मेणबत्तीला करा 'राम' 'राम' !

ताजे प्रेत's picture
ताजे प्रेत in काथ्याकूट
6 Nov 2020 - 4:41 pm
गाभा: 

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षी साजरा करूया मेणबत्ती विरहित ख्रिसमस. 

मधमाश्या नष्ट झाल्या कि चार वर्षात मानव नष्ट होईल अस म्हटलं कि लोक विचारतात कस बर... हे वाक्य आहे थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन याचं, ते सांगतात कि मधमाशी विविध प्रकारचा वनस्पतीचे परागीभवन करीत असतात, बरीच फळझाड, फुलझाड, भाजीपाला, धान्य पिके याचं परागीभवन फक्त मधमाश्याच करू शकतात. जर याचं प्रमाण कमी होत गेल तर आपल्या खाद्यातील अनेक घटक नष्ट होतील आणि मग वनस्पतीच्या अनेक प्रजाती नष्ट होऊन, अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होऊन भूकबळी वाढतील आणि मग अन्नही मिळणार नाही. 

आणी या मधमाशा कशाचे घर बनवतात ? मेणाचे - आणि मेणबत्ती कशाने बनते मेणापासून !

Dr. Humberto Boncristiani (honey bee husbandry applied researcher at the University of Florida Honey Bee Research and Extension Lab) म्हणतात  कि   एक साडेपाच इंच मेणबत्ती बनवण्यासाठी १३७.४८ मधमाशा चा बळी द्यावा लागतो . ख्रिसमसच्या दिवसात साधारण २३७ अब्ज मेणबत्त्या जगभर विकल्या जातात , तर किती मधमाशा मारल्या जात असतील! आणि यापासून तयार होणारा कार्बन डायऑक्साईड फटाक्यांच्या तुलनेत ५७. २२  पटीने जास्त असतो. फटाका ०.३  ग्रॅम तर मेणबत्ती १७.१६६ ग्रॅम.!

मेणबत्त्या अशा प्रकारे वाया घालवू नका, त्या वीज नसलेल्या छोट्या वाड्या वस्त्यांना दान करून त्यांची अंधारलेली घरे तेजोमय करण्यासाठी मदत करा. आजही जगात ४. ७ अब्ज  लोक रोज अंधारात रात्र काढतात. विनाकारण पेटवण्यात येणार्‍या एवढ्या मोठ्या प्रमाणातील मेणबत्त्या १३२ कोटी गरीब लोकांना वर्षभर उजेड देऊ शकेल.

चला तर मग मेणबत्ती रहित ख्रिसमस साजरा करण्यासाठी सर्वांना फॉरवर्ड करा.

प्रतिक्रिया

समीर वैद्य's picture

6 Nov 2020 - 8:37 pm | समीर वैद्य

स्तुत्य उपक्रम आहे हा....

योग्य वेळी आलेला योग्य लेख..
आजून बुद्धुजीवीयांनी दरवर्षीची दिवाळीआधीची टिवटिव चालू केलेली नाहीये.. आणि केली तरी त्याला आधी हा लेख दाखवून याबद्दल काय असा प्रश्न विचारू..

कंजूस's picture

6 Nov 2020 - 8:56 pm | कंजूस

क्रिसमस, दिवाळी, धर्म बाजूला ठेवून फक्त 'मेण' यावर विचार करा.
मेणबत्तीचे मेण १९१९ मध्ये किंवा अगोदर कोणते होते आणि आता २०२० मध्ये कोणते आहे. म्हणजे ते कुठून मिळते.

लेख वाटसपवरून मिळाला आहे का?

---------------------------
'Wax' search करून प हा.

निनाद's picture

11 Nov 2020 - 6:11 am | निनाद

हा विचार 'मेणचट' असावा असे वाटते.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Nov 2020 - 9:18 pm | प्रकाश घाटपांडे

मौजमजा या सदरात घ्यायचा आहे कि उपहास म्हणून? यावर बरच काही अवलंबून आहे. तुलना दिवाळीच्या फटाक्यांच्या वायु व ध्वनीप्रदूषणाशी असेल तर तारतम्य बाळगणारे वाचक आहेत. कंजूस म्हणतात मेणबत्तीचे मेण १९१९ मध्ये किंवा अगोदर कोणते होते आणि आता २०२० मध्ये कोणते आहे. म्हणजे ते कुठून मिळते. या बद्दलही लिहा.

चौथा कोनाडा's picture

6 Nov 2020 - 10:08 pm | चौथा कोनाडा

सध्याच्या काळात बहुतेक मेणबत्त्या पॅराफिन मेणापासून बनविल्या जातात आणि पॅराफिन मेण हे पेट्रोलियम रिफायनिंगचे एक उत्पादन असे विकिकोश सांगतो.

https://en.wikipedia.org/wiki/Candle#:~:text=Today%2C%20most%20candles%2...).

सदर मेणबत्त्यांच्या खपावर संकट आलं तर उत्पादन ते विक्री या साखळीचा उद्योग संकटात तर येणार नाही ना ?

आपण ही माहिती कुठुन काढता ? तुम्ही वापरता तो विकीपेडीया कुठल्या शतकातला आहे ?

प्रत्येक मेणबत्ती पेटवल्यानंतर मला आता १३७.४८ मधमाश्यांची 'ताजी प्रेतं ' दिसतील.

आता पुढचे शांतता नोबेल प्राइझ तुम्हालाच ! योग्य वेळी नामांकनासाठी आपली माहिती मागविण्यात येईल. पी एम ओ मधुन कधीही फोन येईल. तयार रहा.
लोकांना ही महत्वाची माहिती देऊन करोडो मधमाश्यांचे प्राण वाचवलेत तुम्ही.

शिरसाष्टांग नमस्कार !

चौथा कोनाडा's picture

9 Nov 2020 - 7:56 pm | चौथा कोनाडा

ताजे प्रेत यांना अपसव्य करुन नमस्कार !
....... ..... १३७.४८ मधमाश्यांची 'ताजी प्रेतं ' दिसतील.
.... .. करोडो मधमाश्यांचे प्राण वाचवलेत तुम्ही.

Olectra12456

सामान्यनागरिक _/\_

निनाद's picture

11 Nov 2020 - 6:10 am | निनाद

आता पुढचे शांतता नोबेल प्राइझ तुम्हालाच !
असे का? हे तर प्रेत आहेत. आणि प्रेताला का नोबेल प्राइझ?

माझा विरोध आहे या प्रकाराला. उद्या तुम्ही मधमाश्यांना नोबेल प्राइझ द्याल. असे नाही चालणार. त्या माश्यांची नावे तरी माहित आहेत का?

साहना's picture

6 Nov 2020 - 11:09 pm | साहना

अतिशय स्तुत्य उपक्रम !

त्याशिवाय झाडे पृथ्वीची फुफ्फुसे असल्याने झाडाच्या फांद्या सुद्धा घरांत आणू नये. ख्रिस्तमस ट्री आपल्या मनात वाढवावी आणि येशूचा पवित्र प्रेमाचा संदेश आपल्या मनात वाढू द्यावा.

त्याशिवाय ह्या कठीण परिस्थितींत चंगळवाद वाढू नये ह्यासाठी दुकानावर संता बाबाची चित्रे लावून माल खपवण्याचे निंद्यनीय प्रकार करू नयेत. गरीब माणूस ईश्वराला जास्त प्रिय असतो असे पपू पोप साहेबांनी म्हटले आहे.

निनाद's picture

10 Nov 2020 - 11:34 am | निनाद

शिवाय झाडे पृथ्वीची फुफ्फुसे असल्याने झाडाच्या फांद्या सुद्धा घरांत आणू नये. मग कडूलिंबाचे दातून पण बंद करा!

आणि पर्यावरण प्रती तुमची तळमळ स्तुत्य आहे.

युरोपात जेंव्हा मेणबत्त्या वापरल्या जायच्या त्यापेक्षाही कितीतरी अगोदरपासून भारतात तेलाचे तुपाचे दिवे वापरले जात होते.
युरोपीयन आल्यानंरही इथे अत्यल्प समाज सोडता बहुतेक समाज तेलाचे दिवेच वापरत राहिला.
आजही आपण मेणबत्त्या क्वचितच वापरतो. आज वापरल्या जातात त्या मेणबत्त्या पेट्रॉलियम पासून बनवतात. मधमाशाम्पासून बनवलेले मेण असे जाळण्यासाठी वापरले जात असेल असे वाटत नाही.
किती कारखान्यात मधमाशांच्या पोळ्यातले मेण वापरले जाते याचा विदा आहे का काही?

नाव घेतलंय ताजे प्रेत आणि उकरतायत जुनी मढी?

देशात होणाऱ्या वायू प्रदूषणात दिवाळी मध्ये होणाऱ्या आतषबाजी मधून किती वायू प्रदूषण होते आणि ते सर्व प्रदूषणाच्या किती टक्के आहे.
मग दिवाळी मध्ये फटकडे वाजवणे म्हणजे खूप मोठा गंभीर गुन्हा आहे असा प्रचार का केला जातो.

निनाद's picture

11 Nov 2020 - 6:07 am | निनाद

असा प्रदूषण प्रचार का केला जातो?

उपयोजक's picture

7 Nov 2020 - 12:21 pm | उपयोजक

:))))

यापुढे मेणबत्त्या पेटवणे बंद!!! ;)

निनाद's picture

11 Nov 2020 - 6:08 am | निनाद

यापुढे पेटवणे बंद - असे ठेवा!

महासंग्राम's picture

7 Nov 2020 - 4:36 pm | महासंग्राम

ख्रिसमस ला मेणबत्त्या लावायच्या तर लावा अंटार्क्टिका चा बर्फ वितळला तर तुम्ही जबाबदार :)

निनाद's picture

11 Nov 2020 - 6:13 am | निनाद

बर्फात मेणबत्त्या लावताच कशाला पण?

डॅनी ओशन's picture

7 Nov 2020 - 5:28 pm | डॅनी ओशन

क्या रे ताजे प्रेत. प्रेत होके भी इतना चोटा सोचता हय। थिंक बिग माय बुआय ।

ये मेणबत्ती शेणबत्ती सब चोटा प्लेया हय। बडा प्लेया तो तुमजाईसा प्रेत लोग हय। सब प्रेत लोग को तुमजाईसा ताजा प्रेत रायनेको सिकाओ, तो सोचो, कॉफीन माफिक, और वो पायर का माफिक किटना लकडी वेस्ट होता हय । वो बीलोग भी ट्रीजपे रहता हय । तो टूम प्रेतको ईजिप्शियन लोग माफिक ताजा रख सखता हाय, सॅण्डसे पिरॅमिड बनाके ऊनसाबको अंडर ठुस सकता हय, तो सोचो किटना एयर, किटना ट्री अँड किटना बीलोग को तुम बचा सकता हय।

ये नाही जमता तो वो पारसी फोल्क जैसा वेल मे डंप करनेका सोच सकता हय । इतना बडा उपाय होने माफिक तुम ये कँडल शॅंडल खेलता हय, व्हेरी बॅड। तुमजाईसे झंटलमन प्रेत से ये एक्सपेकटेशन नाही थी।

निनाद's picture

10 Nov 2020 - 11:32 am | निनाद

अतिशय वाईट लिखाण आहे हे.
लोकांच्या पवित्र भावनांशी असे खेळणे योग्य नाही.
तुम्ही एकदा करार वाचा तुम्हाला पण कळेल खरा मार्ग कोकणात आहे ते.

ख्रिसमसच्या दिवसात का? लाईट गेल्यावर आम्ही लावतो. तुम्ही नका लाउ .
पण फटाके जाळून काय होते ते प्रदुषण असते. त्यातून कुठे उजेड कसा पडतो?

राघव's picture

10 Nov 2020 - 12:14 pm | राघव

सणासुदीच्याच वेळेस हे असे धागे काढायचे प्रयोजन काय? अंतःस्थ हेतू उघड आहे.
इतर दिवशी ज्या मेणबत्त्या जाळल्या जातात त्यामुळे काय मधमाशा कमी होणार नाहीत अन् आणि पर्यावरणाचा र्‍हास होणार नाही??

निनाद's picture

11 Nov 2020 - 6:06 am | निनाद

या स्पर्धांचे परिक्षक आपणच होतात. आणि त्या ऑनलाईन परिक्षणातून आज हे निकाल आपल्या हाती आले आहेत.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Nov 2020 - 2:31 pm | राजेंद्र मेहेंदळे

दिवाळीला फटाके उडवु नका, ख्रिसमसला मेणबत्त्या जाळु नका, ईदला बकरे कापु नका, होळिला *******
आता श्वास घ्यावा की नाहि हे विचारायला पण कायप्पा नाहितर मिपावर यावे लागणार बहुतेक.

निनाद's picture

11 Nov 2020 - 6:12 am | निनाद

प्रश्न जरा अस्थाई आहे असे वाटते. श्वास घ्यावा की नाहि याचे प्रेताला काय पडले आहे?

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Nov 2020 - 12:11 pm | राजेंद्र मेहेंदळे

भारीच विनोदी बुवा तुम्ही
बादवे अस्थाई नही अस्थायी म्हणजे अयोग्य स्थानी

चौथा कोनाडा's picture

11 Nov 2020 - 1:21 pm | चौथा कोनाडा

सालं, मेणाच्या पुतळ्यांच्या संग्रहालयावर देखील बंदी घातली पाहिजे. ती मादाम तुसाँ जगभर मेण वाया घालवत सुट्लीय !
लोकांना मधमाश्यांच्या जीवाचं काहीच घेणं राहिलेलं नाही !

मा. आदित्य ठाकरे, वाचताय ना ?

सॅगी's picture

11 Nov 2020 - 1:41 pm | सॅगी

जेसीबी घेऊन जाऊ मादाम तुसाँ संग्रहालयावर...."उखाड देंगे!!!"

चौथा कोनाडा's picture

12 Nov 2020 - 11:09 pm | चौथा कोनाडा

HNBDH2234

सागर गुरव

बबन ताम्बे's picture

12 Nov 2020 - 9:49 am | बबन ताम्बे

फर्निचरवाले लाकडात खड्डा दिसू नये म्हणून मेण भरतात आणि त्याच्यावर पॉलिश मारतात. किती मधमाशा मरत असतील काय माहीत. 3.456 एका सोफ्यामागे किंवा एका डायनिंगटेबल मागे?

निनाद's picture

12 Nov 2020 - 9:59 am | निनाद

नेलपॉलिशवर बंदी घाला.