मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शशक'२०२२ - कलियुगात कॉनमॅन

साहित्य संपादक · · स्पर्धा
सरतशेवटी आज जॉब पूर्ण होणार होता. इतक्या दिवस फोनवर तोंड चालवले त्याचे बक्षीस मिळणार. म्हाताऱ्यांची लूट करताना टोचणी लागते खरी, पण उत्क्रांतीच्या नियमांनुसार- ओटीपी दुसऱ्याला सांगायचा नसतो हे पण माहीत नसलेला माणूस नामशेषच होणारच. पण म्हाताऱ्याचा फोनवरचा अविर्भाव आज वेगळाच होता. चढ्या आवाजात प्रश्न विचारत होता, पोलिसांत तक्रार करणार म्हणत होता. सगळं मुसळ केरात ! त्याने फणकाऱ्याने फोन ठेवला. संध्याकाळी, म्हाताऱ्यानं फोनवरून जो डायलॉग मारलेला तोच सेम टू सेम डायलॉग टीव्ही वर सुपरिचित आवाजात ऐकल्यावर तो सटपटला- आणि दगाफटका झाल्याचे दुःख झाले. त्याने खोलीत जाऊन 'शोले'चे पोस्टर रागाने फाडले. काय कलियुग आहे, च्यामारी एकसुद्धा सेलिब्रिटी फॅन होण्याच्या लायकीचा नाही.

वाचने 7085 वाचनखूण प्रतिक्रिया 14

मला कळली असे वाटते. कथेतला सेलिब्रिटी म्हणजे अमिताभ बच्चन असावा. त्याला हा कॉनमॅन फसवण्याचा प्रयत्न करत असावा. संध्याकाळी केबीसी वर तो सुपरिचित आवाज ऐकतो आणि कथानायक चिडतो असे असावे.

In reply to by कानडाऊ योगेशु

चौथा कोनाडा 11/05/2022 - 13:03
बरोबर. ... आणि कॉनमॅन हा बच्चन या एकमेव सेलीब्रेटीचा फॅन असावा त्या मुळेच " एकसुद्धा सेलिब्रिटी फॅन होण्याच्या लायकीचा नाही" हा विचार.

In reply to by कानडाऊ योगेशु

चौथा कोनाडा 11/05/2022 - 13:03
बरोबर. ... आणि कॉनमॅन हा बच्चन या एकमेव सेलीब्रेटीचा फॅन असावा त्या मुळेच " एकसुद्धा सेलिब्रिटी फॅन होण्याच्या लायकीचा नाही" हा हताशपणाचा विचार.

In reply to by कानडाऊ योगेशु

संध्याकाळी, म्हाताऱ्यानं फोनवरून जो डायलॉग मारलेला तोच सेम टू सेम डायलॉग टीव्ही वर सुपरिचित आवाजात ऐकल्यावर >> शहनशाहच वाटतंय.

विजुभाऊ 01/06/2022 - 12:26
डायरेक्ट बच्चनला फोन कसा काय लावू शकला हा प्रश्नच आहे. आम्ही तर डू नॉट डिस्टर्ब करूनसुद्धा " पैशे हवेत का , लोन वाले , क्रेडीट कार्ड वाले असले फोन येतच रहातात