कट्टा - रविवार दिनांक २२ सप्टेंबर 2019

प्रशांत's picture
प्रशांत in काथ्याकूट
20 Sep 2019 - 7:14 pm
गाभा: 

मिपा मालक नीलकांत ह्यांच्या पुण्यनगरीतील आगमनाप्रीत्यर्थ कट्टा आयोजित करण्यात आलेला आहे

रविवार दिनांक २२ सप्टेंबर 2019

वेळः सकाळी १०:०० वाजता

स्थळः आपले नेहमीचेच पाताळेश्वर, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड.

कोण कोण येणारे ते इथे कन्फर्म करा. म्हणजे भोजनास कुठे जायचे हे ठरवता येईल. मिसळपाव मुक्त संस्थळ असल्याने यायचा जायचा आणि खादाडीचा खर्च प्रत्येकाने आपला आपला करावयाचा आहे.

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

20 Sep 2019 - 9:43 pm | टर्मीनेटर

२२ सप्टेंबर म्हणजे परवाच की! थोडा आधी धागा काढला असतात तर येण जमवता आलं असतं...
असो, पुन्हा कधीतरी... कट्ट्यास शुभेच्छा!

जॉनविक्क's picture

20 Sep 2019 - 10:14 pm | जॉनविक्क
जालिम लोशन's picture

20 Sep 2019 - 11:29 pm | जालिम लोशन

अजुन नक्की ठरवता येत नाही आहे.

पुणे कट्ट्याचा धागा आणि तीनच प्रतिसाद? पूर्वीच्या काळी असं नव्हतं.

येईनच मी.

तुषार काळभोर's picture

21 Sep 2019 - 6:56 am | तुषार काळभोर

येतोय.

कुमार१'s picture

21 Sep 2019 - 7:40 am | कुमार१

येतो पण जेवणास जमणार नाही कारण आधीच घरी कार्यक्रम ठरला आहे .

यशोधरा's picture

21 Sep 2019 - 8:28 am | यशोधरा

येणार.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Sep 2019 - 9:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विधानसभा निवडणुकीत 'झोनल ऑफिसर' म्हणून कार्यरत आहे, रविवारीही काम आहे. यायला जमणार नाही. नीलकांतसेठ आपल्याबरोबर मिपाचा १२ वर्षाचा संसार झाला पण आपली काही भेट होईना...:(

ता.क. वर वल्ली येतोय म्हटल्यामुळे तसाही मूड गेलाच होता, खुप भेटी झाल्या यांच्या. कंटाळा आला प्रशांत आणि वल्लीचा. ;)

मिपा कट्ट्याला शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

महासंग्राम's picture

21 Sep 2019 - 10:02 am | महासंग्राम

हैला, साहित्यिकांना सुद्धा डूट्या लावायला लागले आता.. उद्धवा अजब तुझे सरकार

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Sep 2019 - 11:18 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आपण फक्त कारकुन असतो त्या निवडणूक अधिकार्‍याच्या दृष्टीने.
नाय ऐकलं की अमुक धमुक कलमानुसार कार्यवाहीची धमकी.

लोकसभेत हेच काम होतं. विधानसभेलाही तेच.
काल नुसतं एकाला नुसतं ड्युटीचं ऑर्डरमुळे हार्टटॅक आला म्हणे. :(

इंजॉय करतो हेही काम. गाणी, शायरी आणि तिच्याशी गप्पा.
अजिबात तान येत नाही. :)

''उसकी याद कुछ इस तरहसे मेरे दिलसे लिपटी है
जैसे गुलाब के फुल पर किसी तितली को निंद आजाए''

-दिलीप बिरुटे
(मनमौजी)

दुर्गविहारी's picture

21 Sep 2019 - 1:06 pm | दुर्गविहारी

"तिच्याशी गप्पा" ????
कोण हो सर "ती" ?
पिवळ्या साडीतील रिना अगरवाल कि निळी साडीवाली.

असे काही असेल तर स्वयंसेवक म्हणून आम्हालाही ईलेक्शन ड्युटीला बोलवा. ;-)

कंजूस's picture

21 Sep 2019 - 12:07 pm | कंजूस

आँ?
इकडे कोणीच क्राउड पुलर नाही? पहिले याची व्यवस्था झाली की मग शो स्टॉपर, सिक्युअरटी वगैरे लागतील.
एकूण काय तर भटकंती/सायकलीवाले नकोत?

नाखु's picture

21 Sep 2019 - 10:33 am | नाखु

आले तर चालेल का??
वाचकांची पत्रेवाला नम्र नाखु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Sep 2019 - 11:02 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

वृत्तांत लिहा तुम्ही, बरेच दिवस झाले नुसते पत्रवाले, पत्रवाले करत आहात.

-दिलीप बिरुटे

शरद's picture

21 Sep 2019 - 11:02 am | शरद

येतो पण जेवणास जमणार नाही
शरद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Sep 2019 - 11:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मला तुम्हाला भेटायचं हो सर.
कधी भेट होईल माहिती नाही.

-दिलीप बिरुटे
(शरद सरांचा जालविद्यार्थी) :)

लोथार मथायस's picture

21 Sep 2019 - 1:04 pm | लोथार मथायस

थोडं उशिरा जॉईन होईल पण नक्की जमवतो

उगा काहितरीच's picture

21 Sep 2019 - 2:40 pm | उगा काहितरीच

नक्की प्रयत्न करेल.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Sep 2019 - 4:30 pm | अत्रुप्त आत्मा

पांडू नै,तर मी पण नै! https://lh3.googleusercontent.com/-yoZKvSwxxFc/VfzpdSyQoXI/AAAAAAAAhLk/e9PNzHHLamE/s28-Ic42/ao.gif

चौकटराजा's picture

21 Sep 2019 - 7:09 pm | चौकटराजा

ए पांडू , ठाकुरलित काय .... *डी घालायला रविवार घालवतो का रे ? ये रे ये रे पांडू , बोलावतो पुण्याचा बंडू , .......

कंजूस's picture

21 Sep 2019 - 8:28 pm | कंजूस

आलो आलो. पांडू आलाच.

अत्रुप्त आत्मा's picture

22 Sep 2019 - 12:39 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/laughing/rofl-smiley-emoticon.gif

प्रयत्न करतो नक्की. बहुतेक येईनच

राघव's picture

22 Sep 2019 - 9:29 am | राघव

:( ऑफिस ची emergency activity निघालीय.. नाही शक्य वेळेत पोहोचणे.. असो.. कट्ट्याला शुभेच्छा!

कंजूस's picture

21 Sep 2019 - 6:46 pm | कंजूस

उद्याच्या इंद्रायणी, इंटरसिटीचे आरक्षण तट्ट आहे. प्रयत्न करतो. बसने नाहीच.

वाहव्वा, कट्ट्यास शुभेच्छा.

भेटीगाठी, गप्पाटप्पा (पक्षी उखाळ्यापाखाळ्या), खादाडी आणि फटू सह कट्टा वृत्तांत आलाच पायजेले .
चला, आता इनो ची सोय करणे आले.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Sep 2019 - 10:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अपडेट प्लीज. कोण कोण ? कसं कसं ? कुठे कुठे ?? काय काय ?

-दिलीप बिरुटे

महासंग्राम's picture

22 Sep 2019 - 10:14 am | महासंग्राम

पातळेश्वरात पोचलोय

गड्डा झब्बू's picture

22 Sep 2019 - 10:25 am | गड्डा झब्बू

सविस्तर वृत्तांत लिहा

मी धरून दहाजण. मी लवकर निघालो अकराला. अभ्या.. नंतर येतोय.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

22 Sep 2019 - 12:53 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दहा मिपाकर आलेत म्हणजे खुप आले. रविवार त्यात...फार मोठा त्याग आहे. धन्यवाद. मिपाकरांचे तिन्ही लोकात कट्टे झाले पाहिजेत. खादाडी झाली पाहिजे.

''तिन्ही लोक आनंदाने भरुन खाऊ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावुं दे रे '' :)

-दिलीप बिरुटे
(खादाड मिपाकर)

कुमार१'s picture

22 Sep 2019 - 1:07 pm | कुमार१

कट्टा मस्त झालेला आहे !
एकूण १० जण (माझ्यासह), त्यातील एकमेव महिला यशोधरा .

ओळखी, परिचय, गप्पाटप्पा, मिपा स्थापनेचा इतिहास, मिपासुधारणा सूचना , दिवाळी अंक .....
धमाल ! व्यक्तिगत कारणाने मला जेवणास थांबता आले नाही.
पुढे घरी येऊन ही झलक लिहीली !
सर्व कट्टेकरीना धन्यवाद !

कुमार१'s picture

22 Sep 2019 - 1:19 pm | कुमार१

वृत्तांत कोणीतरी लिहिलच.
तूर्त हा हजेरीपट :

नीलकांत, प्रशांत
प्रकाश घाटपांडे, प्रचेतस, लोथार मथायस,

कंजूस, यशोधरा,
महासंग्राम , कुमार१

आणि हो ..... समीर शेलार हे चोखंदळ वाचक !

(कोणी उशीरा आले असल्यास किंवा माझ्याकडून विसरले असल्यास क्षमस्व)

जालिम लोशन's picture

22 Sep 2019 - 2:12 pm | जालिम लोशन

घरातील साफसफाईचे काम निघाल्यामुळे, आणी प्रमुख भुमिका रामा गड्याची माझ्याकडे असल्यामुळे जमवता आले नाही.

कुमार१'s picture

22 Sep 2019 - 4:37 pm | कुमार१

कुठे पळाले बाकीचे कट्टेकरी ?
येउद्यात अजून... ☺️

मस्तच झाला कट्टा. मजा आली. डॉ. कुमार१, कंकाका, लोथार मथायस, घाटपांडे ह्यांची प्रथमच भेट झाली. छान गप्पा रंगल्या होत्या.

सगळ्यांत कंकाका, तुमचं खरंच कौतुक आहे. तुम्ही मुंबईहून कट्ट्याला आलात आणि परतीच्या गाडीसाठी लगेच तुम्हाला निघावे लागले, खूप थोडा वेळ थांबायला मिळणार असूनही तुम्ही आवर्जून आलात. खरंच ग्रेट!

महासंग्राम's picture

23 Sep 2019 - 9:10 am | महासंग्राम

मी राहिलो p)

यशोधरा's picture

23 Sep 2019 - 9:19 am | यशोधरा

आपण मागे भेटलोय नाही का कट्ट्याला कोणत्या?

महासंग्राम's picture

23 Sep 2019 - 9:50 am | महासंग्राम

तै, नाही सगळ्यांना पहिल्यांदा भेटलोय काल :)

यशोधरा's picture

23 Sep 2019 - 10:01 am | यशोधरा

ओह, हो का रे? मग तू पण. :)

पद्मावति's picture

22 Sep 2019 - 5:09 pm | पद्मावति

वाह...व्रुत्तांत येउ देत आता.

चौथा कोनाडा's picture

22 Sep 2019 - 8:59 pm | चौथा कोनाडा

मला पण यायचे होते, पण नाही जमले.
आता कट्टा वृतांताविषयी उत्सुकता आहे.
फुटुसह कट्टा वृतांत आलाच पाहिजे !

कंजूस's picture

22 Sep 2019 - 11:41 pm | कंजूस

फोटो १

डावीकडून श्री डॅा कुमार १, यशोधरा, समीरसूर, लोथार मथायस, प्रशांत, प्रकाश घाटपांडे, महासंग्राम, मालक नीलकांत, प्रचेतस.

फोटो २

डॅा कुमार १ आणि प्रेचतस.

जॉनविक्क's picture

23 Sep 2019 - 9:25 am | जॉनविक्क

खूप तरुणाई असायची मिपा(कट्या)वर. इथे तर निलकांत जी आणी महासंग्राम जी सोडले तर बाकीच्यांना लवकरच तिकीटदरात 50% सवलत सुरू होईल असे वाटतेय, कुठं न्हेउन ठेवलंय मिपा माझे ?

हलकेच घ्या वे :)

हस्तर's picture

23 Sep 2019 - 2:17 pm | हस्तर

परा असायला पाहिजे होता ,चिरतरुण

जॉनविक्क's picture

23 Sep 2019 - 9:40 pm | जॉनविक्क

मिपावर तारुण्याच रुसल्या आहे की काय असा संशय व्यक्त करतो.

मस्तच झालेला दिसतोय कट्टा.

हुज हू कळले.

एक आगंतुक सूचना - किमान दोन मिपाकरांनी जेव्हीद्वि व्रत करावे असे सुचवितो.
कृपया हल्के घेणे आणि सुचने मागची भावना लक्षात घेणे

स्मिता दत्ता's picture

26 Sep 2019 - 11:53 am | स्मिता दत्ता

छानच ... पुढच्या वेळेस नक्की येईन.

कुमार१'s picture

23 Sep 2019 - 6:37 am | कुमार१


एक दुरुस्ती:

पहिल्या फोटोत 'समीरसूर' असे नजरचुकीने लिहिलेले दिसते.
ते गृहस्थ 'समीर शेलार' आहेत.

(समीरसूर हे अन्य मिपाकर असून ते कट्ट्यास नव्हते).

समीरसूर's picture

23 Sep 2019 - 3:13 pm | समीरसूर

मी क्षणभर गोंधळलो पण नंतर लक्षात आले की नजरचुकीने माझे नाव लिहिले गेले असावे. चूक लक्षात आणून दिल्याबद्दल ध्यनवाद. कट्टा छानच झालेला दिसतोय. मला शक्यच नव्हतं. यायला नक्कीच आवडलं असतं. पुढच्या वेळी जरा ३-४ दिवस हातात ठेवून कट्टा ठरल्यास जमू शकेल. वर्णनदेखील सुरेख! जेवण कुठे घेतलं?

आई शप्पथ, मी फोटो खरंच निरखून पाहिला; म्हटलं आपण चुकून गेलो तर नव्हतो कट्ट्याला!!!??! पण तो मी नव्हतोच.

संपादित

काल कट्ट्यावर बोललो होतो ती परदेशवारी मालिका आज वाचून काढली! भन्नाट लिहिले आहे विलासरावांनी!

कुमार१'s picture

23 Sep 2019 - 10:15 am | कुमार१

मित्रहो,
कट्टा संयोजक प्रशांत हे आज कामात मग्न असल्याने त्यांच्या सूचनेनुसार आपल्यासमोर वृत्तांत सादर करतो. अर्थात फोटो त्यांचेकडेच असल्याने ते सवडीने इथे चढवण्याची जिम्मेदारी सर्वस्वी त्यांचीच आहे याची नोंद घ्यावी !
......

शनिवारी पहाटे गावाहून आलो होतो. प्रवासात बुडालेली झोप आता सकाळी भरून नाही काढता येत. मग आन्हिके उरकली अन मिपाकडे धाव घेतली. सर्वात वरचा धागा पाहिला : मिपाकट्टा पुणे ! आता अंगात एकदम संचार झाला. मागच्या शनिवारवाडा कट्ट्याला दीड वर्ष उलटले होते. तेव्हा पुढच्या कट्ट्यासाठी मी आसुसलेलाच होतो.

घरी हे कानावर घातले आणि थोडा विरस झाला. नेमके रविवारी दुपारी माझ्याकडेच पाहुणे जेवायला ठरले होते. पण, कट्ट्याची वेळ हा माझ्यासाठी सुखद आधार होता- सकाळी १०. तेव्हा मला गप्पाटप्पांचा आनंद लुटता येणार होताच. त्यातून खुद्द मालक मंडळी येणार याचाही आनंद होता. आपल्या सर्वांसाठी हे मनमोहक आणि मोफत संस्थळ उपलब्ध करून देणाऱ्या द्वयीन्ना प्रथम पाहण्यास मी जाम उत्सुक होतो.

कट्ट्याचे स्थळ पाताळेश्वर हे देखील साद घालत होते. शालेय जीवनातील सहलीनंतर मी तिकडे कधी फिरकलो नव्हतो. हे जरी मिपाचे पारंपारिक कट्टास्थळ असले तरी मी मिपाकर झाल्यानंतरचा हा इथला पहिलाच कट्टा असावा.
सकाळी सव्वादहाला मी तिथे हजर झालो. आत शिरता शिरताच एका दृश्याने लक्ष वेधून घेतले. एक ज्येष्ठ गृहस्थ मांडीत एका मांजरीला घेऊन कुरवाळत बसले होते. का कोण जाणे, पण असे वाटून गेले की असावेत हे मिपाकर ! मग गेलो जवळ अन टाकला खडा... अन बसलाही बरोबर !

एव्हाना तुम्ही ओळखलेच असेल की हे सद्गृहस्थ म्हणजेच आपले जानेमाने कंजूस ! मुंबईहून भल्या पहाटे निघालेल्या या तरुण तुर्काने इथे पहिला नंबर लावला होता! बरं, काल रात्रीच त्यांनी रेल्वे आरक्षण तट्ट असल्याचे जाहीर केले होते. आता मला प्रश्न पडला की यांना मांजरीसकट बरा ट्रेनमध्ये प्रवेश मिळाला ! मग त्यांनीच खुलासा केला की त्या मांजराचे आधारकार्ड मुंबईचे नसून पुण्याचेच आहे !! मग त्या मांजरीस अलविदा करून आम्ही दोघे अन्य मंडळींच्या स्वागतास सज्ज जाहलो.
( क्रमशः)

सुबोध खरे's picture

23 Sep 2019 - 10:33 am | सुबोध खरे

.

तुमच्या ताजमहालासारखा आमचा सुद्धा बिबि का मकबरा
पुण्याचा कट्टा ठरतो आहे पाहून मला सुद्धा वाटायला लागले कि आपणही मिपाकरांना भेटायला पाहिजे. म्हणून शनिवारी मी "मिळून मिसळून" या मिपाकरांच्या व्हॉट्स ऍप ग्रुप वर रविवारी सकाळी ठाणे येथे "मेतकूट" या हॉटेलात नाश्त्यासाठी कोणी येऊ शकेल का असा संदेश पाठवला. त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही चौघे जण सकाळी ९ वाजता मेतकूट मध्ये भेटलो.

उजवीकडून डावीकडे मी, खटपट्या, मोदक आणि अत्रन्गि पाऊस असे चौघे भेटलो.

सुरुवात कांदा भजीनी झाली मग भाजणीचे धिरडे, दडपे पोहे, अळू वडी आणि अपा यांची फर्माईश म्हणून बटाटा भजी असे सुग्रास खाऊन वर चहा कॉफी पिऊन भरल्या पोटाने आणि तृप्त मानाने मंडळी साडे अकरा वाजता रवाना झाली.

जॉनविक्क's picture

23 Sep 2019 - 6:22 pm | जॉनविक्क

कुठे सफरचंद, कुठे टोमॅटो.

छया पूर्वीचे मिपाच राहिले नाही... ;)

कुमार१'s picture

23 Sep 2019 - 11:26 am | कुमार१

....
पुणे : भाग २

कंजूस आणि माझी ही प्रथमच भेट. आमची ओळखपाळख होत नाही तोवरच प्रचेतस हजर झाले. चला, दो से भले तीन ! मग आम्ही हळूच त्या ‘पाताळात’ प्रवेश केला. आता ही मोहक पुरातन लेणी पहायची आणि साथीला त्याचा इतिहास कोळून प्यालेले आपले प्रचेतस. दुधात साखरच म्हणाना. त्या प्रवेशद्वाराशीच असलेला शिलालेख मला तरी अदृश्यच होता. पण प्रचेतस यांनी त्यावर एक नजर टाकताच तो एकदम लख्ख दिसू लागला !

तिथल्या सुखद गारव्याचा आम्ही अनुभव घेतोय तोच मिपाचे मधल्या फळीतील दमदार फलंदाज (कप्तानासह) तिथे अवतरले. आतला शांत परिसर समीर यांच्या दमदार आवाजाने थरारून गेला ! गेली ११ वर्षे निव्वळ मिपावाचनमात्र असणारे हे चोखंदळ वाचक.
.......
प्रिय कट्टेकरिंनो, या वृत्तांताची गाडी मी २ स्थानके चालवत आणली आहे. आता चक्रधराची जागा अन्य कोणी घेऊन ती फुडे हाकत रहावी ही इनंती !

जव्हेरगंज's picture

23 Sep 2019 - 1:36 pm | जव्हेरगंज

एक नंबर लिवलंय....

याच्या पुढचेही तुम्हीच लिहावे ही इनंती!!

jamesrao bondpatil's picture

24 Sep 2019 - 6:05 pm | jamesrao bondpatil

भाऊ काइतर जबरदस्त लिहा, तुमच्या साठी आलोय मी ईथे..

टर्मीनेटर's picture

23 Sep 2019 - 2:54 pm | टर्मीनेटर

वा! छान झाला की कट्टा... संपूर्ण वृत्तांत वाचायला आवडेल.

@कंजूस काका -फोटो छान!
@कुमार१ - वृत्तांताची छोटेखानी झलक आवडली.

कुमार१'s picture

23 Sep 2019 - 3:34 pm | कुमार१

जव्हेरगंज, टर्मिनेटर, समीरसूर आणि अन्य सर्व प्रतीसादकांचे आभार
******************************
भाग ३ :
आता कट्टासंघातील ८ खेळाडू हजर झाले होते. नावे वर लिहिलीच आहेत. त्यातील प्रकाश घाटपांडे हे अजून एक तरुण तुर्क ! लेण्यांवर एक दृष्टीक्षेप टाकून आम्ही पाताळातून पुन्हा धरतीवर आलो !

आता नव्या भेटीगाठीनी खूप मस्त वाटत होते. गोलाकार उभे राहून गप्पा चालू असतानाच नववे खिलाडी लोथार मथायस दाखल झाले. हे आपले पुणेकर त्या जर्मन पायचेंडूपटूच्या इतक्या प्रेमात पडले की ते स्वताचेच खरे नाव विसरून गेलेत !

आता आम्ही सर्व ९ पुरुष मंडळी टवाळ होऊ लागणार इतक्यात यशोधरा अवतरल्या ! अशा तऱ्हेने कट्टा दशक पुरे झाले होते. आता थोडे आत येऊन काळ्या कातळावर जमेल तसे बूड टेकवून कट्टासभा सुरु झाली.
( क्रमशः)

लोथार मथायस सगळ्यात शेवटी आले. येता येता ते पाताळेश्वराच्या कुंपणापलीकडून आपल्या घोळक्याकडे बघत होते, तेव्हा आपण म्हणालो सुद्धा की कोणी मिपाकर दिसताहेत! बाकीच्या मिपाकरांना शोधताहेत म्हणून. :)

कुमार१'s picture

23 Sep 2019 - 3:48 pm | कुमार१

चू भू दे घे ☺️

सर्वसाक्षी's picture

23 Sep 2019 - 3:39 pm | सर्वसाक्षी

बर्‍याच दिवसांनी कट्ट्याविषयी वाचायला, ऐकायला मिळालं. बरं वाटलं

पद्मावति's picture

23 Sep 2019 - 4:36 pm | पद्मावति

मस्तं वर्णन. वाचतेय.

सुधीर कांदळकर's picture

23 Sep 2019 - 4:49 pm | सुधीर कांदळकर

मस्त वृतान्त आणि त्यावरील प्रतिक्रिया. खासकरून उपस्थितांच्या, त्यातूनही भस्म न झालेल्यांची.

मजा आली. वाचायला. पुढील कट्ट्याला शुभेच्छा, धन्यवाद.

कुमार१'s picture

23 Sep 2019 - 5:26 pm | कुमार१

अहो,
नुसत्या शुभेच्छांनी नाही भागणार सुधीरभाऊ. पुढच्या कट्ट्यास तुमची उपस्थिती आवश्यक ! आमाला आवडेल ना तुमच्या मांडीला मांडी लावून बसायला आनि ते रंजन का गुंजन पुन्हा एकवार कराया !!

उपेक्षित's picture

23 Sep 2019 - 7:19 pm | उपेक्षित

जल्ला मेला आज पायला धागा २ दिस आजारी होतो त्यामुळे. :(
लयीच घाईत झाला पण एका धाग्यात झाला :) {उगाच बाहेरच्या लोकांनी अफवा पसरवाल्यात मेल्यांनी पुणेकरांबद्दल :) }

कुमार१'s picture

23 Sep 2019 - 7:38 pm | कुमार१

आता प्रत्येकाचा परिचय, इथले नाव, घरचे नाव, काय काय ‘उद्योग’ करतो....इ.इ. चे प्रांजळ कथन सर्वांनी केले. याची सांगता अर्थातच नीलकांत यांनी केली. या सर्व गोष्टींची नोंद मिपा आयोगासमोर ‘इन क्यामेरा’ झालेली आहे ! ती इथे जाहीर करण्यास मिपा घटनेनुसार सक्त मनाई आहे. फक्त पुढील कट्ट्यास उपस्थित राहणाऱ्यांनाच ती माहिती मिळू शकते !

तर मंडळी, असा हा परस्पर परिचय आणि स्नेह वाढविणारा सुरेख कट्टा. ‘श्रीगलेमा’च्या सुंदर मेजवानीनंतर मोजक्या मिपाकरांनी अनुभवलेला. मिपाला आता एक तप पुरे होऊन गेलेले आहे. आभासी जगाच्या इ-पडद्यावर आपण सगळे वावरत आहोतच. त्यातून एकमेकाबद्दल थोडीफार माहिती कळते, व्यक्तिमत्वाचा जरा अंदाज येतो खरा. पण, प्रत्यक्ष भेटीची सर या जालवावराला नाहीच. म्हणूनच भेटीगाठी आवश्यक. खादाडी झाली का, झाली असल्यास काय खाल्ले वगैरे गोष्टी गौण आहेत, नाही का?

या संदर्भात माझ्या एका आवडत्या इंग्लीश अवतरणाने या वृत्तांताचा शेवट करतो:

You can learn more about a person in an hour of play than in a year of conversation.
कट्टा संयोजक, उपस्थित सभासद आणि इथले सर्व वाचक यांना धन्यवाद !

टर्मीनेटर's picture

23 Sep 2019 - 7:53 pm | टर्मीनेटर

१००% सहमत...
आभासी दुनियेतील व्यक्तिरेखा आणि प्रत्यक्ष भेटीतला अनुभव ह्या दोन्ही खूप वेगळ्या गोष्टी आहेत.
रच्याक: मी मिपाकर झाल्यापासून मालक नीलकांत ह्यांचे काहीच लेखन वाचनात आले नाहीये, तेव्हा त्यांना नम्र विनंती की, कृपया ह्या कट्ट्याचा वृत्तांत त्यांनी शब्दबद्ध करावा....

यशोधरा's picture

23 Sep 2019 - 7:47 pm | यशोधरा

मस्त वृत्तांत हो डॉ. छान लिहिलेत.

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 Sep 2019 - 11:26 pm | बिपीन सुरेश सांगळे

खूपच छान
सुंदर

मी रविवारी दिवस भर एका कार्यक्रमात होतो
नाहीतर यायला खूप आवडलं असतं

प्रचेतस's picture

24 Sep 2019 - 8:30 am | प्रचेतस

कुमार१ ह्यांनी लिहिलेला वृत्तांत खूप आवडला. कंजूस काकांचे इतक्या लांबवर आल्याबद्द्ल खास कौतुक.

काही क्षणचित्रे
लेण्यांतील गप्पांत रमलेले मिपाकर

डावीकडून कंजूस, कुमार१, महासंग्राम, प्रशांत, नीलकांत आणि समीर शेलार

a

हसरे मिपाकर

a

कुमार१'s picture

24 Sep 2019 - 9:17 am | कुमार१

काढलेत प्रचेतस !
धन्यवाद

जव्हेरगंज's picture

24 Sep 2019 - 10:50 am | जव्हेरगंज
जालिम लोशन's picture

24 Sep 2019 - 4:23 pm | जालिम लोशन

मस्त

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Sep 2019 - 9:37 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नंबर एक. आवडेश. लगे रहो.

-दिलीप बिरुटे

तुषार काळभोर's picture

24 Sep 2019 - 11:00 pm | तुषार काळभोर

मस्त

कुमार१'s picture

24 Sep 2019 - 11:06 am | कुमार१

चलत्चित्र छान केले आहे. आवडले.
धन्यवाद.

कशी आहे पाताळेश्वर लेणी?
विडिओ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Sep 2019 - 9:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कंजुसकाका, व्हिडीयो चित्रण आवडले.

-दिलीप बिरुटे

चौथा कोनाडा's picture

25 Sep 2019 - 11:35 am | चौथा कोनाडा

जव्हेरगंज, क्लिप एक नंबर ! वाह !

नीलकांत's picture

25 Sep 2019 - 11:48 am | नीलकांत

खुप दिवसांनंतर मिपाकरांना भेटता आले. मिपाकरांना भेटताना नेहमीच एक अनुभव येतो की चेहरा अनोळखी असतो माणुस मात्र ओळखीचा वाटतो. नेहमीच्या चर्चेने गप्पा करण्याइतपत सवयीचे अनोळखी चेहरे पाहून मजा येते. अर्थात त्यानंतर ते लोक आपले जवळचे होतात.

कट्ट्याला कंजूस काका आले होते. थोडाच वेळ थांबता येईल हे माहिती असून सुध्दा ते एवढ्या दुरून आले हे विशेष वाटले. कुमार१ सरांशी भेट झाली. सोबतच महासंग्रामसोबत पेपरात काही देतोस का अशी विचारणा झाली मात्र पत्रकार काही ऐकेनात. ते आपले फक्त पाचशे वर अडून बसले. या निमीत्ताने फक्त ५० यांची सुध्दा आठवण निघाली.
प्रशांत, वल्ली आणि यशोधरा यांच्याशी गलेमा आणि आगामी दिवाळी अंकाच्या गप्पा झाल्या. प्रकाश घाटपांडे काकांची अनेक वर्षांनी भेट झाली. लोथार मथायस नवीन होते त्यांच्याशी छान गप्पा झाल्या. मला कटट्याची एक विशेष मदत होते ती म्हणजे मिपाबाबत प्रत्यक्ष फिडबॅक मिळतो. काय केलं पाहिजे. काय बदल हवाय असे नवनवीन समजते. समीर शेलार तसे नवीन होते पण ते एवढ्या लोकांना ओळखतात आणि श्रामो व बिकाच्या गप्पा झाल्या. एकंदरीत मजा आली.

- नीलकांत

चौथा कोनाडा's picture

27 Sep 2019 - 9:05 pm | चौथा कोनाडा

+१०, ००१

प्रत्यक्ष नीलकांत यांच्या लेखणीतून वृतान्त ! क्या बात हए !

नमस्कार नीलकांतसाहेब.

कुमार१'s picture

25 Sep 2019 - 12:16 pm | कुमार१

संस्थळावर काही काळ वावरल्यानंतर आपण इथल्या एखाद्या व्यक्तीबद्दल मनात एक रेखाचित्र उभे करतो. ते अर्थातच काल्पनिक असते. ते पूर्णपणे आपले कल्पनारंजन असते. या कट्ट्याला मालकमंडळी येणार म्हणून उत्सुकता होतीच. प्रशांत यांचा फोटो आधीच पाहिलेला असल्याने प्रश्न नव्हता. आता नीलकांत हे कसे असतील याचे एक चित्र मनात रेखाटले होते. असा अंदाज केला होता की ते एक मध्यमवयीन, छानपैकी मिशा राखलेले करारी गृहस्थ असावेत !

वास्तव आता आपल्यासमोर फोटोच्या रूपाने आहेच ! उत्साहाने सळसळते तरुण, विनम्र आणि सर्वांच्या सूचना अगदी प्रेमाने ऐकून घेणारे असे.
असा कल्पना आणि वास्तवदर्शन यात जो खूप फरक निघतो, तो देखील आनंददायी असतो !

हे कट्टे नेमकं काय प्रयोजनासाठी असतात ? कट्टा अटेंड करायचा नेमका अनुभव कसा असतो ? तेथे काय उपक्रम असतात यावर अधिकृत सविस्तर माहिती हवी होती तसेच कट्टे मिपाच्या ध्येयधोरणात बस्तात काय आणि कट्याला मिपाची ध्येयधोरणे व आचारसंहिता लागु आहे काय ?

चौथा कोनाडा's picture

25 Sep 2019 - 5:43 pm | चौथा कोनाडा

अटेंड करायचा अनुभव खुप छान असतो. एकदा आले की पुन्हा यावे वाटते. मिपातल्या दिग्गज सेलिब्रेटीना भेटून भारावून जायला होते.

यावेळी कट्टा पुण्यात असून ही उपस्थित राहता आले नाही याचे वाईट वाटले !

एकदा योग जमवून आणा. पहा कसे वाटते. सांगा अम्हालाही अनुभव तुमचा !

ह्या कट्टा प्रकरणाने मनाची उत्सुकता फारच शिगेला पोहोचली होती.
दर वेळी मिपा एक नवीनच सरप्राइज असते. मला आधी वाटले होते की फक्त सास, सम वगैरेंनाच कट्याची परवानगी आहे. पण इथे तर सामान्य वाचकही कट्यास उपस्थित राहून आपल्या आवडत्या मिपा लेखकाला/मिपाकरांना प्रत्यक्ष भेटून अत्यन्त सुखावून जात असला पाहिजे.

अतिशय स्तुत्य उपक्रम _/\_

राजेंद्र मेहेंदळे's picture

25 Sep 2019 - 1:22 pm | राजेंद्र मेहेंदळे

a

जॉनविक्क's picture

25 Sep 2019 - 1:30 pm | जॉनविक्क

देशातही कोणी कट्टा म्हणणार नाही

कट्टानुभव
कट्टा अटेंड करायचा नेमका अनुभव कसा असतो ?

इथे आपण एखादा विषय मांडतो, चर्चा होते. काही जणांना आपल्या विषयाची आवड आहे हे कळतं. मग बरेच लेखन, खरड, वैयक्तिक निरोपही होतात. मग समजतं जवळपास राहात आहे. भेटून तो सभासद कसा आहे ते पाहतो. हीच गम्मत.

दीड तासाच्या कट्ट्यात फारसे बोलणं होत नाही. पण तो उद्देश नसतोच. पुन्हा लेखनातून संवाद होतच राहतात.
बाकी मिपाधोरण किंवा कोणत्याही छापील माध्यमास संयमित/मर्यादित/व्यक्त होण्याचे धोरण ठेवावेच लागते. मिपाकरांनी एकमेकास भेटून काही बोलणे वगैरे केले त्याचा थेट संबंध कसा लावणार?
आचारसंहिता वगैरे प्रश्न मला कळला नाही.

कट्टानुभव
कट्टा अटेंड करायचा नेमका अनुभव कसा असतो ?

इथे आपण एखादा विषय मांडतो, चर्चा होते. काही जणांना आपल्या विषयाची आवड आहे हे कळतं. मग बरेच लेखन, खरड, वैयक्तिक निरोपही होतात. मग समजतं जवळपास राहात आहे. भेटून तो सभासद कसा आहे ते पाहतो. हीच गम्मत.

दीड तासाच्या कट्ट्यात फारसे बोलणं होत नाही. पण तो उद्देश नसतोच. पुन्हा लेखनातून संवाद होतच राहतात.
बाकी मिपाधोरण किंवा कोणत्याही छापील माध्यमास संयमित/मर्यादित/व्यक्त होण्याचे धोरण ठेवावेच लागते. मिपाकरांनी एकमेकास भेटून काही बोलणे वगैरे केले त्याचा थेट संबंध कसा लावणार?
आचारसंहिता वगैरे प्रश्न मला कळला नाही.

जॉनविक्क's picture

25 Sep 2019 - 2:20 pm | जॉनविक्क

आचारसंहिता वगैरे ...

आचारसंहिता वगैरे म्हणजे इथे व्यक्त होताना ती पाळली गेली नाही तर प्रतिसाद संपादित होतो, समज मिळते अथवा बॅनही होऊ शकतो. तसेच कट्ट्यावर व्यक्त होताना काही पथ्ये पाळायची असतात का व ती मिपाचेच रुल्स एक्सटेंड करतात की कसे ?

मिपाचे नाहीत पण सार्वजनिक ठिकाणचे.

कुमार१'s picture

25 Sep 2019 - 6:24 pm | कुमार१

‘कट्टा’ या विषयाच्या अनुषंगाने मी एक आवाहन करतो.

संस्थळावरील लोकांच्या गाठीभेटी याव्यतिरिक्तही अन्य प्रकारचे कट्टा-उपक्रम समाजात चालू असतात. आपल्यातील काही जण अशा उपक्रमांचे सभासद असू शकतील. तर त्याची माहिती /अनुभव स्वतंत्र धागा काढून लिहीता येतील. आपल्या महाविद्यालयीन जीवनातील असे काही अनुभव देखील असू शकतात. नमुन्यादाखल माझ्या यासंदर्भातल्या एका जुन्या लेखाचा दुवा देतो:

https://misalpav.com/node/40878

जर अशा काही माहितीचे संकलन झाले तर आपण ‘कट्टा’ या शब्दाकडे व्यापक दृष्टीने बघू शकू.

सुंदर संकल्पना डॉक्टर . टोस्ट मास्टर पण अशा विषयावरती चालतो ना?

कंजूस's picture

26 Sep 2019 - 6:37 am | कंजूस

इतर कोणते कट्टे?

संस्थळावरील लोकांच्या गाठीभेटी याव्यतिरिक्तही अन्य प्रकारचे कट्टा-उपक्रम समाजात चालू असतात. आपल्यातील काही जण अशा उपक्रमांचे सभासद असू शकतील. तर त्याची माहिती /अनुभव स्वतंत्र धागा काढून लिहीता येतील.

दहा वर्षे नियमित चालू असलेला एक कट्टा मुंबईत आहे. आयोजक डॉ उषा देसाई (80) आणि रिनि व्यास (70) आहेत. दर महिन्याला एका रविवारी कट्टा मुंंबईतल्या एका पार्कमध्ये सकाळी साडेसात ते साडेनऊ वेळात होतो. झाडांची ओळख हा विषय. बागेत फिरून झाडांची माहिती घेतात. साधारणपणे पन्नास ते सत्तर लोक येतात. निम्मे पंचवीशीतील असतात. (फक्त सिनिअर सिटिझन हाफ तिकिट नाहीत). कोणतेही इन्फ्रास्ट्रक्चर नाही, खर्च नाही, अवडंबर नाही.
मी या कट्ट्याला अधुनमधून जातो. एक लेखही लिहिला आहे -ठाण्यातला पाचू दत्ताजी साळवी उद्यान.

याचे फेसबुक पेज
Tree Appreciation Walks Mumbai - facebook public group page

मुंबईत फार्मास्युटिकल केमिस्ट्स असोसिएशन वर्षातून तीन कट्टे भरवीत असे. २६ जानेवारी, १ मे आणि १५ ऑगस्ट. १००/१५० च्या आसपास लोक असत. बहुतेक सारे औषध कारखान्यात काम करणारे `अन्न आणि औषधे कायद्याखाली मान्यताप्राप्त तांत्रिक अधिकारी.

स्थळ असे बोरिवली राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनीतले मॉडर्न बेकरी समोरचे क्रीडांगण वा असेच कोणतेतरी. न्याहारी, जेवण आणि केव्हाही मिळणारा चहा हे सारे वर्गणीत अंतर्भूत असे. मी औषध कंपनीतली नोकरी सोडल्यानंतरही मला चिटणिसांची आमंत्रणपत्रिका आणि दिवाळीचे शुभेच्छापत्र येत असे.

माणसे जरी एवढी असली तरी कुठे ८-१०, कुठे २५-३० तर कुठे ४-५ असे अनेक वेगवेगळे गट बसत. नवीन तंत्रज्ञानाची देवाणघेवाण, औषध नियंत्रण कायद्यातले फेरफार, कामगार कायदे इ. इ. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालत. काही जण फक्त पत्ते कुटत. कोणती चर्चा कुठे चालू आहे हे पाहून आपल्या आवडीप्रमाणे वा गरजेप्रमाणे कोणीही कुठेही घुसत असे. गाण्यांच्या कॅसेटसची देवघेव देखील गाणी उतरवून घेण्यासाठी होई.

नवीन संशोधनाबाबत प्रशिक्षण देखील औषध प्रशासनाच्या साहाय्याने दिले जाई. हेपेटायटीस बी, लेप्टोस्पायरॉसिस, चिकुनगुनिया इ. रोगांबद्दल प्राथमिक माहिती आणि समाजजागृती अशा अनेक चांगल्या कार्यक्रमांची माहिती इथे मिळत असे.

त्यातच एका फिल्म क्लबचा देखील कट्टा होत असे आणि त्या क्लबतर्फे दर्जेदार सिनेमे दाखवले जात. आपली आवड जाणून काही चित्रपटांना आपल्याला खास आमंत्रित म्हणून आमंत्रण दिले जायचे. 'बायसिकल थीफ'सारखे काही दर्जेदार सिनेमे मी खास आमंत्रित म्हणून पाहिलेले आहेत.

अगदी पाचेक वर्षापूर्वी मला माजी सचिवांनी शास्त्रीय संगीताच्या काही डीव्हीडी स्पीड पोस्टने पाठवल्या होत्या.

अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाषणबाजी टाळून कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त माहिती सांगणे आणि श्रोत्यांच्या प्रश्नांना उत्तरे अशा स्वरूपात ३०-४० मिनिटात देखील सैद्धान्तिक आणि अनुभवाचे बोल अशी मोलाची माहिती मिळे.

कुमार१'s picture

26 Sep 2019 - 12:48 pm | कुमार१

वा !
टीपी के, कंजूस व सुधीर,
उपयुक्त माहिती.
टी पी, हे टोस्ट मास्टर के असते ?

टीपीके's picture

26 Sep 2019 - 4:03 pm | टीपीके

टोस्टमास्टर

Toastmasters International is a US headquartered nonprofit educational organization that operates clubs worldwide for the purpose of promoting communication and public speaking skills.

विकि

जरा फॉर्मल क्लब किंवा कट्टा :)

कुमार१'s picture

26 Sep 2019 - 4:38 pm | कुमार१

छान कल्पना
धन्यवाद

विजुभाऊ's picture

26 Sep 2019 - 1:07 pm | विजुभाऊ

लोथार ला इंग्लंडला भेटलो होतो.
भारतात कधी आलास.
फोन्नंबर कळव

कट्ट्याला काही खास मजा आलेली दिसत नाही.

खाण्यापिण्याची काही खास मजा नाही.

उन्हातान्हात, पावसात चांगलीच रखडपट्टी झाली असावी.

फोटोही तेच तेच फिरवून छापावे लागलेले दिसतात.

चर्चेचे विषयही काही फारसे चमचमीत वाटले नाहीत.

एकूण विशेष मजा आलेली दिसत नाही.

एकंदरीत पुणे येथील कट्टे ठाण्याप्रमाणे कितपत मनोरंजक, सकारात्मक आणि सामाजिक संदेश देणारे बांधिलकी दाखवणारे असतात याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते असे परखड मत नोंदवून मी खाली बसतो.

कोण आयोजक होतं बरं यावेळी?

धन्यवाद. (प्रशांत, पुढील दोनशे प्रतिसादांची सोय केल्याबद्दल अल्प शुल्क पेपालने स्वीकारतो)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2019 - 1:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एकंदरीत पुणे येथील कट्टे ठाण्याप्रमाणे कितपत मनोरंजक, सकारात्मक आणि सामाजिक संदेश देणारे बांधिलकी दाखवणारे असतात याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होते असे परखड मत नोंदवून मी खाली बसतो.

अगदी अगदी..!

कोण आयोजक होतं बरं यावेळी?

वल्लीशेठ होते म्हणे, पण ( नेहमीप्रमाणे कारणे दाखवून माघार) ऐनवेळी मग प्रशांतकडे जवाबदारी आली.
पण कसे का असेना, प्रशांतसेठ निभावून नेतात. मग कट्टा असो, की सायकल प्रवास, की मित्र असोत.

बाय द वे गविशेठ, मी जर आलो असतो तर मला तुमच्या शेजारी उभे राहुन फोटो घ्यायचा होता.
काढू दिला असता की धुसफुस केली असती ? :)

-दिलीप बिरुटे

वल्लीची लेणी पायपीट आयोजन वगळता इतरत्र धरसोड असतेच वृत्ती. पण अर्रर्र, आपले प्रशांतशेठ होते का फायनल आयोजक? दिलगिरी.

एक उत्तम कट्टा. पुकप्र.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Sep 2019 - 2:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

एक उत्तम कट्टा. पुकप्र.

असेच म्हणतो.

मिपाकट्टा म्हणजे तरी काय असतो. भेटणे, बोलणे, लिहिणे, प्रोत्साहन देणे.
आणि जालीय आयडी-व्यक्तिमत्वांच्या मुखवट्यात प्रत्यक्ष काही क्षण सुखाचे.

अरुण कोल्हटकरांची क्षमा मागून, त्यांच्या कवितेत बदल करुन लिहितो.

''माझ्या मिपाचा बोर्ड कोरडा नको ठेवू
आमचे सर्वांचे प्रतिसाद पावसात भिजो,

शाही फुटो,
ही अक्षरं विरघळोत,
आमच्या लेखनांचा लगदा होवो.
या जालजगतात,
आमच्याच मिपाच्या अंश सापडो.''

प्रशांतसेठ, छान झाला कट्टा. आता औरंगाबादला करु कट्टा.

-दिलीप बिरुटे

''माझ्या मिपाचा बोर्ड कोरडा नको ठेवू
आमचे सर्वांचे प्रतिसाद पावसात भिजो,

शाही फुटो,
ही अक्षरं विरघळोत,
आमच्या लेखनांचा लगदा होवो.
या जालजगतात,
आमच्याच मिपाच्या अंश सापडो.''

तुमच्या या प्रतिभेपायी बाकी कसे का असेनात, आम्ही तुम्हाला वंदनीय मानतो. (अर्थात वय हाही एक भाग आहेच.)

प्रचेतस's picture

26 Sep 2019 - 2:41 pm | प्रचेतस

तुम्ही दोघेही 'दो हंसो का जोडा' आहात. एकाचा प्रतिसाद आला की दुसरा येतो, दुसर्‍याचा आला की पहिला येतो.

गवि's picture

26 Sep 2019 - 2:44 pm | गवि

+१०१

ये रिशता है बरसो पुराना हमारा
सलामत रहे दोस्ताना हमारा..

प्रचेतस's picture

26 Sep 2019 - 2:54 pm | प्रचेतस

=))

प्रचेतस's picture

26 Sep 2019 - 2:39 pm | प्रचेतस

प्रशांतसेठ, छान झाला कट्टा. आता औरंगाबादला करु कट्टा.

वेरुळला केलात तर मी येईन.

वेरुळला केलात तर मी येईन.

हा असेल तर पायपीट, वणवण वॉर्निंग देणं हे जनहितार्थ कर्तव्य पार पाडलं पाहिजे.

पण त्या लेण्यांशी एकरुप होण्याबाबत मात्र __/\__

एकदा कैलासाच्या दारात काहीजण उभे असताना अमुक पावले सरळ जाऊन डावीकडे पहा की तमुक मूर्ती. पुढे डावीकडे अमुक पावले तिथे अमुक क्रमाने या मूर्ती. तिथून किती पायऱ्या वर चढल्यावर नेमकं समोर काय येईल हे हा मनुष्य बसल्या जागेवरून त्यांना संदेश पाठवून सांगत होता.

प्रचेतस's picture

26 Sep 2019 - 2:53 pm | प्रचेतस

वेरुळला फारशी पायपीट, वणवण नाही. निवांतपणं होतं सगळं. तुम्ही या ना भो.

तुम्ही तिकडेच वस्तीला असता का?

प्रचेतस's picture

26 Sep 2019 - 3:02 pm | प्रचेतस

नै हो, अधीमधी जातो इतकंच.

प्रशांत's picture

26 Sep 2019 - 2:01 pm | प्रशांत

तुम्हि ठाण्याला कट्टा ठरवा आम्हि येवु.

बर्‍याच लोकांना जेवणासाठी थांबणे शक्य नसल्याने यावेळी जेवणाचा बेत हुकला.

तुमच्या प्रतिसादाच्या उप प्रतिसदाला किती कमिशन?

आधी ट्रान्सफर झालेले दिसूदेत डोळ्यांना. मग बघू.

ओह, नुसतेच मुंकेस होते होय? =))

जॉनविक्क's picture

26 Sep 2019 - 2:01 pm | जॉनविक्क

जसं बुद्धिबळ खेळणाऱ्याला आपल्यापेक्षा वरचढ /समतुल्य प्रतिस्पर्ध्याशी खेळायचं असतं तसं काही कट्टेकऱ्यांचही असतं बहुतेक. नाही तर ते टाळतात.

अरे वा, छान झालाय कट्टा. काही नविन चेहरे दिसले. यशोताईंचे दर्शन झाले.