मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शशक'२०२२ - सत्य आणि ज्ञान

साहित्य संपादक · · स्पर्धा
तो डोंगर चढत होता . एक खूप म्हातारा साधू . त्याच्या गुरूने त्याला सांगितलं होतं , त्या शिखरावर जगाचा नियंता रहातो. आजच्या तिथीला तो भेटेल आणि त्याला सत्य सांगेल व ज्ञान देईल. इतके दिवस तो घनदाट जंगलात राहिलेला . एकटाच . फळं अन कंदमुळं खाऊन त्याने दिवस काढले होते . आहारविहाराची सगळी पथ्यही त्याने पाळलेली होती . तो माणसांपासून लांब राहिला होता आणि स्त्रियांपासूनसुद्धा ! फक्त त्या नियंत्याचं नामस्मरण . तो शिखरावर पोचला. त्याने त्या नियंत्याचं स्मरण केलं आणि हात जोडले . तो प्रकट झालाच . एकदा त्याच्याकडे पाहून नियंता म्हणाला . ‘ सत्य हे आहे की तू मूर्ख आहेस आणि ज्ञान हे आहे की ज्या पद्धतीने तू आयुष्य जगलास ते व्यर्थ आहे . ‘

वाचने 5400 वाचनखूण प्रतिक्रिया 6

तो माणसांपासून लांब राहिला होता आणि स्त्रियांपासूनसुद्धा !
म्हणजे ? स्त्रीया माणसे नसतात ? +०

चौथा कोनाडा Mon, 05/23/2022 - 12:33
+१ बरोबर. स्त्रियांपासूनसुद्धा लांब राहिला म्हणजे आयुष्य जगला ते व्यर्थ आहे.

नीळा Mon, 05/23/2022 - 15:22
छान.. मला वाटल स्त्रियां पासुन लांब राहिला.... आणि परमेश्वर एक स्त्रीच आहे हा साक्षात्कार होतोय कि काय!