माझीही फोटोग्राफी - अजंठा - वेरुळ

श्रीमंत दामोदर पंत's picture
श्रीमंत दामोदर पंत in कलादालन
11 Nov 2008 - 5:27 pm

काही दिवसांपुर्वी अजंठा वेरुळला गेलो होतो....तिथले काही फोटो तुमच्या सोबत शेयर करतो..तुम्हाला आवडतील अशी आशा आहे...

कैलास मंदिर - वेरुळ


अजंठा -

छायाचित्रण

प्रतिक्रिया

टारझन's picture

11 Nov 2008 - 5:55 pm | टारझन

के व ळ अ प्र ति म !!!

- टारोबा खेचर

आनंदयात्री's picture

11 Nov 2008 - 5:59 pm | आनंदयात्री

भग्न वैभव पाहुन फार वाईट वाटले. मी औरंगाबादचाच असल्याने लहानपणापासुनच कैक वेळा गेलो आहे. तेव्हापासुन प्रश्न पडायचे हे वैभव असे भग्न का ?
काळ जात गेला तशी अनेक उत्तरे मिळत गेली. धर्मवेड्या औरंगजेबाने हजार हजार पाथरवटांच्या टोळ्या लाउन हे वैभव नासवले... रंग जात नव्हते म्हणुन अनेक वेळा पुर्ण लेण्यात भुस्सा भरुन तो पेटवला !!
आता शिल्पे पाहुन आपण विस्मयचकित होतो, ते वैभव अजुन राहिले असते तर काय बहार झाली असती !!

श्रीमंत दामोदर पंत's picture

11 Nov 2008 - 6:03 pm | श्रीमंत दामोदर पंत

आंद्या यार पटलं तुझं म्हणणं....

खरचं रे ही सगळी शिल्पं पुर्वी होती तशीच राहिली असती तर काय सुरेख दिसली असती ना....

काय मिळालं असेल ना त्या औरंगजेबाला अशी अप्रतीम शिल्पं नासवुन?????

बाकी तुला वाईट वाटलं असेल तर माफ कर रे....

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Nov 2008 - 6:46 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भग्न वैभव पाहुन फार वाईट वाटले. मी औरंगाबादचाच असल्याने लहानपणापासुनच कैक वेळा गेलो आहे. तेव्हापासुन प्रश्न पडायचे हे वैभव असे भग्न का ?

आंद्यासारखेच प्रश्न मलाही पडायचे !!!

अवांतर : क्या दामोधर भाय, तुम्ही औरंगाबादला येऊन गेल्याचे कळले, तेव्हा एखादा कॉल केला असता तर लिंबू शरबताची व्यवस्था नक्कीच केली असती :)

-दिलीप बिरुटे
(औरंगाबादकर)

लिखाळ's picture

11 Nov 2008 - 6:57 pm | लिखाळ

फोडून पाषाण
टणक भारिव
सौंदर्य कोरिव
प्रकटले

तोड फोड केली
सुंदर शिल्पाची
अवकळा आली
वैभवाला

फोटो सुंदर..
-- (देवद्वाराने भारलेला) लिखाळ.

चित्रा's picture

11 Nov 2008 - 7:47 pm | चित्रा

लेण्यांच्या आतले फोटो काढले नाहीत का?

भाग्यश्री's picture

11 Nov 2008 - 10:31 pm | भाग्यश्री

किती दिवसांनी पाहीली ही लेणी.. शाळेची सहल जायची ते आठवलं..
बाकी, भग्न अवशेष पाहून खरंच वाईट वाटलं.. :( हे सगळं औरंगजेबाने केले ते वेगळं, पण आशा आहे, आत्ताच्या काळात कोणी तिथे जाऊन राहूल बदाम ज्योती लिहीत नसेल.. :|

http://bhagyashreee.blogspot.com/

टारझन's picture

11 Nov 2008 - 10:48 pm | टारझन

आत्ताच्या काळात कोणी तिथे जाऊन राहूल बदाम ज्योती लिहीत नसेल..

या वाक्याचा मी तथाकथित "राहूल" आणि "ज्योती" नामधारकांच्या वतिने जाहीर णिषेध करतो ..
:)
(ह.घ्या)

टारझन बदाम काजू-अक्रोड

भाग्यश्री's picture

11 Nov 2008 - 11:06 pm | भाग्यश्री

:)
ते वाक्य टाकताना डिस्क्लेमर टाकावा का असा विचार करतंच होते !
मग आठवून पाहीले मिपा वर कोणी राहूल आणि ज्योती नाहीएत(नसावेत!). मग लिहीली बिन्धास्त नावं..
हे असंही करता येईल हे नाही आलं डोक्यात!! :| :) :)

http://bhagyashreee.blogspot.com/

टारझन's picture

11 Nov 2008 - 11:30 pm | टारझन

असं कसं.... असं कसं ? कोण खरी णावं लिहीतं ?
असो .. तरी आपली णिशाणी आम्ही अफ्रिकेच्या जंगलात लिहून आलोय...
एका मोठ्या झाडावर कोरलंय... "टारझन बदाम काजु-अक्रोड"

अहो ह.घ्या हो ..

यशोधरा's picture

11 Nov 2008 - 11:40 pm | यशोधरा

दामोदरपंत, सुरेख फोटो.

स्वाती दिनेश's picture

12 Nov 2008 - 8:25 pm | स्वाती दिनेश

फोटो आवडले.. ९वीत असताना शाळेची सहल औ'बादला गेली होती तेव्हा पहिल्यांदा हे शहर पाहिले... मग अशाच काही निमित्ताने ३,४ दा गेले.. पुढच्या वर्षी बहुतेक जर्मन मित्रांना घेऊन जायचा विचार आहे..
स्वाती

ब्रिटिश टिंग्या's picture

12 Nov 2008 - 8:49 pm | ब्रिटिश टिंग्या

फोटो छानच!
आवडले!

विसोबा खेचर's picture

13 Nov 2008 - 1:12 pm | विसोबा खेचर

श्रीमंत,

अतिशय सुरेख चित्र!...

तात्या.

नितिन नवले's picture

13 Nov 2008 - 1:20 pm | नितिन नवले

आयला मला बी लई चांगलं वाटलं.ईकडं कर्नाटकात राहुन सुद्धा औरंगाबादची सफर झाल्या सारखं वाटलं. के व ळ अ प्र ति म !!!

मनस्वी's picture

13 Nov 2008 - 1:36 pm | मनस्वी

दामोदरपंत, खूपच छान आलेत फोटो.

श्रीमंत दामोदर पंत's picture

13 Nov 2008 - 2:10 pm | श्रीमंत दामोदर पंत

सगळ्यांना मनापसुन धन्यवाद :)

औरंगाबाद सफरीची आणखी छायाचित्र देण्याचा प्रयत्न करेन.... :)

मृगनयनी's picture

15 Nov 2008 - 10:45 am | मृगनयनी

पंत!....... माफ करा ४ दिवस उशीरा प्रतिसाद देत आहे!........ :)

खरोखर सुंदर! काही वर्षांपुर्वी..म्हणजे शाळेत असताना ही लेणी घरच्यांबरोबर बघायचा योग आला होता... पण १दाच!..... त्यानंतर आजच बघते आहे! खूप अप्रतिम आहेत..... ज्या कारागीरांनी अहोरात्र मेहेनत करुन ही लेणी कोरुन त्यावर रंग काम केलं.... त्यांच्या साठी
" हॅट्स ऑफ"

आणि ज्या औरंगजेबाने या सुंदर कलाकृतीचा विध्वंस केला, त्याचा...,, त्याच्या आख्ख्या कुळाचा ...पुर्वजांचा, वंशजांचा........जाहीर निषेध!!!! जाहीर निषेध!!!! जाहीर निषेध!!!!

जय हिन्द! जय महाराष्ट्र! भारत माता की जय!
राज ठाकरेंचा ही विजय असो.....!
:)

जैनाचं कार्ट's picture

15 Nov 2008 - 11:39 am | जैनाचं कार्ट (not verified)

नयनी बाई ,
थंड घ्या... !
=))

औरंगजेब ला मरुनपण लई वरिस झाली...! ;)

** राहिलं त्याचं कुळ.. वारस... कलकत्तात कुठेतरी गल्ली मध्ये एकदम हालाखीचे जिवन जगत आहे... राहू दे कश्याला त्यांना अजून निषेध त्यांचा :)

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

टारझन's picture

15 Nov 2008 - 12:42 pm | टारझन

राघव's picture

15 Nov 2008 - 2:31 pm | राघव

आजच बघीतलेत फोटोज.. खूप सुंदर :)
अवांतरः
कुणी कर्नाटकाला हम्पीचे फोटोज काढलेत काय?.. असतील तर टाकावे मिपावर!!
(फोटोग्राफी शिकण्याच्या सदैव प्रयत्नात असलेला) मुमुक्षु

१.५ शहाणा's picture

15 Nov 2008 - 6:38 pm | १.५ शहाणा

अवांतर : क्या दामोधर भाय, तुम्ही औरंगाबादला येऊन गेल्याचे कळले, तेव्हा एखादा कॉल केला असता तर लिंबू शरबताची व्यवस्था नक्कीच केली असती Smile

मी पण सोडा आणीला असता...............................