सुदैवाने काही काळ दिग्गजांच्या मृत्युमुळे काहीसे झाकोळले गेलेले ओंबळे यांचे हौतात्म्य राजकारणातून का होईना गौरवले गेले. गिरगाव चौपाटीजवळ त्यांचा पुतळा आणि प्रेरणा स्थळ उभारण्यात आले - २६/११/११ रोजी.. ओंबळे यांना शांतताकाळातला सर्वोच्च पुरस्कार - अशोक चक्र देण्यात आला.
खटला पूर्ण करून संविधानिक दृष्ट्या काम पूर्ण करून सार्वभौमत्वावर हल्ला या आरोपाखाली कसाबला फाशी देण्यात आले.. कसाबला मृत्यूदंड देणे हा एकमेव उद्देश नक्कीच नव्हता ज्यासाठी मरण पत्करून ओंबळे यांनी कसाबला जिवंत पकडले. कसाबची फाशी हे या सर्व करकरे, साळसकर, ओंबळे यांपासून ते उज्ज्वल निकम यांच्यापर्यंत सर्वांच्या इतक्या प्रचंड कामाचे, प्रयत्नांवरचे केवळ शिक्कामोर्तब.
भारताला २६/११ च्या कटाची माहिती मिळवण्यासाठी आणि जगापुढे पाकिस्तानचा खरा चेहरा आणण्यासाठी कसाबचा उपयोग झाला. आणि निशःस्त्र ओंबळे यांच्या ज्याला आर्मीच्या भाषेत Supreme Sacrifice - सर्वोच्च त्याग / बलिदान म्हणतात त्याचे सार्थक झाले.
मिठाई, फटाके, फुगड्या या तमाशाऐवजी या सर्व हुतात्म्यांचे आणि त्यांना साथ देणार्या गोविलकरांसारख्या इतर शूरांचे स्मरण जास्त योग्य ठरले असते.
असो.. हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना पुनःश्च विनम्र श्रद्धांजली.
मिठाई, फटाके, फुगड्या या तमाशाऐवजी या सर्व हुतात्म्यांचे आणि त्यांना साथ देणार्या गोविलकरांसारख्या इतर शूरांचे स्मरण जास्त योग्य ठरले असते. .. खरं आहे.
हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना विनम्र श्रद्धांजली.
प्रतिक्रिया
धन्यवाद मैत्र.
खरेच
तुकाराम ओंबाळे यांना खरी श्रद्धांजली
कोणता कार्यक्रम होता ते कळू शकेन का?
(No subject)
हुतात्मा तुकाराम ओंबळे यांना विनम्र श्रद्धांजली.