लेपाक्षी -हम्पी व परत ... भाग चौथा

Primary tabs

चौकटराजा's picture
चौकटराजा in भटकंती
28 Apr 2020 - 5:26 pm

भाग 1

भाग 2

भाग 3
भाग 3 वरून पुढे

सकाळी उठलो. आज तुन्गभद्रेच्या पलिकडे नावेने जायचे व स्कूटर भाड्याने घेऊन विरूपापुरागड्डी बेटाला भेट द्यायची ,सानापूर तलाव, जुना हम्प्पी व्हायडक्ट सारखा ब्रीज करीत ,हनुमान हळ्ळी , पम्पा सरोवर व अन्जनेय पर्वत असा भरगच्च बेत मनात आखला होता. नाश्ट्याला पुरी भाजी चा आस्वाद घेऊन मी १३ वर्शापूर्वी जिथे राहिले होतो त्या " अर्चना गेस्ट " हाउस च्या आन्टीना भेट दिली. त्यांची मुले मोठी होऊन मुलानीच आता गेस्ट हाउस वाढवले आहे. आता " फोरेनरचे होस्ट " हा त्यांचा मुख्य व्यवसाय झाला आहे. मुलाशी बोलताना त्याने लांबलेल्या पावसामुळे बरीच बुकिंग रद्द झाल्याचे संगितले व नदीला अजूनही जरा जास्तच पाणी असल्याने पलिकडे हिप्पी आयलण्ड ला नेणारी नाव बंद आहे अशी सुवार्ता दिली. आता आजच्या दिवसाच्या प्लानचा तर फज्जा उडाला होता. मग रॉयल एनक्लेव्ह ओळखल्या जाणाऱ्या भागाचा दौरा करायचा म्हणून साडे आठशे रूपयात रिक्षा ठरवली. पहिला पडाव श्रीक्रुष्ण मंदिर .
.

,

.

.

.

.

श्रीक्रूष्ण मन्दीर,हम्पी

.

श्री कृष्ण मंदिराच्या प्रवेश्द्वारातील एक पॅनेल " प्रत्येक गोलात दशावतारातील एक"

.

.

.

श्री कृष्ण मंदिराच्या समोरील भाजी मार्केट ( त्यावेळचे ) . मधील एक कॉरिडॉर
,

हम्पी परिसरात उदंड सापडणारा प्राणी -खार -

श्रीक्रुष्ण मंदिराच्या शेजारीच हंपीची वेस आहे आपण हंपीत आलो याची खूण म्हणा हे द्वार आहे . यातूनच हंपीत प्रवेश घेण्यासाठी सर्व वाहने आत जातात. आता सरकारने हेमकूट टेकडीचा परिसर भिंतींचे कुंपण टाकून बंद केला आहे . कृष्ण मंदिराच्या मुख्य गोपुराचे दुरुस्ती व पुनर्ररचना काम चालू असल्याने त्या सेंटरिंगमुळे त्या गोपुराचा आनंद घेता येत नाही. पण द्वारावर भिंतीला काही शिल्पकाम आहे त्यात दशावताचा भाग आहे. आत हिरवे गार पोपट इकडून तिकडे उडताना दिसले. मंदिराच्या समोर खडड्यात मोठे पटांगण आहे . त्याचा दोन्ही बाजूने कॉरिडॉर आहेत .त्यावेळेचे ते भाजी मार्केट आहे. तिथे एका भित्री भागबाई खारीचा फोटो झूम असल्याने जमला.
.

उग्र नृसिंह मन्दिराचे प्रवेशद्वार

.
आमच्याकडे वर्णभेद वगरे अजिबात नाही ......
.
.

.

उग्र नृसिंह दर्शन
श्रीकृष्ण मंदिराचे नजीकच उग्र नृसिंह मंदिर आहे व त्याला लागूनच बडवीलिंग मंदिर आहे. चार बाजूंनी दगडी भिंतीने बंद फक्त एक बाजूने द्वार अशा चौकोनात उग्र नृसिंहाची खरेच उग्र भाव दाखवणारी मूर्त आहे. त्याच्या मागचे तो नागाचा फडा देखील तितकाच उग्र .
.

.
.
.
पुढचा पडाव....प्रसन्न विरूपाक्ष मन्दिर .. हे देऊळ जमीनीच्या खाली आहे . म्ह्णजे मन्दिर पहाण्यासाठी पायर्‍या उतरून जावे लागते. कालच पाउस पडल्याने मन्दिरात मंडपात पाणी साचले होते. गाभार्‍यात प्रवेश शक्यच नव्हता. पण मंडपातील खाबांची सुरेख प्रतिबिम्बे कॅमेर्याने टिपता आली.
.

.

.

.

.

.

.

.

.

हा फोटो काढताना मिपावरील दोन नटखट नटोरियस मित्रांची आठवण झालीच झाली !

.

सन्ग्रहालय

.

,
महानवमी डीब्बा याजवळील एक साधारण २० फूट उंचीचा अखंड दगडी दरवाजा
.

.
शाही सिक्रेट चेम्बर

"मी अमुक ठिकाणी थांबतो तुम्ही लोटस महाल , हत्तीखाना वगैरे रॉयल एन्क्लेव्ह चा भाग पाहून या ! असे रिक्षावाला म्हणाला तसे एक सर्वसमावेशक तिकीट काढून मी शाही विभागातून भटकू .लागलो हंपी भोवती त्याकाळी एक भव्य तटबंदी मधूनमधून टेहेळणी मनोरे असलेली अशी होती .शक्य असेल तिथे आता पुनर्र्चनेचे काम सुरू आहे.मनोरे काही प्रमाणात ढासळले असले तरी जे काही पाहायला उरले आहे ते ही देखणे आहे ! हत्तीखान्याजवळच एक संग्रहालय आहे. हत्तीखान्याच्या समोर हिरवळ उत्तम स्थितीत राहील याची काळजी घेतली आहे. लोटस महाल मध्ये मात्र त्याच्या जोत्यावर जाण्यास मनाई केली आहे .

.

.
हजार राम मन्दिराचा अन्तर्गत भाग

.

.

.

.

.
हजार राम मन्दिर विविध अंगानी दर्शन

हम्पी मधे आपण आल्यावर इथले दगड धोन्डे, नारळी केळी च्या बागा , भाताची शेते, मन्दिरे ,टेकड्या हे एकाच ठिकाणी पाहून आपण स्तिमित होतो.श्रीकृष्ण, अच्युतराया, विजय विठ्ठल व हजार राम या मन्दिराबरोबर विरूपाक्ष मन्दिर ही येथील अशी ठिकाणे आहेत की आपण कमी वेळात त्याना व आपल्या देखील न्याय देउ शकत नाही. मग किश्किन्धा, सानापूर ,हनुमानहळ्ळ्ली, अनिगुडी,कमलापूर सन्ग्रहालय ,तुन्गभद्रा धरण हे विषय आपल्या यादीतून निसटत जातात. जागोजागी एक मजली दोन मजली मन्डप आज विपन्नवस्थेत असले तरी अजूनही देखणे आहेत. पहायला आपली नजर हवी

हम्पी मधे काही वाद विवाद आहेत. येथील लोकामधे निरनिराळी हितसम्बन्ध गुंतलेले गट आहेत. रिक्शावाले बेसूमार झाले आहेत . त्याना बारा महिने धन्दा मिळत नाही. सबब मनाला वाटेल तो भाव . त्यान्चा स्कूटर ,मोटरसायकल भाड्याने देणार्याना विरोध आहे. सबब ती सोय नदीच्या अलीकडे नाही. गावातील काही लोकाना सरकारने पर्यायी घरे देऊन मुख्य देवळासमोरून हाकल्ले आहे. आता जी काही ५० घरे आहेत त्यानी दडपून दुसरा मजला चढवला आहे. अन्तर्गत रस्ते खराब आहेत. वर्षातून नोव्हेबर ते फेब्रूवारी एवढाच धन्दा असल्याने मग पदार्थ महाग विकावे लागतात असे एकाने सांगितले. इथल्या लोकाना ओला उबर ची काही माहिती नाही. मी रिक्शावाल्यांशी गप्पा मारल्या तर म्हणतात पुढे या धन्द्याचे काय होणार कुणास ठाउक . आता एस टी बस फक्त १३ रू त होस्पेटला नेते .अनेक विद्यार्थी इथून होस्पेटला कॉलेज साठी बसने जातात.

.
चक्रधर मंदिर आतून
,
चक्रध्रर मन्दिरात शिल्प काम असे काही नाही जवळ जवळ . पण तो एक वारसा आहेच सबब या मन्दिराची भिन्त जशी त्यावेळी होती तशीच बांधण्याचे काम चालू आहे.

रॉयल एन्क्लेव्ह मधेच महानवमी डिब्बा , पायर्या ची पुश्कर्णी व भुलभुलेया खोली ( रूम ) आहे. महनवमी डिबा म्हणजे मोठ्या महालाचे आता फक्त उरलेले भव्य उंच जोते आहे . इथे पर्यटकांची सेल्फी काढण्याची लगबग दिसत होती. मी मात्र एका खट्याळ फुलपाखराचा फोटो कसा काढता येईल ते पहात होतो.
इथेच जवळ एक वीसेक फूट उंचीच्या दगडी दरवाज्याचे एक दार जमीनीवर विसावले आहे. हे सर्व पहात पुन्हा रिशावाल्याला गाठले. व पुढचा प्रवास सुरू केला.
.
.

जवळच क्वीन्स बाथ ची इमारत होती .मागेच आलो असताना ही व्यवस्थित पाहिलेली होती त्यामुळे रिक्शावाल्याला थेट रिक्षा चंद्रशेखर मंदिरापाशी घ्यायला साँगितली. मंदिराचे सध्या दुरूस्तीचे काम चालू आहे. खास करून मंदिराची सीमाभिंत पूर्वीसारखी करण्याचे प्रयत्न चालू असलेले दिसत होते. या मंदिरात खूप काही असे कलाकाम मला दिसले नाही. आतून एक चक्कर मारून काही फोटो काढले व बहेर पडलो. जवळच अष्टकोनी विहीर आहे. बांधकाम अप्रतिम आहे. इथे काही विद्यार्थी अभ्यास करायला आलेले दिसले.

एव्हाना रिक्शावाला चुलबूळ करायला लागला होता. एकतर त्याला घरी जायचे असावे किंवा दुसरे गिर्हाईक मिळते का हे बघावयाचे असावे. मीही बराच दमलेला होतो ,मग त्याला रिक्शा परत हम्पीत बस अड्ड्यावर घ्यायला सांगितले. दुसरा दिवस संपला. आजच्या दिवसात स्कूटर भाड्याने घेऊन हिप्पी आयलंड , अनेगुडी ,सानापूर अशी मनसोक्त रपेट करण्याचे मनसुबे पावसामुळे फसले होते.

क्रमशः

प्रतिक्रिया

कंजूस's picture

28 Apr 2020 - 5:52 pm | कंजूस

सुंदर.
हे अंतर चार -सहा किमिचे आहे परंतू रिक्षाचा रेट हा तुम्हाला किती तास द्यायचे यावर आहे. तासाला पाचशे रुपये.

प्रचेतस's picture

30 Apr 2020 - 1:41 pm | प्रचेतस

तिथं सायकल भाड्याने घेणे उत्तम.

चौकटराजा's picture

30 Apr 2020 - 9:37 pm | चौकटराजा

सायकल सर्वत्र अगदी मस्त पण पोलिस स्टेशन ते विठ्ठ्ल मंदिर व्हाया कोदंडधारी राम मंदिर , वराह मंदिर अशक्य !

प्रचेतस's picture

30 Apr 2020 - 10:29 pm | प्रचेतस

तिथं चढाव, दगडांमुळे शक्यच नाही.

हा भागही मस्त झाला. हंपीवर मी ही एक लेखमाळा अर्धवट लिहिली होती, ती आता पूर्ण करायचे मनावर घ्यावे लागेल.

आपण जो उग्र नृसिंह मूर्तीचा उल्लेख केलाय ती आज उग्र मूर्ती म्हणून ओळखली जाते असली तरी ती पूर्वी लक्ष्मीनृसिंह ह्या नावाने विख्यात होती, आज देखील लक्ष्मीचा एक हात नृसिंहाचे खांद्यावर विसावलेला आपणास दिसतो.

कृष्ण मंदिर आणि त्यासमोरील कृष्ण बाजार मस्त आहे. कृष्ण मंदिराचे प्रवेशद्वाराचे गोपुराचे आतल्या भागावर कृष्णदेवरायाच्या ओरिसावरील स्वारीचे शिल्पांकन केलेले दिसते. रॉयल एंकलेव्ह परिसर भारीच आहे. हजारराम मंदिर हे रायांचे खाजगी मंदिर असल्याने तेच फक्त अंतर्भागात आहे. तर चंद्रशेखर अगदी सुरुवातीला आहे, बाकी महत्वाची मंदिरे सगळी सेक्रेड एन्कलेव्ह मध्ये विखुरलेली आहेत.

तुम्ही महानवमी डिब्ब्यावर माथ्यावर गेलात नाही वाटते. तिथून हा राजांचा परिसर खूप सुरेख दिसतो. विजयनगरच्या सैन्याचे चित्रण डिब्ब्यावर केले आहे.

किल्लेदार's picture

1 May 2020 - 2:02 am | किल्लेदार

हंपी ला परत जायची इच्छा मनात मूळ धरू लागली आहे.

बघूया कधी जमतंय....

पु भा प्र

र च्या क ने ही किष्किंधा नेमकी कुठे ? वेगळी अशी काही जागा आहे का? हंपी आणि आसपासचा परिसर म्हणजेच पुराणातील किष्किंधा असा माझा समज होता.

चौकटराजा's picture

1 May 2020 - 8:51 am | चौकटराजा

हम्पी म्हण्जे किश्किन्धा नव्हे. मी जर बरोबर असेन तर तो प्रदेश हम्पीच्या थोडा उत्तरेला आहे. हम्पी ची जी टूर पॅकेजेस असतात त्यात किष्किंधा या भागाचा समावेश असणारी काही आहेत !

हंपी म्हणजे पंपाक्षेत्र. पंपा हे तुंगभद्रेचं प्राचीन नाव. किष्किंधा म्हणजे कांपिलीच्या आसपासच्या टेकड्या असाव्यात.

हंपी ला परत जायची इच्छा मनात मूळ धरू लागली आहे.
मग लखुंडी पाहाच. होस्पेट - एक तास - लखुंडी - दोन तास - हुबळी रेल्वे स्टेशन
किंवा होस्पेट - एक तास - लखुंडी - पंधरा मिनीटे - गदग रेल्वे स्टेशन

किल्लेदार's picture

4 May 2020 - 6:09 am | किल्लेदार

बरंच लांब दिसतंय लखुंडी हंपीपासून

चौकटराजा's picture

4 May 2020 - 1:40 pm | चौकटराजा

याच भागात चित्रदुर्ग ही आहे ! तिथे, कंका, गदग येथे राहून जाता येईल काय ??

चौकटराजा's picture

4 May 2020 - 3:02 pm | चौकटराजा

होस्पेटेवरून दुपारी २ ला बंगलोर येथे जाण्यासाठी फास्ट पसेन्जर आहे. ती चित्रदुर्ग ला रात्री आठ वाजता पोहोचते. याचा अर्थ चित्रदुर्गला एक मुक्काम करावा लागणार . एक होस्पेटेला केला तर हम्पी ची नदीपलिकडची बाजू स्कूटर ने पहात येईल !

रात्री आठला ट्रेन पोहोचते म्हणजे दोन दिवस राहावे लागेल!!

बदामि - पट्टडकलु - ऐहोळे ( इल्कलमार्गे ) होस्पेट - हंपी - लखुंडी पाहून परत होस्पेटला येणे - सकाळी होस्पेट -मडगाव ट्रेनने दुपारी दोनला गोवा आणि तिथून परत हाच प्लान चांगला आहे व कनेक्टिंगमध्ये वेळ जात नाही आणि योग्य वेळेस नवीन ठिकाणी पोहोचून हॉटेल रुम घेऊन अर्धा दिवसही पर्यटन होते.

कंजूस's picture

4 May 2020 - 3:42 pm | कंजूस

नकाशा

चित्रदुर्ग हे शिवमोगा ( शिमोगा) इथून थोडे जवळ आहे. तिथे भद्रा वाइल्डलाईफ जवळ आहे. चित्रदुर्ग हे चिकजऊर या मेन लाईन रे स्टेशनजवळ आहे. परंतू मैसुरू/ बेंगळुरु च्या येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे रात्री इकडून जातात. त्यामुळे चित्रदुर्ग टाळावे लागते. बसचा प्रवास = हंपी -३ तास - चित्रदुर्ग - ४ तास - बेंगळुरू फार लांबचा पल्ला आहे.

चौकटराजा's picture

1 May 2020 - 11:43 am | चौकटराजा

विकिपेडियानुसार किष्किन्धा म्हण्जेच विरुपापुरगड्डी . विजय विठ्ठल मंदिराच्या मागे नदीपलीकडे एक " ॠशिमुख" नावाची टेकडी, त्यापल्किडे पम्पा सरोवर व अन्जनेय टेकडी हे सारे एकत्र केले की सुग्रीवाचे " वानर" राज्य तयार होते. तीच किष्किन्धा !

म्हणजे तुंगभद्रेपलीकडला प्रदेश

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2020 - 6:16 pm | अत्रुप्त आत्मा

___/\__

सिरुसेरि's picture

2 May 2020 - 2:03 pm | सिरुसेरि

खुप माहितीपुर्ण व वाचनीय वर्णन . +१

चौथा कोनाडा's picture

4 May 2020 - 1:11 pm | चौथा कोनाडा

अप्रतिम फोटो प्रचि. आणि सुंदर वर्णन !
वास्तूशिल्प आणि शिल्पसौंदर्य पाहून थक्क व्ह्यायला झालं !

चौरा साहेब !
_/\_

अनिंद्य's picture

4 May 2020 - 6:25 pm | अनिंद्य

सहलप्रवर्तक वर्णन!

आता तर तुम्ही लिहिलयं तसं नवकलेवर देण्याचे काम होते आहे. आता काही कारणच शिल्लक नाही हंपी-बदामी भेट पुढे ढकलण्याचं :-)

जायलाच लागतय आता.

गोरगावलेकर's picture

25 Dec 2020 - 12:53 am | गोरगावलेकर

सध्या माझी मुलगी व तिच्या दोन मैत्रिणी हम्पी -गोकर्ण सहल करीत आहेत. त्यांच्यातर्फे मिळालेले काही अपडेट्स

* हॉस्पेट ते हम्पी ऑटो रिक्षा भाडे - माणशी रु.१००/- किंवा रु.२००/- संपूर्ण रिक्षा
* हम्पी दर्शन रिक्षा भाडे (६०किमीसाठी) - रु.१२००/-
* हिप्पी आयलँड बाजूचा परिसर रिक्षा भाडे - रु.१२००/-
* सायकल २४ तासाकरिता - रु.१००/-
* कोरॅकल (डुंगी) राईड - (संपूर्ण)
१५ मिनिटांकरिता - रु. ८०० , ३० मिनिटांकरिता -रु.१५००/-
(मोलभाव/घासाघीस शक्य)
* मुक्काम (बऱ्यापैकी हॉटेल) - रु.१०००/-प्रति रात्र (दोघांकरिता)
* काही भागात बिबट्यांचे हल्ले झाल्याने पहाटे सूर्योदय पॉईंटला जाण्यास मज्जाव.
* हिप्पी आयलँड पाडल्या गेल्याने येथे राहण्याची कोणतीही सुविधा नाही.
* विरुपाक्ष ते हिप्पी आयलँड जाण्यासाठी कोरॅकल/बोट सुविधा नाही. रोडने जाण्या येण्यास जवळपास ६०किमीचा प्रवास
* शक्यतो विरुपाक्ष मंदिराच्या आसपास मुक्काम करावा.
* उंची हॉटेल हवे असल्यास हॉस्पेटला रहावे
* ऑटो रिक्षा हॉटेलमार्फतच बुक करावी. स्वस्त पडते. फसवणूक नाही.
* करोनामुळे पर्यटक अगदी तुरळक. निवांत फिरता येते.
* फोनचे नेटवर्क मिळत नाही. हॉटेलमध्ये वायफाय सुविधा असल्यास चांगले.
* गेल्या वर्षांपासून येथे प्राणी संग्रहालयही झाले आहे
* माकडांपासून सावधान

सोबत त्यांच्या सहलीतील दोनचार फोटो