श श क २०२२ -डिलीवरी
“जेवायला वाढ, खूप भूक लागलीय.” तो घरात शिरत म्हणाला.
“अकरा साडेअकरापर्यंत कशाला डिलीवऱ्या करत हिंडायचं?”
“अगं, ड्यूटी असतीय, वाढ तू”
“आणि खाल्लं का काही वडापाव वगैरे? की संध्याकाळपासून नुसतेच हिंडताय दुसऱ्यांसाठी गल्लीबोळातून बाईकवरून?”
“तुझं झालं का? आणि सोहमचं? त्याने घरचा अभ्यास केला का नीट?”
“वाढलं त्याला. झोपला तो कधीच. उद्या विचारा त्याला अभ्यासाचं.”
“म्हणजे तू जेवली नाहीसच. नको थांबत जाऊ माझ्यासाठी.”
“पण तुम्ही काही खाऊन का नाही घेत संध्याकाळचं?”
“नको, आपण खाणार आपल्याच पैशानी, पण मागे त्या एका डिलीवरी बॉयचा विडियो व्हायरल झाला होता, तसं काहीतरी केलं कुणी तर केवढ्याला पडेल ते. तेव्हापासून भीतीच वाटते काही खायला हा गणवेश घातल्यावर.”
वाचने
17805
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
खरंच
In reply to खरंच by कर्नलतपस्वी
+1
+१
+१
+१
अधिकेक
+१
+१
+१
उत्तम शशक. खूप आवडली.
+१
+१
+१ छान जमली आहे.
+१
+१
मस्त+1
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+१
+1
+१ आवडली!
+१
+1
+१
+१
+१
+१
+१
+१
लोक संगणकासमोर बसून केवळ कल्पनाशक्ती ताणत आहेत का?
+1 आवडली.