चुकलेली वारी..

Primary tabs

मी-दिपाली's picture
मी-दिपाली in जे न देखे रवी...
23 Jun 2020 - 4:09 pm

आषाढ महिना लागला की आठवतात काळे मेघ ; त्या मेघांनाच दूत बनवणारे महाकवि कालिदास आणि मग वेध लागतात आषाढी एकादशीचे ,टाळ मृदंगाच्या जयघोषाचे ,विठ्ठलाच्या नामाचे, पंढरीच्या वारीचे.
वारी म्हणजे तीनशेहून अधिक वर्षे जपलेला महाराष्ट्राच्या भागवत संप्रदायाचा सांस्कृतिक वारसा ,वारी म्हणजे नेम ,अट्टाहासाने घेतलेले आत्मक्लेषाचे व्रत ,त्यातील भक्तिरसाच्या सुखाची अनुभूति , समर्पणातील आत्मानंद .
या वर्षी कोरोनाच्या सावटामुळे 'मनाचिये द्वारी यंदाची ही वारी ' असे म्हणण्याची वेळ वारकऱ्यांवर आली आहे. प्रत्यक्ष पंढरपूरी जाऊन विठुरायाचे दर्शन घेता येणार नसल्यामुळे जीवाची तगमग होते आहे....

.

कविता

प्रतिक्रिया

प्राची अश्विनी's picture

23 Jun 2020 - 4:49 pm | प्राची अश्विनी

सुरेख.

प्रशांत's picture

23 Jun 2020 - 5:19 pm | प्रशांत

+१

मूकवाचक's picture

23 Jun 2020 - 5:00 pm | मूकवाचक

प्रासादिक काव्य.

(शेवटी स्वामी म्हणे, नामा म्हणे अशा स्वरूपाचा उल्लेख नसेल तर चुकल्यासारखे वाटते)

ज्ञानोबाचे पैजार's picture

23 Jun 2020 - 5:06 pm | ज्ञानोबाचे पैजार

याचे फार वाईट वाटते आहे
पैजारबुवा,

प्रशांत's picture

23 Jun 2020 - 5:21 pm | प्रशांत

या वर्षी पुणे - पंढरपुर - पुणे सायकल वारी करायचा विचार होता.

खिलजि's picture

23 Jun 2020 - 6:04 pm | खिलजि

एक नमुना पेश व्हावा

म्हणुनी परतुनी आलो

आज चिंब त्या कडांचा

एक , फक्त एक थेम्ब साठवुनी गेलो

तू विठू आम्हा सावळा

कुणा वाटे तु रे काळा

पुरवितसे अखंड तू

भक्ती चैतन्याच्या झळा

आज जाहलो मी म्लान

आले कोरोनाचे थैमान

ये धावुनी तू त्वरा

भक्त दर्शना पाठमोरा

गणेशा's picture

23 Jun 2020 - 6:11 pm | गणेशा

अप्रतिम

गोंधळी's picture

23 Jun 2020 - 6:26 pm | गोंधळी

विठ्ठ्ल..विठ्ठ्ल..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2020 - 6:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रूप मनोहारी
लावी वेड भारी
मन जाई वारी
रंगोनिया!!!

अहाहा ! इथे पैकीच्या पैकी गुण दिले आहेत. लिहिते राहा.

-दिलीप बिरुटे

रातराणी's picture

23 Jun 2020 - 9:41 pm | रातराणी

अप्रतिम!!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

23 Jun 2020 - 11:48 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अतिशय प्रासदिक आणि प्रवाही लिखाण!

सत्यजित...'s picture

24 Jun 2020 - 12:20 am | सत्यजित...

विठुदर्शनाची आस,त्यासाठी होणारी तगमगही सुरेख मांडली आहे!
सावळ्याची प्रतिमाही काहिसा दिलासा देवून गेली.
शिवाय सुरुवातीस लिहिलेली भूमिका मला विशेष उल्लेखनीय वाटते.
अभिनंदन!

प्रचेतस's picture

24 Jun 2020 - 6:29 am | प्रचेतस

अप्रतिम

चांदणे संदीप's picture

24 Jun 2020 - 3:46 pm | चांदणे संदीप

मनाचिये द्वारी यंदाची ही वारी

आलिया भोगासी असावे सादर l देवावरी भार घालूनिया ll

उत्तम रचना! चित्र आणि त्यावरचे सुलेखनही सुरेख!

सं - दी - प

सही रे सई's picture

24 Jun 2020 - 8:43 pm | सही रे सई

सुन्दर

फास्टरफेणे's picture

24 Jun 2020 - 10:20 pm | फास्टरफेणे

काय हे पडळकर साहेब ! शिवसेनेने पवारांचं "हाफिज सईद" असं "सौम्य" नामकरण केलेलं असताना तुम्ही त्यांना थेट "कोरोना" संबोधता !!! किती जहाल विचार आहेत तुमचे !

किसन शिंदे's picture

1 Jul 2020 - 10:33 am | किसन शिंदे

सुरेख लिहीलंय!