✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

Soap Opera

स — संदीप-लेले, Sun, 08/30/2020 - 20:42
जमेल तसे जास्तीत जास्त स्वत:ला विकायला शीक दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक सगळ्या मालिका सारख्या त्यात दळली फक्त कणी पाझरती सा-या वाहिन्या जसे गटारातील पाणी निर्बुद्धपणा कळसाला सारे कैकयीचे वंशज कमरेचे अजून कमरेला तेही सुटेल लवकरच रोज त्याच घाणीमध्ये डुकरासारखं लोळायला शीक दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक पेराल तेच उगवते पहाल तेच निपजते तणासारखे वाढते TRP वर फोफावते पडद्यावर जे दिसेल ते सुख देवो मनाला अभिरुची सोडून दे डोकं बांध गुडघ्याला भरलं ताट टाकून कच-यावर पोट भरायला शीक दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक पुरुषांना साड्या नेसवून पाचकळ विनोद करूया पडद्यामागून जोरदार 'चला हशा येऊ द्या' आपल्याच मालिकांना आपणच बक्षीस देऊया अतीसुमार कलेवराला खांद्यावर वाहून नेऊया रोज रोज जगण्यासाठी रोज रोज मरायला शीक दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक ... संदीप लेले

प्रतिक्रिया द्या
2399 वाचन

💬 प्रतिसाद (4)

१००% सहमत

रंगीला रतन
Wed, 04/28/2021 - 15:47 नवीन
कवितेतल्या भावनांशी १००% सहमत पण भरलं ताट टाकून कच-यावर पोट भरायला शीक दळभद्री असल्या तरी मालिका तू पहायला शीक ह्या काय आपल्याला जमायचा नाय! नाय म्हंजे नायच! :)
  • Log in or register to post comments

खणखणीत

गॉडजिला
Wed, 04/28/2021 - 15:53 नवीन
... क्या बात!
  • Log in or register to post comments

झक्कास.

चित्रगुप्त
Fri, 04/30/2021 - 04:09 नवीन
झकास कविता.
  • Log in or register to post comments

मर्मभेदी सुगम काव्य..

तुषार काळभोर
Fri, 04/30/2021 - 21:59 नवीन
भावनांशी सहमत. आता ott पर्याय उपलब्ध असूनही हिंदी मराठी मालिकावाले सुधरत नाहीत, हे दुर्दैव. अवांतर : याहून जास्त डोक्यात जाणारा प्रकार म्हणजे सर्व प्रकारच्या माध्यमात दिसणारी अन् कानावर पडणारी मराठी भाषा. इंद्रायणी तांदळाच्या भातावर मटणाचा रस्सा (किंवा वरण अन् तुपाची धार फॉर दॅट मॅटर) ओतून ओरपताना प्रत्येक घासाला तीन खडे लागावेत असे वाटते.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा