✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पेय निघून गेले (विडंबन)

क — कांदा लिंबू, Mon, 05/06/2024 - 15:12
प्रेरणा: ते दिवस निघून गेले टेबलावर प्याले आपटून आणखी-आणखी भरण्याचा हट्ट करून धुंद धुंद होत रिचविण्याचे ते दिवस निघून गेले. मित्रांमध्ये पिऊन-पाजवून विकांताला पार्ट्या करून तरीही बुधवारी नाइन्टी मारण्याचे ते दिवस निघून गेले. थोडीशीच वोडका पिऊनसुद्धा आपल्या घरी जाऊन बायकोचा ओरडा खाण्याचे ते दिवस निघून गेले. पुरेसे खंबे आधीच आणून बॅकअप बाटली तयार ठेऊन तरीही एक क्वार्टर कमी पडण्याचे ते दिवस निघून गेले. गार बर्फाच्या दोन खड्यांवर सोनेरी स्कॉच मापात ओतून हळुवार सिप करत राहण्याचे ते दिवस निघून गेले. एकच प्यालाचा आग्रह करून पण शेवटी सगळ्याच बाटल्या संपवून स्वतःचे-इतरांचे भान न उरण्याचे ते दिवस निघून गेले. बिअर पासून सुरु करून हळूहळू हार्ड घेत राहून शेवटी अट्टल सोशल ड्रिंकर होण्याचे ते दिवस निघून गेले. होळी, गटारी आणि थर्टी फर्स्ट काही न काही निमित्त काढून मधुशालेची वारी करण्याचे ते दिवस निघून गेले. पिण्याच्या यादीतील ब्रॅण्ड्सना कधीच नव्हता-नसेल अंत "कम्बख्त, तुने पी ही नही" नसे असला खेद-खंत.

प्रतिक्रिया द्या
1074 वाचन

💬 प्रतिसाद (2)

तुम्ही डोकं लावलंत की एआयचा

अहिरावण
Mon, 05/06/2024 - 19:16 नवीन
तुम्ही डोकं लावलंत की एआयचा वापर केला? एआय नसेल तर धागा बाद !
  • Log in or register to post comments

हीही.

अमरेंद्र बाहुबली
Mon, 05/06/2024 - 20:34 नवीन
हीही.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा