देशद्रोही

नि३'s picture
नि३ in काथ्याकूट
13 Nov 2008 - 6:33 am
गाभा: 

नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार ..भोजपुरी नट कमाल खान याचा देशद्रोही या चित्रपटावर महाराष्ट्रा सरकार ने २ महीन्यांकरीता बंदी आणली आहे.

मुंबई च्या सिनीयर पोलीस ऑफीसर्स नी त्यांच्याकरीता खास आयोजीत केलेल्या शो मधे हा चित्रपट बघुन त्यांचा रिपोर्ट महाराष्ट्र सरकारला पाठवीला होता . त्या रिपोर्ट नुसार जर सध्याच्या परीस्थीतीत जर हा चित्रपट रिलीज झाला तर कायदा आणी सुव्यवस्थे ची पुर्णपणे वाट लागणार.

तिकडे ह्या चित्रपटावरील बंदीमुळे प्रोड्युसर आणी नट कमाल खान ह्याने कोर्टाकडे धाव घेतली आहे.

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

13 Nov 2008 - 9:25 am | घाशीराम कोतवाल १.२

**घाले मुंबईत पोटापान्यासाथी येतात कि शिर्जोर गिरि करन्यासाठी जरा विचार करा
आनी बरे झाले एक डब्बा चित्रपट नाही आला तो
संगणकिय विषाणु तयार करणे त्यावर नियंत्रण ठेवणे
त्यांच्यात विध्वंसक क्षमता तपासणे आणी त्याचा वापर पुरेपुर करणे
यात आम्ही सध्या प्रगती पथावर आहोत

सागर's picture

13 Nov 2008 - 11:50 am | सागर

बरे झाले...

अशा संधी साधू प्रोड्युसरला असा फटका बसल्याशिवाय धडा नाही मिळणार...

तापलेल्या तव्यावर स्वतःची रोटी शेकण्याबरोबरच अजून आगीत तेल ओतण्याचे काम ह्या चित्रपटाने केले असते.
ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मुंबईत माजुर्डेपणा करणार्‍या युपी, बिहारच्या लोकांना अजून बळ मिळाले असते.

समस्त मराठी बांधवांनी हा चित्रपट न पाहूनच अशा समाजकंटकांना उत्तर दिले पाहिजे ..... होऊ दे फ्लॉप हा चित्रपट....

उगीच काय आहे चित्रपटात पाहू तरी.... असे म्हणून चित्रपट बघायला जाल आणि हिट करुन सोडाल....

असो...
मराठी लोक सुज्ञ आहेतच. देशद्रोही च्या अशा फालतू प्रयत्नांना भीड नाहीच घालणार

जय महाराष्ट्र
सागर
अवांतर : काल आज तक वर एक बातमी पाहीली : महाराष्ट्र में"देशद्रोही" नही...... अहो नाहितच आमच्या महाराष्ट्रात देशद्रोही... :)

शैलेन्द्र's picture

13 Nov 2008 - 11:31 pm | शैलेन्द्र

आपला सोपा उपाय,

सगळे हिंदी चित्रपट पायरेटेद डी व्ही डी आणुन पहायचे,

आणि चांगले मराठी टाकीज मधे जावुन...

veebee009's picture

13 Nov 2008 - 11:43 pm | veebee009

मी हे तत्व खूप पुर्विपासुन वापरतोय...

पण तरीही कल्पना सही आहे...

फुकटची प्रसिद्धी मिळली.... आता जेव्हा सिनेमा रिलिज होईल तेव्हा तो लोकं जाउन नक्कि बघणार...

पण या विषयाच्या सुरुवातीला कमाल खानला... नट म्हट्ले आहे... ते... मराठी मध्ये... कि आन्ग्ल भाषेत ???

काय आहे... की... तो... आन्ग्ल भाषेतला नट आहे ते मला मान्य आहे... पण ... मराठीतला... नट नाही वाट्त...

सुक्या's picture

14 Nov 2008 - 12:32 am | सुक्या

काहीतरी आचरट्पणा करुन आपली तुंबडी भरायची हाच त्या बावळट कमाल खान चा उद्देश होता. त्या चित्रपटाचा थोडा भाग पाहुनच भयंकर हसलो होतो. २ महिण्यात बाकी ठिकाणी हा चित्रपट काय दिवे लावतो ते कळेलच. तो डब्यातच जाणार हे वेगळे सांगणे नको.

सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)