शशक'२०२२ - फ्रॉम डस्क टिल डॉन

साहित्य संपादक's picture
साहित्य संपादक in स्पर्धा
19 May 2022 - 8:00 am

सुर्य क्षितिजाआड गेला, मावळतीचे रंग गडद व्हायला लागले तसे त्याचे मन निराशेच्या गर्तेत खोलखोल बुडाले.
.
.
टेरेसवर बसुन सुर्यास्त पहात असताना त्यांची ओळख झाली होती. गप्पा वाढल्या, जवळीकही वाढत गेली. काल धाडस करुन त्याने तिला मिठीत ओढले अन ओठांवर ओठ टेकवले. ती बिथरली.
"नको ना. इथे टेरेसवर येईल कोणीतरी. उद्या गावी जाणार आहेत घरचे. तेंव्हा भेटु."
इतका सुंदर नकारातील होकार ऐकुन तोही रोमांचित झाला !!
.
.
पण आज ती आलीच नाही. खिन्न मनाने पायर्‍या उतरताना त्याची नजर तिच्या फ्लॅटच्या बंद दरवज्यावर धडकली.
.
.
दरवाजा अचानक उघडला अन नाजुक हाताने अलगद त्याला आत खेचले.
भान आले तेव्हा खिडकीबाहेर, क्षितिजाकडे नजर गेली - तिच्या अनावृत्त कटीमागुन सुर्य उगवत होता.

प्रतिक्रिया

कटी म्हणजे काय? कंबर ना?
अनावृत्त कटी अन् मागून सूर्य वगैरे वाचून मी दुसरंच काहीतरी picturize केलं.

Anyway हसवल्याबद्दल +१

कटी म्हणजे काय? कंबर ना?
अनावृत्त कटी अन् मागून सूर्य वगैरे वाचून मी दुसरंच काहीतरी picturize केलं.

Anyway हसवल्याबद्दल +१

प्रसाद गोडबोले's picture

29 May 2022 - 1:45 pm | प्रसाद गोडबोले

+०

कटी म्हणजे कंबरच की, पण तुमचा प्रतिसाद वाचल्या पासुन नवीन अजुन जास्त रोमँटिक अर्थ लागायला लागले आहेत ;)

Nitin Palkar's picture

19 May 2022 - 8:11 pm | Nitin Palkar

अनावृत्त कटीमागून सूर्योदय.... रमणीय कल्पना.

Nitin Palkar's picture

19 May 2022 - 8:13 pm | Nitin Palkar

समर्पक शीर्षक.

तुषार काळभोर's picture

20 May 2022 - 1:31 am | तुषार काळभोर

नशीब सूर्योदय दिसला!
सलमा हायेक असती तर त्याने काही सूर्य पाहिला नसता!!

राजाभाउ's picture

20 May 2022 - 11:15 am | राजाभाउ

+१

जव्हेरगंज's picture

20 May 2022 - 1:00 pm | जव्हेरगंज

मजेशीर!!

+१

गामा पैलवान's picture

20 May 2022 - 2:11 pm | गामा पैलवान

+१

सूर्य मावळला नाही तोच .... कार्यक्रम सुरू ! लांबी रेसकी घोडी लगती है.

-गा.पै.

गामा पैलवान's picture

20 May 2022 - 2:12 pm | गामा पैलवान

विजुभाऊ's picture

20 May 2022 - 4:28 pm | विजुभाऊ

-१
कथा आवडली नाही.
कथेत काहीच कथा मटेरीयल नाही

चौथा कोनाडा's picture

21 May 2022 - 12:18 pm | चौथा कोनाडा

+१

आणखी शृंगारिक करता आली असती.
शृंगार रस हरवत चालला आहे हेच खरे.
आमच्यावेळी (म्हंजे तात्या असताना) असं नव्हतं.

ॐ सुर्याय नम:

चेतन सुभाष गुगळे's picture

25 May 2022 - 7:50 pm | चेतन सुभाष गुगळे

पुन्हा पुन्हा सुमार कथा वाचायला मिळत आहेत.

अनावृत्त कटीमागुन सुर्य उगवत होता.

अनावृत्त म्हणजे काय? तर ज्याची कोणतीही इतर आवृत्ती नाही ते ...

अनावृत्त [anāvṛtta] a. a. Not returning, not repeated, being for the first time;

अनावृत ⇄ naked
marathi
अनावृत ⇄ open
marathi
अनावृत ⇄ uncovered

परीक्षकांबद्दल सहानुभूती