Relaxed Attentive

Primary tabs

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जनातलं, मनातलं
12 May 2019 - 10:56 am

थोडं मुक्तचिंतन करायचा प्रयत्न करतोय.

मॅट्रिक्स सिनेमात मॉर्फियस निओ ला मार्शल आर्ट शिकवताना सांगतो, 'Don't try to hit me, and hit me!' सिनेमा बघितल्यापासून त्यातली अनेक वाक्य जी समजायला अवघड आहेत असं वाटलेलं त्यापैकी हे एक. अनेक वाक्य दरवेळी नव्याने अधिक उलगडत जातात. हे त्यातलंच एक.

किंवा कॅरम खेळणाऱ्या तरबेज लोकांचा खेळ बघणं पर्वणी असते. त्यांचा गेम प्लॅन, स्ट्रोक्स च नियंत्रण वगैरे गोष्टी आकर्षक असतातच पण मला मोहात पाडते ती गोष्ट थोडी वेगळीच. अनेक वर्षांच्या गॅप नंतर कॅरम खेळायला सुरवात केल्यावर काही काळाने बरी पकड आली खेळावर. अनेकदा अवघड सोंगट्या पण हुकमी घेता येऊ लागल्या. पण अनेकदा अनुभव असा आला की उत्तम खेळणाऱ्या समोर साधारण 5व्या बोर्ड नंतर बाजी उलटायला सुरवात होत असे. म्हणजे एकदा तर 18-0 आघाडी असताना मी गेम हरलो होतो.

नंतर त्याच्याशी बोललो तेंव्हा काही मुद्दे स्पष्ट झाले. खेळताना मी टेंस होतो. तो ताण 8 बोर्ड कायम ठेवून उत्तम खेळत राहणं अवघड असतं. खेळताना न ठरवलेल्या गोष्टी घडत असतात. उदा. पाचव्या ब्रेकमध्ये माझे 2 डबलड्यु झाले होते. त्यामुळे मी डिस्टर्ब झालो. आणि मग चुका वाढत गेल्या.

सगळ्याचं सार असं की या मोठ्या खेळाडूंकडे एक दुर्मिळ मानसिकता असते. Relaxed Attentiveness असं म्हणता येईल त्याला. ते नेम धरत नाहीत तर त्यांच्याकडून नेम धरला जातो, ते स्ट्रायकरला टिचकी मारत नाहीत तर ती त्यांच्याकडून मारली जाते. सोंगटी घेतली जावी अशी इच्छा धरूनच खेळतात पण नाही गेली तर मनःस्थिती बिघडत नाही. परिस्थिती अवघड आहे, स्ट्रायकर हाती आल्यावर समोरच्याच्या फक्त 3 सोंगट्या बाकी आहेत याचं त्यांना टेन्शन येत नाही. They are in a zone, trans like state of mind.

अशी मानसिकता कॅरमच नव्हे तर सगळ्या खेळातल्या उच्च खेळाडूंची असते. आयुष्याचा खेळ खेळताना आपली मानसिकता तशी करता आली तर त्यासारखं सुख नसेल.

तुम्हाला काय वाटतं मंडळी?

-अनुप

तंत्र

प्रतिक्रिया

पैलवान's picture

12 May 2019 - 11:35 am | पैलवान

आपापल्या क्षेत्रात असं कौशल्य बहुतेक लोकांकडे असतंच.
किंबहुना ज्यांच्याकडे असतं, त्यांना पुढे जाणं सोपं जातं.

हे कौशल्य येण्यासाठी प्रचंड आणि प्रचंड सराव/प्रॅक्टिस/रियाझ यांची गरज असते.

जालिम लोशन's picture

12 May 2019 - 11:39 am | जालिम लोशन

छान.

कॉलिंग संक्षी..त्यांचे यातले मुक्त चिंतन ऐकले नाही तर दिवस वाया जाईल.

अन्या बुद्धे's picture

13 May 2019 - 2:08 pm | अन्या बुद्धे

संक्षी कोण आहेत? मी नवखा असल्याने ओळख नाही.. कसे पोचू तिकडे ते ही माहीत नाही..

mrcoolguynice's picture

12 May 2019 - 12:46 pm | mrcoolguynice

छान लेख.

सदर चित्रपटातले एका सीन्सची आठवण, एका मित्राला, योगतील चक्रासन करतना आजही येते... पाठ दुखावल्याने.

mrcoolguynice's picture

12 May 2019 - 6:54 pm | mrcoolguynice

Mtx

पैलवान's picture

12 May 2019 - 8:00 pm | पैलवान

4

mrcoolguynice's picture

12 May 2019 - 8:55 pm | mrcoolguynice

रैट्ट

वकील साहेब's picture

12 May 2019 - 12:53 pm | वकील साहेब

अप्रतिम. वाचनखून साठवत आहे.

टर्मीनेटर's picture

12 May 2019 - 1:16 pm | टर्मीनेटर

अशी मानसिकता कॅरमच नव्हे तर सगळ्या खेळातल्या उच्च खेळाडूंची असते. आयुष्याचा खेळ खेळताना आपली मानसिकता तशी करता आली तर त्यासारखं सुख नसेल.

कॅरम बद्दल विशेष ममत्व नसल्याने पास, पण बाकी खेळ आणि आयुष्याचा खेळ खेळतानाची मानसिकता (बिटवीन द लाईन्स- एकाग्रता आणि कौशल्य) बद्दल सहमत.

उगा काहितरीच's picture

12 May 2019 - 2:05 pm | उगा काहितरीच

मस्त ! कॅरम हा खेळ नेमबाजी वगैरे वगैरे पेक्षा मानसिक खूप जास्त आहे असं वाटते. आमच्या कंपनीची कॅरम टुर्नामेंट मी मागच्या वर्षी जिंकलो होतो. या वर्षी दुसऱ्याच राउंडमधे बाहेर पडलो. समोरचा चांगला खेळला आणि माझ्याकडून प्रेशर मधे साध्या साध्या पण सोंगट्या मिस झाल्या. नंतर त्याला मी सहज हरवले पण टुर्नामेंटमधे तो वरचढ होता. फक्त शांत होऊन ,डोकं शांत ठेवून खेळल्यामूळे तो जिंकला असं वाटते मला.

विजुभाऊ's picture

12 May 2019 - 4:43 pm | विजुभाऊ

अजून एक वाक्य
डोन्ट बेंड द स्पून.. बेंट द माइंड

अन्या बुद्धे's picture

13 May 2019 - 2:10 pm | अन्या बुद्धे

Know.. there is no spoon!

दुर्गविहारी's picture

12 May 2019 - 8:18 pm | दुर्गविहारी

उत्तम लिहिले आहे. शांत डोक्याने निर्णय घेतल्याने काय होते, याचे उदाहरण म्हणजे महेंद्रसिंग धोनीचे उदाहरण समोर आहेच..

त्याच्या शांत डोक़्यामुलेच वर्ल्डकपस ज़िंकता आले...

शेखरमोघे's picture

12 May 2019 - 8:22 pm | शेखरमोघे

लिहिलेले आवडले.

आपल्या Outliers या पुस्तकात Malcolm Gladwell या लेखकाने "एखाद्या क्षेत्रात तरबेज होण्याकरता त्यात किमान १०,००० तास समजून उमजून काम करावे लागते" (the "10,000-Hour Rule"-the key to achieving world-class expertise in any skill, is, to a large extent, a matter of practicing the correct way, for a total of around 10,000 hours) हा सिद्धान्त मान्डला. आता त्यावरही चर्चा आणि सन्शोधन होत असून मानसिक बल वाढणे याचा देखील मोठाच भाग असल्याचे निदर्शनास आले आहे.

अन्या बुद्धे's picture

13 May 2019 - 2:11 pm | अन्या बुद्धे

मिळवतो..

बिपीन सुरेश सांगळे's picture

14 May 2019 - 10:15 pm | बिपीन सुरेश सांगळे

एक प्रकारची जागृत समाधी अवस्था यावी लागते ,
पण खूप अवघड आहे
मी किंवा माझ्या सारखी सामान्य माणसे सतत परिस्थिती पुढे झुकत राहतात
एखाद्या भोवऱ्यात अडकल्यासारखी
त्यावर मात करणे हे अनेकांना शक्य असते
पण पुन्हा त्याची करणे वेगवेगळी असू शकतात
मोठा विषय आहे
अजून प्रतिक्रिया यायला हव्यात