सिंग वाज किंग

बाजीगर's picture
बाजीगर in जे न देखे रवी...
19 Sep 2022 - 1:15 pm

बातमी : कॅप्टन अमरिंदर सिंग आज भाजपात प्रवेश करणार

https://www.loksatta.com/desh-videsh/former-punjab-cm-captain-amrinder-s...

कॅप्टन अमरींदसिंग झाले अगवा
हाती धरणार आता भगवा

सिध्दूने लावली त्यांची वाट
स्वत: उबवतोय जेल ची खाट

सिद्धू ने भरले रागा चे कान
पंजाबमधे आले भगवंत मान

बलीष्ट कॅप्टनचा केला अपमान
फुकटचंबू जनतेने दिला 'आप' ला मान

वंशज त्यांचे राजघराणे पटियाला
राजकारण हास्यजत्रा शो झाला

'पंजाब लोक काँग्रेस' भाजपात विलीन
फुकटचंबू लोकांचं 'मत'परीवर्तन करीन

खुशहाली आणि डोलणारी पिके हे ख्वाब
जमिनीवर कधी येइल 'उडता पंजाब' ?!

कविता

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

19 Sep 2022 - 3:40 pm | प्रसाद गोडबोले

हा हा हा .

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Sep 2022 - 3:49 pm | ज्ञानोबाचे पैजार

आवडली इन्स्टंट कविता
पैजारबुवा,

मी काय म्हणतो, तुम्ही आयटीसेल ला का पाठवत नाहीत तुमच्या कविता? इतकी सुंदर एकरंगी प्रतिभा असताना त्याचा मोबदलाही मिळेल मजबूत शिवाय देशभर फिरेल. इथेही आहेत काही फॉरवर्ड बादशे. ते देतील लिंका व्यवस्थित.

वामन देशमुख's picture

19 Sep 2022 - 4:52 pm | वामन देशमुख

कविता आवडली, मस्त वाटली.

वामन देशमुख साहेब
सुरिया जी
ज्ञानोबाचे पैजार सर
मार्कस आरिलियस सर
खूप आभार

कर्नलतपस्वी's picture

19 Sep 2022 - 7:16 pm | कर्नलतपस्वी

सिंगा सिंगाच्या लढाईत
'आप' च फावलं
काॅमेडी कराया
मानाचं भगवंत घावलं

फडफडली ज्योत
अन् अमर झाली
बुडत्या(शिपच्या) कॅप्टन नं
कमळाची कांडी धरली

मुक्त विहारि's picture

19 Sep 2022 - 8:44 pm | मुक्त विहारि

कविता आणि हा प्रतिसाद, आवडला...

बाजीगर's picture

20 Sep 2022 - 10:02 am | बाजीगर

तात्काळ कविता आवडली...क्या बात है.