चालू घडामोडी - मे २०२१ (भाग ४)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
18 May 2021 - 3:02 pm
गाभा: 

मोदींच्या प्रतिमाभंजनासाठी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील विषाणूचा उल्लेख "मोदी विषाणू" असा करण्याची कॉंग्रेसची आपल्या कार्यकर्त्यांना सूचना. चीनचा उल्लेखही नाही. कसा करणार? कॉंग्रेसचा चिनी राज्यकर्त्यांबरोबर करार आहे ना.

https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/call-it-modi-strain...

प्रतिक्रिया

इमेज ची किती पडलीय नाही .

श्रीगुरुजी's picture

18 May 2021 - 5:16 pm | श्रीगुरुजी

आपली रेघ मोठी करता येत नसली की दुसऱ्याची रेघ छोटी केली की आपली रेघ आपोआप मोठी दिसते.

Narada Scam: उच्च न्यायालयाने जामीन नाकारताच ममतांच्या मंत्र्यांची तब्येत बिघडली, तिघे हॉस्पिटलमध्ये

--------------

https://m-lokmat-com.cdn.ampproject.org/v/s/m.lokmat.com/crime/narada-sc...

-------------

असे आजारपण येणे, हा निव्वळ योगायोग आहे...

नावातकायआहे's picture

18 May 2021 - 4:42 pm | नावातकायआहे

निवडणुक झाल्यावर चौकशी हा पण योगायोग .

मुक्त विहारि's picture

18 May 2021 - 5:18 pm | मुक्त विहारि

आता कारवाई होत आहे ...

पण नेमके, अशावेळीच काही जणं आजारी कसे काय पडतात बुवा?

विजुभाऊ's picture

18 May 2021 - 4:53 pm | विजुभाऊ

मी गेले चार दिवस टीव्ही बंद करुन बसलो आहे.
उगाच भणाभणा दिवसभर चालू असते.
आणि बातम्या किती खर्‍या आहेत तेच समजत नाही.
या कोवीड आणि महाविकास आघाडी शिवाय जगात सध्या दुसरे काहीच नाही असे वाटायला लागलेय.
एकोहम सत्यं ...... टीव्ही नाम : अस्मिन.
जगात इतरत्र काय होतेय तेच समजत नाहिय्ये.
गाझा मधे इस्राईल हल्ले करतच आहे.
पाकिस्तान मधे इम्रान विरुद्ध लोकमत वाढायला लागलय. तहेरीक ए लब्बाईक ही नवीच संघटना पुढे येतेय.
बाकी भुतान ब्रम्हदेश नेपाळ स्रिलंका अफगाणीस्थान बांगलादेश येथे सध्या काय चाललय तेही समजत नाहिये.
इंग्लंड हळू हळू कोविड मधून बाहेर येतय, जर्मनी पण खम्बीर पणे सामना करतय.

अगदी उत्तम ....

मी अद्याप पर्यंत टीव्ही वरच्या बातम्या लावलेल्या नाहीत, 1975 पासून ...

श्रीराम हसबनीस's picture

26 May 2021 - 12:49 pm | श्रीराम हसबनीस

उत्तम गोष्ट. तारीख आणि फार तर नावं वेगळी असतात. घड़ामोड़ी त्याच. संसर्ग, मृत्यु, आरोप-प्रत्यारोप, भ्रष्टाचार, हल्ले, राजकारण. आपण आपलं मार्मिक साहित्य, कला वैग़ैरेचा आस्वाद घ्यावा. अगदी कळकळ वाटली तर एखाद्या गरजूला मदत करावी. अजून काय?

कॉमी's picture

18 May 2021 - 7:07 pm | कॉमी

केरळ मध्ये मुखमंत्री पी विजयन सोडले तर संपूर्ण मंत्रिमंडळ नव्या चेहेऱ्यांना संधी देण्यासाठी बदलले आहे.
कोव्हिड मध्ये उत्तम काम करणाऱ्या आरोग्यमंत्री शैलजा टीचर यांना सुद्धा संधी दिली नसल्याने लेफ्ट मिडियाकडून केरळ वर टीका होत आहे. पण त्या स्वतः म्हणतात-

KK shailaja denied any disappointment and accepted it as a party decision.

मला नवीन लोकांना संधी देण्याचा निर्णय आवडला.

आनन्दा's picture

18 May 2021 - 11:30 pm | आनन्दा

पंकजाकडून इतकं शिकलं तरी पुरेसे आहे.

नगरीनिरंजन's picture

19 May 2021 - 5:45 am | नगरीनिरंजन

पद्मश्री डॉक्टर के के अग्रवाल यांचे कोरोनामुळे निधन झाले.
स्वतः डॉक्टर असूनही “दिवे लावल्याने कोरोनाचा प्रतिबंध कसा होतो” व्गैरे छ्द्मविज्ञान पसरवणारे म्हणून ते नेहमीच लक्षात राहतील.
एका अशिक्षित, द्वेषवादी व गावगुंडासारख्या माणसाच्या समर्थनासाठी उच्चशिक्षण घेतलेले लोक स्वतःचे अवमूल्यन करुन घेताना पाहणे वेदनादायी आहे.
मला वाटतं ह्यांच्या डोक्यात ह्यांच्या आईबापांनी श्रेष्ठत्वाच्या व जुन्या सुप्रिमसीच्या खुळचट कल्पना भरवलेल्या असतात व मोदी आपल्याला तो जुना “सुवर्णकाळ” आणून देईल असे ह्यांना वाटत असणार.
प्रत्यक्षात अस्तनीतला निखारा स्वतःलाच चटका देणार हे त्यांना चटका बसेपर्यंत कळत नाही.
पारंपारिक रिझर्वेशनमधून उच्च्शिक्षण वगैरे घेत असले तरी हे शेवटी सुमार ते सुमारच.
असो. त्यांचे प्रेत जाळायला लाच न देता जागा मिळाली असेल अशी आशा.

श्रीगुरुजी's picture

19 May 2021 - 10:32 am | श्रीगुरुजी

मुळात मोदींची पदवी खोटी आहे हे केजरीवाल, आशुतोष, संजय सिंह या विकृत आपटार्ड्सनी निवडणुकीच्या तोंडावर जाणीवपूर्वक पसरविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. परंतु त्यात तोंडावर आपटल्याने हा अपप्रचार बंद झाला. परंतु विकृत मनोवृत्तीचे काही नंबरी अजूनही तोच अपप्रचार करीत आहेत.

How did Narendra Modi get a degree in entire political science when such a degree isn’t even offered in India, or any part of the world?

Entire Political Science used to be a popular degree during 1970s and 80s. The Vice Chancellor of Gujarat University has also tried to clear the air regarding this. In fact, it is also awarded in the Magadh University, Bodh Gaya of Bihar.

What is Entire Political Science Course?

It is about completing entire MA course where the candidate/student has taken only political science subjects. The candidate has not taken any allied subject and has taken all 8 papers related to Political Science only. That is why it is called Entire Political Science.

Now, many universities have stopped this course, but you can’t blame Modi for the same.

Gujarat University has uploaded the mark sheet of Narendra Modi on its official website. You can see 'Entire Political Science' mentioned in the mark sheet.

मोदींचे शिक्षण आणि त्यावरील गोंधळ ह्या इतका मूर्खपणाचा वाद मी भारतीय राजकारणांत पहिला नाही. जो माणूस सामान्य परिवारांत जन्माला येऊन स्वकर्तृत्वावर प्रधानमंत्री झाला त्या माणसाला शिक्षण आहे कि नाही हा मुद्दा पूर्णपणे निरर्थक आहे. त्यामाणसाने आपले स्किल आधीच कर्तृत्वाने सिद्ध केले आहे. स्वयमेव मृगेंद्रता म्हणतात ती तीच. शिवाजी महाराज हे क्षत्रिय परिवारातील होते कि नाही, त्यांना तलवार किती चांगली चालविता येत होती, धनुष्यबाणाने त्यांचा वेध किती अचूक होता, राजकारणाचे धडे त्यांनी कुठे गिरवले हे मुद्दे पूर्णपणे गौण आहेत कारण ह्या माणसाने स्वकर्तृत्वाने हिंदू राजेशाही उभारली. अहो शिक्षण हि शिडी आहे पण जो माणूस आधीच वर पोचला आहे तो शिडीवरून नक्की किती पाऊले उचलून आला हा मुद्धा फक्त सुशिक्षित मूर्ख लोकच उचलून धरू शकतात.

तुकाराम महाराजांनी कुठल्या वेदपाठशाळेंत दाखला घेतला होता ? पण

‘वेदाचा तो अर्थ आम्हांसीच ठावा।
येरांनी वाहावा भार माथां।
खादल्याची गोडी देखिल्यासी नाहीं।
भार धन वाही मजुरीचें।।’

हे सांगून त्यांनी संपूर्ण हिंदू धर्मांत स्वकर्तृत्वाने आपले स्थान निर्माण केले. वेदपाठशाळेंत गेलेल्या कुठल्याही ब्राह्मणापेक्षा तुकाराम महाराज कुठल्याही पद्धतीने कनिष्ठ अजिबात नाहीत.

कुठल्याही राजकीय नेत्याला शिक्षण असणे गरजेचे नाही असे माझे मत आहे. मुलांत भारतीय शिक्षण व्यवस्थेचा पाया ढासळत चालला आहे हे सर्वच लोक मान्य करतात. माझ्या स्वतःच्या अनुभवाप्रमाणे दिल्लीच्या दरबारांत व्यक्ती पोचली कि सर्व ज्ञानावर आपोआप एक पडदा पडतो आणि बुद्धिभ्रम होतो. त्यामुळे शिक्षण हे दिल्लींत फायद्याचे नाही.

सुशिक्षित म्हणवणारे IAS अधिकारी कसे उन्मत्तपणे जनावरांप्रमाणे वागतात आम्ही पहिले आहे. उच्चविद्याविभूषित असे मन्नू साहेब कश्या प्रकारे देशाची वाट लावतात हे सुद्धा आम्ही पहिले आहे आणि विशेष शिक्षण नसणारे फवार साहेब कश्या प्रकारे क्रिकेट पासून दारुक्षेत्र पर्यंत सगळीकडे चाणाक्ष पद्धतीने खेळ्या खेळत आहेत हे सुद्धा पहिले आहे. सोनिया गांधी ह्यांना विशेष शिक्षण नसले तरी उत्तम नेतृत्व दाखवून त्यांनी काँग्रेस जिवंत ठेवली. चांगले शिक्षण घेतलेला त्यांचा सुपुत्र सध्या ते जहाज बुडवत आहे.

---

शिक्षण महत्वाचे नसले तरी, सत्य बोलणे महत्वाचे आहे. काही राजकीय नेते जसे स्मृती इराणी ह्यांनी आपल्या प्रतिज्ञापत्रांत आपले शिक्षण खोटे सांगितले होते असा आरोप आहे. इथे खोटे बोलणे चुकीचे आहे, शिक्षण किती आहे हा मुद्दा नगण्य आहे.

टीप : बहुतेक शिक्षण हे माणसापासून कारकून घडविण्यासाठी आहे. ह्या व्यक्ती नेते बानू शकत नाहीत. पहिल्या बाकावर बसणारा विद्यार्थी क्वचितच चांगला नेता होतो.

गॉडजिला's picture

23 May 2021 - 1:48 pm | गॉडजिला

शिवाजी महाराजांना गरजेचे शिक्षण बालपणिच मिळाले त्यांचे कर्तुत्व म्हणजे पुढे त्यानी ज्ञानाचा खुबिने केलेला वापर होय.

तुकाराम महाराज राजकारणात न्हवते तर ते आत्मोध्दाराच्या मार्गात होते तिथे शिक्षण न्हवे तर नेमका उलट प्रवास अस्तो म्हणुन त्यान्चे उदाहर देणे हीच बाब ज्ञानाचा आभाव दर्शवते.

आजुनही कोणत्याही विद्याविभुशीत नेत्याला भारतीय जनतेने एक्वटुन शक्ती दिलेली नस्ल्याने नेत्याना शिक्षणाची गरज काय असा आप्ला भ्रम झालाय खरे तर पक्षातील ३५% खासदार आम्दार हे उच्च्विद्या विभुशीत अस्ले पाहिजेत असा काय्दा हवा मग ब्घा भारतातुन कसा सोन्याचा धुर वाहु लाग्तो ते. आज साहेब किमान माजी पंतप्रधान नक्किच गणले गेले असते जर ते....

असो शिक्षणा शिवाय, लोकशाही, संविधान बळकट होउ शकत नाही आज देशात जो काही भ्रष्टाचार, ब्रेन ड्रेन, आणी नको असणार्‍या गोष्टी असतील तर त्याला कारण फक्त आंणी फक्त शिक्षणाचा आभाव हेच आहे

सुबोध खरे's picture

24 May 2021 - 9:51 am | सुबोध खरे

@ गॉडजिला
खरे तर पक्षातील ३५% खासदार आम्दार हे उच्च्विद्या विभुशीत अस्ले पाहिजेत असा काय्दा हवा मग ब्घा भारतातुन कसा सोन्याचा धुर वाहु लाग्तो ते.

जरा खालच्या वस्तुस्थितीवर नजर टाका

The current Lok Sabha has the highest number of people with at least a graduate degree, 394/542. This is almost three times the number of graduates in the first Lok Sabha.

https://www.hindustantimes.com/india-news/number-of-graduates-is-highest...

अन्यथा दक्षिण आफ्रिकेतील सामाजिक बदल या विषयावर ज ने यु मधून आठ वर्षे घेऊन पी एच डी केलेला उमेदवार खासदार झाला किंवा अर्वाचीन गद्य वाङ्मयाचा इतिहास या विषयातअथवा उत्तरध्रुवावरील पांढऱ्या अस्वलाच्या उवांवर संशोधन करून डीम्ड विद्यापीठातून पी एच डी झालेला अशी काय क्रांती करणार आहे तो लोकसभेत.

केवळ उच्च शिक्षित झाला म्हणजे सामाजिक परिस्थितीची जाणीव आणि आकलन असेलच असे नाही.

आग्या१९९०'s picture

24 May 2021 - 11:49 am | आग्या१९९०

तसे असते तर आपले क्रेंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे बाबा रामदेवचे कोरोनील औषध लाँच करायला गेलेच नसते. बाबा धडधडीत खोटे दावे करतोय आणि हे निमूटपणे ऐकत होते. मिपावर कोणीकोणी त्यांचा निषेध केला?

गॉडजिला's picture

24 May 2021 - 12:11 pm | गॉडजिला

हे माहीत न्हवते खूप छान.

केवळ उच्च शिक्षित झाला म्हणजे सामाजिक परिस्थितीची जाणीव आणि आकलन असेलच असे नाही.
हम्म बरे झाले हे स्पष्ट केले अन्यथा यापुढे नेते हे शिक्षकच असावेत हा विचार करत होतो

कॉमी's picture

23 May 2021 - 2:05 pm | कॉमी

शिक्षण नसणे या कारणाने आउट ऑफ हँड उडवून लावणे अतार्किक आहे.

पण नेत्याने शिक्षण घेतले असावे अशी अपेक्षा असणे आणि उच्चशिक्षण एक प्रो मुद्दा मानणे हे योग्यच वाटते.

श्रीगुरुजी's picture

23 May 2021 - 3:00 pm | श्रीगुरुजी

शिक्षण असणे हा एक मुद्दा आहे. जो द्विपदवीधर आहे, त्याच्या शिक्षणाबद्दल योजनाबद्ध कंड्या पिकवून त्याचा अशिक्षित, अडाणी, अल्पशिक्षित असा तुच्छतापूर्वक करीत राहणे हा पूर्ण वेगळा मुद्दा आहे.

कॉमी's picture

23 May 2021 - 3:41 pm | कॉमी

हो, सहमत आहे.

Ujjwal's picture

23 May 2021 - 5:11 pm | Ujjwal

+१००
बरं असंही नाही कि शिव्या देणाऱ्यांचा नेता उच्चशिक्षित आहे. ड्रॉपआउट नेत्याची चाटण्यातच यांना धन्यता वाटते.
ते म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.

Ujjwal's picture

23 May 2021 - 5:11 pm | Ujjwal

+१००
बरं असंही नाही कि शिव्या देणाऱ्यांचा नेता उच्चशिक्षित आहे. ड्रॉपआउट नेत्याची चाटण्यातच यांना धन्यता वाटते.
ते म्हणतात ना दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही.

श्रीगुरुजी's picture

23 May 2021 - 6:15 pm | श्रीगुरुजी

मोदींच्या शिक्षणाबद्दल मुद्दाम अफवा पसरवून संशय पसरविण्याचा योजनाबद्ध प्रयत्न केला गेला. माहिती अधिकार कायद्याचा वापर करून व त्याची जाहिरात करून मोदींच्या पदवीविषयी माहिती मागितली गेली. त्यातून जी पदवी प्रमाणपत्रे मिळाली ती खोटी आहेत असे आरोप केले गेले. विद्यापीठात जाऊन कुलगुरूंना वारंवार भेटून मोदीची पदवी, त्यांचा परीक्षा क्रमांक इ. गोष्टींसाठी पिच्छा पुरविला गेला. कुलगुरु घामाने निथळत होते, भीतिने थरथर कापत होते असे कुलगुरूंविषयी आशुतोष या आपटार्डने जाहीर पसरविले होते. १९७० च्या दशकात मोदींना संगणकीकृत गुणपत्रिका मिळणे शक्यच नाही कारण तेव्हा म्हणे भारतात संगणकच नव्हता असे आपले अज्ञान जाहीर हे तोंडावर आपटले. त्यांच्या दुर्दैवाने काही जणांनी आपली १९७३ मधील सीबीएसईची संगणकीकृत गुणपत्रिका प्रसिद्ध केल्याने यांचे तोंड काळे झाले.

ज्यांनी आजतागायत स्वतःच्या शिक्षणाचे कोणतेही पुरावे दिले नाहीत, ज्यांनी राबडीसारख्या ठार निरक्षर महिलेला सलग ८ वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी पाठिंबा दिला होता, ज्यांनी राजस्थानात गोलमादेवी नावाच्या ठार निरक्षर महिलेला मंत्री बनविले होते, जे जेमतेम १० वी उत्तीर्ण असलेल्या व्यक्तीला पंतप्रधान बनवायला निघाले होते, तेच नालायक मोदींच्या पदवीची उठाठेव करीत होते कारण त्यांच्याकडे मुद्देच नव्हते. बरं, पदवी, शिक्षण वगैरे म्हणून नाचणाऱ्यांच्या पक्षातील उच्चविद्याविभूषित नेत्यांनी फक्त चाटुगिरी करून देशाचं वाटोळं करणे यासाठीच आपल्या तथाकथित उच्च शिक्षणाचा उपयोग केला, याकडे मात्र यांचे सोयिस्कर दुर्लक्ष.

हे सर्व जनता ओळखून असल्याने जनतेने या मुद्द्यावरून यांना भीक घातली नाही. त्यामुळे आता तो दुष्प्रचार थांबलेला दिसतो. अर्थात तोच मुद्दा घेऊन मोदींना अर्वाच्य बोलणारे काही नंबरीनिर्बुद्ध मिपावर आहेत व अनेक वेळा तोंडावर आपटूनही ते चिवटपणे हाच मुद्दा पुन्हा पुन्हा उगाळत बसतात.

१९७० च्या दशकात मोदींना संगणकीकृत गुणपत्रिका मिळणे शक्यच नाही.

कशी मिळणार? भारतात संगणक म्हणजे काय असते हेच मुळी राजीव गांधी पंतप्रधान होण्यापूर्वी माहित नव्हते ना? मग १९७० च्या दशकात संगणकीकृत गुणपत्रिका कशा मिळणार?

चंद्रसूर्यकुमार's picture

23 May 2021 - 8:08 pm | चंद्रसूर्यकुमार

हे उपरोधाने लिहिले आहे हे वेगळे लिहायलाच नको.

भारतात पहिला संगणक टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चमध्ये १९५५ मध्ये आला होता. टी.सी.एस ची स्थापना १९६८ मधील तर इन्फोसिसची १९८१ मधील. स्वतः नारायणमूर्ती पटणी कॉम्प्युटर्समध्ये नोकरीला होते म्हणजे पटणीची स्थापना १९८१ पूर्वीची कधीची तरी.

तरी भारतात कॉम्प्युटर पहिल्यांदा कोणी आणले? तर राजीव गांधींनी.

श्रीगुरुजी's picture

23 May 2021 - 9:48 pm | श्रीगुरुजी

१९७७ मध्ये जनता पक्षाची सत्ता केंद्रात आल्यानंतर तत्कालीन उद्योगमंत्री जॉर्ज फर्नांडिसांनी काही महिन्यातच आयबीएम, कोका कोला अशा मोठ्या परदेशी कंपन्यांना भारतातून निघून जाण्यास भाग पाडले.

त्यावेळी भारतात आयबीएम, बरोझ, आयसीएल, डेटा जनरल, डेक, कंट्रोल डेटा कॉर्पोरेशन अशा मोठमोठ्या परदेशी संगणक कंपन्या व्यवसाय करीत होत्या. पुण्यातील विद्युत महामंडळ, पुणे विद्यापीठ अशा ठिकाणी आयसीएलचे मेनफ्रेम वापरात होते. किर्लोस्कर कमिन्स मध्ये ६० टर्मिनल जोडलेला आयबीएमचा मेनफ्रेम होता. किर्लोस्कर ऑईल इंजिन्स कंपनीत बरोझचा मेनफ्रेम होता. अल्फा लाव्हल मध्ये डेटा जनरलचा मेनफ्रेम होता.

HCL १९७६ मध्ये, काळे कन्सल्टंट्स १९८० मध्ये, विप्रो १९८० मध्ये स्थापन होऊन डेटा प्रोसेसिंगचे काम करीत होते. MCA हा ३ वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम इंदूर विद्यापीठाने १९८२ मध्ये व पुणे विद्यापीठासहीत अजून ४ विद्यापीठांनी १९८३ मध्ये सुरू केला होता.

राजीव गांधी ३१ ऑक्टोबर १९८४ या दिवशी पंतप्रधान झाले होते.

गॉडजिला's picture

19 May 2021 - 12:16 pm | गॉडजिला

वरील तक्ता असे दाखवतो, की ह्यांतील बर्‍याच, सध्याच्या अतिशय नावारूपास असलेल्या कंपन्यांचे संस्थापक व त्यांच्या सुरूवातीच्या अनेक वर्षांच्या वाटचालींचे निर्देशक उच्चविद्याविभूषित नेहमीच होते असे नव्हे.

मंग यांचे सीएओ कधी ड्रॉप ऑउट का नसतात ? ते मात्र शिकलेले का लागतात ? एंप्लोयी मस्ट बी नॅचरल एक्स्टेंशन असे असुनही यांचे सिएओ वगैरे वगैरे मंडळ हाय हाय टी, यमाइटी वाले कसे असते ?

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 May 2021 - 12:26 pm | अनिरुद्ध.वैद्य

प्रतिसाद देताय येवढाला.

प्रदीप's picture

19 May 2021 - 4:30 pm | प्रदीप

आपल्या कौतुकाची शिदोरी मर्यादितच असते, तेव्हा मोदींसारख्या, तुमच्या मते, अशिक्षीत व अडाणी माणसाच्या वाट्यास तुमचे कौतुक नाही आले, हे ठीकच. कारण फायनॅन्स, बँकिंग व ऑडिटर्स ह्या क्षेत्रांतील उच्चविद्याविभूषितांसाठी ते राखून ठेवले पाहिजे. त्यांची विद्वत्ता व त्यांतून निपजणारे कारनामे काय वर्णावे?

काही अलिकडची उदाहरणे पहाता, तुम्हाला त्या क्षेत्रांतील उविविंनी बरीच संधी अलिकडेच दिली होती:

१. मलेशियन सॉव्हरीन फंडाच्या संबंधित एका नामांकित बँकच्या उविविंनी केलेला फ्रॉड, जो त्यांनी कबूल केला आहे.
२. वायरकार्डचा अनेक वर्षे सुरू राहिलेला फ्रॉड, त्यांच्या ऑडिटर्सच्या लक्षांत आला, किंवा नाही, ह्याविषयी संभ्रम.
३. ग्रीनसीलसंबंधित घोटाळ्यांत एका मोठ्या बँकेचे पैसे गेल्यात जमा. ह्या २ व ३ संबंधीत एकाच नामांकित बॅंकेच्या (अर्थात, उविवि) रिस्क म्यॅनेजरची गच्छंति.

ह्या व अशाच सर्वच घोटाळ्यांत पकडले गेल्यावर, दंड भरून शहाजोगपणे सुटण्याची हुशारीही अर्थात ह्या उविविंनी चालवलेल्या संस्थांकडे असतेच.

आणि ह्या क्षेत्रांतील उविविंचे हे असलेच कारनामे पूर्वीही सुरूच होते. ते तसेच ह्यापुढेही सुरू राहतीलच, ह्यांत शंका नाही. तेव्हा आपल्या कौतुकाचा मर्यादित साठा, जपूनच वापरावा, ह्यांजकडून खूपच संधि उपलब्ध होत राहतीलच तुम्हाला.

वायरकार्डचा अनेक वर्षे सुरू राहिलेला फ्रॉड, त्यांच्या ऑडिटर्सच्या लक्षांत आला, किंवा नाही, ह्याविषयी संभ्रम.

आता तसा संभ्रम राहिला नाही, असे दिसते आहे. जर्मनीच्या पार्लमेंट्च्या कमिटीने ई. वाय. वर भरपूर ताशेरे ओढले आहेत. आता, तेथील उविविंची स्वतःची कातडीव बचावण्यासाठी पळापळ होईल. पण येथील उविवि ह्याविषयी काही बोलणार नाहीत.

तेजस आठवले's picture

20 May 2021 - 10:07 am | तेजस आठवले

संपादक मंडळाला ह्या प्रतिसादाबद्दल काहीच वावगे वाटत नाही ?

दिगोचि's picture

19 May 2021 - 6:41 am | दिगोचि

असे आजारपण येणे, हा निव्वळ योगायोग आहे...>>> योगायोगच नव्हे तर नशीब पण लागते. अगदी असेच आजारपण भुजबळाना पण आले होते. तेम्व्हा ते मफलरमधे असायचे आता एकदम टुणटुणीत दिसतात. आजारी आहोत असे दाखवून त्यानी पुरोगामी व राश्ट्रवादी लोकान्च्या मनात त्यानी खूप सहानभूती निर्माण केली जशी ममतानी पाय मोडला आहे असे दाखवून केली तशी.

सॅगी's picture

19 May 2021 - 10:04 am | सॅगी

आजारपण यायलाच पाहीजे असे काही नाही....आजारपणाचे नाटक जरी केले तरी खूप झाले..

हल्लीचेच उदाहरण बघा, प्लॅस्टर आणि व्हीलचेअर मतदानानंतर अचानक नाहीशी झाली. =))

राघव's picture

21 May 2021 - 5:08 pm | राघव

राजकारण्यांना अशी "राजकीय" आजारपणे हुकमीपणे काढता येतात. अन् बहुतेक पब्लिक त्याला भुलते सुद्धा.
यात मला तरी काही वावगे वाटत नाही. जसं बंद/आक्रसताळेपणा/अफवा म्हणजे एक राजकीय हत्यार, त्याचप्रमाणे, राजकीय आजारपण/हृदयाची हाक वगैरे सगळ्या राजकीय ढाली आहेत. फक्त कोण किती निर्ढावलेले आहेत तेवढे यातून नीट समजते हे खरे.

नावातकायआहे's picture

19 May 2021 - 11:55 am | नावातकायआहे
सुबोध खरे's picture

19 May 2021 - 12:01 pm | सुबोध खरे

@ नगरीनिरंजन
पारंपारिक रिझर्वेशनमधून उच्च्शिक्षण वगैरे घेत असले तरी हे शेवटी सुमार ते सुमारच.
असो. त्यांचे प्रेत जाळायला लाच न देता जागा मिळाली असेल अशी आशा.

डॉ के के अगरवाल यांच्या सारख्या उत्कृष्ट डॉक्टरांवर आपण शिंतोडे उडवून काय मिळवलं हे समजत नाही.
द्वेषाने आपली दृष्टी अंध झाली आहे एवढेच मी म्हणेन.

डॉ अगरवाल यांनी यु ट्यूबच्या माध्यमातून गेले एक वर्ष करोना बाधित रुग्णांचे किती प्रबोधन केले आहे किती लोकांना मानसिक आधार दिला आहे याची आपल्याला यत्किंचितही कल्पना नाही.

वैद्यकीय क्षेत्रात या व्यक्तीला किती मान होता याची तुम्हाला अजिबात कल्पना नाही.

आरक्षणाचा येथे काय संबंध आहे? जिथे तिथे गरळ ओकून मोदी विरोध जातीयवादी वक्तव्ये करून आपण घाण करून ठेवली आहे.

निदान त्यांनी आपल्या उच्च शिक्षणाचा कसा उपयोग केला आहे आणि किती रुग्णांना दिलासा दिला आहे या बद्दल थोडी तरी माहिती घेतली असतात तर बरे झाले असते.

त्यांच्या ज्ञानाला सुमार म्हणायला आपली लायकी काय आहे? He was one of the pioneers of streptokinase therapy for heart attacks in India and introduced the technique of Colour Doppler Echocardiography in India. [7]

Dr Aggarwal had been honoured with the Dr. B. C. Roy Award, the highest Indian award in the medical category, in 2005.[6][7][10][11]

He was also a recipient of Vishwa Hindi Samman, National Science Communication Award, FICCI Health Care Personality of the Year Award, Dr D S Mungekar National IMA Award,[10] and the Rajiv Gandhi Excellence Award.[10] In 2010, he received the Padma Shri.[5] He had been the National President of the Indian Medical Association [12] and Chief Editor of IJCP Group.[13]

अशी निरर्गल टीका करण्याच्या ऐवजी त्यांनी स्वतः करोनाबाधित असताना ऑक्सिजन वर असताना यु ट्यूब वर टाकलेला निदान शेवटचा व्हिडीओ एकवार पाहून घ्या.

मृत्युशय्येवर असताना सुद्धा रुग्ण सेवा करणाऱ्या अशा ऋषितुल्य डॉक्टरवर टीका करताना मृत व्यक्तीच्या पार्थिवाला प्रेत म्हणताना आपल्याला जरा सुद्धा लाज वाटली नाही?

अनिरुद्ध.वैद्य's picture

19 May 2021 - 12:28 pm | अनिरुद्ध.वैद्य

की झालं, काहीही बरळायला मोकळे असला काहींचा समज दिसतोय

कॉमी's picture

19 May 2021 - 12:29 pm | कॉमी

सहमत आहे.
मृत व्यक्तीसोबत प्रत्येक बाबत सहमत व्हावे असे नसले तरी "त्यांनी छद्मविज्ञान पसरवले" इतक्या वरुनच त्यांचे त्यांच्या क्षेत्रातले यश मोजणे पटले नाही.

श्रीगुरुजी's picture

19 May 2021 - 1:17 pm | श्रीगुरुजी

डॉ. अग्रवाल यांच्याबद्दल खूप चांगले वाचले आहे. परंतु मोदीद्वेषाने भान हरपलेले काही नंबरी निरंजन कायम आपली मळमळ ओकत असतात.

प्रसाद_१९८२'s picture

19 May 2021 - 3:21 pm | प्रसाद_१९८२

नगरीनिरंजनचे प्रतिसाद कॉंग्रेसच्या "टुल किट"चा एक भाग असावा.

कॉमी's picture

20 May 2021 - 8:18 am | कॉमी

फेक बातमी आहे.
काँग्रेसचे सेंट्रल व्हीस्ता वरचे डॉक्युमेंट घेऊन उर्वरित टूलकिट फेक तयार केले आहे.

श्रीगुरुजी's picture

20 May 2021 - 9:30 am | श्रीगुरुजी

ही पश्चात बुद्धी आहे. आपले कारस्थान उघडकीस आल्याने कॉंग्रेसने सारवासारव आणि कांगावा सुरू केलाय. यालाच चोराच्या उलट्या बोंबा असे संबोधले जाते.

कॉंग्रेसनेच टुलकिट तयार केलंय. टुलकिट लेखिका म्हणून सौम्या वर्मा या कॉंग्रेस कार्यकर्तीचं नाव बाहेर येताच, तिने तातडीने स्वत:चे ट्विटर खाते डीलीट करून टाकले. टुलकिटची सर्व ४ पाने खोटी आहेत असे सांगणाऱ्या कॉंग्रेसने आज त्यातील १ पान आपणच तयार केल्याचे मान्य केलंय. राहुल गांधींनी टुलकिट मधील सूचनांचं १५ दिवस आधीच पालन करायला सुरूवात करून कोविडचा उल्लेख मोविड, कोरोनाचा उल्लेख इंडियन व्हायरस असा ट्विट्स मध्ये केलेला आहे. टुलकिट मध्ये जे लिहिलंय त्याचं तंतोतंत पालन मागील काही दिवसांपासून कॉंग्रेस नेते करीत आहेत.

चीनविरूद्ध डोकलाममध्ये भारतीय सैन्य १०० मीटर अंतरावर युद्धाच्या पवित्र्यात उभे असताना चोरून चीनच्या राजदूताला भेटणारे राहुल आणि देशहिताची कधीही पर्वा न करणाऱ्या कॉंग्रेससाठी, असले टुलकिट तयार करून जगभर मोदी व भारताची योजनाबद्ध बदनामी करणे ही अत्यंत किरकोळ गोष्ट आहे.

Coronavirus | It’s MOVID pandemic, says Congress

नगरीनिरंजन's picture

19 May 2021 - 2:50 pm | नगरीनिरंजन

धन्यवाद!
खरंच बरं वाटतं घुसनट बाहेर पडली की.
लोक मरताहेत खूप. बातम्या येतात आजूबाजूच्या.
कोणी व्हेंटिलेटरवर आहे; कोणी ऑक्सिजनवर आहे.
कोणी गेलाच.
लस मिळत नाहीये. मित्रांचे म्हातारे आईबाप चकरा मारताहेत लशीसाठी.
स्वतः मित्र जवळपासच्या गावोगावी हिंडून पाहताहेत लस मिळतेय का.
मेडिकल क्षेत्रातले मित्र थकलेत; पण अजून शेवट दॄष्टीपथातही नाहीय.
घुसमट म्हणा, मळमळ म्हणा, ती आहेच.
आणि बाहेर पडणारच. त्याला काही ईलाज नाही.
नुसतं मुक्या जनावरासारखं नाही ना बघता येत.
मिपावर काढता येते म्हणून मिपाचे आभार.

श्रीगुरुजी's picture

19 May 2021 - 2:53 pm | श्रीगुरुजी

पडली ना सगळी मळमळ बाहेर. मग झोपा आता.

नगरीनिरंजन's picture

19 May 2021 - 3:07 pm | नगरीनिरंजन

बरंय तुम्हाला काही घुसमट, मळमळ वगैरेचा प्रॉब्लेम नाही.
सदासुखी. असेच सुखी राहा.

हे सगळे प्रॉब्लेम्स: लस नसणे, औषधे नसणे, लोक मृत्यू पावणे इत्यादी फक्त नवीन रिझर्वेशन वाल्यानाच आहेत अशी कल्पना आहे का? पारंपरिक रिझर्वेशन वाले याने त्रस्त नाहीत असं वाटतंय का? उगीच वड्याचं तेल वांग्यावर काढण्यात काय अर्थ आहे? सगळे नवीन रिझर्वेशन वाले डॉक्टर घेऊन व्हायरस आठवड्याभरात कंट्रोल मध्ये येणार असेल तर देऊया सगळ्या पारंपरिक रिझर्वेशन वाल्याना नारळ!

एवढं हायपर व्हायची गरज नाहीये. लोकांच्या निष्काळजी पणा मुळे ही दुसरी लाट आली आहे. लाख गोष्टी असतील परंतु गर्दी झाली की कोरोना पसरतो हे माहीत असुनही लोक सभा / लग्ने / धार्मीक कार्यक्रम याला जातात कसे? आपल्या जीवाला धोका आहे हे माहीत असुनही मास्क न वापरणे / साधे स्वच्छतेचे नियम न पाळणे अजुनही चालु आहे.

भारताची लोकसंख्या प्रचंड आहे. लस उत्पादन एका रात्रीत वाढवता येत नाही. जागतीक आरोग्य संघटनेशी झालेल्या करारामुळे बाहेर देशांना लस पुरवावी लागते. हे काही नवीन नाही. आता जे लोक आजारी आहेत त्यांना बरे करणे हे एकच ध्येय आहे.

मित्रांना गावोगावी हिंडू देउ नका. त्याने आजार पसरण्याचीच जास्त शक्यता आहे.
मेडिकल क्षेत्रातले मित्र आहेत त्यांना आवश्यक मदत करा . . ते रात्रंदिवस काम करत आहेत. हे ही दिवस जातील .. प्रत्येक वाईट गोष्टीचा शेवट होतो .. धीर धरा . . .

श्रीगुरुजी's picture

19 May 2021 - 8:20 pm | श्रीगुरुजी

+ १

सुखीमाणूस's picture

20 May 2021 - 4:11 am | सुखीमाणूस

असे भासवायचे हा टुलकीटचा भाग आहे याची खात्री पटली. आणि हे कौन्ग्रेस्चे कारस्थान आहे याचा पुरावा मिळाला.
लस येण्याआधी जे लोक मरण पावले त्याना मोदि कसे काय जबाबदार?लस आल्यावर प्राधान्याने ती वैद्यकीय सेवेतील लोकाना दिली गेली होती. हा आजारच सन्सर्ग हवेतुन पसरवतो आहे त्यामुळे वैद्यकिय व्यवसायातील व्यक्ती त्यात सापडत आहेत.
आत्ता कौन्ग्रेस् सत्तेवर नाही म्हणुन भारतियान्चे नशीब जोरावर आहे कारण पहिली लाट खुप चान्गली थोपवली गेली. दुसर्या लाटेपासुन बचाव होतो आहे.आता रुग्ण्सन्ख्या कमी होण्याच्या मार्गावर आहे.
अश्या प्रतिक्रिया वाचल्या की मोदीना पाठीम्बा अजुन ठामपणे द्यावासा वाटतो.

श्रीगुरुजी's picture

20 May 2021 - 3:43 pm | श्रीगुरुजी

https://m.lokmat.com/national/video-show-must-go-dr-kk-aggarwal-last-vid...

केवळ मोदींच्या दिवे लावण्याच्या आवाहनाला पाठिंबा दिला म्हणून डॉ. अग्रवालांसारख्या व्रतस्थ समाजसेवकांवर शिंतोडे उडविणाऱ्या काही मूर्ख बरळवीरांना वरील बातमी वाचून उपरती होईल अशी आशा आहे.

मराठी_माणूस's picture

19 May 2021 - 12:28 pm | मराठी_माणूस

https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/19052021/0/1/

ह्या पानावरची एक चीड आणणारी सिंगापुर मधील बातमी. काही चीनी लोकांचा भारतीयांप्रती द्वेष.
स्वतःच्या देशामुळे सगळे जग हवालदील झाले असताना, इतरांवर त्याचे खापर फोडण्याचा प्रकार.
चोराच्या उलट्या ..... म्हणतात ते हेच.

जे डोक्यात असते तेच बोलण्यातून बाहेर पडतं, असा खरमरीत टोला काँग्रेसने मोदींना लगावला.

https://www.esakal.com/desh/focus-on-increasing-covid-19-positive-cases-...

आग्या१९९०'s picture

19 May 2021 - 3:04 pm | आग्या१९९०

म्हणून तर ते नेहमी पत्रकारांना टाळतात. अभ्यासाची बोंब असल्याने आयत्यावेळी काय बोलायचे हा आत्मविश्वास त्यांना अजिबात नाही. कधी स्पेलिंग मिस्टेक,कधी भारतीय लोकसंख्येचा चुकीचा आकडा. आता तर लोकांच्या जीवावरच उदार झालेत. नौटंकीबाज भाषणाची सवय दुसरे काय?

चंद्रसूर्यकुमार's picture

19 May 2021 - 12:49 pm | चंद्रसूर्यकुमार

काल म्हणजे १८ मे रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री युगपुरूष श्री.रा.रा. अरविंदजी केजरीवाल यांनी पुढील ट्विट केले-

त्यानंतर सिंगापूरच्या परराष्ट्रमंत्रालयाने भारताच्या राजदूताला पाचारण करून केजरीवालांच्या या ट्विटबद्दल आक्षेप नोंदवला. त्यानंतर स्वतः परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी सिंगापूरच्या सरकारला जे काही सांगायचे असेल ते सांगितले. त्याबरोबरच खालील ट्विट केले--

केजरीवाल हा मनुष्य भयानक डोक्यात जातो आणि तो माझ्या मते भारतीय राजकारणातला भामटा नंबर १ आहे हे अशा प्रकरणांवरून समजून येईल.

यश राज's picture

19 May 2021 - 1:32 pm | यश राज

केजरीवाल हा मनुष्य भयानक डोक्यात जातो

+१११११११११११११११११ या साठी.

बाकी केजरीवाल यांच्याकडे बघुन कळुन येते की उच्चशिक्षित जरी असलात तरी तुम्ही सत्ता योग्य प्रकारे सांभाळु शकत नाहीत.
ज्याना मोदींच्या शिक्षणाबद्दल तक्रारी आहेत त्यांनी एकवेळ उच्चशिक्षणाचे फेल्युअर प्रॉडक्ट असलेले हे उदाहरण जरुर पहावे.

आग्या१९९०'s picture

19 May 2021 - 2:44 pm | आग्या१९९०

केजरीवाल सरकार हे बहुमताने निवडून आलेले आहे. त्या राज्यातील जनतेचा त्यांच्यावर विश्वास. आपण त्यांना कितीही नावं ठेवा, तिकडची जनताच ठरवेल त्यांची उपयुक्तता.

यश राज's picture

19 May 2021 - 3:03 pm | यश राज

बहुमताचे महत्व निदान केजरीवाल यांच्या निमित्ताने मान्य केल्याबद्द्ल धन्यवाद.
त्याच न्यायाने मोदी हे प्रचंड बहुमताने २ दा निवडुन आलेले पंतप्रधान आहेत, भारतातील जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहेच हे सुज्ञास सांगणे न लगे.

आग्या१९९०'s picture

19 May 2021 - 3:11 pm | आग्या१९९०

बहुमताचे महत्त्व कधीच नाकारले नाही. केजरीवाला पत्रकारांना टाळत नाहीत. कर नाही त्याला डर कशाला? केंद्रिय नेतृत्व लपून बसतं.

यश राज's picture

19 May 2021 - 3:18 pm | यश राज

केजरीवाल हे पत्रकारांना टाळत नाहीत तर पत्रकारांचा उपयोग करुन धडाधाड खोटे नाटे पसरवण्यात वाकबदार आहेत.

कर नाही त्याला डर कशाला?

यासाठी सध्याची दिल्लीची परिस्थीती सगळं सांगुन जाते. मुळात हे वाक्य केजरीवाल यांच्यासाठी काही करतच नाही तर त्याला डर कशाला असं असावं

आग्या१९९०'s picture

19 May 2021 - 3:26 pm | आग्या१९९०

दिल्लीतील जनता असं काही म्हणताना दिसत नाही.

सरकार (केंद्र) रोज पत्रकार परिषद घेतं. कोरोना वर हेल्थ मिनिस्टर किंवा त्यांचे सचिव, कोरोना टास्क ग्रुप चे प्रमुख किंवा इतर महत्वाच्या व्यक्ती बोलतात आणि पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे ही देतात. अगदी महत्वाचं असेल तर प्रधानमंत्री बोलतात. प्रधानमंत्री राज्यांच्या मुख्यमंत्रांबरोबर मिटिंग्ज घेतात. काही दिवसांपूर्वी त्यांनी महत्वाच्या राज्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांबरोबर ही संवाद साधला होता. तेव्हा हे वरील वाक्य नक्की काय उद्देशाने लिहिले हे सांगितले तर बरे.

सुखीमाणूस's picture

21 May 2021 - 3:23 am | सुखीमाणूस

काहिही करुन भारतात सगळे त्रासात आहेत हे जगाला पटवुन द्यायचे बास.
आणि मोदी कसे नाकाम आहेत ते जनतेला पटवुन द्यायचे.
एवढ्या निवडणुक सभा आणि नन्तर दन्गली होउन बन्गाल मध्ये कसा काय कोरोना नियन्त्रणात आहे बर? काय गौड्बन्गाल आहे?

कॉमी's picture

19 May 2021 - 3:14 pm | कॉमी

सिंगापूर मध्ये खरेच अश्या स्ट्रेन चा प्रादुर्भाव आहे की नाही ?
बाकी, जयशंकर ह्यांनी डिप्लोमाटीक बोलून समजूत घातली ते योग्य आहे. पण जर अशी स्त्रेन खर्च असल्यास प्रवासबंदी व्हायलाच पाहिजे की.

हे गुप्त/कमी पब्लिक प्रकारे सांगता आले हे पटण्यासारखे आहे.

आग्या१९९०'s picture

19 May 2021 - 3:23 pm | आग्या१९९०

खरोखरीच असा स्ट्रेन तेथे असला तरी काय फरक पडतोय आपल्या सरकारला? राहुल गांधींनी कोविडची दुसरी लाट येणार म्हणून सावध रहायला सांगितले होते. तेव्हा त्यांची चेष्टा केली होती. कोणाचे ऐकायचेच नाही, चूक झाली तर पांघरून घालायला अख्खी मीडिया विकत घेतली आहे.

रात्रीचे चांदणे's picture

19 May 2021 - 3:34 pm | रात्रीचे चांदणे

राहुल गांधींचा सल्ला कमीत कमी उद्धव ठाकरेंनी तरी ऐकायला पाहिजे होता, पण त्या वेळी ते वाझेंना वाचविण्यात busy होतें, तर अजित पवार पंढरपूर मध्ये. आजही कोविड मुळे मारणार्यामध्ये 25 टक्के हे महाराष्ट्रातील आहेत.

आग्या१९९०'s picture

19 May 2021 - 3:55 pm | आग्या१९९०

का? पंतप्रधानांना काय अडचण होती सल्ला ऐकायला?

श्रीगुरुजी's picture

19 May 2021 - 4:45 pm | श्रीगुरुजी

कसला सल्ला? त्यात काही स्पैसिफिक सूचना, मुद्दे वगैरे होते का? कोणत्या गोष्टी कराव्या, कोणत्या टाळाव्या, नक्की काय करावे असे काही सांगितले होते का?

आग्या१९९०'s picture

19 May 2021 - 4:57 pm | आग्या१९९०

ती खूप पुढची गोष्ट. ऐकून घ्यायची इच्छा असावी लागते,आणि मुख्य म्हणजे समजून घ्यायची कुवत असावी लागते. इथे त्याबाबतीत तर सगळाच आनंदी आनंद.

श्रीगुरुजी's picture

19 May 2021 - 5:17 pm | श्रीगुरुजी

म्हणजे काहीही स्पेसिफिक असं सांगितलं नव्हतं.

मुळात ज्याला इतर जनता सोडाच पण स्वपक्षातील लोकसुद्धा गांभीर्याने घेत नाहीत, जो फक्त आचरटपणा करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे, जो संशयास्पदरित्या चीनच्या राजदूताला चोरून भेटतो, जो सर्वोच्च न्यायालयाचे अध्यक्ष, फ्रान्सचे अध्यक्ष यांच्या नावाने खोटे बोलतो आणि नंतर त्यासाठी माफी मागतो . . . अशाची वरवरची ट्विट्स कोण आणि का ऐकून घेईल?

आग्या१९९०'s picture

19 May 2021 - 5:26 pm | आग्या१९९०

कोणाचं ऐकतात? बोकीलचे?

श्रीगुरुजी's picture

19 May 2021 - 5:34 pm | श्रीगुरुजी

जे काही विशिष्ट सूचना करतात अशांचं ऐकतात. ज्यांचा पूर्वोतिहास काळाकुट्ट आहे, जे आचरटपणासाठी खोटेपणासाठी कुप्रसिद्ध आहेत, ज्यांना जग गांभीर्याने घेत नाही, जे कायम परदेशात जाऊन मौजमजा करण्यात धन्यता मानतात अशांचे वरवरचे लेखन ऐकण्याची गरज नाही.

श्रीगुरुजी's picture

19 May 2021 - 3:34 pm | श्रीगुरुजी

राहुल गांधींनी टूलकिट पण तयार केलंय.

राहुल गांधींनी सरकारने चेष्टा केली होती हे दाखवणारे काही रेफरन्स, बातमी, पत्रके इत्यादी काही आहे का?

प्रदीप's picture

19 May 2021 - 3:59 pm | प्रदीप

जालावर अगदी सहज उपलब्ध आहे हो!

इथे पहा, व इथेही.

कॉमी's picture

19 May 2021 - 4:28 pm | कॉमी

धन्यवाद.

मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स बंदच आहेत, आणि सिंगापूर सोबत भारताचा "एअर बबल" म्हणजे तात्पुरता करार सुद्धा नाही आहे, त्यामुळे केजरीवाल यांचा पूर्ण मुद्दा अर्थहीन झाला आहे. हे एव्हीएशन मिनिस्टरांनी सांगितले आहे.
सिंगापूर मध्ये लहान मुलांना संसर्ग होत आहे हे पण तितकेच खरे आहे. हे कशामुळे होत आहे, म्युटेशन आहे की नाही, हे माहित नाही.

आनन्दा's picture

19 May 2021 - 5:47 pm | आनन्दा

संसर्ग की सिरीयस?

सर्वसामान्य's picture

19 May 2021 - 6:53 pm | सर्वसामान्य

सिंगापोर मधील बहुतांशी केसेस या बी १६१७ (ज्याला भारतीय variant समजलं जाते ) या प्रकारच्या आहेत. थोड्या केसेस UK आणि South आफ्रिका प्रकारच्या आहेत . त्यामुळे केजरीवाल यांचे म्हणणे हे तद्दन मुर्खपणाचे आहे. स्वतःला इतर राजकारण्यांपेक्षा वेगळं समजणाऱ्या केजरीवालांनी तरी थोडा फार अभ्यास करून बोलायला हरकत नव्हती.

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 May 2021 - 2:33 pm | अनिरुद्ध.वैद्य

नव्हे, भारतात आढळलेला.

अनिरुद्ध.वैद्य's picture

20 May 2021 - 2:31 pm | अनिरुद्ध.वैद्य

२ दिवस आधीच ह्यावर चर्चा झालिये. हा स्ट्रेन भारतातलाच बी १६१७२ आहे असं सिंगापुरच्या सरकारचं म्हणणे आहे. भारत सिंगापुर प्रवासबंदी अगोदरपासुनच आहे, अर्थात, तो असुनही हा स्ट्रेन तिकडे कसा पोचला हा संशोधनाचा विषय आहे.

सिंगापुर सरकार फेक न्युज पसरवली म्हणुन केजरिवालांवर गुन्हा दाखल करायला निघाले होते, जयशंकर अन भारत सरकारला बरच वजन खर्ची घालुन वाचवायला लागलंय केजरिवालांना.

चंद्रसूर्यकुमार's picture

20 May 2021 - 2:38 pm | चंद्रसूर्यकुमार

सिंगापुर सरकार फेक न्युज पसरवली म्हणुन केजरिवालांवर गुन्हा दाखल करायला निघाले होते, जयशंकर अन भारत सरकारला बरच वजन खर्ची घालुन वाचवायला लागलंय केजरिवालांना.

या गृहस्थाची फेक न्यूज पसरवायची खोड फार जुनी आहे. अरूण जेटली आणि नितीन गडकरींनी खरं तर चांगलंच अब्रूनुकसानीच्या खटल्याच्या कात्रीत पकडले होते. पण दोघेही फारच भोळे सांब निघाले आणि नुसत्या माफीवर दोघांनीही केजरीवालांना सोडून दिले.

एक गोष्ट समजत नाही. अरूण जेटली गेल्यावर या माणसाला तिथे अंत्यदर्शनाला जाताना काहीही लाज वाटली नसेल? खरं तर कार्यकर्त्यांनी चपलेने बडवून पळवून लावायला हवे होते.

सर्वसामान्य's picture

20 May 2021 - 6:02 pm | सर्वसामान्य

Air इंडिया ची विमाने सिंगापूरला आज सुद्धा येत आहेत. एप्रिल पर्यंत सिंगापूर नागरिक , PR आणि ep व wp असलेले येऊ शकत होते. फक्त tourist ना बंदी होती. सध्या फक्त सिंगपोर नागरिक आणि PR येऊ शकतात.

राष्ट्रीय महामार्गाच्या नावाखाली वृक्षतोड; आता कधी होणार वृक्षलागवड ?..

https://www.esakal.com/nanded/tree-cuting-national-highway-when-will-the...

---------

आरे बाबतीत वेगळा नियम आणि इतर ठिकाणी वेगळा नियम, असे काही आहे का?

“….तुम्हाला अजिबात गांभीर्य नाही,” मुंबई हायकोर्टाने ठाकरे सरकारला सुनावलं
--------

https://www.loksatta.com/maharashtra-news/maharashtra-not-at-all-serious...
----------

Narada Sting: सीबीआयच्या याचिकेत ममता बॅनर्जींचंही नाव, राज्याबाहेर खटला वर्ग करण्याची मागणी...
-----------

https://www.google.com/amp/s/www.tv9marathi.com/national/mamata-banerjee...
----------

दोषींवर कारवाई व्हायलाच हवी ....

६० वर्ष एका घराण्याची सत्ता चालवुन आणि नको तितकी लोकसन्ख्या वाढु देउन.
आता आकाशपाताळ एक करतायत परत सत्ता मिळवण्यासाठी आणि मुर्खासाऱ़खे राज्यान्मागे राज्य जातायत हातुन..

रात्रीचे चांदणे's picture

20 May 2021 - 7:51 am | रात्रीचे चांदणे

मुंबईतील काही भागात ज्यांचे वय 45 पेक्षा कमी आहे अशा लोकांचीही लसीकरण चालू आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हे चालू असणार आहे. ग्रामीण भागात लसीचा तुटवडा असण्याचं हे एक कारण असावे.

https://www.loksatta.com/mumbai-news/vaccination-special-guests-in-seven...

नावातकायआहे's picture

20 May 2021 - 3:13 pm | नावातकायआहे
चंद्रसूर्यकुमार's picture

20 May 2021 - 6:35 pm | चंद्रसूर्यकुमार

बंगालमध्ये विधानपरिषद आणण्यात यावी हा प्रस्ताव मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रीमंडळाने मंजूर केला आहे. यामागचे कारण नक्की काय हा प्रश्न नक्कीच पडतो. ममतांचा नंदीग्राममध्ये शुभेंदू अधिकारींनी पराभव केला तरीही ५ मे रोजी ममतांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यामुळे त्यांना ४ नोव्हेंबरपर्यंत विधानसभेवर निवडून येणे भाग आहे. कोरोनाची दुसरी लाट थोडीथोडी ओसरायला लागली असली तरी परिस्थिती पूर्ण नियंत्रणात यायला आणखी काही महिने जातील असे दिसते. कोरोनाच्या काळातच विधानसभा निवडणुकांसाठीचे मतदान घेतल्यामुळे निवडणुक आयोगावर भरपूर टीका झाली होती. असे असताना नोव्हेंबर पर्यंत पोटनिवडणुक न झाल्यास ममतांपुढील अडचणी वाढतील. त्यामुळे राज्यात विधानपरिषद स्थापन करून त्यावर निवडून जायचा ममतांचा डाव आहे का?

राज्यात विधानपरिषद स्थापन करणे म्हणजे राज्यात एखादी नवीन महापालिका स्थापन करून तिथे निवडणुका घेण्याइतके सोपे नाही. राज्यघटनेच्या कलम १६९(१) प्रमाणे-

Parliament may by law provide for the abolition of the Legislative Council of a State having such a Council or for the creation of such a Council in a State having no such Council, if the Legislative Assembly of the State passes a resolution to that effect by a majority of the total membership of the Assembly and by a majority of not less than two thirds of the members of the Assembly present and voting.

म्हणजेच हा प्रस्ताव बंगालच्या मंत्रीमंडळात मंजूर झाल्यानंतर विधानसभेत मतदान करणार्‍या सदस्यांपैकी दोन-तृतीयांश बहुमताने मंजूर करून घ्यावा लागेल. तो करून घ्यायला फारशी अडचण नसावी. त्यासाठी विधानसभेचे एखादे विशेष अधिवेशनही ममता बोलावू शकतील. तसे झाल्यानंतर चेंडू केंद्राच्या कोर्टात जाईल. मग केंद्रीय मंत्रीमंडळाने हा प्रस्ताव मान्य करून त्यासंबंधीचे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर करावे लागेल. त्याला मंजुरी मिळाल्यावर मग ते राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी जाईल. राष्ट्रपतींची सही झाल्यावर भारताच्या गॅझेटमध्ये ते विधेयक कायदा म्हणून प्रसिध्द होईल. त्यानंतर विधानपरिषदेची स्थापना होईल. आणि नुसती विधानपरिषदेची स्थापना झाली तरी त्याचा फारसा उपयोग नाही. त्या सभागृहात ममतांना निवडूनही जावे लागेल. आणि त्यासाठी निवडणुकांची घोषणा परत निवडणुक आयोगालाच करावी लागेल. मुख्य म्हणजे या सगळ्या पायर्‍या अमुक इतक्या दिवसात झाल्याच पाहिजेत असे कोणतेही बंधन नाही. केंद्रीय मंत्रीमंडळ या प्रस्तावावर बसून राहिले तर ममता आदळआपट सोडून काहीही करू शकणार नाहीत. संसदेचे पावसाळी अधिवेशन सामान्यतः दरवर्षी जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात बोलावले जाते. पावसाळी अधिवेशन संपले की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हिवाळी अधिवेशनापर्यंत मधे कोणतेही अधिवेशन नसते. त्यामुळे हा प्रस्ताव संसदेत पावसाळी अधिवेशनातच मंजूर करून घ्यावा लागेल. तसेच त्यानंतर निवडणुक आयोग निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार. म्हणजे आयोगाने तशी घोषणा करावी ही नुसती अपेक्षाच. कारण कोरोनाचे कारण दाखवून सगळ्या निवडणुका आयोग बेमुदत पुढे ढकलायची शक्यता सगळ्यात जास्त.

त्यातच आजच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींनी आपला अपमान केला, आपल्याला पुतळ्यासारखे बसून राहणे भाग झाले वगैरे गोष्टी ममतांनी बोलून ठेवल्या आहेत. मुळात मोदी आणि ममता यांच्यातून विस्तव जात नाही. त्यात हा आणखी संघर्ष ममतांनी करून ठेवला आहे. मागच्या वर्षी उध्दव ठाकरेंपुढे अशी अडचण आल्यावर मोदींनी मध्यस्थी केली आणि राज्यात विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी मतदान घ्यावे अशी रदबदली मोदींनी निवडणुक आयोगापुढे केली होती. पण असे सततचे खटके ममतांकडून उडवले जाणार असतील तर मोदींनी असे काही ममतांसाठी का करावे हा प्रश्नही पडेलच.

आता लिहित आहे ते बंगालमध्ये लागू पडेल. माझे हेच मत मागच्या वर्षी महाराष्ट्राविषयी पण होते. कोरोनाकाळात सगळ्या निवडणुका पुढे ढकलायचा निर्णय घेतला गेला असेल तर एका राज्यासाठी आणि त्यातही एका मुख्यमंत्र्यासाठी त्या नियमाला अपवाद करणे अयोग्य ठरेल. शेवटी दोन्ही राज्यांमध्ये निवडून गेलेली विधानसभा अस्तित्वात आहे आणि एका पक्षाला/आघाडीला बहुमतही आहे. अमुक एक मनुष्य मुख्यमंत्रीपदावर असावा यासाठी प्रयत्न करायचे कोणतेही कारण केंद्र सरकार आणि केंद्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून राज्यपालांकडे नाही. तर केवळ राज्यात एक बहुमतातले सरकार असावे हेच ऑब्लिगेशन दोघांचेही आहे. तसे असेल तर मागच्या वर्षी ठाकरे किंवा यावर्षी ममतांना सहा महिन्यात विधीमंडळावर निवडून जाता येणे शक्य नसेल तर राजीनामा देऊन त्यांच्या जागी नवा मुख्यमंत्री नेमणे सहज शक्य होते/आहे. मग जेव्हाकेव्हा निवडणुका होतील तेव्हा त्यांना निवडून जाऊन परत मुख्यमंत्री बनणे शक्य आहे.

त्यातून काही खूप मोठा चमत्कार झाला आणि कोरोनाची लाट अपेक्षेपेक्षा खूप जास्त वेगाने ओसरली आणि पोटनिवडणुक घेणे शक्य झाले तर सगळेच चित्र पालटेल. बघू काय होते ते.

दिगोचि's picture

21 May 2021 - 6:00 am | दिगोचि

आजच मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत मोदींनी आपला अपमान केला, आपल्याला पुतळ्यासारखे बसून राहणे भाग झाले वगैरे गोष्टी ममतांनी बोलून ठेवल्या आहेत. >>> ही ब्रेकिन्ग न्युज असल्याचे वाचले. ही मुख्यमंत्र्यांच्या बैठक कोरोनासाठी बोलावली असता ममतानी दुसराच विशय काढला म्हणुन मोदीनी त्याना गप्प बसवले. काहीतरी विशय काढून भाण्डण करायचे हा ममतान्चा स्वभाव आहे. जसे त्यानी जय श्रीराम म्हणणार्याशी केले होते. आज हेच फक्त परत सिद्ध झाले.

मदनबाण's picture

23 May 2021 - 9:16 pm | मदनबाण

बंगाल मधली निडणुक मॉमता दीदींच्या पक्षानी जिंकली याचा आनंद आपल्या राज्यातील काही माठ नेते आणि काही इतर बोलबच्चन करत होते. मात्र स्वतः मॉमता दीदी यांचा व्यक्तीगत पराभव झाला हे मात्र जसे तो झालाच नाही असे सगळीकडे दर्शवण्यात येत होते, मिडिया देखील मोदी / बीजेपीचा पराभवच कसा झाला अन् कुठली लाट वगरै नसते अश्या आशयाच्या बातम्यांचा जणु काही पुर आणण्यात आला...
बीजेपी जरी बहुमतात नसली तरी त्यांची संख्या मात्र वाढली यांचा मुद्दामुन विसर पाडण्यात आला तसाच दीदींच्या पक्षाला मुस्लिम एकगठ्ठा मतदानाचा सगळ्यात मोठा फायदा /आधार मिळाला या बद्धल मात्र सोयिस्कर रित्या मौन बाळगण्यात आले.
आता जे काही मॉमता दीदींच्या राज्यात चालले आहे ते अत्यंत भयानक आहे, अनेक बीजेपी कार्यकर्त्यांना त्या राज्यातुन जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला, तर काहींचे मुडदे देखील पाडण्यात आले, याच बरोबर हिंदू स्त्रियांवर बलात्काराच्या घटना झाल्या असुन त्यात वाढ होत आहे. मुळात बंगाल राज्यात आता हिंदू जणु काही अल्पसंख्यकच झाले की काय असे वाटते. हा सर्व घटनाक्रम बघताना मला २०१७ मधील रुपा गांगुलींची एक छोटी बाईट आठवली :-

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-“Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning how to dance in the rain.“ :- Vivian Greene

कॉमी's picture

23 May 2021 - 9:22 pm | कॉमी

ह्याचा ममता बॅनर्जींच्या निवडून येण्याशी काय संबंध ?

याच बरोबर हिंदू स्त्रियांवर बलात्काराच्या घटना झाल्या असुन त्यात वाढ होत आहे.

ह्याचा ममता बॅनर्जींच्या निवडून येण्याशी काय संबंध ?
हिंदू स्त्रियांवर बलात्कार करणारे तथाकथित शांतता प्रेमी धर्मांचे आहेत, ज्यांच्या बळावरच दीदी सत्तेत आल्या ना ? सत्तेत असलेल्या ममता दीदी यांना का बरं आवरु शकत नाहीत ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-“Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning how to dance in the rain.“ :- Vivian Greene

कॉमी's picture

23 May 2021 - 10:07 pm | कॉमी

फार कुतर्क,आणि दिशाभूल करणारी वाक्ये.

हिंदू स्त्रियांवर बलात्कार करणारे तथाकथित शांतता प्रेमी धर्मांचे आहेत

काय आधारावर दावा आहे ? ज्या बलात्काराचा राजकीय आणि धार्मिक संबंध जोडला जात होता त्याला तसा कोणताही पैलू नव्हता.
इथे वाचा.

२.

ज्यांच्या बळावरच दीदी सत्तेत आल्या ना ? सत्तेत असलेल्या ममता दीदी यांना का बरं आवरु शकत नाहीत ?

प्रतिवाद करण्याच्या लायकीचे वाक्य नाही, त्यामुळे पास. शब्दाशब्दाला कुतर्क आहे.

कॉमी's picture

23 May 2021 - 10:20 pm | कॉमी

हे योग्य नाही, प्रतिवाद करतोच.
ज्यांच्या बळावर
कोणाच्या बळावर ? हिंदूच्या मतसंख्येमध्येसुद्धा TMC ने पूर्वीपेक्षा बाजीच मारली आहे. तुम्ही तुमचा द्वेषमूलक मुद्दा रेटायसाठी फक्त मुस्लिम मताकडे पाहात आहात. इथे वाचा- गटनिहाय मत कसे हलले आहेत ते- इथे वाचा.

सत्तेत असलेल्या ममता दीदी यांना का बरं आवरु शकत नाहीत ?
हिंदूनच्या बळावर भाजपा निवडून येते तर हिंदूनी केलेल्या गुन्हाच उत्तरदायित्व भाजपावर टाकण्यास तयारी आहे काय ?

मदनबाण's picture

23 May 2021 - 11:34 pm | मदनबाण

काय आधारावर दावा आहे ? ज्या बलात्काराचा राजकीय आणि धार्मिक संबंध जोडला जात होता त्याला तसा कोणताही पैलू नव्हता.
तुम्ही जी बातमी दिली आहे तशीच बातमी त्याच मुली बद्धल इथे देखील वाचता येइल :- 21-year-old college student raped and murdered in Medinipur district in West Bengal, 3 including a woman arrested

हिंदूनच्या बळावर भाजपा निवडून येते तर हिंदूनी केलेल्या गुन्हाच उत्तरदायित्व भाजपावर टाकण्यास तयारी आहे काय ?
बलात्काराचा गुन्हा कोणत्याही धर्मीय व्यक्तीने कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने केल्यास त्याल शिक्षा ही झालीच पाहिजे.
जसा शांतता प्रेमी समाजाकडुन लव्ह जिहाद गेला जातोय तसे हिंदू समाजातुन कुठला जिहाद केला जातोय ते नक्की सांगा.

तुम्ही तुमचा द्वेषमूलक मुद्दा रेटायसाठी फक्त मुस्लिम मताकडे पाहात आहात.
बरे झाले द्वेषमूलक हा शब्द तुम्ही वापरलात, मग जिहाद आणि काफिर हे हिंदूच्या मैत्रीसाठी आणि त्यांच्या गुणगाणासाठी वापरले जातात असे म्हणावे काय ?

Consolidating Muslim, secular votes worked for TMC
The TMC has always had strong following among Muslims in south Bengal, including Kolkata
West Bengal assembly poll results: Muslims pressed button for TMC in Congress bastion
Muslim belt completely switches over to Trinamool from Congress

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-“Life isn't about waiting for the storm to pass. It's about learning how to dance in the rain.“ :- Vivian Greene

कॉमी's picture

23 May 2021 - 11:55 pm | कॉमी

१. तीच बातमी आहे ओपिंडीयात, त्यात काय वेगळे मांडले आहे ? अहो, तो बलात्कार मुस्लिम व्यक्तीनी केलाच नाहीये. आणि लोकल पोलीस आणि त्या मुलीच्या परिवाराने सुद्धा ह्यात कम्युनल आणि राजकीय अँगल नाही असे स्पष्ट केले आहे.

२.

बलात्काराचा गुन्हा कोणत्याही धर्मीय व्यक्तीने कोणत्याही पक्षाच्या व्यक्तीने केल्यास त्याल शिक्षा ही झालीच पाहिजे.

अर्थातच ! पण मुळात ह्या घटनेत मुसलमान इन्व्हॉल्व्हच नाहीयेत. तुम्ही काय आधारावर दावा केलाय ह्या प्रश्नल बगल दिली. OpIndia सुद्धा गुन्हेगार मुसलमान आहेत असे कुठेही म्हणताना दिसत नाही. म्हणून तुम्ही द्वेषमूलक आहात. समजले ?

३.

जसा शांतता प्रेमी समाजाकडुन लव्ह जिहाद गेला जातोय तसे हिंदू समाजातुन कुठला जिहाद केला जातोय ते नक्की सांगा.

नुसती इकडून तिकडे गोलपोस्ट बदलतंय. आधी ममता बॅनर्जींचे नाव काढलेत. आणि ह्या घटनेत मुसलमान आणि TMC दोघेही नाहीत तरी उगाच काहीही आरोप लावलेत. OpIndia मध्ये bjp आणि tmc चा संबंध सुद्धा ऐकीव माहितीवरच जोडला आहे.

some social media users claimed that the girl was a BJP supporter, and her rape and murder was part of ongoing TMC violence against BJP and other opposition parties

हे पोलिसांनी आणि मुलीच्या परिवाराने सुद्धा खोडून काढले आहे! सोशल मिडियावरचे वाचुन बातमी लिहिणारे OpIndia धन्यच.

जिहाद चा प्रश्न कुठून उकरून काढलात मध्येच ? आधी ममता बद्दल बोला, मग इकडे तिकडे धावा. आणि तुम्हीच म्हणाला होता की मुस्लिम मत मिळल्यामुळे ममता मुस्लिम गुन्ह्यांना (जो झालाच नाही!) जबाबदार आहे. मग माझ्या सध्या प्रश्नचे उत्तर द्या. हिंदू मत मिळवल्यावर भाजपा हिंदू व्यक्तींच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे का ?

४.

मग जिहाद आणि काफिर हे हिंदूच्या मैत्रीसाठी आणि त्यांच्या गुणगाणासाठी वापरले जातात असे म्हणावे काय ?

कुठे कुठे धावताय हो! मी कधी म्हणलं असं काही ? तुम्हीच शांतताप्रेमी धर्मातील माणसाने बलात्कार केला आणि त्याचा ममता tmc विजयाशी संबंध आहे असा दावा केला. एकही आधार नाही एकाही assertion साठी.

आणि उगाच भसभास व्हिडीओ देणार असाल तर माझा खरोखरीच पास. व्हिडिओतील मुद्दे टंकायचे कष्ट घेणार असाल तर ठीक, नाहीतर राहूदे.

मदनबाण's picture

24 May 2021 - 12:33 am | मदनबाण

तीच बातमी आहे ओपिंडीयात, त्यात काय वेगळे मांडले आहे ? अहो, तो बलात्कार मुस्लिम व्यक्तीनी केलाच नाहीये. आणि लोकल पोलीस आणि त्या मुलीच्या परिवाराने सुद्धा ह्यात कम्युनल आणि राजकीय अँगल नाही असे स्पष्ट केले आहे.
होय, ते अजुन स्पष्ट झालेले नाही.

पण मुळात ह्या घटनेत मुसलमान इन्व्हॉल्व्हच नाहीयेत.
त्याच गोष्टीसाठी मी व्हिडियो देतो आणि ते न पाहता तुम्ही तुमचा मुद्दा मांडु पाहता.

आधी ममता बॅनर्जींचे नाव काढलेत. आणि ह्या घटनेत मुसलमान आणि TMC दोघेही नाहीत तरी उगाच काहीही आरोप लावलेत. OpIndia मध्ये bjp आणि tmc चा संबंध सुद्धा ऐकीव माहितीवरच जोडला आहे.
ममता दीदींच्या पक्षास मुस्लीम वर्गाचा पाठिंबा आहे त्या स्वरुपाच्या बातम्या मी वरती संदर्भ म्हणुन दिलेल्या आहेत.

हिंदू मत मिळवल्यावर भाजपा हिंदू व्यक्तींच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे का ?
त्यांच्या कार्यकर्त्यांनी जसा टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी धुडगुस / मारहाण / खुन / बलात्कार केले तर तो दोष भाजपावर द्यावाच लागेल, काहीही कारण नसताना मोदींना दोष देणारे तर रोजच दिसतात.

कुठे कुठे धावताय हो! मी कधी म्हणलं असं काही ? तुम्हीच शांतताप्रेमी धर्मातील माणसाने बलात्कार केला आणि त्याचा ममता tmc विजयाशी संबंध आहे असा दावा केला. एकही आधार नाही एकाही assertion साठी.
आणि उगाच भसभास व्हिडीओ देणार असाल तर माझा खरोखरीच पास.

मी फक्त ४ व्हिडियो दिले आहेत, त्यातील शेवटचे २ व्हिडियो पाहिले तरी बंगाल मधील अवस्था सहज कळुन येइल. शेवटचा व्हिडियो खरं तर मला द्यायचा नव्हता, कारण ५०+ वर्ष वय असलेल्या त्या स्त्रीवर शांतता प्रेमी समाजाच्या गुन्हेगाराने बलात्कार केला. ती महिला आधी सीपीएम नंतर टीएमसी आणि आता बीजेपी समर्थक झाली होती. ही जाळपोळ खून आणि बलात्कार करण्याचे जे सत्र बंगाल मध्ये सुरु झाले आहे त्याचा आणि टीएमसीच्या विजयाशी काडीमात्र संबंध नाही असे जर आपले मत असेल तर मी इथेच थाबतो....

व्हिडियो हे पाहिले जाण्यासाठीच दिले जातात... आता मी हिंदू राहिलेली नाही आणि माझ्या लोकांना मी माझे तोंड कसे दाखवु ? अशी ती वृद्ध महिला व्हिवळत सांगते आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Risk and time are opposite sides of the same coin. If there were no tomorrow, there would be no risk.”

१. आजिबात नाही. दोन्ही मुद्दे पूर्ण स्पष्ट झाले आहेत. त्या घटनेत tmc आणि मुसलमान दोघाचा संबंध नाही असे स्पष्ट झाले आहे. आरोपींना अटक झाली आहे आणि त्यांनी गुन्हा मान्य पण केला आहे. यापेक्षा काय स्पष्ट होणार आहे ?

२. तुम्ही दिलेला व्हिडीओ- Ewoke TV
१३५ view
५ like
१ comment
काय अहो ? असे कुठलेपण रँडम व्हिडिओ मी मुळात का पाहू, विश्वास ठेवणे फाsssss र लांब. विश्वसनीय सोर्स द्या, मग पुढे बोलू शकेन.

३.

त्यांच्या कार्यकर्त्यांनी जसा टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी धुडगुस / मारहाण / खुन / बलात्कार केले तर तो दोष भाजपावर द्यावाच लागेल, काहीही कारण नसताना मोदींना दोष देणारे तर रोजच दिसतात.

मूळ प्रश्न टाळला. तुम्ही म्हणत होता मुस्लिम व्होट ममताला मिळाले म्हणून ममता मुस्लिम व्यक्तींच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे. मग मी विचारले मग भाजप हिंदू व्यक्तींच्या गुन्ह्यांसाठी जबाबदार आहे का ? तुम्ही शिताफीने पुन्हा पुन्हा उत्तर द्यायचे टाळले आहे.पार्टी कार्यकर्त्यांनी केलेल्या गुन्ह्यांसाठी पार्टी जबाबदार बऱ्याचदा असते हे तर अत्यंत obvious आहे. तो प्रश्नच नव्हता माझा.

४. मुस्लिम लोकांचे समर्थन असणे तुम्ही काहीतरी आरोप केल्याच्या थाटात पुन्हा पुन्हा सांगत आहात ,हे दुर्लक्ष करून, कि TMC ला हिंदू मतं सुद्धा लोकसभा निवडणुकीपेक्षा जास्तच मिळाली आहेत.. अर्थातच! जिथे तिथे कम्युनल ट्विस्ट देऊन मुस्लिम जनतेवर आरोप करणे ही भाजपाची/भाजप समर्थकांची (तुम्ही, उदा.) स्ट्रॅटेजी असेल तर का म्हणे मुस्लिम लोक त्यांना मत देतील ? मुस्लिम मतं इतक्या वाईट प्रकारे घालवणे हे भाजपचे अपयश आणि तृणमूलचे यशच आहे. त्यात तृणमूल वर आरोप करण्यासारखे काहीही नाही. तृणमूल ने स्वतःची हिंदू मतसंख्या सुद्धा लोकसभा इलेक्शन तुलनेत वाढवली आणि मुस्लिम मतसंख्या सुद्धा.

५.ही जाळपोळ खून आणि बलात्कार करण्याचे जे सत्र बंगाल मध्ये सुरु झाले आहे त्याचा आणि टीएमसीच्या विजयाशी काडीमात्र संबंध नाही असे जर आपले मत असेल तर मी इथेच थाबतो....
-
बलात्काराशी नाहीच आहे. तुम्ही पुन्हा तेच का सांगताय माहित नाही. बाकी जाळपोळ आणि हत्या ह्याचा TMC विजयाशी संबंध आहेच, पण त्यात धार्मिक ट्विस्ट देणे हे पुन्हा खोटारडेपणाचे आहे.

६. व्हिडीओ द्यायचे असतील तर सोर्स म्हणून द्यायचे, तुमचा अख्खा प्रतिवाद म्हणून नाही. आणि विश्वसनीय सूत्राकडून असले पाहिजेत हेवेसांनल.

नगरीनिरंजन's picture

21 May 2021 - 8:33 am | नगरीनिरंजन

केर्न्स एनर्जीने एअर इंडियाविरुद्धचा म्हणजेच पर्यायाने भारत सरकारविरुद्धचा खटला जिंकला आहे.
परदेशातल्या सरकारी संपत्तीवर जप्ती येऊ नये म्हणून पळापळ सुरु झाली आहे.
देश की संपत्ती पे पंजा नही पडने दूंगा म्हणणारे गायब आहेत.

https://www.ndtv.com/business/cairn-energy-government-asks-state-run-lenders-to-withdraw-cash-from-cairns-accounts-2436593

एकदा त्यांनी नक्की कुठे कुठे लक्ष घालायचं हे पण सांगून ठेवा. तुमचा सल्ला घेऊनच करतील ते कारभार या पुढे.

आनन्दा's picture

21 May 2021 - 9:19 am | आनन्दा

ती केस काय आहे नेमकी?

प्रदीप's picture

21 May 2021 - 9:26 am | प्रदीप

ह्याच तुम्ही दिलेल्या दुव्यामधील खालील भाग तुम्ही वाचलात काय?

"The dispute began after a previous Indian government decided to impose capital gains tax retrospectively on some companies, such as Cairn and telecoms operator Vodafone Plc, which also took its case to arbitration and won.

The cases scared off foreign investors and dealt a blow to the government of Manmohan Singh, who lost power in a 2014 election to Prime Minister Narendra Modi. The (Modi) government has said it would not make retrospective tax claims in future but it has defended outstanding cases."" ह्यांतले, बोल्डीकरण माझे.

माझ्या आठवणीनुसार हा अतिशय मूर्ख रिट्रोअ‍ॅक्टिव्ह टॅक्स, चिदंबरन अर्थमंत्री असतांना, तत्कालिन सरकारने लावला होता. तेव्हा ही वखवख त्या सरकारची होती.

सध्या भारत सरकारने अपिल केलेले आहे, तसेच बोलण्याचे गुर्‍हाळही सुरू आहे. त्यामुळे एक खबरदारी म्हणून, आपले नोस्ट्रो अकाउंट्समधे असलेले पैसे वाचवायची धडपड भारत सरकारतर्फे सुरू आहे, ही बातमी आहे. ह्यात "देश की संपत्ती पे पंजा नही पडने दूंगा म्हणणारे गायब झाले आहेत" असे कुठे दिसले तुम्हाला? त्यांनी ह्याविषयी जाहीर वाच्यता करत फिरावे, अशी अपेक्षा आहे काय? दुसरे, "देश की संपत्ती पे पंजा नही पडने दूंगा" हे एका वेगळ्या संदर्भांत मोदींनी म्हटले होते, त्याचा तुम्ही येथे उल्लेख करत आहांत. ते अगदी वेगळ्या संदर्भात म्हटले होते, हे तुम्हाला माहित नसावे, ह्याची शक्यता कमी आहे. तेव्हा तो संदर्भ माहित असूनही तुम्ही मुद्दाम येथे तो तिरकस उल्लेख करत असावेत, असे दिसते.

असे आपले पैसे अडकले असतां, वेळप्रसंगी ते झटकन काढून घेण्याची वेळ अनेकांवर येते- अगदी सूट्स्वाल्या उविविंवरही. अलिकडचेच आर्चिगोसचे उदाहरण घ्या ना? तिथे दोन मोठ्या, उविवि सूट्सनी म्यॅनेज्ड ब्यांका सोडल्या तर इतर दोन- तीन मोठ्या (अर्थात, उविवि सूट्सनी म्यॅनेज्ड) ब्यांकांनी अगदी अशीच पळापळ सफलरीत्या केली. त्या दोन मोठ्या उविवि सूट्सनी म्यॅनेज्ड ब्यांकांचे नुकसान झाले. हे अगदी अलिकडेच झाले आहे. त्या उदाहरणांत व आता तुम्ही दिलेल्या बातमीच्या केसमध्ये फरक इतकाच, की एका ठिकाणी उविवि धावपळ करत होते, इथे भारतीय वेषांतले मंत्री व सफारीवाले बाबू ती धडपड करत आहेत. दोन्ही केसेसमधे समान दुवा, पैशाची अतिरेकी हाव.

श्रीगुरुजी's picture

21 May 2021 - 9:50 am | श्रीगुरुजी

अज्ञान आणि द्वेषी मळमळ याचे आदर्श उदाहरण म्हणजे हा प्रतिसाद.

मुळात हे प्रकरण २००६ मध्ये सुरू झाले जेव्हा सुसंस्कृत, मितभाषी, विद्वान, अर्थतज्ज्ञ वगैरे विशेषणांनी नटलेले मौनीबाबा पंतप्रधान होते व अजून एका नामवंत अर्थतज्ज्ञ चिदंबरम् अर्थमंत्री होते. केर्नच्या भारतातील उपकंपनीने वोडाफोनला आपले समभाग विकल्यानंतर २०११ मध्ये भारताने त्यावर मोठी कर आकारणी केली. परंतु सर्वोच्च न्यायालयाने २०१२ मध्ये ही कर आकारणी रद्द केल्यानंतर भारताने नवीन विधेयक आणून पूर्वलक्षी पद्धतीने केर्नला कर भरण्यास सांगितले व कराच्या किंमतीएवढी केर्नची मालमत्ता भारताने गोठवून ठेवली.

शेवटी केर्न जागतिक न्यायालयात गेले व आता त्यांच्या बाजूने निकाल लागला आहे.

मोदींना नेहरूंच्या गंभीर घोडचुका निस्तरताना आता मौनीबाबांंच्याही गंभीर घोडचुका निस्तराव्या लागत आहेत. परंतु काही बिनडोक यासाठी मोदींनाच दोष देत आहेत.

https://www.google.com/amp/s/www.natlawreview.com/article/cairn-v-india-...

नगरीनिरंजन's picture

21 May 2021 - 1:40 pm | नगरीनिरंजन

काँग्रेसला कंटाळूनच लोकांनी दिले ना मोदींना निवडून?
सात वर्षात खाजगीकरणही जमले नाही वाटते.
ज्यांनी चुका केल्या त्यांची सत्ता गेली. काही बिनडोक मात्र अजून त्यांचेच नाव घेत बसलेत चुका दुरुस्त होताहेत की नाही ते पाहण्यापेक्षा.

श्रीगुरुजी's picture

21 May 2021 - 1:47 pm | श्रीगुरुजी

काही बिनडोक मात्र अजून त्यांचेच नाव घेत बसलेत

हे मात्र अगदी खरं बोललात आणि बोलताना आत्मताडनही केलंत. लगे रहो!

नगरीनिरंजन's picture

21 May 2021 - 2:41 pm | नगरीनिरंजन

सात वर्षांत सगळे अधिकार असलेल्या निकम्म्या दैवताने काही केले असते तर असे बालीश शब्दच्छल करयची वेळ आली नसती. =))

श्रीगुरुजी's picture

21 May 2021 - 2:48 pm | श्रीगुरुजी

निकम्म्याने केर्नवर पूर्वलक्षी प्रभावाने कर लावण्याचे भलते उद्योग न करता काही भरीव केले असते तर आज ही वेळ आली नसती आणि काही नंबरीनिर्बुद्धांना रोज मळमळ ओकावी लागली नसती.

काही लोकांना २०१४ पासून कावीळ,रक्तदाब, आम्ल पित्त आणि मूळव्याध हे चारही एकदम उपटलेले आहे.

त्यामुळे तिखट, आंबट, क्षारयुक्त असं सर्व अन्न वर्ज्य आहे. आणि गोड सात्विक अन्न याना झेपत नाही. तेंव्हा फक्त कडू आणि तुरट असे अन्न खाऊन यांची जीभ कडू झालेली आहे.

त्यामुळे त्यांची अवस्था अतिशय गंभीर झाली आहे.

त्यासाठी बारामती, नंदीग्राम, वायनाड, अमेठी अशा अनेक ठिकाणच्या निष्णात वैद्यांचे औषध आणवले गेले परंतु त्याचा अजिबात गुण आलेला नाही.

आता यावर ऑक्न्त उपाय करावा याचे चर्वित चर्वण चालू आहे.

कोणास रामबाण उपाय माहिती असेल तर कळवावा

योग्य ते पारितोषिक दिले जाईल

आणि आता इतर पक्ष ते उभेही करू शकत नाहीत...

हा आहे.

करोनात जीव गमावलेल्या श्रद्धांजली वाहताना त्यांनी एक आवंढाही गिळला. सोबतच, योग आणि आयुषनं करोना विषाणूच्या या काळात लोकांची ताकद वाढवल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलंय

https://maharashtratimes.com/india-news/pm-narendra-modi-gets-emotional-...

मराठी_माणूस's picture

21 May 2021 - 4:12 pm | मराठी_माणूस

https://epaperdivyamarathi.bhaskar.com/nashik/247/21052021/0/1/

ह्या पानावर नांदेड मधील भयंकर घटना

प्रदीप's picture

21 May 2021 - 4:31 pm | प्रदीप

तुम्हाला नक्की कुठली अभिप्रेत आहे, ते समजले नाही. मात्र त्या पहिल्याच पानावर, उजवीकडे सरकारच्या आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या पाहणीची बातमी आहे. तीअवश्य पाहावी.

वामन देशमुख's picture

21 May 2021 - 5:05 pm | वामन देशमुख

तुम्हाला ही बातमी म्हणायची आहे का?

कोरोना रुग्ण असलेल्या एका शिक्षकाच्या मृत्यूनंतर केवळ पैसे लाटण्यासाठी तीन दिवस त्यांच्या मृत्यूची बातमीच नातेवाइकांपासून लपवून ठेवली आणि उपचार सुरू असल्याचा अाभास निर्माण करण्यात आला...

https://divyamarathi.bhaskar.com/local/maharashtra/jalgaon/nandurbar/new...

मराठी_माणूस's picture

21 May 2021 - 7:19 pm | मराठी_माणूस

हो हीच बातमी. काल पण आली होती. आज त्या घटनेचा पुढचा भाग आला आहे.

श्रीगुरुजी's picture

21 May 2021 - 11:09 pm | श्रीगुरुजी

उत्तर प्रदेश सरकारला १७ मे २०२१ या दिवशी आदेश देऊन १ महिन्याच्या आत राज्यातील सर्व ९७,००० खेड्यांमध्ये ICU सुविधा असलेल्या प्रत्येकी २ ऍम्ब्युलन्स पुरविण्याचा आदेश दिला होता. परंतु राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जाऊन अशी व्यवस्था १ महिन्याच्या आत करणे व्यावहारिक नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देताना सांगितले की उच्च न्यायालयाने असे अव्यावहारिक आदेश देऊ नये.

https://m.timesofindia.com/india/hcs-must-not-pass-orders-that-are-impos...

खरं आहे. १ महिन्यात १,९४,००० ICU सुविधा असलेल्या ऍम्ब्युलन्स पुरवणे प्रामाणिक प्रयत्न केले तरी अशक्य आहे. त्यात कर्मचारी भरती पण करावी लागेल. असले आदेश न्यायालय का देते हे गुढ आहे.

न्यायालयाचा अवमान करण्याचा हेतु नाही परंतु न्यायालयाने असले टार्गेट आपल्या केसेस कमी करायला स्वतः वर लावायला हवेत.

सुबोध खरे's picture

22 May 2021 - 11:43 am | सुबोध खरे

न्यायालयाने असे अचाट आणि अफाट पण अंमल बजावणी करता येणार नाही असे निकाल देऊ नयेत हि वस्तुस्थिती.

त्यावर स्पष्टपणे टीका झालीच पाहिजे. जनतेच्या क्षोभाचा धाक हा न्यायाधीशाना सुद्धा असला पाहिजे.

बेदम मारहाण झाल्यावर के इ एम मधील निवासी डॉक्टर संपावर गेले असता न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश श्रीमती मंजुळा चेल्लुर यांनी तुम्हाला भीती वाटत असेल तर राजीनामा देऊन घरी बसा असे बेताल वक्तव्य केले होते. त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती.

आज याच निवृत्त न्यायमूर्तींना विचारले पाहिजे कि आज हेच डॉक्टर अंगावर पी पी ई किट घालून प्रत्यक्ष काम करत असताना देशातील सर्व न्यायालये मात्र घरून कामे करत आहेत.

त्यांना(खालच्या, उच्च आणि सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांना) आपण "तुम्हाला भीती वाटत असेल तर राजीनामा देऊन घरी बसा" असा सल्ला देण्याची हिंमत करणार का?

१००० च्या वर डॉक्टर या महामारीत काम करत असताना हुतात्मा झाले आहेत. त्यांच्या कुटुंबियांना निदान काही सन्माननीय भरपाई दिली जाईल या बद्दल न्यायालये काही करतील का?

NJAC च्या सुनावणीच्या वेळेस सत्य बोलल्याबद्दल श्री मुकुल रोहटगी यानि पूर्व न्यायाधीशांच्या अकार्यक्षमतेबद्दलची वस्तुस्थिती न्यायासना समोर आणली असता सरन्यायाधीश खेहर यांनी त्यांना पूर्व न्यायाधिशांवर टीका केल्या बद्दल न्यायालयीन अवमाननेचा इशारा दिला होता.

तेंव्हा श्री मुकुल रोहटगी यांनी सरन्यायाधीश खेहर याना माझ्या विरुद्ध तुम्ही न्यायालयीन अवमान केल्याबद्दल कार्यवाही करून दाखवाच असे सरळ स्पष्ट आव्हान दिले होते. पुढे ते म्हणाले सूर्यप्रकाशाएवढे सत्य समोर आणण्याबद्दल तुम्ही माझ्या वर न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कार्यवाही करू शकत नाही.

सरन्यायाधीश खेहर यांची कार्यवाही करण्याची हिम्मत झाली नाही.

न्यायालयाचा अवमान हि काही गल्लीतल्या गुंडावर पोलीसांनी केलेली प्रतिबंधात्मक कार्यवाही नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

22 May 2021 - 11:29 am | चंद्रसूर्यकुमार

मुळे सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देताना सांगितले की उच्च न्यायालयाने असे अव्यावहारिक आदेश देऊ नये.

नक्कीच स्वागतार्ह निवाडा. कधीकधी न्यायालयाचे काही काही आदेश खरोखरच अनाकलनीय असतात.

मागे मद्रास उच्च न्यायालयाच्या एका न्यायाधीशाने नॅशनल हायवे ऑथोरीटी ऑफ इंडियाला पूर्ण देशात टोल प्लाझांवर व्ही.आय.पी साठी एक स्वतंत्र लेन ठेवण्यात यावी आणि त्या लेनमध्ये न्यायाधीशांचाही समावेश असावा हा आदेश दिला होता. इतकेच नव्हे तर या न्यायाधीशांनी म्हटले होते-- It is embarrassing for VIPs and sitting judges to have to wait at toll plazas and display identity documents. इतकेच नव्हे तर या लेनमध्ये केवळ व्ही.आय.पींनाच प्रवेश द्यावा तसेच इतर लोक या लेनमध्ये आल्यास कारवाई करण्यात येईल अशीही तंबी या न्यायाधीशांनी दिली.

कसली संस्कृती हे न्यायाधीश आणू पाहात होते? आणि ते पण स्वतःसाठी सगळ्या यंत्रणेला वाकवून? अशा ठिकाणी कोणी व्ही.आय.पी असेलच तर ते म्हणजे रूग्णवाहिका आणि अग्नीशमन दल वगैरेंची वाहने. त्यांना टोल प्लाझावर किंवा कुठेही अजिबात अडकायला लागले नाही पाहिजे. बाकी कोणी व्ही.आय.पी नाही/नसावा.

या एका निर्णयाबद्दल संसदेने तातडीने त्या न्यायाधीशांविरूध्द महाभियोग आणून त्यांना पदच्युत करायला हवे होते असे फार वाटले होते.

सुबोध खरे's picture

22 May 2021 - 11:50 am | सुबोध खरे

CHENNAI: The Madras high court sent a blunt message to the National Highways Authority of India (NHAI) on Wednesday: Create exclusive lanes for VIPs, including sitting judges, at all toll plazas on national highways or face contempt of court proceedings.

https://timesofindia.indiatimes.com/india/hc-wants-separate-toll-lanes-f...

अतिशय संतापजनक वक्तव्य आहे.

श्रीगुरुजी's picture

22 May 2021 - 2:07 pm | श्रीगुरुजी

या एका निर्णयाबद्दल संसदेने तातडीने त्या न्यायाधीशांविरूध्द महाभियोग आणून त्यांना पदच्युत करायला हवे होते असे फार वाटले होते.

१९८० च्या दशकात हरयाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश रामस्वामी यांनी सरकारी खर्चाने ८० लाखांचे फर्निचर घेतले होते. त्यांच्याविरूद्ध महाभियोग चालविण्यासाठी १९९३ मध्ये संसदेत ठराव आला होता. त्यावेळी कॉंग्रेसच्या मणीशंकर अय्यरने रामस्वामी तामिळ आहेत व तामिळीविरूद्ध महाभियोग चालवू नये यासाठी दक्षिणेतील कॉंग्रेसच्या खासदारांना एकत्र आणून नरसिंहरावांवर दबाव आणला होता. त्यामुळे नरसिंहरावांनी कॉंग्रेसच्या खासदारांना मतदानात सहभागी न होण्याचा आदेश देऊन महाभियोगाचा ठराव मंजूर होऊन दिला नव्हता. हे करण्यासाठी त्यांनी रामस्वामीकडून राजीनामा देण्याचा शब्द घेतला होता. परंतु महाभियोगाचा ठराव अमान्य झाल्यानंतर रामस्वामीने राजीनामा न देता आपली उर्वरीत कारकीर्द पूर्ण करून नंतर निवृत्ती घेतली होती.

चंद्रसूर्यकुमार's picture

22 May 2021 - 4:58 pm | चंद्रसूर्यकुमार

हो. त्यानंतर १९९९ मध्ये त्यांनी वायकोंविरूध्द शिवकाशी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणुक पण लढवली होती. १९९३ चे हे व्ही.रामस्वामी महाभियोग प्रकरण मी रस घेऊन बघितले होते. त्यावेळी मी शाळेत होतो आणि महाभियोग असे काही असते हेच पहिल्यांदा कळले. महाभियोगात संबंधीत व्यक्तीला आपला बचाव संसदेत करता येतो आणि त्यासाठी आपला वकील नेमता येतो. तेव्हा कपिल सिब्बल रामास्वामींचे वकील होते. कपिल देव सोडून आणखी कोणी कपिल असतात हे पण तेव्हा पहिल्यांदाच कळले :)

पुढे अण्णांचे २०११ मधील उपोषण चालू असताना संसदेने कलकत्ता उच्च न्यायालयाचे सौमित्र सेन यांच्यावर महाभियोग चालवून पदच्युत केले होते. महाभियोग चालवून संसदेने पदावरून हटविलेले ते पहिले न्यायाधीश होते.

श्रीगुरुजी's picture

22 May 2021 - 5:44 pm | श्रीगुरुजी

मी सुद्धा तेव्हाच पहिल्यांदा कपिल सिब्बल हे नाव ऐकले. ते प्रकरण सिब्बलांच्या आयुष्यातील एक वळणाचा दगड ठरले. त्यानंतर अनेक मोठे खटले त्यांनी यशस्वीपणे हाताळले व राजकारणातही पाय रोवले. ते सलग २० वर्षे खासदार व केंद्रीय मंत्री होते.

अलिकडे मात्र ते चालवित असलेले बहुतेक सर्व खटले हरत आहेत. श्रीरामजन्मभूमी खटल्यात ते बाबरी मशीद कृती समितीचे वकील होते व त्यासाठी त्यांना बरीच टीका सहन करावी लागली. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नावाने खोटे बोलण्याच्या खटल्यात ते राहुल गांधींचे वकील होते. मराठा राखीव जागा खटल्यात ते महाराष्ट्र सरकारचे वकील होते. हे सर्व खटले ते हरले.

श्रीगुरुजी's picture

22 May 2021 - 5:45 pm | श्रीगुरुजी

सलग १० वर्षे

सुबोध खरे's picture

22 May 2021 - 7:22 pm | सुबोध खरे

महाभियोग चालवून संसदेने पदावरून हटविलेले ते पहिले न्यायाधीश होते.

हे बरोबर नाही.

राज्यसभेत त्यांच्यावर महाभियोगाचा ठराव पस झाल्यावर लोकसभेत ठराव येण्यापूर्वीच त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे लोकसभेत असा ठराव आलाच नाही. आणि त्यांचा राजीनामा मंजूर करून घेतला

Ahead of the impeachment motion against him in the Lok Sabha on 5 & 6 September 2011, he resigned on 1 September 2011
https://en.wikipedia.org/wiki/Soumitra_Sen

इतर दोन्ही न्यायाधीश ज्यांच्या विरुद्ध असा महाभियोगाचा ठराव आला होता त्यात एक श्री दिनकरा यांनी राजीनामा दिला आणि श्री रामस्वामी यांच्या विरुद्ध ठराव पास झाला नाही.

एकंदर स्वतंत्र भारताच्या इतिहासात एकाही न्यायाधीशाविरुद्ध महाभियोग होऊन त्यांना बडतर्फ केले गेलेले नाही.

चंद्रसूर्यकुमार's picture

22 May 2021 - 7:33 pm | चंद्रसूर्यकुमार

धन्यवाद.

हो सौमित्र सेन यांनी आधी राजीनामा दिला होता. पण तो राजीनामा मान्य न करता त्यांच्यावर महाभियोग चालवून त्यांना हटविणार अशी चर्चा चालू होती. पण प्रत्यक्षात तसे झाले नाही. राज्यसभेने महाभियोग ठराव पास केल्यानंतर लोकसभेत तो ठराव येण्यापूर्वी त्यांनी राजीनामा दिला आणि तो मान्य केला गेला.

श्रीगुरुजी's picture

22 May 2021 - 10:18 am | श्रीगुरुजी

मोदी जनतेची नाडी अचूक ओळखतात व विरोधकांना आपल्याच मैदानात आपल्याच खेळपट्टीवर सामना खेळायला लावून लोळवितात हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर सुद्धा विरोधक मोदींनी लावलेल्या सापळ्यात अलगद अडकतात.

मोदी अशा कृती करतात की ज्यामुळे महत्त्वाचे सर्व विषय बाजूला ठेवून विरोधक त्यांच्यावर व्यक्तीगत हल्ले सुरू करतात व त्यातून शेवटी बहुसंख्य जनतेची सहानुभूती मोदींनाच मिळते व विरोधक संधी हातची घालविल्याने हात चोळत बसतात.

काल मोदी बोलताना भावुक झाल्याने लगेच त्यांच्यावर टीका सुरू झाली. ते टीव्हीवर येऊन रडणार असे भाकीत मी आधीच केले होते असे आपटार्ड संजय सिंहने सांगून नाटकी, ढोंगी अशा शब्दात मोदींची संभावना केली. इतर विरोधक शहाणे असतील या प्रकाराला फार महत्त्व न देता व व्यक्तीगत टीका न करता मुख्य विषय बाजूला पडून देणार नाहीत. अन्यथा पुन्हा एकदा ते तोंडावर आपटतील.

श्रीगुरुजी's picture

22 May 2021 - 10:24 am | श्रीगुरुजी

काही महत्त्वाच्या बातम्या -

- ख्यातनाम पर्यावरण कार्यकर्ते व चिपको आंदोलनाचे प्रणेते सुंदरलाल बहुगुणा यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले.

- तहलका संपादक तरूण तेजपाल लैंगिक छळाच्या सर्व आरोपातून पुराव्याअभावी निर्दोष सुटले.

- मागील आठवड्यात दैनिक नवीन कोरोना रूग्णांची संख्या ४ लाखांहून अधिक झाली होती. काल ही संख्या अडीच लाखांच्या आसपास आहे. हा आकडा सुद्धा खूप मोठा आहे, परंतु नवीन रूग्णांची संख्या वेगाने कमी होत आहे.

https://www.loksatta.com/maharashtra-news/sharad-pawars-policy-actually-...

----------

शरद पवार, नेहमीच पलटी का मारतात? शेतकरी आंदोलनच्या नंतर, आता ही दुसरी पलटी ...

लक्ष्मण यांचे खरे नाव विजय काशीनाथ पाटील. वयाची विशी ओलांडल्यावर विजय पाटील नागपूरहून घर सोडून मुंबईला आले. मुंबईत आल्यानंतर त्यांची ओळख सुरेंद्र हेंद्रेंशी झाली. ते बासरी वाजवत. एका कार्यक्रमात दादा कोंडके यांनी विजय पाटील आणि सुरेंद्र हेंद्रेंना आपल्या पुढच्या सिनेमाला संगीत देण्याची ऑफर दिली. विजय पाटील यांना घरात लखन म्हणत. तेवढेच दादांनी लक्षात ठेवले आणि या जोडगोळीचे नामकरण राम-लक्ष्मण असे करून टाकले.

https://maharashtratimes.com/entertainment/wellknown-musician-hum-aapke-...

चंद्रसूर्यकुमार's picture

22 May 2021 - 6:24 pm | चंद्रसूर्यकुमार

विरोधक ब्लॅक फंगस आहेत असा घणाघात शिवसेनेचे नेते आणि सामनाचे सहसंपादक खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/shiv-sena-mp-sanjay-r...

श्रीगुरुजी's picture

22 May 2021 - 6:36 pm | श्रीगुरुजी

आणि ही घाण म्हणजे स्पुटनिक लस.

श्रीगुरुजी's picture

23 May 2021 - 8:24 am | श्रीगुरुजी

There is news about Covaxine not considered for overseas travel and Covaxine is not approved - not yet on the World Health Organisation's (WHO) Emergency Use Listing (EUL).

https://amp/s/www.news18.com/amp/news/auto/as-covaxin-is-not-on-who-list...

जागतिक आरोग्य संघटना चीनची गुलाम आहे. भारतीय लसीला मान्यता मिळू नये व चीनच्या लसीला मान्यता मिळावी यासाठी चीनच्या दबावाखालीच जागतिक आरोग्य संघटनेने मुद्दाम हा निर्णय घेतला असावा.

मुक्त विहारि's picture

24 May 2021 - 9:54 am | मुक्त विहारि

Axis बँकेवर झाली ठाकरे सरकारची कृपा; अमृता फडणवीसांवर सातत्याने करत होते टीका....
---------

"Axis बँकेवर झाली ठाकरे सरकारची कृपा; अमृता फडणवीसांवर सातत्याने करत होते टीका - Marathi News | Axis Bank favored by Thackeray government; Amrita Fadnavis was constantly criticizing by Leaders | Latest politics News at Lokmat.com" https://m-lokmat-com.cdn.ampproject.org/v/s/m.lokmat.com/politics/axis-b...
-------------

बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात....

बाबा बिचारे एक व्हाट्सॅप मेसेज वाचुन दाखवत होते, त्यात अधुनिक मेडिकल सायन्स कसे इश्टुपिड आहे असे लिहिले होते. म्हणे- हाय्ड्रोक्सीक्लोरोक्वीन फेल झाले, फॅबीफ्ल्यु फेल झाले, प्लाज्मा थेरपी सुद्धा फेल आणि बॅन झाली म्हणे, आणि लाखो लोकं मेले ते औषधे खाउनच. हा मेसेज बाबांना मान्यच होता असे दिसते. आयएमए ही संस्था जाम भडकली, आणि रामदेव आपले "इल्लिगल औषध" खपवण्यासाठी थापा लाऊन भिती पसरवत आहे असा दावा केला आणि त्यांनी हर्षवर्धन ह्यांच्याकडे कारवाईची मागणी केली.

हर्षवर्धन ह्यांनी रामदेव बाबांना आपले विधान मागे घेण्याची मागणी केली, रामदेव बाबांनी ऐकली.

पण ह्याच आयएमए ने डॉ. हर्ष वर्धन यांना त्यांनी आपण कोरोनीलचा प्रचार करत नाही आहे असे घोषित करावे असे सांगितले होते, तिथे माझ्या महितीप्रमाणे काहीही झाले नाही.

कोरोनील सारख्या औषधाला कोव्हिडसाठी पुरक म्हणुन विक्रीची परवानगी देणे, ते सुद्धा रामदेव बाबा WHO ने कोरोनीलला मान्यता दिली असे धाधांत खोटे बोलत असताना.

“Being a Health Minister of the country, how justified is it to release such falsely fabricated unscientific product to people of the whole country and how ethical was it to promote the product in unethical, wrong and false ways,” the IMA statement said.

The association also pointed out that as per the code of act of the Medical Council of India, no doctor can promote any drug, “whether for compensation or otherwise, any approval, recommendation, endorsement, certificate, report or statement” and said that it was “surprising that the Minister himself is promoting the drug (Coronil)”.

रामदेव बाबाला प्रॉफीट व्हावा म्हणुन सरकार सरळ सरळ शिलींग करत आहे. निषेध.

HCC चा खरंच काही उपयोग झाला नाही. रेमदेसीविर बद्दल बोलायचं तर आपले अलोपॅथी चे डॉक्टर्स त्याला अक्षरशः दिसेल त्याला prescribe करत होते. म्हणून तर गुलेरिया सारख्याना सांगावं लागलं की ते फक्त मधल्या काळात द्यायचं औषध आहे. सुरवातीला देऊन उपयोग होत नाही आणि नंतर दिलं तर उपयोग तर होतंच नाही, शिवाय रोग्याला त्याचा त्रास होतो. प्लाझ्मा थेरपी बद्दल नक्की काय प्रकार आहे खरंच माहिती नाही. मध्ये त्याबद्दल खूप ऐकलं होतं पण आता त्याबद्दल काही ऐकू येत नाही.

1. भारताला प्रचंड प्रमाणात डॉक्टर्स ची गरज आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी मेडिकल च्या सीट्स खूप प्रमाणात वाढवणे गरजेचे आहे. होऊ दे डॉक्टर्स चा अति पुरवठा, काहीही बिघडत नाही.
2. शिवाय जे विद्यार्थी सरकारी ग्रँट घेऊन शिकतील त्यांना आयुष्यभर सरकारी हॉस्पिटल्स मध्ये काम करायला भाग पाडणे गरजेचे आहे. निवृत्तीनंतर करू दे त्यांना private मध्ये काम हवं तर.
3. जर कुणाला private हॉस्पिटल्स मध्ये काम करायची इच्छा असेल किंवा स्वतः ची private प्रॅक्टिस करायची इच्छा असेल तर त्यांनी स्वतःचे लाखो (की करोडो?) रुपये घालून शिक्षण घ्यावे.
4. सरकारने वैद्यकीय क्षेत्रावर खर्च होणारा निधी वाढवण्याची गरज आहे. या खर्चात सरकारी डॉक्टर्स च्या सॅलरी वर होणारा खर्च ही वाढवावा.
5. चांगल्या प्रतीचे वैद्यकीय इन्फ्रास्ट्रुक्चर तालुक्यापर्यंत आणि गावांपर्यंत नेण्याची गरज आहे. हे कसं करायचं हा प्रश्न असेल पण हे होण्यासाठी लागणारे डॉक्टर्स तरी मोठ्या प्रमाणावर तयार करावे लागणार.
6. सध्याच्या वैद्यकीय कट प्रॅक्टिस आणि मोठ्या हॉस्पिटल्स मधून होणाऱ्या प्रचंड बिल्स कडे लक्ष देऊन खरोखरच इतका खर्च होतो का, हॉस्पिटल्स चा revenue किती आणि income किती, तेवढा टॅक्स भरला जातो का, मेडिकल इन्शुरन्स चा हॉस्पिटल्स गैरवापर करतात का हे पहाण्याची गरज आहे.

गॉडजिला's picture

24 May 2021 - 5:32 pm | गॉडजिला

6. सध्याच्या वैद्यकीय कट प्रॅक्टिस आणि मोठ्या हॉस्पिटल्स मधून होणाऱ्या प्रचंड बिल्स कडे लक्ष देऊन खरोखरच इतका खर्च होतो का, हॉस्पिटल्स चा revenue किती आणि income किती, तेवढा टॅक्स भरला जातो का, मेडिकल इन्शुरन्स चा हॉस्पिटल्स गैरवापर करतात का हे पहाण्याची गरज आहे.

याबाबत विचार करुन डोके गरगरते... हॉस्पिटल चालवायला घेतली जातात (खाजगी असली तरी) इथेच कंत्राटी प्रकरण सुरु होत असल्याने आणखी काय बोलणार ?

नगरीनिरंजन's picture

24 May 2021 - 6:53 pm | नगरीनिरंजन

हा व्हिडिओ पाहा: https://fb.watch/5HohAALpEC/

महान योगगुरु श्री रामदेव बाबा यांनी कोविडमुळे मेलेल्या डॉक्टरांची खिल्ली उडवली आहे.
परंतु आता ब्रह्मर्षी त्यावर मूग गिळून बसतील.
ज्या विद्येमुळे पोटापाण्याची व्यवस्थाच नव्हे तर मानसन्मानही मिळाला ती विद्या अडाणी व लुच्च्या लोकांच्या पायी वाहण्यासाठी नक्कीच काहीतरी प्रचंड अमिष असले पाहिजे.
मुस्लिम धर्मवेड्यांना ७२ अप्सरांचे असते म्हणतात. ह्या लोकांना कसले असावे?

श्रीगुरुजी's picture

24 May 2021 - 6:58 pm | श्रीगुरुजी

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. संपादक मंडळ आपले असभ्य प्रतिसाद वारंवार काढत टाकले असूनही पुन्हा पुन्हा तेच प्रतिसाद टाकण्याची खोड सुरूच आहे.

पंतप्रधान सिंगापूर मध्ये बसून 9 ते 5 नोकरी करतात आणि बाकीच्या वेळी ट्विटर, मिसळपाव, फेसबुक वर वेळ घालवतात अशी त्यांची कल्पना दिसते. पंतप्रधानांना (सगळ्याच) दिवसातले 14-18 तास काम करायचे असते. त्यांचे दिवस सकाळी 5 ला सुरू होऊन रात्री उशिरा कधीही संपू शकतात. रामदेवबाबाच्या बातमीवर, राजकुमारांच्या ट्विट वर, संजय रौतांच्या interview वर आणि अशा फुटकळ गोष्टींवर मतं व्यक्त करत बसले तर देशातल्या सगळ्या मंत्र्यांच्या/सचिवांच्या/राष्ट्रपती/राज्यपाल/मुख्यमंत्री आणि त्यांच्या स्वतःच्या खात्यांच्या कामावर लक्ष कधी ठेवणार? उचलली जीभ आणि लावली टाळ्याला.

लिओ's picture

24 May 2021 - 10:59 pm | लिओ

या रामदेव बाबांना थोडा तारतम्य हवे.

आय. एम. ए. भडकली आहे देशातील डॉ़क्टर भडकले आहेत. एक गोष्ट साफ झाली आहे कि केंद्र सरकारला वाटते कि सगळयांनी गुलामासारखे वागावे. आणि केंद्र सरकारचे गुण गावेत यासाठि भारतातली जनता आहे.

आय. एम. ए. फक्त अ‍ॅलोपैथिक डॉ़क्टरांचे प्रतिनिधित्व करत नाही ( अ‍ॅलोपैथिक डॉ़क्टरांचे संघटनेत वर्चस्व आहे हे मान्य ).

कशाला मागच्या वर्षी (अ‍ॅलोपैथिक) डॉ़क्टर काम करत असलेल्या हॉस्पिटल मध्ये डॉ़क्टर आणि नर्सिंग स्टाफ वर कोव्हीड योध्दा म्हणुन भारतीय वायुदलाच्या हॅलिकॉप्टर मधुन पुष्पवर्षाव केला. ?

एखादा रुग्ण करोना रुग्ण आहे हे RT-PCR , HRCT , Antigen टेस्ट शिवाय कसे शोधु शकाल ? बर RT-PCR , HRCT , Antigen टेस्ट शिवाय एखादा रुग्ण शोधला तर तो किती गंभीर आजारी असणार आणि त्या रुग्णाचे काय होणार हे सांगायची गरज आहे का ? असा रुग्ण PPE kit न घालता कोणी बरा करु शकेल काय ? असा रुग्ण PPE kit न घालता कोणी बरा करु शकत असेल तर त्याने वैद्यकिय शास्त्राला आव्हान द्यावे.
आणि हि परिस्थिती लक्षात घेउन केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी बोलावे हि माफक अपेक्षा.

केंद्र सरकारचा काय संबंध? आय एम ए आणि रामदेवबाबा बघून घेतील की. केंद्र सरकार ला वाटते सगळ्यांनी गुलामसारखे वागावे? केंद्र सरकारच्या कुठल्या अध्यादेशामध्ये हे म्हटलं आहे? की एखाद्या मंत्र्याने/नोकरशहाने असं म्हटलं आहे? की एखाद्या interview मध्ये असं म्हटलं आहे? की हे तुमचं interpretation आहे? असेल तर कोणत्या फॅक्टस वर अवलंबून आहे? आणि नसेल तर फडतूस ट्रोलिंग पोस्ट कशासाठी?

श्रीगुरुजी's picture

25 May 2021 - 12:05 am | श्रीगुरुजी

मुळात रामदेव बाबा कोणी सरकारी अधिकारी, मंत्री वगैरे आहेत का? त्यांच्या बोलण्याला एवढं महत्त्व देण्याचं कारणच काय? "डॉक्टरांंना काय कळतं, मी तर नेहमी कंपाऊंडरकडूनच औषध घेतो" असे मागच्या वर्षी संजय राऊत बोलले होते. तेव्हा त्या बोलण्याला किती जणांनी महत्त्व दिले होते? मग रामदेव बाबांंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष का करीत नाहीत?

सुबोध खरे's picture

25 May 2021 - 9:35 am | सुबोध खरे

बाडीस

गॉडजिला's picture

25 May 2021 - 10:17 am | गॉडजिला

रामदेव बाबा एलोपेठीच्या स्पर्धक औषधांचा व्यापार करतात राऊतांप्रमाणे देशाच्या एका विशिष्ट भागापुरते मर्यादित प्रभावशील नाहीत परिणामी त्यांची चिखलफेक हि निर्लेप नसून दिवस रात्र राबून जो अभ्यासक्रम शिकून लाखो लोकांचे प्राण ज्यांनी वाचवले त्याचा उघड अपमानही आहे

श्रीगुरुजी's picture

25 May 2021 - 1:24 pm | श्रीगुरुजी

राऊत ज्या विशिष्ट मर्यादित भागात प्रभावशाली आहेत, त्या भागातील किती जणांनी डॉक्टरऐवजी कंपाऊंडरकडून औषध घ्यायला सुरूवात केली?

देशी दारू प्यायल्याने कोरोना बरा होतो असे नुकतेच एका डॉक्टरनेच सांगितले होते. त्याचे ऐकून किती जणांनी देशी दारू ढोसायला सुरूवात केली?

फेअर अँड लव्हली लावून गोरेपण येते, अशी जाहिरात अनेक दशके सुरू आहे. ती पाहून किती जण गोरे होण्यासाठी हे मलम वापरले?

अनेक वृत्तवाहिन्या रोज अनेकदा अर्ध्या तासांचे डॉक्टरांचे पेड जाहिरातींंचे कार्यक्रम दाखवितात. ते पाहून किती जणांनी त्या डॉक्टरकडून उपचार घेतले?

हे सर्वजण डॉक्टरांचा अपमान करीत नाहीत का?

गॉडजिला's picture

25 May 2021 - 1:41 pm | गॉडजिला


राऊत ज्या विशिष्ट मर्यादित भागात प्रभावशाली आहेत, त्या भागातील किती जणांनी डॉक्टरऐवजी कंपाऊंडरकडून औषध घ्यायला सुरूवात केली?

वेल हे घडले नसेल तर राउतांनी डॉक्टरांची माफी मागायलाच हवी याबद्दल आपले मिपाकर डॉ खरे साहेब याच मताचे असतील.

देशी दारू प्यायल्याने कोरोना बरा होतो असे नुकतेच एका डॉक्टरनेच सांगितले होते. त्याचे ऐकून किती जणांनी देशी दारू ढोसायला सुरूवात केली?
आयत थिंक तुम्ही काही तरी गल्लत करताय, देशी दारू पाजुन मग डोक्टरने देशी प्यायल्याने कोरोना बरा होतो असे म्हटले होते म्हणजे देशी पाजली गेली आहे ते सुध्दा डॉक्टर कडुन.

फेअर अँड लव्हली लावून गोरेपण येते, अशी जाहिरात अनेक दशके सुरू आहे. ती पाहून किती जण गोरे होण्यासाठी हे मलम वापरले?
आयम नॉट रेसिस्ट आणी या जाहीरातीचा धिक्करही केला गेला आहे.

अनेक वृत्तवाहिन्या रोज अनेकदा अर्ध्या तासांचे डॉक्टरांचे पेड जाहिरातींंचे कार्यक्रम दाखवितात. ते पाहून किती जणांनी त्या डॉक्टरकडून उपचार घेतले?
त्यात खरेच डोक्टर (म्हणजे आपले खरे डो़क्टर न्हवे)असतात की अभिनेते डॉक्टरचा रोल करुन फसवणूक करतात ? तसेही कायदेशीर बाबितुन सुटका करणार्‍या जाहीरातदारांच्या ट्रिक्स म्हणजेच ** आणी अजुन बारीकबारीक अक्षरातील सुचना आपणास माहीत नाहीत ? बाकी डॉक्टर लागुनी जाहीरती केल्या तर त्यांचे लायसेंस रद्द केल्य गेले होते.

हे सर्वजण डॉक्टरांचा अपमान करीत नाहीत का?
म्हणून रामदेव बाबाला सहन करयच व्हय ? मग तर सर्वप्रथम रामदेवबाबाला तदेव कर्म कुर्वीत ह्येन आत्मा संप्रसीदति हा धागाच ऊदवायला सांगायला पाहिजे.

श्रीगुरुजी's picture

25 May 2021 - 2:20 pm | श्रीगुरुजी

तेच म्हणतोय मी. जे रामदेवबाबांंनी केलंय ते पूर्वी अनेकजणांनी केलंय. परंतु त्यांच्या बाबतीत क्वचितच निषेधाचे सूर उमटले होते. संजय राऊतच्या बरळण्याकडे जसे दुर्लक्ष केले जाते, संजय राऊतला जसे सहन केले जाते, तसे रामदेवबाबांच्या बाबतीत का केले जात नाही? मुळात रामदेवबाबांनी जे उत्पादन आणलंय ते औषध नसून immunity booster आहे. त्यासंबंधीचा खालील प्रतिसाद वाचा.

तेच चालु रहायला आपला काही विरोध नसावा.