त आहे सिनेमा. राजकुमार रावणे छान काम केलंय. नक्की पहावा असा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

अंदाज

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/27/2024 - 11:03 नवीन
राज्य  भाजपा आघाडी  काँग्रेस आघाडी  (इंडिया )
  महाराष्ट्र         १५ ३२
आंध्रप्रदेश         ०२
          ०७  (वाय एस आर पंखा  १६ )
तेलंगना         ०७           १०
कर्नाटक         १०           ०२ भारत आघाडी १०   
तामिळनाडू         ०१           १०  डीएमके १९ सीपीआय ०५ इतर ०६
 केरळ         ०२           १३  इतर ०५
आसाम         ०७           ०७
 प्.बंगाल         १८           ०४ टीएमसी २१ इतर ०२
  बिहार         १०           १९ इतर ११
  ओडीसा         १०           बीजेडी ११
  छत्तीसगड         ०६           ०५
  उत्तरप्रदेश         ५०           ३०
  गुजरात         १५           ०८ बसपा आणि इतर ०३
  राजस्थान         १२           १० इतर ०३
  मध्यप्रदेश         १२           १० इतर ०६
  उत्तराखंड         ०२           ०२ इतर ०१
  हरियाना         ०२           ०८
  दिल्ली         ०१           ०३ झाडू ०३
  पंजाब         ०१           ०७ झाडू आणि इतर ०५
  हिमाचल प्रदेश         ०३           ०१
  झारखंड         ०४           १० इतरांसहित
   गोवा         ००           ०२
 जम्मु काश्मिर लडाख         ०२           ०४
 मणीपूर         ०१           ०१
 मेघालय         ००           ०२
 अरुणाचल         ०१           ०१
 त्रिपुरा         ०१           टीएमपी ०१
     

 

 

  • Log in or register to post comments

तीन प्रश्न

चंद्रसूर्यकुमार
Mon, 05/27/2024 - 11:19 नवीन
१. केरळमध्ये आय.यु.एम.एल म्हणजे मुस्लिम लीग भाजप आघाडीत? २. कर्नाटकात जनता दल (ध) भाजप आघाडीत आहे काँग्रेस आघाडीत नाही. आणि ते ६ जागा लढवत पण नाहीयेत. त्यांना ६ जागा कुठून आणि कशा मिळणार? ३. गुजरातमध्ये बसपाला ८ जागा? यावर खुद्द मायावतींचाही विश्वास बसायचा नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दुरुस्ती बाकी.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/27/2024 - 11:42 नवीन
टेबल करतांना घोळ झालाय. मुस्लीम लीग आणि कर्नाटकची दुरुस्ती करुन घेतो संपादकांना सांगून. बाकी वाचतांना काँग्रेस आघाडीतली संख्या अगोदर वाचावी. गुजरात, काँग्रेस आठ बसपा आणि इतर तीन असे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

सहमत. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे.

कंजूस
Mon, 05/27/2024 - 12:27 नवीन
सहमत. प्रा.डॉ.दिलीप बिरुटे. इतर पेपरवाले हेच वर्तवत आहेत. बाकी फटाके आणि पेढे वाल्यांनी स्टॉक करून ठेवला आहे. इतर काही दुकानदारांनी "स्टॉक संपला आहे" ही पाटी रंगवून तयार ठेवली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा हा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/27/2024 - 12:31 नवीन
आपल्याला अंदाज करायला काय जातंय. वेगवेगळे पक्ष आणि त्याच्या कोणाकोणाशी युत्या... मांडामांड करता करता थकून गेलो.. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कंजूस

बेरीज...

वेडा बेडूक
Mon, 06/03/2024 - 14:26 नवीन
करता येत नाही का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

ते गणिताचे नाही मराठीचे

अहिरावण
Mon, 06/03/2024 - 14:28 नवीन
ते गणिताचे नाही मराठीचे अभ्यासक आहेत ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेडा बेडूक

आंद्रे वडापाव — 8 Apr 2024 -

आंद्रे वडापाव
Mon, 05/27/2024 - 15:19 नवीन
आंद्रे वडापाव — 8 Apr 2024 - 20:58 माझ्या वै मते. २५० ते ३५० मोदींना मिळावे (या रेंजची प्रोबाबिलिटी ९६%) ( शेअर मार्केट च्या सवयी मुळे असा रेंज बाऊंड अकड्यात मी लिहितो :) ) ३०० हा सरासरी मध्य वाटतो. मध्या पासून +- २५ जागा हा १ डेव्हि झोन, +- ५० जागा हा २ डेव्हि झोन... प्रोबाबिलिटी...
  • Log in or register to post comments

उत्तरप्रदेश आणि गुजरात

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Mon, 05/27/2024 - 16:36 नवीन
या दोन राज्यांमधुन १०६ जागांपैकी मधून इंडियाला किती जागा मिळतील हे महत्वाचं आहे. यूपीतील 'योगी को लाना है मोदी को हटाना है' याचे पडसाद निवडणुकीत कसे उमटतात हे महत्वाचे वाटते ही दोन राज्य सोडली तर, इतर सर्व राज्यात NDA ला लढावे लागतंय. दोन हजार चौदा आणि एकोनावीस सारखी परिस्थिती आता आहे असे वाटत नाही. अर्थात हे सगळे आपले मनसूबे.. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

वातावरण

चंद्रसूर्यकुमार
Mon, 05/27/2024 - 21:51 नवीन
दोन हजार चौदा आणि एकोनावीस सारखी परिस्थिती आता आहे असे वाटत नाही.
२०१४ आणि २०१९ मध्ये तरी मोदी आणि भाजपसाठी परिस्थिती चांगली आहे असे तुम्ही (व्यक्तिशः तुम्ही नव्हे तर तुमच्यासारखे लोक) कुठे बोलत होतात? २०१४ मध्ये मोदी पंतप्रधान होऊच शकणार नाहीत, २०१९ मध्ये परत जिंकणारच नाहीत असेच बोलत होतात ना? निवडणुकांचे निकाल लागल्यावर अचानक ती परिस्थिती मोदींना अनुकूल होती याचा साक्षात्कार तुम्हाला झाला. २०१९ ची निवडणुक झाल्यानंतर पुरोगामी पत्रकारांच्या एका सभेत (की संमेलनात) शेखर गुप्ता म्हणाले की मोदींच्या बाजूने वातावरण आहे हे आम्हाला जाणवत होते पण आम्हाला ते बघायचे नव्हते. आताही मोदींना अनुकूल वातावरण आहे असे तुम्ही म्हणत नाहीयात. ४ जूननंतर ते पण म्हणू लागाल.
अर्थात हे सगळे आपले मनसूबे..
हे स्पष्ट केलेत हे बरे झाले :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काळ उत्तर..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Tue, 05/28/2024 - 08:59 नवीन

दोनहजार चौदाला परिस्थिती वेगळीच होती. काँग्रेस-आघाड्यांचे सरकार आणि अल्पसंख्यांकांच्या मतांच्या लांगुनचालनाला आणि असलेल्या भ्रष्टाचाराला  जनता कंटाळलेली होती. स्वातंत्र्यासारखं आंदोलन अण्णा हजारे आणि अरविंद केजरीवालांनी देशभर  बदलासाठी एक नवं वातावरण केलं.  राजकीय जमीन भुसभुशीत आणि पेरणीलायक करुन ठेवली. आपण जर, पाहिलं तर लक्षात येतं की तोवर भाजपा यात नव्हती. अन्य कोणत्याही देशभर असलेल्या पक्षाने लीड घेतली असती तरी, देशभर असलेल्या अशा पक्षाला लोकांनी भरभरुन पाठींबा दिला असता. मतदान केलं असतं. आपल्या भारतीय जनतेचा चमत्कारावर फार विश्वास. भोळी माणसं,  अशा वेळी,  विश्वगुरुचं आगमन हे अवतारासारखं झालं. 

दोनहजार चौदाला  महागाई, रोजगार, भ्रष्टाचार, काळा पैसा,  हे निवडणुकीचे मुद्दे झाले. दोन हजार चौदाला विकासाच्या मुद्यावर लढली गेलेली निवडणूकीचा प्रवास मंदीर, मशीद, गाय, गोबर, हिंदु-मुस्लीम, पकिस्तान,  मंगळसुत्र, मटन, मासे आणि आता मुज-यावर पोहचली आहे. वाह रे, पंतप्रधान. अर्थात, हे नको असलेली जनता देशात नाही, असे समजायचं कारण नाही. अवतार गेला तर, आपल्या बहुसंख्यांकाचे काय हाल होतील, अशी भिती दाखवून मतांची गोळाबेरीज सुरु आहे, जगण्या-मरण्याच्या प्रश्नापेक्षा हे फार महत्वाचं आहे, असे वातावरण देशभर केलं गेलं आहे. अशा सरकारच्या विरोधात असलेली जनता आणि येथील पक्ष सरकारी यंत्रणांनी दाबून टाकण्याचं काम चोख बजावलं.  सद्य सरकारच्या विरोधात जनता असली तरी असे बदलाचा काळ यावा लागतो आणि  प्रत्येकाचा बदलाचा काळ येत असतो. जनतेला, महागाई, रोजगार, येथील भ्रष्टाचार, येथील प्रशासकीय व्यवस्था, सरकारी यंत्रणेचा केले जाणारा गैरवापर कळत नाही, असे नाही. सरकारी नौक-या आणि असंख्य गरजेच्या गोष्टी जेव्हा समजतील तेव्हा ते बदल होतील. बदलाला फक्त तारीख, काळ लागतो मग ती तारीख चार जुन असेल किंवा अजून कोणतीही. आपलं काम प्रबोधनाचं ते नित्य सुरु ठेवायचं इतकंच. 

-दिलीप बिरुटे 

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

प्रबोधन का धूळ / चिखल फेक ?

अमर विश्वास
Tue, 05/28/2024 - 10:16 नवीन
प्रबोधन का धूळ / चिखल फेक ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

डॉक्टर साहेबांसारख्या शिक्षित

विवेकपटाईत
Tue, 05/28/2024 - 12:14 नवीन
डॉक्टर साहेबांसारख्या शिक्षित व्यक्तीला दहा वर्षात झालेला विकास दिसत नसेल असे शक्यच नाही. रोजगार चे म्हणाल तर फक्त ईपीएफ मध्ये सहा कोटी नवीन खाते उघडले अर्थात संघटित क्षेत्रात सहा कोटी लोकांना रोजगार मिळाला. महागाई दर यूपीए काळापेक्षा अर्धी झाली आहे. फिरोजगारीधर सर्वात कमी आहे. भारताचा निर्यात 339 बिलियन डॉलर पासून ७71 बिलियन डॉलर म्हणजे ३५ लक्ष कोटी वाढला. मोबाईल उत्पादन १८५०० कोटीहून ४ लक्ष कोटी. रेल्वे कोच दहा वर्षांत ७००० जागी ४००००. लिस्ट लमोठी होईल थोडक्यात डॉक्टर साहेबांनी अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र कृषी ते गुगल करून तपासावे त्यांना कळेल गेल्या दहा वर्षांत पूर्वीच्या ३० वर्षाहून जास्त प्रगती झाली आहे. बाकी हिंदू मुस्लिम भाजप नाही indi करते आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काही शब्द चुकले बेरोजगारी

विवेकपटाईत
Tue, 05/28/2024 - 12:16 नवीन
काही शब्द चुकले बेरोजगारी दर सर्वात कमी कृषी ते उद्योग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

डॉक्टर साहेबांसारख्या शिक्षित व्यक्तीला

वेडा बेडूक
Mon, 06/03/2024 - 14:26 नवीन
ह ह पु वा!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

ओ त्यात काय हसण्यासारखे

अहिरावण
Mon, 06/03/2024 - 14:29 नवीन
ओ त्यात काय हसण्यासारखे डॉक्टर शिकलेला नसतो का ? मी तर जे डॉ पाहिले ते सगळे शिकलेले होते ब्वा !! तुमचं माहीत नाही ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेडा बेडूक

दिल्लीत बहुतेक ६/७ ही जागा

विवेकपटाईत
Tue, 05/28/2024 - 12:03 नवीन
दिल्लीत बहुतेक ६/७ ही जागा भाजप जिंकणार. आमच्या पश्चिम दिल्ली भागात आपसात जोर कुठेच दिसला नाही. बहुतेक हीच परिस्थितीत संपूर्ण दिल्लीत आहे.
  • Log in or register to post comments

पश्चिम दिल्ली

चंद्रसूर्यकुमार
Tue, 05/28/2024 - 12:28 नवीन
मागच्या वेळेस पश्चिम दिल्लीतून भाजपचे प्रवेश वर्मा जवळपास पावणेसहा लाख मतांनी निवडून आले होते. यावेळेस आप आणि काँग्रेस युती असल्याने मताधिक्य तितके राहणार नाही पण जागा जिंकणार हे नक्की. इतके प्रचंड मताधिक्य असताना त्या जागेवर पराभव होण्यासाठी प्रस्थापितविरोधी खूप म्हणजे खूप मोठी लाट हवी. त्याची चिन्हे दिसत नाहीयेत. दिल्लीत ७ च्या ७ जागा भाजपच्या येत आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विवेकपटाईत

मतदार लोकसभेला वेगळा विचार

कंजूस
Tue, 05/28/2024 - 16:36 नवीन
मतदार लोकसभेला वेगळा विचार करतात. केजरीवालांना मत दिले नाही तर फुकट पाणी वीज बंद होणार नाही.
  • Log in or register to post comments

मोदींच्या ४-५ मुलाखती

रात्रीचे चांदणे
Tue, 05/28/2024 - 19:26 नवीन
मोदींच्या ४-५ मुलाखती बघितल्या. मी काही फेस रीडिंग करणारा नाही पण मोदींच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास जराही वाटत नाही. कदाचित वायचाही परिणाम असावा. दुसरी गोष्ट म्हणजे १४ आणि १९ ला लाट स्पष्ट दिसत होती. ज्यांचा भाजपशी जराही सबंध नव्हता ते लोकही भजपच का पाहिजे म्हणून भांडत होती. सध्या ही परिस्थिती नाही. एक तर राम मंदिर आणि ४०० पार घोषणे मुळे भजपचं येणार हे जवळ जवळ सगळ्यांनाच वाटत होत त्यामुळेही का असेना पण भाजपा समर्थक ॲक्टिव वाटत नाहीत. त्यामुळे भाजपच्या जागा कमी होतील अस वाटतय. तरीही भाजपा आघाडी २७२ पर्यंत जरी पोहोचली तरी भाजपचा मोठा विजय मानला जाईल. कारण सलग ३ वेळा जिंकण सोप नाही, नेहरूंच्या वेळी ते झालेलं पण ती गोष्ट वेगळी होती.
  • Log in or register to post comments

एक्झिट पोलचे निकाल आले. भाजप

विवेकपटाईत
Sun, 06/02/2024 - 07:58 नवीन
एक्झिट पोलचे निकाल आले. भाजप स्वबळावर ३००+ जागा पुन्हा जिंकणार असे दिसत आहे. खर काय ते ४ जूनला दिसेलच.
  • Log in or register to post comments

इंडिया ब्लॉक (खरगे)३५० वर ठाम

कंजूस
Sun, 06/02/2024 - 13:01 नवीन
इंडिया ब्लॉक (खरगे)३५० वर ठाम आहे.
  • Log in or register to post comments

कॉन्ग्रेसने ३१८ लढवल्या ५४३

कंजूस
Sun, 06/02/2024 - 13:05 नवीन
कॉन्ग्रेसने ३१८ लढवल्या ५४३ पैकी. त्यातून किती येणार? बाकीच्या इतर पक्षांच्या.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा