✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एकदा तरी माती व्हावे

प — पाषाणभेद, Mon, 01/27/2020 - 21:57
एकदा तरी माती व्हावे कधीतरी इतरांच्या पायी जावे एकदा तरी माती व्हावे नको राग लोभ कशाचा मी माझाच नाही आहे सर्वांचा नको व्यर्थ माझे माझे करावे एकदा तरी माती व्हावे दैन्य इतरांचे पाहून मग कळते मी किती सुखी ते आपलेच सुख आपल्याला टोचावे एकदा तरी माती व्हावे चारी ठाव घरी खातसे ताटात गरम पक्वाने कागदावर अन्न केव्हातरी चाखावे एकदा तरी माती व्हावे वापरसी अंघोळीस पाणी मुबलक फासशी साबण अंगास सुवासीक शरीर सार्वजनीक स्नानास अनुकूल असावे एकदा तरी माती व्हावे सेवा करवून घेई स्वत:ची हातात सार्‍या वस्तू येती कधीतरी झाडू मारूनी उष्टे उचलावे एकदा तरी माती व्हावे आत्मकेंद्री स्वभाव होई मलाच हवे सारे काही वागणे असे टाकून द्यावे एकदा तरी माती व्हावे स्वार्थी जग असले तरी कुणी एखादा भेटतो वेगळा त्याच्या अंगचे निस्वार्थीपण घ्यावे एकदा तरी माती व्हावे - पाषाणभेद २७/०१८/२०२०

प्रतिक्रिया द्या
1884 वाचन

💬 प्रतिसाद (1)

छान.

मदनबाण
Sun, 02/02/2020 - 11:28 नवीन
छान.

मदनबाण.....

आजची स्वाक्षरी :- Haan Main Galat... :- Love Aaj Kal
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा