रेखाटने

वर्षा's picture
वर्षा in कलादालन
11 Nov 2008 - 4:49 am

माझ्या दोन आवडत्या कलाकारांची रेखाटने करायला घेतली होती. पण ते मूळ फोटो मध्यंतरी पीसी format केला त्यात गायब झाले. कालपरवा आठवून शेडींग करायचा प्रयत्न केला पण काही जमलं नाही. मग नाद सोडून दिला. आता परत नव्यानेच रेखाटावे म्हणते. बघुया. :)

माध्यमः Derwent Charcol Medium, RAFFINE 2B Graphite pencil

मग काय वाटलं कुणास ठाऊक, चक्क दोन कार्टून्स काढली आणि रंगवलीपण! कित्ती दिवसांनी नव्हे वर्षांनी! मला वाटतं शाळेनंतर आताच काढली डायरेक्ट :D खूप मजा आली

डिस्नेचे Chip 'n Dale....मला फार आवडतात...कधीकधी मिकी आणि डोनाल्डपेक्षाही :)
माझा ७ महिन्यांचा लेक यांना बघून खूष झाला... अजून काय पाहिजे! :)

-वर्षा

रेखाटन

प्रतिक्रिया

भाग्यश्री's picture

11 Nov 2008 - 5:32 am | भाग्यश्री

चिप न डेल काय क्युट आलेत! पर्फेक्ट एकदम!
वर, शम्मी कपुर आणि कोण आहे? नाही ओळखलं.. :( तेही दोघं छान , पण अपूर्ण वाटतात...

http://bhagyashreee.blogspot.com/

वर्षा's picture

11 Nov 2008 - 6:14 am | वर्षा

धन्यवाद गं.
होगं अपूर्णच आहेत. आणि तसंही चेहेरा रेखाटून झाला की केस रेखाटायला मला कंटाळा येतो. (जमतच नाही ना :D )
शम्मी बरोबर...दुसरी ओळखली नाहीस????? नवलच आहे बाई :D
अगं मी समजा दहा वेळा चित्र रेखाटलं तर त्यातले नऊ वेळा प्रयत्न फसलेलाच असतो :)
-वर्षा

भाग्यश्री's picture

11 Nov 2008 - 8:44 am | भाग्यश्री

ओह्ह.. दिप्ती नवल होय!!
काय क्रिप्टीक लिहीतेस!! :))))

छान आहे गं, फसले नाहीय.. मला डोळे ओळखीचे वाटले पण नाव नाही आठवलं.. :)

http://bhagyashreee.blogspot.com/

मदनबाण's picture

11 Nov 2008 - 6:50 am | मदनबाण

चिप न डेल मस्तच दिसतात...

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

सहज's picture

11 Nov 2008 - 7:22 am | सहज

चिप न डेल मस्तच दिसतात...

अनिल हटेला's picture

11 Nov 2008 - 7:55 am | अनिल हटेला

चिप न डेल मस्तच दिसतात...
असेच म्हणतो.....

शम्मी कपूर आणी माहीत नसलेली हीरोइन सुद्धा छान रेखाटलीये..

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

विसोबा खेचर's picture

11 Nov 2008 - 9:40 am | विसोबा खेचर

के व ळ अ प्र ती म...!

तात्या.

संताजी धनाजी's picture

11 Nov 2008 - 10:54 am | संताजी धनाजी

भयंकर सुंदर काढले आहेस!
माझ्यामते चित्रातला सर्वात आवघड भाग म्हणजे डोळे. तेही अतिशय छान आले आहेत.

वर्षा's picture

11 Nov 2008 - 10:27 pm | वर्षा

सगळ्यांना धन्यवाद
-वर्षा

शितल's picture

11 Nov 2008 - 11:24 pm | शितल

रेखाटने आवडली. :)

यशोधरा's picture

11 Nov 2008 - 11:50 pm | यशोधरा

शम्मी, चिप न डेल मस्त!
दीप्ती नवल मात्र नाही ओळखू आली...