✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४)

व
वामन देशमुख यांनी
Wed, 04/14/2021 - 15:50  ·  लेख
लेख
चालू घडामोडी - एप्रिल २०२१ (भाग ४) काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी, आज रात्री आठ वाजल्यापासून महाराष्ट्रात लॉक डाउन सुरु होईल अशी घोषणा केली. त्यासंबंधित ही एक विडिओ बातमी, संदर्भ म्हणून इथे देऊन ठेवत आहे. यासंबंधी एक इंग्लिश परिपत्रक मला सापडले. त्याचा अर्थ सामान्यांना कळेल अशा भाषेत कुणी समजावून सांगितला तर बरे होईल. युरोमेरिकेतील चर्चेस विकत घेऊन त्यांचे मशिदींत रूपांतर करणे यासंबंधित ही एक बातमी इथे दिसली. हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गुरुग्राममध्ये दिसून आला आहे. पाच राज्यांतील निवडणुका सुरु असल्या तरी माध्यमांचा रोख मुख्यतः बंगालवरच आहे असे दिसते. तथापि, तेलंगणातील नागार्जुनसागर या उप निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मागच्या काही महिन्यांत हैदराबाद पालिकेत मिळवलेल्या अभूतपूर्ण यशाच्या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी तेरास आणि भाजपा यांच्यात चुरशीची लढत आहे. या निवडणुकीत सगळ्याच पक्षांत झालेल्या फाटाफुटीनंतर पक्षश्रेष्ठी आपापल्या पक्षातील नाराजांवर लक्ष ठेऊन आहेत याची ही एक मजेशीर बातमी. अगदीच अनपेक्षित नव्हते, पण सीबीएसईने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, बारावीच्या पुढे ढकलल्या. ... ताज्या घडामोडींचे दर महिन्याला पाच-सहा धागे निघत आहेत, पण त्यांत वाचनीय प्रतिसाद कमीच आहेत. या धाग्यापासून चांगले प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
69811 वाचन

💬 प्रतिसाद (266)

प्रतिक्रिया

ताज्या घडामोडींचे दर

नावातकायआहे
Wed, 04/14/2021 - 16:11 नवीन
ताज्या घडामोडींचे दर महिन्याला पाच-सहा धागे निघत आहेत, पण त्यांत वाचनीय प्रतिसाद कमीच आहेत. या धाग्यापासून चांगले प्रतिसाद मिळतील ही अपेक्षा. +१
  • Log in or register to post comments

सीबीएसई च्या दहावीच्या परीक्षा

चंद्रसूर्यकुमार
Wed, 04/14/2021 - 16:15 नवीन
सीबीएसई ने दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर अकरावीचे प्रवेश कोणत्या आधारावर होणार समजत नाही. हा निर्णय नक्कीच वादग्रस्त ठरणार असून त्याला कोर्टात आव्हान दिले जाईल/ दिले पाहिजे. दुसर्‍या बाजूने विचार केला तर कोरोनाचे आकडे इतके वाढलेले असताना यापेक्षा वेगळे काय करता येणार होते हे पण समजत नाही. अकरावी प्रवेशासाठी प्रत्येक ठिकाणी काही टॉपची कॉलेजेस असतात तिथे प्रवेश मिळवायला विद्यार्थी धडपडत असतात. मुंबईत रूपारेल असे एक कॉलेज आहे. दरवर्षी रूपारेलमधील कित्येक विद्यार्थी १२ वी नंतर आय.आय.टीत दिसतील. कलकत्त्याचे प्रेसिडेन्सी कॉलेज असेच. या ठिकाणी नक्की कोणत्या आधारावर प्रवेश देणार की लकी ड्रॉ काढून सर्वांना समान संधी असा समाजवाद आणणार हे समजत नाही. एकूणच आता विद्यार्थी असलेले चुकीच्या वेळेस जन्माला आले असे म्हणायला हवे. महाराष्ट्रात ११ वी चे प्रवेश तसेच बोंबलले. २०२१ ची एम.बी.ए साठीची सी.ई.टी परीक्षा अजून झालेली नाही. इंजिनिअरींगच्या सी.ई.टीचे काय होत आहे कोणास ठाऊक. अजून एक वर्ष असेच जाणार का? आणि हे बोलायला ठिक वाटते पण पुढच्या वर्षी एकदम दुप्पट विद्यार्थी झाले तर सगळ्यांना प्रवेश मिळेल का? जुन्या पध्दतीत ११ वी एस.एस.सी होती पण १९७६ मध्ये १० वी एस.एस.सी करण्यात आली. त्यामुळे १९७६ साली जुनिअर कॉलेजला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांची अशीच दुप्पट संख्या झाली होती असे मागे मनोगतवर वाचल्याचे आठवते. एकूणच सगळी परिस्थिती बिकट दिसते. यातून मार्ग कसा निघणार कोणास ठाऊक.
  • Log in or register to post comments

ही खरंच खूप जटील अन दूरगामी परिणाम करणारी समस्या आहे

तुषार काळभोर
Wed, 04/14/2021 - 16:40 नवीन
ही खरंच खूप जटील अन दूरगामी परिणाम करणारी समस्या आहे!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

इंजिनियरिंग सी ई टी बारावी

खेडूत
Wed, 04/14/2021 - 16:41 नवीन
इंजिनियरिंग सी ई टी बारावी परीक्षेनंतर होईल..साधारण जुलै मध्ये. पण जे ई ई ठरल्याप्रमाणे झाल्या आहेत आणि पुढील दोन्ही होतील असे वाटते. त्यांचं आयोजन पाहिलं. खूप शिस्तीत चालू आहे. मेडिकल पदव्युत्तर प्रवेश चाचणी या रविवारी 18 एप्रिल रोजी होत आहे. व्यवस्थेला कशाही स्वरूपात डॉक्टर्स हवे आहेत म्हणून ही परीक्षा लांबणार नाही. एकूणच नियोजन असेल तर परीक्षा घेणे अवघड नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

इतरही अडचणी

चंद्रसूर्यकुमार
Wed, 04/14/2021 - 16:57 नवीन
आयोजन व्यवस्थित होत असेल आणि तसे केले गेले तर चांगलेच होईल. पण जुलैत परीक्षा मग ऑगस्टमध्ये निकाल आणि त्यानंतर प्रवेश म्हणजे कॉलेज सुरू व्हायला ऑक्टोबर उजाडेल. त्यातही कॉलेज ऑनलाईन असेल ही शक्यताच जास्त. आय.टी वगैरे शाखांना ऑनलाईन-ऑफलाईन असले तरी फार फरक पडणार नाही. पण इतर अनेक शाखा अशा आहेत की त्यात ऑनलाईन कॉलेज कसे असेल याची कल्पना करवत नाही. इंजिनिअरींगमध्ये सीव्हीलच्या विद्यार्थ्यांना सर्व्हे करायला आलाच पाहिजे तो ऑनलाईन कसा करणार? मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांना वर्कशॉप पण असेच महत्वाचे. इलेक्ट्रीकल-इलेक्ट्रॉनिक्सच्या विद्यार्थ्यांना सर्कीट जोडणीसाठी आता काही सॉफ्टवेअर आली आहेत असे ऐकले आहे. अर्थात माझी माहिती ऐकिवच आहे. माझ्यासारखे विद्यार्थी कॉलेजात जाऊनही फार दिवे लावतात असे नाही पण अभ्यासू विद्यार्थ्यांसाठी अशा काही शाखांमध्ये कॉलेजात असणे सगळ्यात महत्वाचे असेल. एम.बी.ए कॉलेजांमध्ये क्लास पार्टीसिपेशन महत्वाचे असते आणि ग्रुप असाईनमेंट असतात. विद्यार्थी हे सगळे घरी बसून ऑनलाईन कसे करत असतील काय माहित. इंडिअन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेडच्या विद्यार्थ्यांना कार्गो जहाजे जा-ये करतात अशा कांडला वगैरे मोठ्या बंदराच्या तिथे घेऊन जातात आणि आठवडाभर बंदराचे काम कसे चालते हे त्यांना अभ्यासायचे असते. असे सगळे ऑनलाईन करता येणेच अशक्य. ऑनलाईन शिक्षणामुळे अशा काही अनुभवांना हे विद्यार्थी नक्कीच मुकत असतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

+1

मुक्त विहारि
Wed, 04/14/2021 - 20:58 नवीन
+1
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

एकूणच नियोजन असेल तर परीक्षा

श्रीगुरुजी
Wed, 04/14/2021 - 17:09 नवीन
एकूणच नियोजन असेल तर परीक्षा घेणे अवघड नाही. + १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: खेडूत

सहमत,शिक्षण क्षेत्राचे आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे.

Bhakti
Wed, 04/14/2021 - 16:58 नवीन
पण ऑनलाईन परीक्षेचा मार्ग सीबीएसईने याबाबत विचारच केला नाही.आणि महाराष्ट्र बोर्डही असेच पावले उचलण्याची शक्यता आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

सीबीएसई असल्यामुळे

Rajesh188
Wed, 04/14/2021 - 18:35 नवीन
ऑनलाईन परीक्षेचा मार्ग नाही निवडला तरी इथे कोणी कण्हत नाही. तेच राज्य सरकार नी केले असते तर बुध्दी तेजाचे अटॅक आले असते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

+१

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/14/2021 - 18:38 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

NIOS बोर्डाने ऑफलाईन

Bhakti
गुरुवार, 04/15/2021 - 13:55 नवीन
NIOS बोर्डाने ऑफलाईन परीक्षेसाठी २४,००० चे कीट विद्यार्थी घेऊ शकतात ज्यामध्ये त्यांचा कॅमेरा वैगरे आहे,असे माझ्या एका विद्यार्थ्याने सांगितले.याविषयी मी जालावर शोधले पण दुवा सापडला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

NIOS बोर्डाने ऑफलाईन

Bhakti
गुरुवार, 04/15/2021 - 13:57 नवीन
NIOS बोर्डाने ऑफलाईन परीक्षेसाठी २४,००० चे कीट विद्यार्थी घेऊ शकतात ज्यामध्ये त्यांचा कॅमेरा वैगरे आहे,असे माझ्या एका विद्यार्थ्याने सांगितले.याविषयी मी जालावर शोधले पण दुवा सापडला नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Bhakti

महाराष्ट्रात 11 वी चे प्रवेश झालेले नाहीत

Rajesh188
Wed, 04/14/2021 - 18:32 नवीन
हे नक्की खरे आहे का? जरा चेक करून घ्या. ऑनलाईन प्रवेश आणि ऑनलाईन लेक्चर ,परीक्षा सर्व चालू आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

सीबीएसई ची १२ वी ची परीक्षा

श्रीगुरुजी
Wed, 04/14/2021 - 17:05 नवीन
सीबीएसई ची १२ वी ची परीक्षा पुढे ढकलली आहे पण १० ची परीक्षा रद्द केली आहेअशी बातमी आहे. नक्की काय निर्णय झालाय?
  • Log in or register to post comments

निर्णय

वामन देशमुख
Wed, 04/14/2021 - 20:26 नवीन
नक्की काय निर्णय झालाय?
ही एक बातमी - यंदाच्या वर्षी CBSE च्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचं देखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलं आहे. त्यामुळे वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे. दरम्यान, दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका आणि ११वीच्या प्रवेशांचं काय? अशी चर्चा सुरू झाली असून त्यांच्या गुणपत्रिका ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरियानुसार तयार करण्यात येणार असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. आणि हे एक ट्विट -

Board Exams for Class 10th cancelled & 12th postponed. Results of Class 10th will be prepared on the basis of an objective criterion to be developed by the Board. Class 12th exams will be held later, the situation will be reviewed on 1st June by the Board: Ministry of Education pic.twitter.com/ljVuUkEChB

— ANI (@ANI) April 14, 2021
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

योगी आदित्यनाथ कोव्हिड पॉझिटिव्ह

चंद्रसूर्यकुमार
Wed, 04/14/2021 - 17:25 नवीन
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कोव्हिड पॉझिटिव्ह आले आहेत.
  • Log in or register to post comments

हे भाजपचे राऊत की आठवले हे

श्रीगुरुजी
Wed, 04/14/2021 - 19:41 नवीन
हे भाजपचे राऊत की आठवले हे मला ठरविता येत नाही. https://maharashtratimes.com/maharashtra/solapur/the-government-in-maharashtra-will-collapse-after-may-2-says-chandrakant-patil/articleshow/82066866.cms
  • Log in or register to post comments

+१

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/14/2021 - 19:47 नवीन
+१ राज्य भाजप चुकीच्या लोकांच्या हाताखाली गेल्याने अनेक भाजप समर्थक नाराज आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कोथरूडकरांनी कसला नमुना आमदार

श्रीगुरुजी
Wed, 04/14/2021 - 21:22 नवीन
कोथरूडकरांनी कसला नमुना आमदार निवडलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमरेंद्र बाहुबली

+१

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/14/2021 - 21:24 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

खरंय

सॅगी
Wed, 04/14/2021 - 21:43 नवीन
when you have to shoot, shoot!!! don't talk हे यांना कधी समजणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

कधी समजेल असं वाटत नाही.

श्रीगुरुजी
Wed, 04/14/2021 - 22:10 नवीन
कधी समजेल असं वाटत नाही. पात्रता नसताना उच्च पदावर बसविले की शोकांतिका होते. भाजपचा मताधार घटण्यामागे फडणवीसांचे चुकीचे निर्णय आणि चंपाचा आचरटपणा यांचा सिंहाचा वाटा आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सॅगी

+१

अमरेंद्र बाहुबली
Wed, 04/14/2021 - 23:21 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

शिवभोजन केंद्रे सुरू राहणारच, कारण...;

मुक्त विहारि
Wed, 04/14/2021 - 20:03 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/shiv-bhojan-former-mp-nilesh-rane-criticizes-cm-uddhav-thackeray-over-shiv-bhojan-centers/articleshow/82067260.cms एक रुपयात मिळणारी झुणकाभाकर आठवली...
  • Log in or register to post comments

पोलीस अधिकाऱ्याने घेतली वारणा नदीत उडी;

मुक्त विहारि
Wed, 04/14/2021 - 20:07 नवीन
https://www.loksatta.com/kolhapur-news/police-officer-attempt-to-suicide-api-kolhapur-police-bmh-90-2444538/ दिपाली चव्हाणच्या बाबतीत जशी अक्षम्य दिरंगाई झाली, तशी व्हायला नको...
  • Log in or register to post comments

चंपा चमेली,जाई जुई

Rajesh188
Wed, 04/14/2021 - 20:22 नवीन
राज्य संकटात असताना सरकार आज पडेल उद्या पडेल असल्या फालतू कमेंट करून फडणवीस आणि चंपा bjp चे बारा वाजवत आहेत. समर्थक सुद्धा आता ह्यांचे समर्थन करत नाहीत. एकदाचे सरकार पाडा आणि करा तुमचे समाधान. राज्य bjp म्हणजे राज्याला लागलेली वाळवी आहे.
  • Log in or register to post comments

नीती वान असती BJP

Rajesh188
Wed, 04/14/2021 - 20:25 नवीन
तर सरकार कधी पडेल ह्याची वाट बघत बसली नसती . आणि दर दोन दिवसांनी तारीख देत बसले नसते. आपल्या १०५ आमदारांना त्यांच्या मतदार संघात पाठवून आप आपल्या मतदार संघातील लोकांच्या अडचणी सोडवायला सांगितले असते. राज्य संकटात आहे आणि हे बेधुंद.
  • Log in or register to post comments

मागील दोन दिवसांपासून

रात्रीचे चांदणे
Wed, 04/14/2021 - 20:31 नवीन
मागील दोन दिवसांपासून बारामतीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. ही बाब समजताच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी बारामतीकरांसाठी तब्बल ४५० रेमडेसिवीर इंजेक्शन मोफत उपलब्ध करून दिले.
  • Log in or register to post comments

हॉटेलातील खाद्यपदार्थ बनवताना त्यात थुंकण्याचा अजून एक प्रकार गु

NiluMP
गुरुवार, 04/15/2021 - 00:41 नवीन
Just google London shit food case.....
  • Log in or register to post comments

कोवीड लसिकरण ...

सुक्या
गुरुवार, 04/15/2021 - 01:45 नवीन
केंद्र सरकारच्या टीका उत्सवात आता पर्यंत ११ कोटी लोकांचे लसिकरण झाले. लस उत्सव म्हणा किंवा काहीही ... लसिकरण होणे महत्वाचे आहे. अजुन काही दिवसात ह्या लोकांना दुसरा डोस द्यावा लागेल. बहुदा लसिकरणाचा नंबर वाढणार नाही परंतु संपुर्ण लसिकरण केलेले लोक वाढतील. त्याचा आरोग्य सेवेवर निस्चितच सकारात्मक परिणाम दिसुन येइल. यात महाराष्ट्र / राजस्तान / उत्तर प्रदेश या राज्यांनी १ कोटी लसिकरणाचा टप्पा पार केला त्याबद्दल ह्या राज्यांचे अभिनंदन. https://timesofindia.indiatimes.com/india/over-31-39-lakh-vaccine-doses-administered-on-fourth-day-of-tika-utsav/articleshow/82071085.cms जाता जाता: महारष्ट्रात अजुनही गोंधळ चालुच आहे. ३ किलो गहु २ किलो तांदुळ कुणाला मिळेल यावर अजुन ठोस निर्णय आला नाही. भुजबळ साहेब लगेच केंद्राच्या दिशेने कटोरा घेउन उभे आहेत. नंतर बहुदा केंद्राच्या नावाने शिमगा होइलच. लस साठा देण्यात केंद्र गैर भाजपा सरकारांच्या बाबतीत दुजाभाव करते अशी ओरड होत होती. आता १ कोटी लसिकरणाचा टप्पा पार केलेल्या राज्यात दोन गैर भाजापा सरकारे आहेत. मग ती ओरड का होती?
  • Log in or register to post comments

एक नेहमी लक्षात ठेवा

Rajesh188
गुरुवार, 04/15/2021 - 02:26 नवीन
केंद्र महाराष्ट्र समोर नेहमी कटोरा घेवून उभे असते.सर्वात जास्त टॅक्स ह्या राज्यातून जातो नाही तर पंतप्रधान ना मारुती ८०० मधून फिरावे लागेल तीच वापरायला परवडेल. महाराष्ट्र केंद्र समोर कटोरा घेवून जात नाही हक्काचे मागत असतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

+१

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/15/2021 - 11:47 नवीन
+१
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

धक्कादायक!

मुक्त विहारि
गुरुवार, 04/15/2021 - 08:39 नवीन
धक्कादायक! ऑक्सिजन-व्हेंटिलेटर बेडसाठी रुग्णाची २४ तासात अ‍ॅम्ब्युलन्समधून ४०० किमी वणवण! ----------- https://www.loksatta.com/maharashtra-news/patient-made-to-travel-400-km-in-ambulance-amid-shortage-of-oxygen-ventilator-beds-pmw-88-2444662/ -------- आता ही चुकी पण केंद्राचीच, असेही काही टक्केवाले म्हणणारच...
  • Log in or register to post comments

सुरत ला कशी स्थिती आहे

Rajesh188
गुरुवार, 04/15/2021 - 09:31 नवीन
गुजरात, चतुर प्रदेश मध्ये बेड खाली आहेत,ऑक्सिजन बेड एवढे आहेत की एकच बाधित दिवसातून चार पाच बेड वापरत आहे. काय करायचे एवढ्या सुविधेचा असा प्रश्न चतुर प्रदेश आणि गुजरात मध्ये भेडसावत आहे. एका बाधित साठी दहा dr chi सोय गुजरात आणि चतुर प्रदेश नी केली आहे. काय ती सुंदर व्यवस्था वर्णावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

हा हा हा. मदत केंद्राला जाब

अमरेंद्र बाहुबली
गुरुवार, 04/15/2021 - 11:48 नवीन
हा हा हा. मदत केंद्राला जाब राज्याला वाल्यांवर हसू येते फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

ठाण्यातील संतापजनक प्रकार.....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/15/2021 - 09:35 नवीन
कोरोनाबाधितांचे मृतदेह गुंडाळण्यासाठी कचऱ्याच्या पिशव्यांचा वापर.... "VIDEO | ठाण्यातील संतापजनक प्रकार, कोरोनाबाधितांचे मृतदेह गुंडाळण्यासाठी कचऱ्याच्या पिशव्यांचा वापर | Plastic Garbage Bags use for Pack COVID Deadbody" https://www-tv9marathi-com.cdn.ampproject.org/v/s/www.tv9marathi.com/maharashtra/thane/thane-municipal-jawahar-bagh-cemetery-use-plastic-garbage-bags-for-pack-covid-deadbody-437553.html/amp?amp_gsa=1&amp_js_v=a6&usqp=mq331AQFKAGwASA%3D#amp_tf=From%20%251%24s&aoh=16184589929076&csi=0&referrer=https%3A%2F%2Fwww.google.com&ampshare=https%3A%2F%2Fwww.tv9marathi.com%2Fmaharashtra%2Fthane%2Fthane-municipal-jawahar-bagh-cemetery-use-plastic-garbage-bags-for-pack-covid-deadbody-437553.html ----------------- आता ही पण चुकी केंद्राचीच, असेही काही टक्के जनता म्हणणारच....
  • Log in or register to post comments

ही केंद्राची चूक नाही

Rajesh188
गुरुवार, 04/15/2021 - 09:44 नवीन
केंद्र असल्या किरकोळ चुका करत नाही त्यांच्या साऱ्या घोड चुका असतात .गेली सात वर्ष देश त्यांच्या चुकांचीच फळ भोगत आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

कुठल्या चुका?

मुक्त विहारि
गुरुवार, 04/15/2021 - 12:31 नवीन
काही सांगू शकाल का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

या दोन्ही महोदयांना उत्तर देऊ

पिनाक
Fri, 04/16/2021 - 12:44 नवीन
या दोन्ही महोदयांना उत्तर देऊ नये ही नम्र विनंती. धाग्याचे पानिपत होते. त्यांना लिहायचे असले तर लिहू देत. चटकन अंगठा वापरून प्रतिसाद वर ढकलता येतो. बाकीच्यांनी प्रतिसाद दिला तर धागा वाहवत जातो. एक इंग्लिश म्हण सांगतो. बाकी तुम्ही सुज्ञ आहातच. Never wrestle with a pig. You just get dirty and the pig enjoys it.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

प्रचंड सहमत

चंद्रसूर्यकुमार
Fri, 04/16/2021 - 13:11 नवीन
प्रचंड सहमत. या दोनतीन सदस्यांचे ९९% प्रतिसाद दुर्लक्ष करण्यासारखे असतात. चुकून एखादा उत्तर देण्यासारखा दिसला तरच त्याला उत्तर द्यावे अन्यथा या मंडळींचे मिपावरील अस्तित्वच ध्यानात घेऊ नये. या सदस्यांना उगीच उत्तर देऊन विनाकारण धाग्याचा टी.आर.पी वाढवू नये- अशा प्रतिसादांमधून अर्थबोध कसलाही होत नाही आणि माहितीत भरही काही पडत नाही. हे आवाहन यापूर्वी मी दोनदा केले होते पण मुविकाकांसारखे ज्येष्ठ सदस्य परत परत असल्या सदस्यांच्या तोंडी लागतात. ते का हे मला तरी समजण्याच्या पलीकडचे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिनाक

चुकून एखादा उत्तर देण्यासारखा

शाम भागवत
Fri, 04/16/2021 - 14:23 नवीन
चुकून एखादा उत्तर देण्यासारखा दिसला
😲
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चंद्रसूर्यकुमार

धार्मिक गर्दीला आवर कधी ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुवार, 04/15/2021 - 09:58 नवीन
सर्वप्रथम एक लिहितो, कोणत्याही धर्माच्या सण उत्सव यात्रा, प्रार्थना आदिंमुळे होणार्‍या गर्दीला नियंत्रण करायलाच हवे, करोनाकाळात गर्दी होणा-या कोणत्याही प्रकारच्या गर्दीला आवरायला हवे. कालच्या एका धाग्यात एक मिपाकर म्हणाले, तसे फारच आवश्यक असेल तर प्रतिनिधी म्हणून चार-पाच लोकांना अशा गोष्टींना परवानगी द्यायला हरकत नाही. काल कुंभमेळ्यात नियम धुडकावून ला़खोंची शाहींचे स्नान झाले. सर्वप्रकारच्या नियमांना तिलांजली दिल्या गेली आणि लाखोंच्या संखेने भाविक आणि साधुंनी हरिद्वार येथे ’हर पौड’ घाटावर गंगास्नान केले. करोनाचा संसर्गाने बाधित काही भाविक सापडले हे लिहिलेच होते परंतु गंगामय्याचे आशिर्वाद घेऊन कुंभमेळ्यातील शाहीस्नानासाठी जावे. भाविकांची गंगामय्यावर श्रद्धा आहे, गंगामातेच्या कृपेमुळे करोनाचा फ़ैलाव होणार नाही, असा दावा मुख्यमंत्री तिरथसिंह रावत यांनी केला आहे. (बातमी) शिक्षणाने माणूस चांगलं वाईट असा विचार करु शकतो. श्रद्धेचा भाग सोडून द्या, पण जेव्हा किमान करोनाचा वाढता जागतिक धोका पाहता अशी विधाने करीत राहणे आणि ते ऐकत राहणे म्हणजे, आपल्याला अजूनही शिक्षणाची, समाजप्रबोधनाची किती गरज आहे हे दिसून येते. दुसरी गोष्ट, मुस्लीमांचा रमझान महिना सुरु झाल्यामुळे दक्षिण मुंबैतील काळाबादेवी जांजीकर स्ट्रीत येथील मशीद सुरु करण्यास आणि पन्नास जणांच्या उपस्थितीत दिवसातून पाचवेळा नमाज पठण करु देण्यास परवानगी देण्यात यावी अशा विनंती याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फ़ेटाळुन लावली. राजघटनेच्या अनुच्छेद २५ अन्वये सर्वांना आपापल्या धर्म आचरणाचा मूलभूत हक्क असला तरी सार्वजनिक आरोग्य बाजूला सारणे शक्य नाही तसेच धर्म आचरणापेक्षा नागरिकांचे आरोग्य व सुरक्षा महत्वाची आहे, असा शेरा मा. न्यायमुर्तींनी मारला आहे. (बातमी : आजचा छापील महाराष्ट्र टाइम) सध्याचा करोनाचा वाढता संसर्ग पाहता, सर्व प्रकारची गर्दीला आवरले पाहिजे. संसर्गाला थांबवण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न होत असतांना अशा गर्दीमुळे सर्वच यंत्रणेवर तान पडतो. संसर्ग वाढतो, मृत्यु वाढतात, तेव्हा कायद्याने गर्दीवर नियंत्रण आणून अशा सर्वच व्यक्तींवर-संस्थेवर मग ती कोणत्याही जाती-धर्माची असली तरी कडक कार्यवाही व्हायला हवी, असे माझे व्यक्तीगत मत आहे. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हरिद्वारहून परतलेल्या

सुबोध खरे
गुरुवार, 04/15/2021 - 10:02 नवीन
हरिद्वारहून परतलेल्या सज्जनांपासून दूर रहावे नाही तर परत आपल्याला (अस्थी) लोट्यातून हरिद्वारला न्यायची पाळी येईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अशा ठिकाणी, सांसर्गिक रोग वाढत असल्याने....

मुक्त विहारि
गुरुवार, 04/15/2021 - 10:09 नवीन
मी कधीच जाणार नाही ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुबोध खरे

शेवटचा परिच्छेद आवडला

मुक्त विहारि
गुरुवार, 04/15/2021 - 10:04 नवीन
धर्म घरात आणि कायद्याचे राज्य बाहेर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आंबेडकर जयंतीवर करोनाचं सावट, चैत्यभूमीवर शुकशुकाट

मुक्त विहारि
गुरुवार, 04/15/2021 - 11:38 नवीन
https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/130th-birth-anniversary-of-dr-babasaheb-ambedkar-celebrated-in-corona-pandemic/amp_videoshow/82063166.cms ------------ बौद्ध बांधवांनी अतिशय उत्तम केले... इतर धर्मियांनी हा आदर्श नक्कीच घ्यायला हवा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

सहमत

झेन
गुरुवार, 04/15/2021 - 10:47 नवीन
कडक कारवाई बेजबाबदारपणा दाखवणा-या प्रत्येकावर व्हावी. रावतांपासूनच सुरुवात करावी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सहमत आहे ...

सुक्या
गुरुवार, 04/15/2021 - 12:05 नवीन
संसर्ग वाढतो, मृत्यु वाढतात. त्यांमुळे असल्या गोष्टींवर नियंत्रण हवेच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कुंभ

अनिरुद्ध.वैद्य
गुरुवार, 04/15/2021 - 13:56 नवीन
आयोजीत करायला परवानगी देणे हे डोके खुंटीला टांगुन निर्णय घेणे होय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राध्यापक डॉक्टर बिरूटे

श्रीगुरुजी
गुरुवार, 04/15/2021 - 14:17 नवीन
प्राध्यापक डॉक्टर बिरूटे सरांशी पूर्ण सहमत. २१ तारखेला कृषी कायद्यांविरूद्ध आंदोलन करणारे दलाल दिल्लीत संसदेवर मोर्चा काढणार आहेत. या मोर्चावरही बंदी हवी.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5
  • 6
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा