मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शशक'२०२२ - वेदना

साहित्य संपादक · · स्पर्धा
मरण ! हा शब्द ऐकल्यावर माणसं दचकतात. दुसऱ्याचं मरण पाहिलं तरी आणि स्वतःच्या मरणाचा नुसता विचार जरी मनात आला तरी . हा माणसाच्या आयुष्यातला न टाळता येणारा भाग . दुःखद ! पण जो या जगात आलाय तो जाणारच . हा साधा नियम आहे निसर्गाचा. कोणी जगून जातात तर कोणी अकाली जातात . पण जातात हे नक्की ! टिपूर चांदणं पडलेलं . मी दाट झाडीमधून चाललो होतो. लांब. नदीच्या दिशेने . मरणात दुःख करण्यासारखं काय ? त्यात घाबरण्यासारखं ते काय ? खरं तर , मरण म्हणजे आनंदाचीच गोष्ट म्हणायची की ! ते सोडवतं तुम्हाला. पण हे माणसांना काय कळणार ?... असा विचार करत मी दिशाहीन चालू लागलो . नर्मदेच्या काठाने . कपाळावरच्या भळभळत्या जखमेची वेदना सोबत घेऊन .

वाचने 16902 वाचनखूण प्रतिक्रिया 35

+१ अनंत काळ जगणं लै बोर असणार! कशाला लोक अमर होण्याच्या मागे लागलेले असतात, कळत नाही.

वासरांत लंगडी गाय हे असं लिहिलंय कारण इतर शशक च्या मानाने ठीकठाक असली तरी स्वतंत्र नाही. मूळ अश्वत्थामाची कथा महाभारतावर आहे. स्वतंत्र कथा लिहिल्यास स्वतःची कल्पनाशक्ती अधिक चांगल्या पद्धतीने सिद्ध होते.

तर्कवादी 26/05/2022 - 09:40
महाभारतातील अश्वत्थामा ह्या पात्राचे रटाळ स्वगत भाष्य असलेल्या, पण काहीच कथानक नसलेल्या ह्या शशकला मिळणारी मतं बघून कमालीचं आश्चर्य वाटत आहे. ही मतं महाभारतातल्या मूळ कथेसाठी असावीत बहूधा !!