मिसळपावचा छापील अंक

इनोबा म्हणे's picture
इनोबा म्हणे in काथ्याकूट
4 Jan 2008 - 2:14 pm
गाभा: 

मिसळपावची ख्याती आता सर्वदूर पसरली असताना मिसळपावची छापील आवृत्ती ही काढायला हरकत नाही असे मला वाटले.याच विचारातून 'मिसळबोध'(मला सुचलेले) या अंकाची कल्पना मला सुचली.या अंकाद्वारे मिसळपावच्या सदस्यांना आपले साहित्य रसिक वाचकांपर्यंत पोचवायला आणखी एक माध्यम मिळेल.

शिवाय...

१)महाजालावर साहित्यचोरी मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे बरेचसे लेखक आपले साहित्य प्रसिद्ध करायला धजावत नाहित.
२)ज्या रसिक वाचकांना इंटरनेटचा वापर करता येत नाहीत अशा वाचकांपर्यंत आपले विचार व साहित्य पोचेल.

सहजच मिसळपावच्या जुन्या लेखांवर नजर टाकली तेव्हा ,शिमगा अंकाची एक संकल्पना वाचनात आली.चांगली वाटली.तुम्हाला काय वाटतं?
सदस्यांनी आपापली मते मांडावी.

कळावे,
आपला (मिसळ'लेला) -इनोबा

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

4 Jan 2008 - 8:06 pm | विसोबा खेचर

अनिवसे साहेब,

आत्ता खूप गडबडीत आहे. पहिल्या जागतिक संमेलनाला तुमच्यासकट इतरांचीही पोष्टकार्ड आली आहेत त्या सर्वांनाही उद्याच उत्तरं देतो...

एक दोन महत्वाची कामं हातावेगळी करायची आहेत, तसेच कालपासून रौशनीही पुन्हा डोक्यात घोळू लागली आहे तिलाही येत्या एकदोन दिवसात कागदावर उतरवायचे आहे!

बाकी, मिसळबोध अंकाची कल्पना उत्तम आहे. अनिवसे साहेब, आपल्यासोबतच या बाबतीत आमचे ज्येष्ठ स्नेही प्रमोदकाका, प्रकाश घाटपांडे काका, आणि बिरुटे काका यांचाही विचारविनिमय आम्ही या बाबतीत घेऊ इच्छितो!

असो...

आपला,
तात्या.

इनोबा म्हणे's picture

4 Jan 2008 - 8:28 pm | इनोबा म्हणे

तात्याबा,
बेस आहे,आपण यावर संमेलनात चर्चा करुच्.तुम्ही तुमची कामे हातावेगळी करा.

बाकी हे 'रौशनी' चे झेंगाट तुमच्या डोक्यात 'रौशनी' पाडो.

मिसळ'लेला-इनोबा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jan 2008 - 10:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिसळपावचा अंक काढत असाल तर आनंदाची गोष्ट आहे. पण, मिसळपावच्या लेखांना, सदस्यांच्या संखेला त्याच बरोबर आणखी नव्या प्रतिभेला जरा फुलू द्यावे असे वाटते !!!

आपल्यासोबतच या बाबतीत आमचे ज्येष्ठ स्नेही प्रमोदकाका, प्रकाश घाटपांडे काका, आणि बिरुटे काका यांचाही विचारविनिमय आम्ही या बाबतीत घेऊ इच्छितो!

बिरुटे काका असे म्हणुन आम्हाला आपण ज्या वयोगटात ढकलू इच्छित आहात त्याचा आम्ही निषेध करतो !!! :)

इनोबा म्हणे's picture

4 Jan 2008 - 11:38 pm | इनोबा म्हणे

डॉक्टरसाहेब,(काका नव्हे)
आता सदस्यांच्या संख्येबाबत तुम्ही जे बोलत आहात त्याबद्दल थोडेसे बोलू इच्छीतो...
सदस्यांची संख्या उद्या हाजारावर पोचली तरी आपण या सगळ्या अथवा यातील पंचाहत्तर किंवा पन्नास टक्के सदस्यांचे लेखन छापील अंकात देवू शकत नाही.सदस्यांच्या संख्येपेक्षा आपण दर्जेदार लेखनावर भर दिल्यास गैर काय?आणी लेखांचे व प्रतिभेचे म्हणाल तर मिसळपावमध्ये लेखांची आणी प्रतिभावंत लेखकांची कमी नाही.आपण स्वतः यासाठी प्रयत्न करू.
वेगवेगळ्या विषयांवरील लेख,कथा,कविता,विनोद,व्यंगचित्रे(मी स्वतः व्यंगचित्रकार आहे यामुळे हे काम मी करु शकतो) ,वेगवेगळ्या विषयांवरील काथ्याकूट(चर्चा आणी निकाल)आणी पंतांचे ज्योतिषविषयक मार्गदर्शन(राशीफल) आत्तापासून संकलीत करायला घेतल्यास शिमग्यापर्यंत आपण हे काम हातावेगळं करू शकू.

प्रयत्नांते परमेश्वर या म्हणीवर माझा पूर्ण विश्वास असल्यामुळे माझा गळा फाटेपर्यंत मी सर्वांना याबाबत सुचना व विनंती करुन साहित्य जमा करण्याचा प्रयत्न करणार आहे,अंतीम निर्णय तुम्हा सुज्ञ पंचायत सदस्यांचा.

-इनोबा