✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

भोजन मंत्र अर्थ आणि व्याकरण

श
श्रीनिवास टिळक यांनी
Mon, 03/15/2021 - 20:33  ·  लेख
लेख
वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे / जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म // वरील भोजन मंत्रातील दोन ठिकाणी--(१) नाम घेता फुकाचे (२) जीवन करी जीवित्वा यांचा अर्थ नीट लागत नाही. कोणास माहित असेल तर कृपया तो स्पष्ट करावा. तसेच या मंत्रात असलेल्या क्रियापदांची--(घ्या, होते, घेता, करी, जाणिजे) व्याकरण दृष्ट्या फोड करून पाहिजे आहे. धन्यवाद
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4608 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

हा समर्थ रामदास स्वामी यांचा

खेडूत
Mon, 03/15/2021 - 21:56 नवीन
हा समर्थ रामदास स्वामी यांचा श्लोक आहे. पूर्वी कधीतरी यावर चर्चा झाली होती, त्याचा सारांश मीे साठवून ठेवला होता. (हे माझे विश्लेषण नसून त्या चर्चेत मिळालेले ज्ञानकण आहेत, त्यामुळे चू भू द्या घ्या.) वदनिं = वदनीं = तोंडात कवळ = घास घेतां = घेताना नाम घ्या श्रीहरीचें = नाम घ्या श्रीहरीचे अन्वय : वदनीं कवळ घेतां श्रीहरीचें नाम घ्या = तोंडात घास घेताना श्रीहरीचे नाव घ्या सहज हवन होतें नाम घेतां फुकाचें = फुकटचे नाम घेता सहज हवन होते. जिवन करि जिवित्वा (जिवन करी जिवित्वा .... जिवन जिवित्वा करी. जिवन = जल, पाणी. जिवित्व = प्राण, आयुष्य. जल प्राणाला, आयुष्याला निर्माण करते.) अन्न हें पूर्णब्रह्म = अन्न हे पूर्णब्रह्म (आहे) उदरभरण = पोट भरणे नोहें = नव्हे जाणिजें = जाणले जाते, कळून येते (कर्मणिप्रयोग) यज्ञकर्म = यज्ञकर्म अन्व्यय : उदरभरण नोहें जाणिजें यज्ञकर्म = (हे) पोट भरणे नव्हे, यज्ञकर्म (म्हणून) जाणले जाते. साधारण अर्थ: तोंडात घास घेताना श्रीहरीचे नाव घ्या. फुकटचे नाम घेता सहज (यज्ञा प्रमाणे) हवन होते. शरीराला पोषण देणारे अन्न हे पूर्णब्रह्म आहे. हे पोट भरणे नव्हे, तर हे यज्ञकर्म समजून ग्रहण करा.
  • Log in or register to post comments

भोजन मंत्र

श्रीनिवास टिळक
Tue, 03/16/2021 - 20:45 नवीन
धन्यवाद, खेडूतजी.
  • Log in or register to post comments

शोध यन्त्र मदतीस धावुन येते

वाचक
Wed, 03/17/2021 - 03:17 नवीन
हे सापडले, पुरेसे विवेचन आहे ह्यात, http://mr.upakram.org/node/3369
  • Log in or register to post comments

भोजन मंत्र चर्चा

श्रीनिवास टिळक
गुरुवार, 03/25/2021 - 04:36 नवीन
नमस्कार शोध यंत्र वापरून भोजन मंत्रावर मागे झालेली बरीच साधक बाधक चर्चा आपण काढून दिलीत त्याबद्दल "वाचक" जी आपले आभार.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा