परदेशी गेलेले भारतीय

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in काथ्याकूट
7 Mar 2022 - 12:33 pm
गाभा: 

दरवर्षी लखो विद्यार्थी शिक्षणासाठी परदेशी जातात. लाखो भारतीय नागरीक नोकरीसाठी परदेशी जातात. कधीतरी अनपेक्षितरित्या परदेशात गंभीर परिस्थिती निर्माण होते, जीवीताला धोका नोर्माण होतो. अशावेळी परदेशस्थ भारतीय साहजिकच भारत सरकारने आपली सुटका करुन आपलाला भारतात सुखरूप परत न्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतात, सरकारला विनंती करतात, त्यांचे नातेवाईक सरकारला विनंती करतात. सरकारही तसा प्रयत्नं करतं

सध्या युक्रेन युद्धामुळे तिथे असलेले हजारो भारतीय विद्यार्थी अडकले आणि सरकारने आपली सुटका करावी अशी विनंती विद्यार्थी व पालक यांनी केली. सरकारने अर्थातच योग्य हालचाली करुन त्यांना परतही आणलं. अशा घटना यापूर्वीही घडल्या होत्या.

मात्र यावेळचं चित्र जरा वेगळं, किंबहुना विपरीत आहे.

हे सर्व विद्यार्थी स्वांत सुखाय, स्वतःचं जीवन समृद्ध करण्यासाठी गेले आहेत. युद्ध सुरु होण्याआधी अनेक दिवस या विद्यार्थ्यांना बाहेर पडण्याच्या सूचना दिल्या गेल्या होत्या. अशा परिस्थितीत सरकारने आपल्याला फुकट नेलं पाहिजे असा त्यांचा आणि पालकांचा आग्रह का? आखातात गेलेया हातावर पोट असलेल्या कामगारांना फुकट आणणं समजण्यासारकहं आहे. सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे एकिकडे अनेक विद्यार्थी व पालक कृतज्ञता व्यक्त करत असताना अनेक विद्यार्थी उद्धटपणे बोलताना, अरेरावी करताना दिसून आले आहेत. "आम्हाला अनेक मैल चालावं लागलं मग सरकारी विमान मिळालं, जेवणखाण चांगलं नव्हतं, स्वच्छ्तागृहं स्वच्छ नव्हती, आम्हाला आणलं तर उपकार केले का? अशी भाषा वापरताना काही विद्यार्थी दिसत आहेत. काही वायरल व्हिडीओ मध्ये विमानतळावर स्वागथार्थ आलेले सरकारी अधिकारी/ मंत्री यांची दखल न घेता वा त्यांनी केलेल्या स्वगताला प्रतिसादही न देता विद्यार्थी दिसत होते.

तर अशा स्वस्खुशीने स्वांतसुखाय परदेशी गेलेल्या आणि जाणीवपूर्वक संकटात सापडलेल्या विद्यार्थ्यांना सरकारने फुकट का आणावे?
आता तर या विद्यार्थ्यांना तिथे परत जाणं शक्य नसेल तर इथल्या वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश दिला जावा अशी मागणी केली जात आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी यांच्यापायी आपलं नुकसान का सहन करावं?

हे म्हणजे बँकेत व्याज कमी मिळतं म्हणून नफा कमावण्यासाठी शेअरमध्ये पैसे गुंतवणार्‍यांनी बाजार आपटल्यावर सरकारकडे नुकसान भरपाई मागण्यासारखं आहे

मिपाकरांची मते जाणून घ्यायला आवडेल

प्रतिक्रिया

अनन्त अवधुत's picture

7 Mar 2022 - 1:02 pm | अनन्त अवधुत

हे म्हणजे बँकेत व्याज कमी मिळतं म्हणून नफा कमावण्यासाठी शेअरमध्ये पैसे गुंतवणार्‍यांनी बाजार आपटल्यावर सरकारकडे नुकसान भरपाई मागण्यासारखं आहे

शेअर बाजारात नफा/ नुकसान गुंतवणूक करताना लक्षात घेतलेले असते.
युक्रेनमधे जे घडतय ती साधारण परिस्थीती नाही, आणि ते तसे काही होईल हे अपेक्षीतही नव्हते.

बाकी आपलीच पोरं तिथे अडकले आहेत, त्यांना मदत करणे हे योग्य आहे.

सर्वसाक्षी's picture

7 Mar 2022 - 1:54 pm | सर्वसाक्षी

परदेशी जाताना नुसतं हिरवं कुरणे न पाहता जोखीम सुद्धा लक्षात घेतली पाहिजे.
मुलं परदेशात गेली उच्च शिक्षित झाली कमावती झाली तर ते त्यांचं कर्तृत्व आणि संकट आलं तर सरकार ची जबाबदारी?
इथे गुणवत्तेवर प्रवेश मिळत नाही, देणगी फार वाटते म्हणून परदेशात वैद्यकीय शिक्षणासाठी जाणं ही नफ्यासाठी केलेली गुंतवणूक आहे
इथे राहून अन्य शिक्षण शक्य होतं

अनन्त अवधुत's picture

8 Mar 2022 - 8:37 am | अनन्त अवधुत

परत एकवार, युक्रेन मध्ये उद्भवलेली परिस्थिती साधारण नाही. ते काही, सिरिया अथवा अफगाणिस्तानात नव्हते.

सुबोध खरे's picture

7 Mar 2022 - 1:16 pm | सुबोध खरे

आपलीच पोरं तिथे अडकले आहेत, त्यांना मदत करणे हे योग्य आहे.

हे मान्य केलं तरी तेथून परत येणाऱ्या किती तरी मुलांच्याकडे साधी कृतज्ञता नाही हे खटकतं.

सरकारने केले तर त्यात उपकार नाहीत. असली कृतघ्नतेची भाषा पाहून याना युक्रेन मध्येच सोडून यायला पाहिजे होते असा संतापजनक विचार इथल्या लोकांच्या डोक्यात आला तर त्या काही गैर नाही असे वाटते.

त्यांना परत आणणे हि मानवतावादातून केलेली कृती असली तरी ती सरकारची थेट जबाबदारी नाही.

केवळ ते भारतीय नागरिक आहेत म्हणून सरकार त्यांना परत आणते आहे हे योग्यच आहे. पण त्यांना सरकारने ड्युटी साठी पाठवलेलं नव्हतं.

ते स्वतःच्या खर्चाने आणि स्वतः च्या जबाबदारीवर तेथे गेले होते. याशिवाय देशाकडचे अमूल्य परकीय चलन वापरून गेलेले होते

याउलट आखातात गेलेले कर्मचारी हे तेथून अमूल्य असे परकीय चलन भारतात पाठवत होते.

तेंव्हा या दोघात तुलना करणे चूक आहे.

Trump's picture

7 Mar 2022 - 1:32 pm | Trump

हे मान्य केलं तरी तेथून परत येणाऱ्या किती तरी मुलांच्याकडे साधी कृतज्ञता नाही हे खटकतं.

आपल्यातली किती जण धन्यवाद, कृपया म्हणतात ?
मी एकदा बस वाहकाला धन्यवाद म्हटले, तो चकीत होउन माझ्याकडे बघत बसला. मी असे का म्हणुन त्याला विचारले. त्याने सांगितले की असे धन्यवाद कोणी म्हणत नाही.

सामान्यनागरिक's picture

7 Mar 2022 - 2:54 pm | सामान्यनागरिक

बाकी सगळे ठीक आहे.

पण त्यांच्याकडून किमान यायचे एका वेळचे भाडे तरी घ्यायला हवे. अजुनही वेळ गेलेली नाही. सरकारकडे त्यांचे पत्ते/ नंबर्स आहेत. अजुनही वसूल केले जाउ शकते.
इन्कम ट्याक्स भरतांना पाच दहा रुपये कमी भरले गेले तरी त्यासाठी तीन चार स्मरण्पत्रे येतात. इकडे मात्र हजारो रुपयांचा विमान प्रवास फुकट होतोय. जणू काही ही मुलं म्हणजे कुठेतरी युद्धावर गेलेले सैनिक आहेत आणि ते जखमी वगैरे झाले म्हणुन त्यांना परत आणणे आपले कर्तव्य आहे असाच सगळा समज आहे.

आणि एक गोष्ट मात्र निश्चीत - ह्या भ-व्यांना किमान आपल्या स्वागताला आलेले सरकारी मंत्री आणी अधिकारर्यांकडे नुसते हसून बघायचे सुद्धा सौजन्य नाही.

दोन दिवस स्फोटांत अन्नपाण्या विना तळमळु द्यायला हवे होते ,मग यांना किंमत कळती असती.

रावसाहेब चिंगभूतकर's picture

7 Mar 2022 - 3:01 pm | रावसाहेब चिंगभूतकर

यातले बरेचसे भारतातून ओवाळून टाकलेले जीव होते. याना भारतात मेडिकल साठी प्रवेश मुळीच देऊ नये. मी भारतातल्या अनेक टॅक्स पेयर्स पैकी एक आहे आणि मी या हरामखोरांना भारतात परत आणण्यासाठी टॅक्स भरत नाही.

रात्रीचे चांदणे's picture

7 Mar 2022 - 1:33 pm | रात्रीचे चांदणे

युक्रेन मधील भारतीयांना भारत सरकारनें मदत करायला पाहिजे परंतु फुकट विमानप्रवास वगैरे जरा जास्त होतंय.
युक्रेन मधून आलेल्या बहुतेक विधर्थ्यांनी भारत सरकारचे आभारच मानले आहेत, निदान मी तरी बातम्यांवर असेच पाहिले आहे कदाचित काही विद्यार्थी असतीलही कृतघ्न. परंतु भारत सरकारने अशा संकटामध्ये शक्य होईल तेव्हढी मदत करायला हवी.
काही दिवसांपूर्वी आपल्या राज्यातील मेडिकलच्या काही विद्यार्थ्यांचा अपघात होऊन सर्व मृत्युमुखी पडले होते, त्यात एका भाजप आमदाराच्या मुलाचाही समावेश होता. केंद्र सरकारने त्या केसमध्ये ही आर्थिक मदत केली होती. मुळात भारतात एकाच वेळीं अपघात होऊन दहा-बारा लोक मृत्यू होण्याचे कितीतरी प्रसंग घडत असतील पण प्रत्येकालाच काही भरपाई मिळत नाही.

सर्वसाक्षी's picture

7 Mar 2022 - 1:56 pm | सर्वसाक्षी

आता तर या मुलांना इथल्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश द्या अशा मागणी होत आहे

चौथा कोनाडा's picture

7 Mar 2022 - 5:47 pm | चौथा कोनाडा

खरेतर या परतलेल्या विद्यार्थ्यांकडून ग्रामीण / दुर्गम भागात विनामुल्य आरोग्यसेवक म्हणून ३ महिने तरी काम करुन घ्यावे, त्याशिवाय खरी जाणीव होणार नाही.

सामान्यनागरिक's picture

8 Mar 2022 - 12:11 pm | सामान्यनागरिक

पेपरातया बातम्यांनुसार एका विमानोड्डाणाचा खर्च १ कोटी २० लाख आहे. म्हणजे किमान ५-६ लाख माणशी.

हे वसूल करायला किमान ३ वर्ष ग्रामीण भागात एकही सुटी ने देता काम करुन घ्यावे. घरापासून किमा ४०० कि मी वर बदली द्यावी.

आग्या१९९०'s picture

9 Mar 2022 - 1:46 pm | आग्या१९९०

परदेशातील आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे आपल्या देशात आणणे हे सरकारचे कर्तव्य आहे. आता त्यांच्याकडून खर्च मागण्यापेक्षा भविष्यात पुन्हा ते किंवा कोणीही परदेशात शिक्षणासाठी जाणार असेल त्याच्याकडून ठराविक रक्कम सरकारने ठेव म्हणून घ्यावी जी पुढे अशा प्रसंगी वापरता येऊ शकेल,सरकारवर आर्थिक बोजा पडणार नाही.
ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचे मेडिकलचे शिक्षण पूर्ण झालेले नसल्याने त्यांना कामाचा अनुभवही नसेल. अशा विद्यार्थ्यांकडून आरोग्यसेवा घेणे धोकादायक ठरू शकेल. मुळात ते गुन्हेगार नाहीत की त्यांना अशी शिक्षा द्यावी. त्यामुळे सूचना अव्यवहारीक आणि चुकीची आहे.

सुरिया's picture

7 Mar 2022 - 2:03 pm | सुरिया

विद्यार्थ्यांनी परदेशी शिकायला जातानाच सरपे कफन वगैरे बांधून लास्टची वोवाळणी करुन निघावे.
सोबत एक तिरंगा आणि दोस्त दुश्मन राष्ट्रांची लिस्ट सतत बाळगावी.
म्रुत्युपत्र केले तर वेल अ‍ॅन्ड गुड. एखादा तसा इन्शुरन्स केल्यास घरच्यानाही फायदा.
तेथे शिकताना भारतीय दूतावासाच्या सतत संपर्कात राहावे, दूतावासात घर मिळाल्यास वेल अ‍ॅन्ड गुड.
किमान महिनाभर पुरेल इतका अन्नसाठा, मोबाईल बॅटरी आणि हजारभर किलोमीटर चालण्याची शारिरिक क्षमता बाळगावी.
किमान दोस्त राष्ट्रात पोहोचू शकू इतका पैसा, वेळ आणि ताकत ह्याचा बॅकप घरच्यासहीत सर्वांनी ठेवावा.
आपण ज्या देशात शिकायला जातोय त्या देशाची माहीती आपल्या देशाला किंवा दूतावासाला नसणार आहे हे गृहीत धरुन पावले टाकावी.
युध्द सुरु होण्याआधी कोणता देश आपल्या देशासाठी अधिक जवळचा आहे त्याचा विचार करुन ट्वीट बिट करावे.
बॉम्ब पडायला लागायाच्या किमान २४ तास आधी भारताला निघायच्या विमानात बसावे.
देश आपल्यासाठी काय करतो ह्यापेक्षा आपण देशासाठी काय करतो याची सतत जाणीव ठेवावी.
देश काही करत असेल तर ते योग्यच असणार आहे, त्यासाठी सर्वांनीच खुल्या दिलाने त्याचे स्वागत केले पाहिजे. जे काही करत आहे त्याबद्दल आभार् मानले पाहिजेत. त्यात कुठलेही राजकारण नसते तर असती ती केवळ आस्था ह्याची जाणीव ठेवून वर्तन करावे.
.
.
.
हे पुढे आपण करुन घेऊ. आत्ता सध्या काय?

आंद्रे वडापाव's picture

7 Mar 2022 - 2:39 pm | आंद्रे वडापाव

हा प्रतिसाद मनोरंजक आहे...
:)
कधी भेटलात तर, माझ्याकडून एक कटिंग चहा तुम्हाला लागू ...

अमरेंद्र बाहुबली's picture

7 Mar 2022 - 3:36 pm | अमरेंद्र बाहुबली

+१
सुरीया ताई.
ईथले प्रतिसाद वाचून असं वाटतंय की तिया मुलाना चालू युध्दातून बाहेर काढण्यात आलंय. पहायला गेलं तर ते मुलं ८००~ ९०० किमी चालत आले पोलंड, रोमानिया बोर्डर वर. तिथून त्याना आणखी पन्नास हजार खर्च करून विनयमानात बसणे कठीण नव्हते. पण सुखरूप आलेल्याना आम्ही सुखरूप बाहेर काढले असा दाना केला जातोय, त्याचं श्रेय लाटायचंय काहींना. पण ही मुलं निघाली हुशार, आजिबात दाद देत नाहीयेत. त्यानी तरी का दाद द्यावी?? जिथे खरंच मगतूची गरज आहे तिथे त्याना मदत करायला कुणीही नव्हतं. रोमानियातील एक मेयर सुध्दा ज्योतारादीत्यना बोलला का त्याना सांगा मी शेल्टर नी फूड दिलं, नाॅट यु. भारत माता की बोलल्यावर ते मुलं जोराने जय बोलले पण नरेंद्र मोदी जिंदाबाद बोलायला लावल्यावर शांत बसले. अश्या विडीओ वायरल होताहेत

रावसाहेब चिंगभूतकर's picture

7 Mar 2022 - 2:58 pm | रावसाहेब चिंगभूतकर

https://youtu.be/tFnl81osXUI

Ungrateful students.

सर्वसाक्षी's picture

7 Mar 2022 - 4:39 pm | सर्वसाक्षी

लायक मुलांना वैद्यकीय शिक्षण मिळतं. गुण कमी पडले आणि देणगीही जास्त वाटते अशी मुलं युक्रेन ला जातात. देशाची लायकी न काढता अशांची काढा! इथले डॉ उत्तम आहेत राजकारणी सोडता कुणी उपचारासाठी परदेशात जात नाही
मजुरी हा विषय नीट समजून घ्या. इथे रूपये मिळतात, परदेशात परकिय चलनात मोबदला मिळतो तो रुपयाच्या तुलनेत खुप जास्त वाटतो पण खर्चही परकीय चलनात असतो.
आयटी क्षेत्रातील सगळेच परदेशात जात नाहीत. आणि जगातील मोठ्या अनेक आयटी कंपन्या परदेशात आहेत, त्यांना बुद्धिमान लोक हवे असतात आणि स्थानिक उमेदवारापेक्षा आशियाई कमी पगारात मिळतात. डॉलर युरो वगैरे चलन भारतीय रुपया च्या तुलनेत कमी पटीने बळकट आहेत, साहजिकच भारतीय रुपया मूल्यात तिकडचा पगार निश्चितच अधिक ठरतो.
असो. देशात राहायचं की परदेशात हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, तिथे आपत्ती ओढवली तर देशाला हाक देणं स्वाभाविक आहे पण फुकटेगिरी अमान्य

स्वलिखित's picture

7 Mar 2022 - 5:48 pm | स्वलिखित

"+111111

ही भुमी संतांची तशीच बलवंतांची,

" मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास
कठिण वज्रास भेदु ऐसे
भले तरीं देउ कासेची लंगोटी
नाठाळांच्या माथी हाणु काठी "

तुकाराम महाराजाची शिकवण लक्षात आहे हे विसरू नकोस.

तुका म्‍हणे ऐशा नरा।
मोजून माराव्या पैजारा।।”
.

जेम्स वांड's picture

7 Mar 2022 - 5:29 pm | जेम्स वांड

देणगीही जास्त वाटते

वाटत नाही हो सर ती जास्त असते(च) ना, चांगल्या खासगी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेण्यापेक्षा जर युक्रेन वगैरे परवडत असेल तर खासगी वैद्यकीय शिक्षण शुल्क ह्या विषयात गंभीर विचार आणि संस्थात्मक बदल करणे गरजेचे आहे.

कॉमी's picture

7 Mar 2022 - 5:56 pm | कॉमी

सहमत आहे.

सर्वसाक्षी's picture

7 Mar 2022 - 7:40 pm | सर्वसाक्षी

जेम्स भाऊ,
एका शाळेच्या फाटका बाहेर एक मुलगा रडत होता. तिथुन जाणाऱ्या तुमच्या सारख्या एका दयाळु माणसाने थांबून त्या मुलाला रडण्याचे कारण विचारले. मुलाने सांगितले की त्याच्या आईने त्याला आईस्क्रीम खायला एक रुपया दिला होता तो त्याच्या हातून हरवला. तो दयाळू गृहस्थ त्या मुलाला आपल्या खिशातून एक रुपया काढून देत म्हणाला की रडू नकोस, हा घे रूपया. मुलाने खुषीने त्यांचे आभार मानले.
तो माणूस तिथून निघताच जरा पुढे गेल्यावर पुन्हा त्याला रडण्याचा आवाज आला. बघितलं तर तोच मुलगा रडत होता. त्याला आश्चर्य वाटलं. त्यानं त्या मुलाला रडण्याचं कारण विचारलं की तुझा रुपया हरवला म्हणून मी तुला रुपया दिला आता काय कारण?
मुलगा म्हणाला की जर त्याचा रुपया हरवला नसता तर आज त्याच्याकडे आज दोन रुपये असते!!!

समजा वैद्यकीय जागा वाढल्या तरी " नुसत्या एमबीबीएस ला कोण विचारतो? इथे एमडी ला सीट कमी आणि पेंड सीट परवडत नाहीत तेव्हा आम्ही जातो चीन रशिया युक्रेन ला
एकेकाळी अभियांत्रिकी हा परवलीचा शब्द झाला होता, धडाधड इंजिनिअरिंग कॉलेजेस उघडली. पुढे काय झालं? आज अनेक इंजिनिअरिंग कॉलेजेस बंद पडत आहेत सीट रिक्त जात आहेत.
ज्यांना परदेशात जायचं आकर्षण आहे ते जाणारच. आणि अवश्य जाऊ देत पण जाताना जोखीम विसरू नये. उद्या युरोप मध्ये युक्रेन व चीनच्या डॉ पदव्यांची मान्यता रद्द झाली तर?

+१
. उद्या युरोप मध्ये युक्रेन व चीनच्या डॉ पदव्यांची मान्यता रद्द झाली तर? अगदीच मान्यता नाही रद्द होणार अशी आशा बाळगते डॉक्टर होण्याचं स्वप्न नक्कीच पाहावं पूर्ण करण्यासाठी योग्य पाऊल उचलावी.पण त्या विद्यार्थ्यांना इथे प्रवेश मिळावा ही मागणी एकदम चुक आहे.

कर्नलतपस्वी's picture

7 Mar 2022 - 8:15 pm | कर्नलतपस्वी

शिक्षण,नोकरी साठी परदेशात जाणे गैर नाही परंतू मायदेशा बद्दल
आदरभाव हवा
कृतज्ञता हवी
संकटकाळात मदतीची आपेक्षा रास्त
अर्थिक ओझे टाकू नये
युक्रेन मधून परत येणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशाची मागणी चुक.

कुमार१'s picture

7 Mar 2022 - 8:31 pm | कुमार१

युक्रेन मधून परत येणाऱ्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशाची मागणी चूक +१

सरकारी महाविद्यालयात तर अजिबात नको.
खाजगीमध्ये जर घ्यायचे ठरले तर, घेताना योग्य ती चाचणी परीक्षा घेऊनच.

sunil kachure's picture

7 Mar 2022 - 8:20 pm | sunil kachure

भारतात अनागोंदी कारभार माजला आहे,युक्रेन भारता पेक्षा पण उत्तम देश आहे.
मेडिकल चे शिक्षण देणारी सरकारी कॉलेज भारतात लोकसंख्या च्या प्रमाणात अतिशय नगण्य आहेत
युक्रेन,बंगला देश,रशिया जर भारतीय मुलांना योग्य पैशात मेडिकल चे शिक्षण देत असेल तर.
भारताने त्यांचे आभार मानले पाहिजेत.
महाराष्ट्र,कर्नाटक,तमिळ nadu ह्याच राज्यात जास्त सरकारी मेडिकल कॉलेज आहेत.
बोल बच्चन उत्तर भारत इथे पण भारतीय असल्याचा फायदा घेत असे.
एमबीबीएस होण्या साठी एक कोटी खर्च येतो.
किती लूट करणार.
सरकार नावाची संस्था अस्तित्वात आहे की नाही.
स्वतःची चड्डी फाटली आहे आणि दुसऱ्यांना पूर्ण कपडे घाला असा सल्ला इथे प्रतिसाद मधून सर्व देत आहेत.

सर्वसाक्षी's picture

7 Mar 2022 - 9:45 pm | सर्वसाक्षी

परदेशात उघडलेली कॉलेजेस त्या देशांपेक्षा बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांवर चालतात
युक्रेन सरकार जर अल्प दरात डॉक्टर घडवून आपल्या सेवेसाठी पाठवत असते तर आभार नक्की मानले असते.
चीनमध्ये वस्तू कमी दरात तयार होतात म्हणून जग तिथून विकत घेतं पण तो व्यापार आहे. तसंच युक्रेनचं.
दरवर्षी ४००० विद्यार्थी डॉ होऊन भारतात प्रॅक्टिस करता यावी यासाठी असलेली परिक्षा देतात आणि फक्त ७०० उत्तीर्ण होतात. म्हणजे बहुसंख्य विद्यार्थी डॉ झाल्यावर बाहेर राहतात

जे परिक्षा उत्तीर्ण होत नाहीत ते काय करतात?

दरवर्षी ४००० विद्यार्थी डॉ होऊन भारतात प्रॅक्टिस करता यावी यासाठी असलेली परिक्षा देतात आणि फक्त ७०० उत्तीर्ण होतात. म्हणजे बहुसंख्य विद्यार्थी डॉ झाल्यावर बाहेर राहतात

सामान्यनागरिक's picture

8 Mar 2022 - 12:19 pm | सामान्यनागरिक

ते काहीही असलं तरी आपण स्वखुषीने परदेशात जायचं, वेळेवर परतण्याच्या सूचनांक्डे दुर्लक्षं करायचं आणि नंतर अपेक्षा करायची की आम्हाला फुकटात परत आणा हे जरा जास्तच होतंय.

कितीही हाल अपेष्टा सोसाव्या लागल्या असतील तरी ते स्वखुषीने गेले होते ही वस्तुस्थिती आहे. परदेशात जातांना त्यांना उत्तम जीवन्मानाची आणि सुखी आयुष्याची हमी कोणी दिली नव्हती. आता अडचणी आल्या तर प्रयत्नं करुन मार्ग काढणे त्यान्नाच करु द्या.

जेवढा पैसा खर्च झाला तेवढ्यात पन्नास गावात पिण्ञाचे पाणी पोचवता आले असते. दहा हजार लोकांना उज्ज्वला योजनेत ग्यास सिलींडर देता आले असते.

उगा काहितरीच's picture

7 Mar 2022 - 9:09 pm | उगा काहितरीच

भारतीय आहेत ते! अडचणीत आहेत म्हणून सुखरूप घरी आणने सरकारचे काम आहे. त्यासाठी काहीही करावं लागलं तरी सरकारने केलं पाहिजे.

पण....

त्याचा खर्च १००% त्यांच्या कडून वसूल केलाच पाहिजे.
युरोप ला शिकायला गेलेत म्हणजे खूप गरीब आहेत असे शक्यच नाही (काही सन्माननीय अपवाद असतील कदाचित).

धर्मराजमुटके's picture

7 Mar 2022 - 9:20 pm | धर्मराजमुटके

परदेशी शिक्षणासाठी जावे काय ?

गरीब असले तरी शिष्यवृत्ती घेऊन जावे, पैसे असले तर स्वांत सुखाय, स्वतःचं जीवन समृद्ध करण्यासाठी जावे. जोपर्यंत सरकार नावाच्या यंत्रणेला यात काही गैर आढळत नाही तोपर्यंत आपल्याला विरोध असण्याचे कारण नसावे.

अशा परिस्थितीत सरकारने आपल्याला फुकट नेलं पाहिजे असा त्यांचा आणि पालकांचा आग्रह का?

पालकांचा आग्रह असतो की सरकारी निती अशी आहे ते एकदा पाहिले पाहिजे. सरकारला नको तिथे फुकट पैसे वाटायची सवय लागली आहे ती बदलली पाहिजे. देशी दारु पिऊन मेले वाटा पैसे, अपघातात मेले वाटा लाखो रुपये ही गोष्ट बदलली पाहिजे. आवश्यक असेल तिथे मोफत वैद्यकिय सेवा, प्रवास सेवा, अन्नधान्य सेवा जरुर पुरवावी. ती मानवतेच्या नावाने केलेली कृती असेल. पैसे वाटण्याची सवय मोडली पाहिजे. युक्रेनच्या बाबतीत म्हणायचे तर युद्ध चालू झाल्यामुळे अनागोंदी चालू आहे. सरकार ने फुकट आणले तरी ज्यांना ओरडा करायचा ते करतातच आणि पैसे मागीतले तरी लोक बोंबलणारच ! मात्र आता जीव वाचविणे हे महत्त्वाचे असल्यामुळे सरकारने पैशाचा विचार करु नये. पैसे खर्च होतील पण १०० पैकी १० लोकांच्या मनात जरी देशाबद्दल कृतार्थ भाव जागृत झाला तर असे लोक देशासाठी भविष्यात काहीना काही चांगली कामे नक्की करतील त्यामुळे ती एक प्रकारची गुंतवणूक आहे असे समजावे. आपल्यापैकी बरेच जण कोविड काळात शहरे सोडून आपापल्या गावाकडे पळालो होतो. काही गावांनी प्रेमानी आश्रय दिला तर काहींनी गावाच्या वेशीवरच अडवले. त्यामुळे संकटसमयी मायभुमीकडे आपला ओढा असतोच आणि मायभुमीने आपले अपराध पदरात घेऊनदेखील आपल्याला शरण द्यावे हे गैर नाही.

सर्वात खटकलेली गोष्ट म्हणजे एकिकडे अनेक विद्यार्थी व पालक कृतज्ञता व्यक्त करत असताना अनेक विद्यार्थी उद्धटपणे बोलताना, अरेरावी करताना दिसून आले आहेत.

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. दुर्लक्ष करणे सोयिस्कर ! मात्र कृतज्ञता व्यक्त करावी, उद्धटपणा करु नये ही आपली संस्कृती असावी.

सरकारी अधिकारी/ मंत्री यांची दखल न घेता वा त्यांनी केलेल्या स्वगताला प्रतिसादही न देता विद्यार्थी दिसत होते.

हे स्वागत समारंभाची जे फालतू प्रकरण आहे ते एकदम बंद करावे. सरकारी अधिकारी, मंत्री यांनी हारतुरे घेऊन स्वागत करणे अयोग्य ! घरी गेल्यावर घरच्यांना वाट्टेल ते करु द्या !

या विद्यार्थ्यांना तिथे परत जाणं शक्य नसेल तर इथल्या वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश दिला जावा अशी मागणी केली जात आहे. भारतीय विद्यार्थ्यांनी यांच्यापायी आपलं नुकसान का सहन करावं?

येथील विद्यार्थ्यांच्या पोटावर पाय येणार नाही हे पाहून काही मार्ग काढता आला तर पहावा. नाहितर बाहेरुन येणार्‍या विद्यार्थांनी आपल्या नशीबाला दोष द्यावा आणि एखादे वर्ष कळ काढावी. ही परिस्थिती कायम राहणार नाही.

एकंदरीतच संकटकाळात आपली वर्तणूक कशी असावी, संकटाचा मुकाबला कशा प्रकारे करावा याची रुपरेषा ठरविण्यात आपण भारतीय तोकडेच पडतो. त्यामुळे केवळ सरकारला दोष देऊन चालणार नाही. त्यामुळे सरकार देखील चुकले असेल, मुले देखील चुकले असतील मात्र त्या चुका मागे टाकून, त्यातून योग्य धडा घ्यावा यातच आपले हित आहे.

मात्र एकंदरीतच
गे मायभू तुझे मी फाडीन वस्त्रे सारी |
उचलीन तुझ्या पुढ्यातल्या सार्‍या नोटा आणी नाणी |
मायभू माझ्यापुढे तुझी रडगाणी कशाला ? माझ्या डॉलरमुळेच तुझ्या रुपयाला अर्थ आला |
अशी वृत्ती ठेऊ नये हि विनंती.

कर्नलतपस्वी's picture

8 Mar 2022 - 7:41 am | कर्नलतपस्वी

चारोळी एकदम सटिक आहे.

जेम्स वांड's picture

10 Mar 2022 - 9:03 am | जेम्स वांड

बाडीस

गवि's picture

7 Mar 2022 - 9:21 pm | गवि

रास्त खर्च घ्यावा.

एअर इंडिया तिकीट जर महाग झाले असेल तर एक किमान दर (ना नफा ना तोटा) ठरवून प्रमाणित तिकीट दर घ्यायला हरकत नव्हती.

खरं तर परत या अशी नोटीस जारी करतानाच रास्त दरात अधिकच्या फ्लाईटस (फेर्या) उपलब्ध करुन द्यायला हव्या होत्या. कदाचित आत्ताचा लोड कमी झाला असता.

सरकार खूप प्रयत्न करुन सर्वांना परत आणत आहे. युक्रेनच्या आत सध्याच्या युद्धाकाळात त्यांच्यासाठी दळणवळण वाहतूक उभी करणे हे तिथल्या एम्बसीच्या मर्यादित कर्मचारीसन्ख्येला कठीण होते. युक्रेनच्या स्वत:च्या सिस्टीमच कोलमडल्या असताना एम्बसी काय सोयी उभ्या करु शकणार?
किमान आजूबाजूच्या अन्य देशांत पोचू शकलेल्या विद्यार्थ्यांना मदत केली त्याबद्दल त्यांनी भारत आणि अन्य सर्व देशांबद्दल कृतज्ञ असले पाहिजे.

भारत सरकार नी आणि सर्व राज्य सरकार नी इतकी मेडिकल कॉलेजेस निर्माण करावीत की प्रतेक इच्छुक मुलाला डॉक्टर होता aale पाहिजे .
ते पण योग्य फीस मध्ये...त्या साठी सरकारने हवं तर सरकारी यंत्रणांचा फालतू खर्च बंद करावा.
पंतप्रधान करोडो रुपयाच्या गाडीत फिरायचे काही कारण नाही.
सरकारी नोकरांना त्यांची गुणवत्ता आणि रिटर्न बघून च पगार द्यावा.
आमदार ,खासदार,मंत्री ह्यांच्या वर होणारा फालतू खर्च कमी करावा.
तरी पैसे कमी पडत असतील तर लोकांवर टॅक्स लावावा.
इथे प्रश्न.
युक्रेन मध्ये भारतीय का जातात मेडिकल चे शिक्षण घेण्यासाठी हा आहे.
त्याची उत्तरं अपेक्षित आहेत.

सर्वसाक्षी's picture

7 Mar 2022 - 10:51 pm | सर्वसाक्षी

यावर स्वतंत्र चर्चा घडवून आणा
आज आग लागली आहे ती विझवायची कशी? या क्षणी आग लागू नये म्हणून काय करावं हा परिसंवाद काय कामाचा

चला तुमच्या मतानुसार मेडिकल सीट वाढवल्या. ज्यांना परदेशात जाऊन स्थायिक व्हायचे आहे त्यांचं काय? आपली वैयक्तिक पदवी अनेक देशांत चालत नाही.
इथे भरपूर इंजिनिअरिंग कॉलेजेस असताना मुलं पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेत का जातात? दर्जा हे कारण फार थोड्या विद्यापीठांना लागू होतं

सामान्यनागरिक's picture

8 Mar 2022 - 12:25 pm | सामान्यनागरिक

विषय काय कुठे संबंध लावताय ?

पंतप्रधानांना करोडोच्या गाडीत फिरायचे कारण नाही ? आजचा पंतप्रधान असा आहे की आपण अब्जावधी रुपये ओवाळुन टाकु.

बाकी आमदार/ खासदार यांचेवर होणारा खर्च यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते पण या गोष्टीशी काय संबंध ?

मेडिकल शिक्षण या विषयावर ही वेगळी चर्चा होउ शकते. उगीच इथे संबंध लावु नका

टीपीके's picture

8 Mar 2022 - 12:43 am | टीपीके

काय गंमत आहे बघा, आमच्या लहानपणी अमेरिकन सरकार त्यांच्या नागरिकांची परदेशात कशी काळजी घेते किंवा पाठराखण करते याच्या सुरस कथा ऐकवल्या जायच्या आणि भारतीय सरकार कसे दरिद्री, दळभद्री म्हणून गळे काढले जायचे.
आता सरकार आंतरराष्ट्रीय पातळीवर थोडी पत राखून आहे, गरजेच्या वेळी मदत करत आहे तर त्याबद्दल पण तक्रार. अहो चार टाळकी एकत्र आली की वर खाली बोलणे होणारच. इथेच बघा ना, सरकारने काहीही केले तरी त्यात खोट काढणारे काही आयडी आहेतच की. आपले नागरीक सुरक्षीत परत येत आहेत यातच आनंद मानायचा. You can't satisfy everyone everytime.

मुक्त विहारि's picture

8 Mar 2022 - 6:28 am | मुक्त विहारि

+1

मुक्त विहारि's picture

8 Mar 2022 - 6:30 am | मुक्त विहारि

समजा जर, माझा मुलगा अशा वेळी अडकला असता तर,

माझी आवश्यकता, मुलगा परत सुखरूप येणे

माझी जबाबदारी, त्यासाठी आलेला खर्च, सरकारला देणे

बात खतम्

कर्नलतपस्वी's picture

8 Mar 2022 - 7:44 am | कर्नलतपस्वी

+1

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Mar 2022 - 12:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखातील भावनेशी सहमत. विद्यार्थी फारच कृतघ्न वाटले. उत्तरप्रदेश निवडणुकीत एका सभेत 'ऑपरेशन गंगाची' घोषणा झाली आणि मला खुप आनंद झाला. की आता सगळी मुले सुखरूप येतील त्याच बरोबर 'ऑपरेशन गंगेचा इव्हेंट' देशभर कसा साजरा होतो याचीही खुप उत्सुकता होती, हे नम्रपूर्वक कबूल करतो. जस जसे विद्यार्थी यायला लागले तस तसे व्हिडियो बघायला मिळत होते. काही प्रामाणिक तर काही मिडियासाठी असलेले. पण विद्यार्थ्यांचा तो तुटकपणा मला अजिबात सहन होत नव्हता, आवडला नाही. आजकालच्या पीढ़ी आणि आमची पीढ़ी याची तुलना मनातल्या मनात केली. त्यात रोमानियाच्या महापौराचं बोलणं, त्याचे ते झापणे त्याचाही त्रास झाला. एका व्हीडीयोत विद्यार्थ्यांना 'भारत माता की जय' अशा घोषणा द्यायला लावलेला व्हिडिओ पाहण्यात आला. भारत मात्ता की जय म्हणते वेळी मुलाचा उत्साह जबरा होता आणि त्याच वेळी 'मा.मोदी' यांचा जयजयकार करतांना त्यांचा तो मावळलेला उत्साह, त्यांचं ते गप्प राहणे बिलकुल आवडले नाही. सरकारने वेळीच धावपळ करून आणले त्याचं काही कौतुक विद्यार्थ्यांना दिसले नाही. विद्यार्थ्यांचा तो अलिप्तपणा, तुटकपणा, ती त्यांची टीका, सगळी दृश्य पाहुन मन खिन्न झाले. सध्या फार उदास वाटत आहे.

-दिलीप बिरुटे

Trump's picture

8 Mar 2022 - 12:26 pm | Trump

सुप्रभात सर.
प्रतिसाद आवडला. तुम्ही नेहमीप्रमाणे श्री मोदींच्यावर हल्ले न करता प्रांजळपणे मत मांडले यातच सगळे आहे.

गवि's picture

8 Mar 2022 - 12:34 pm | गवि

:-))

सरांचा 'निरागस' प्रतिसाद ऑफ द ईयर.

पण आम्ही निरागस नाही ना..

सदस्य नावाप्रमाणेच लब्बाड दिसता! :)

प्रांजळ म्हणताना जळजळ म्हणायचं आहे हे लपून राहिलं नाही!

(सरांची आवडती मते मी नेहेमीच वाचतो..)

चौकस२१२'s picture

10 Mar 2022 - 1:48 pm | चौकस२१२

तुम्ही नेहमीप्रमाणे श्री मोदींच्यावर हल्ले न करता प्रांजळपणे मत मांडले यातच सगळे आहे.
आमचा दिवस हि धन्य झाला

नगरी's picture

10 Mar 2022 - 9:13 pm | नगरी

+++1

अनिता's picture

9 Mar 2022 - 4:26 am | अनिता

एकही विद्यार्थ्याने ukrain मध्येच राहून तेथील नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरवू असे म्हटले नाही .. जरी ते रेडक्रॉस सारख्या संस्थांमधून करता आले असते तरी .

कर्नलतपस्वी's picture

9 Mar 2022 - 6:59 am | कर्नलतपस्वी

सरकारनेच त्याना फोर्स करावयास हवे होते. तेथील आपत्कालीन काय दा काय म्हणतो बघायला हवे. बाकी देशभक्ती वगैरेबद्दल न बोलणे बरे कारण तो देश त्याचा नाहीच.

इरसाल's picture

10 Mar 2022 - 3:45 pm | इरसाल

बर झालं ना अस कोणी म्हटलं नाही आणी थांबल नाही तिकडे ते.
उगाच "नीम हकीम खतरा ए जान" कशाला ओढवुन घ्यायची. वरुन रशिया जीव घेतोय तर जमिनीवर हे लोकं जीव घेताय अस झालं असत म्हणजे?????
(रेफ. भारतातुन ओवाळुन टाकलेले भाबडे जीव तिकडे वैद्यकीय शिक्षण घ्याय्ला गेलेत)

रात्रीचे चांदणे's picture

9 Mar 2022 - 8:37 am | रात्रीचे चांदणे

युक्रेनच्या सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना युक्रेनच्या दुसऱ्या शहरात हलवले आहे. तिथून त्याना भारतात आणले जाईल. अत्ता भारतात आल्यावर त्या विद्यार्थ्यांचा attitude बघण्यासारखा असेल.

sunil kachure's picture

9 Mar 2022 - 2:05 pm | sunil kachure

जी मुल युक्रेन मध्ये शिक्षण घेण्या साठी गेले आहेत.
त्याचे कारण भारत सरकार किंवा भारत देश त्यांच्या नागरिकांना शिक्षणाची सुविधा देवू शकतं नाही
भ्रष्ट सरकार आणि बोल बच्चन राजकीय पक्ष फक्त फेकत असतात.
आता युक्रेन मध्ये जी मुल आहेत.
त्यांना तेथील स्थानिक प्रशासन,आणि बाजू च्या देशातील सरकार मदत करत आहेत.
सर्व सुविधा पुरवत आहे.
भारत सरकार काही ही करत नाही.
फक्त जाहिरात आणि श्रेय घेत आहे.
भारत सरकार फक्त विमान पाठवून त्यांना भारतात आणत आहे.
आणि तो देशाचा पैसा खर्च होत आहे.
कोणत्या ही राजकीय पक्षाचा होत नाहीं

ते विमान तिकीट चे पैसे ती मुल देतील.
तुम्ही मागणी करा .
तुम्हाला जाहिरात पण करायची आहे,स्वतःची लाल पण करायची आहे.
आणि मागे भक्त बदनामी पण करत आहेत तरी तिकडे दुर्लक्ष पण करायचे आहे.
सर्व फायदे पाहिजेत.
लोक मूर्ख आहेत का?

रावसाहेब चिंगभूतकर's picture

9 Mar 2022 - 7:05 pm | रावसाहेब चिंगभूतकर

लोक म्हणजे तुम्ही ना? शक्य तरी आहे का मूर्ख असणे?

भारत सरकार किंवा भारत देश त्यांच्या नागरिकांना शिक्षणाची सुविधा देवू शकतं नाही....

हे कधीपासून?

जेम्स वांड's picture

10 Mar 2022 - 10:20 pm | जेम्स वांड

शिक्षणावर डाव्यांचा असर आहे, व्यवसायिक शिक्षण नाही, समान संधी नाहीत म्हणून ओपन कॅटेगरीची हुशार पोरे परदेशी जाऊन ब्रेनड्रेन होतोय वगैरे वगैरे आरोप आपण आधीपासून ऐकले नाहीत का आता अवचितच भारतात उत्तम शिक्षण मिळत असल्याचे आपल्यास आपल्याला साक्षात्कार झालाय मुवि ?

एक जुना धागा सापडला बुआ उद्बोधक

"भारत सरकार काही ही करत नाही."
"भारत सरकार फक्त विमान पाठवून त्यांना भारतात आणत आहे."
अनमोल तर्क वाचून धन्य झालो .. प्रभूंचे पाय दावा कोणीतरी

जेपी's picture

9 Mar 2022 - 9:43 pm | जेपी

अर्ध शतक निम्मित sunil kachure सायबांचा सत्कार युक्रेन चे तिकीट देऊन करण्यात येत आहे .

इरसाल's picture

10 Mar 2022 - 3:49 pm | इरसाल

आजपासुन मी,
श्री. सुनिल कचुरे(काचुरे), श्री. संजय राउत, श्री. कमाल राशेद खान, श्री. मुन्नवर राणा यांचा न बिघडणारा पंखा (आजन्म) झालो हे घोषित करतोय.
(पुन्हा एकदा प्रयत्न करुन बघतो...) सर तुम्ही ऑनलाईन क्लास घेता कां?

माझा धाकटा भाऊ,त्याचे आवडीचे वाक्य,शिकलेले तितका हुकलेला! आज पटले.