Skip to main content

दुधी भोपळ्याचे भरीत

लेखक Bhakti
Published on सोमवार, 11/09/2023
Q एक मुलगी भरीतप्रेमी.. पहिल्यांदाच दुधी भोपळ्याचे भरीत केलं , भोपळा गॅसवर भाजल्यावर मिक्सरमधून गरगट्ट केला आणि चिरलेल्या टोमॅटो फोडणीत,तिखट- मीठ घालून परतून घेतल.मुलीला नाश्ताला दिले.भोपळ्याला नाक मुरडणारी परत परत मागून हे भोपळा भरीत खात होती..बरोबरीला भरताच्या वांग्याचं भरीत आहेच .चुटुकदार डाळिंब दाणे बरोबर. अशाच पद्धतीने पडवळ,दोडके,घोसाळ्याचे भरीत करून लहान मुलांना चटकदार पर्याय देऊ शकतो.

वाचन संख्या 9608
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

फोटो मस्त आहे. एकदम साधी सोपी पाकृ. साध्या सरळ भरतासारखी!

'भोपळ्याचे भरीत' मस्त. दिसतंय भारी. बाकी, भरीत म्हणजे फक्त 'वांग्यांचे' अशी श्रद्धा असलेल्या माझ्या सारख्या माणसाला भोपळ्याचंही भरीत छान लागतं समजून घ्यायला वेळ लागेल. अजुन येऊ द्या...! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

मागे हे भरीत कुठूनसे बघून (बहुधा तूनळी) करून पाहिले होते. पण चव काही लक्षात राहण्यासारखी नव्हती. ठीक ठाक होती. म्हणजे त्यात फार काही विशेष नव्हते. ( म्हणजे स्पष्ट असे की बोअरिंग टू से द लीस्ट.. ) ही पाककृती मात्र कदाचित वेगळी दिसते आहे. एकदा या प्रकारे करून बघावी असे वाटते. दुधी भाजून झाल्यावर सोलणे हा किचकट प्रकार ठरला होता असे आठवते. दुधीचे याहून अधिक टेस्टी प्रकार म्हणजे लौकी के कोफ्ते (कोफ्ता करी) आणि दुधीचे घावन. हे दोन्ही नेहमी घरी बनवतो. मिपावर आगोदर आलेली अशाच स्वरूपाची जरा हटके रेसिपी, जी करून पहिली आणि बेहद्द आवडली होती ती म्हणजे शेवग्याच्या शेंगांचे सार. कोणाची होती ते शोधावे लागेल. अर्थात असे प्रयोग करत राहिले पाहिजे.

In reply to by गवि

मिपावर आगोदर आलेली अशाच स्वरूपाची जरा हटके रेसिपी, जी करून पहिली आणि बेहद्द आवडली होती ती म्हणजे शेवग्याच्या शेंगांचे सार. कोणाची होती ते शोधावे लागेल.
ही का? https://www.misalpav.com/node/34623 --- शेवग्याचे सार

दुधी भाजून झाल्यावर सोलणे हा किचकट प्रकार ठरला होता असे आठवते.
हो खुप किचकट आहे तेव्हा खोल भांड्यात पाणी घेऊन भाजलेला दुधी घासून जळकट काळे आवरण काढायचे.
पण चव काही लक्षात राहण्यासारखी नव्हती.
होय ठीक ठाकच पण लेकीला भाज्या चावण्याचा भयंकर कंटाळा आहे.फोडी असलेल्या भाज्या तिच्यासाठी बाद होतात.नाहीतर खुपच बारीक कराव्या लागतात.त्यापेक्षा थेट मिक्सरमधून भरीतच सोपं वाटलं :)

कद्दू हा हिंदी शब्द माहिती होता पण भरीतला माहिती नव्हता तो आहे भर्ता तेव्हा तुम्ही.. कद्दूका भर्ता बनवो :)

In reply to by Bhakti

अहो, (मराठवाड्यातील) मराठीत या फळभाजीला कद्दूच म्हणतात!* हा कद्दू - Kaddu हे काशीफळ - Kashifal हे देवडांगर / डांगर DevDangar --- *बाकी, महाराष्ट्रातील इतर काही भागांतील काही लोक या फळभाजीला दुधी / दुधी भोपळा असेही म्हणतात.

धागा तो लौकी के भर्ते का है.....

In reply to by कर्नलतपस्वी

अरे हा ;)मराठीमधे सगळे भोपळे सारखेच ;)

भोपळ्याचे भरीत (तांबड्या भोपळ्याचे) हा एक अन्य प्रकार मात्र अगदी रूढ प्रकार आहे. हे दह्यातले असते असे वाटते.

In reply to by आंद्रे वडापाव

घरातले काही लोक सध्या कांदा लसूण नको म्हणतात ,सो ते नाही वापरले पण तेही वापरू शकतो.normal फोडणीच.