✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

माझे गाणे - 'ये ना तू सख्या' ...

ग — गणेशा, Sat, 09/05/2020 - 13:14
या गाण्याला तसे खुप वर्ष झालीत. तसे पाहिले तर हे माझे पहिलेच गाणे आणि शेवटचे ही :-). 'Maroon color' या आठवणीतल्या लेखामुळे आणि ऑडिओ फाइल्स येथे देता येऊ लागल्याने पुन्हा हे गाणे देतोय.
तो काळ तसा वेगळा होता २००७-२०१०. हे गाणे खरे तर ब्रेल लिपीतील पुस्तकातील मी लिहिलेली एक कविता होती.. जे आम्ही भेट दिले होते आळंदी येथील अंध शाळेसाठी. परंतु तेथील मुलांच्या मागणीमुळे निवडक १० कविता आम्ही गाण्यांच्या ऑडिओ रुपात आणली. त्यातलेच हे गाणे. तसे माझा सामजिक वावर तेंव्हा होता, परंतु संगित -कला क्षेत्रात अश्या जास्त ओळखी नव्हत्याच मुळी. आणि नंतर ही मला त्या सर्वांबरोबर कायम संबंध ठेवता आला नाही.. डॉ.राहुल देशपांडे यांच्यामुळे हे एकुलते एक माझे गाणे ऑडिओ रुपात आले. नंतर संगित क्षेत्राशी संबंध आला नाही, आणि मी ही माझा सहभाग पुर्ण बंद केलाच. त्याला अनेक कारणे आहेत :-) या कवितेतील मुळ शब्द नंतर थोडे बदलले होते.. म्हणजे रंग आणि घनपदार्थ यांचे उच्चार आणि वर्णने यामधुन बदलली आहेत.. कारण अंध मुलांना रंगाबद्दल सांगणे लागु नये म्हणुन. एकुलते एक गाणे आहे म्हणुन गाणे कायम जपुन ठेवले. - शब्दमेघ

प्रतिक्रिया द्या
14089 वाचन

💬 प्रतिसाद (18)

चिंब चिंब गाणे.. मस्तच

Bhakti
Sat, 09/05/2020 - 14:18 नवीन
संगीत आणि आवाज अप्रतिम , खुप खुप सुंदर शब्दांनी सजलेले चिंब पावसाळी गाणं आहे.मस्तच आहे रे!
  • Log in or register to post comments

सुरेख पावसाळी गीत

चांदणे संदीप
Sat, 09/05/2020 - 16:28 नवीन
झाडांच्या पानात, वेलींच्या फुलात पाऊस दाटून आला रिमझीम सरींत, भिजल्या मातीत आठव देऊन गेला वार्‍याचा पदर, नदीची चादर चिंबड करीत आला ओंजळ भरूनी, मेघात न्हाऊनी ओटीत घालूनी गेला बरसली ती, झिरपली ती मल्हार वेल्हाळ आला थेंबाची आरती, पानांची पालखी आंदण देऊन गेला झाडांच्या पानात, वेलींच्या फुलात... भिजल्या मनात, सजल्या रानात केशर शिंपीत आला झाडांची झावळी, स्पर्शाने सोवळी ओलेती करून गेला स्वप्नांच्या चाहूली, मिठीची सावली वसंत शिंपत आला कशाला आवरू, मनाला सावरू माझ्यात गुंतून गेला झाडांच्या पानात, वेलींच्या फुलात... झाडांच्या पानात, वेलींच्या फुलात पाऊस दाटून आला रिमझीम सरींत, भिजल्या मातीत आठव देऊन गेला वा! निव्वळ अप्रतिम! सुरेख गाणे झाले आहे. फ्रेश म्युजिक, तितकाच सुंदर आणि फ्रेश आवाज. गाणे ऐकत असताना बाहेर ओसरीवर जणू पावसाने झिम्मड लावलीय असा भास झाला. अजून अशीच गाणी लिहिली पाहिजे भाऊ. नाहीतर चारशे चाळीस करंट माझा, चिमणी उडाली भुर्र, हळूच दांडा धर ह्याचा मार्केटमध्ये खच पडलेला आहेच. सं - दी - प
  • Log in or register to post comments

+11

प्राची अश्विनी
Mon, 09/07/2020 - 16:37 नवीन
+11
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चांदणे संदीप

+९९९९१११९९९९९

मिसळलेला काव्यप्रेमी
Fri, 09/25/2020 - 01:59 नवीन
+९९९९१११९९९९९
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

सुरेख गाणं...

सतिश गावडे
Sat, 09/05/2020 - 16:57 नवीन
सुरेख गाणं लिहीलं आहे गणेशा. संगीत आणि स्वरही तितकाच चांगला आहे.
  • Log in or register to post comments

जियो

अनन्त्_यात्री
Sat, 09/05/2020 - 20:09 नवीन
गणेशा!
  • Log in or register to post comments

भारीच !

संजय क्षीरसागर
Sat, 09/05/2020 - 20:17 नवीन
संगीत ही फार मोलाची देणगी आहे. गाणं छान झालं आहे. पुन्हा सुरु करा, तुम्हाला नक्की मजा येईल.
  • Log in or register to post comments

हायला हा आणखी एक तुमचा दडवून

प्रमोद देर्देकर
Sat, 09/05/2020 - 20:45 नवीन
हायला हा आणखी एक तुमचा दडवून ठेवलेला पैलू नजरेत आला. लिहा अजून. आणि गाण्याला संगीत कोणी दिले तसेच कोण गातंय ते सांगा की.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.. दडवून ठेवलेला पैलू

गणेशा
Sat, 09/05/2020 - 22:24 नवीन
धन्यवाद.. दडवून ठेवलेला पैलू वगैरे नाही हो, असेच तेंव्हा झाले गाणे. नंतर मात्र हे field आणि आमचे रस्ते काही एकत्र आले नाहीत. गायिका: स्वप्नजा लेले. संगितकार: सत्यजीत केळकर.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रमोद देर्देकर

मस्त..

गोंधळी
Sat, 09/05/2020 - 21:13 नवीन
गाणं अप्रतिम आहे. ऐकताना छान वाटलं.
  • Log in or register to post comments

संदीप, भक्ती, प्रमोद जी, संजय

गणेशा
Sat, 09/05/2020 - 22:30 नवीन
संदीप, भक्ती, प्रमोद जी, संजय जी, गोंधळी, सगा, अनंत यात्री धन्यवाद. मनापासुन..
  • Log in or register to post comments

आहा! लूपमध्ये ऐकतेय...

प्राची अश्विनी
Mon, 09/07/2020 - 16:38 नवीन
आहा! लूपमध्ये ऐकतेय... खूपच गोड.
  • Log in or register to post comments

छान!

राघव
Mon, 09/07/2020 - 20:36 नवीन
आवडलंय! शब्द, संगीत आणि आवाज.. सगळंच! :-)
या कवितेतील मुळ शब्द नंतर थोडे बदलले होते.. म्हणजे रंग आणि घनपदार्थ यांचे उच्चार आणि वर्णने यामधुन बदलली आहेत.. कारण अंध मुलांना रंगाबद्दल सांगणे लागु नये म्हणुन.
ह्यासाठी खास _/\_
  • Log in or register to post comments

छान!

राघव
Mon, 09/07/2020 - 20:36 नवीन
  • Log in or register to post comments

मधुघट मागतो...

बबु
Mon, 09/07/2020 - 22:45 नवीन
गणेशा, कविची प्रतिभा नित्य, निरन्तर आणि चिरन्तन असते. लिहिते रहा.
  • Log in or register to post comments

अप्रतिम झालं आहे गाणं! शब्द,

रातराणी
Tue, 09/08/2020 - 11:22 नवीन
अप्रतिम झालं आहे गाणं! शब्द, संगीत, आवाज सगळं जुळून आलंय!
  • Log in or register to post comments

https://youtu.be/K6b3C26N8zc

Bhakti
Fri, 09/18/2020 - 23:24 नवीन
https://youtu.be/K6b3C26N8zc हे नवीन गाणं आहे पावसाळी.. मस्तय ऐका सगळ्यांनी :)
  • Log in or register to post comments

सुंदर संगीत असलेले सुंदर गाणे

मदनबाण
Fri, 09/18/2020 - 23:47 नवीन
सुंदर संगीत असलेले सुंदर गाणे ! या कवितेतील मुळ शब्द नंतर थोडे बदलले होते.. म्हणजे रंग आणि घनपदार्थ यांचे उच्चार आणि वर्णने यामधुन बदलली आहेत.. कारण अंध मुलांना रंगाबद्दल सांगणे लागु नये म्हणुन. वाह्ह... :)

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- बन जा तू मेरी रानी तेनु महल दवा दूंगा बन मेरी महबूबा मैं तेनु ताज पवा दूंगा... :- तुम्हारी सुलू
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा