" मासिक पाळी " याबद्दल शास्त्र काय सांगते ? पुराणामध्ये काही या विषयाबद्दल लिहिले आहे का ?
मिपाकरांनो , मला या विषयाबद्दल नेहेमीच औत्सुक्य वाटत आले आहे . खरं तर हा खूप महत्वाचा विषय आहे .. मासिक पाळी टाळण्यासाठी अजूनही स्त्रिया जे पण काही करता येईल ते करतात . कुणी आयुर्वेदिक उपाय करून ते लांबवतात तर कुणी ऍलोपॅथीच्या गोळ्या खाऊन लांबवतात . कारण एकच, धार्मिक विधी किंवा समारंभाला हजर राहणे .
खरंच याची गरज आहे का ? जे नैसर्गिक आहे ते आहे , ते उगाच गोळ्या खाऊन नाना उपाय करून का पुढे ढकलायचे ? उगाच गर्भाशयाच्या आजारांना का निमंत्रित करायचे ?
मी स्वतः माझ्या घरी यावर ठाम मते मांडली आहेत आणि ते करण्यापासून मज्जावही घातला आहे . त्या समारंभाला वाटल्यास हजर राहू नका पण ती पाळी पुढे ढकलण्यासाठी निदान गोळ्या तरी घेऊ नका .
कुणी महत्वाची व्यक्ती गैरहजर असेल तर , आपलेच नातेवाईक नको नको ते बोलतात . तिला काम करायचा कंटाळा आला असेल किंवा यायचेच नसेल .. बोलून देत , कुणाला फरक पडतोय ? निदान मला तरी नाही पडत , पण मी ज्यांना हे बळजबरीने करायला सांगतो त्यांचे मात्र चेहरे हिरमुसलेले असतात .
पुराणातही मला या विषयावर काही लिहिलेले आढळलेले नाही आहे . तरी देखील इतके न्यूनगंड मनात या विषयाबद्दल का बाळगावे ? का स्त्रियांना इतके दुय्यम वागविले जाते ? ते मला अजूनही कळलेले नाही आहे .
मुळात या प्रकारापासून लांब राहण्यासाठी ज्या काही पळवाटा त्या शोधतात त्या खरंच धोकादायक आहेत . त्यावर कुणीही भाष्य करत नाही , किंबहुना हे जे गर्भाशयाचे कर्करोग होतात त्यामागे हेच मुख्य कारण असावे असे माझे मत आहे .
मिपाकरांचे मत जाणून घ्यायला मी खरंच उत्सुक आहे . मग ते पुराणकालीन असो किंवा शास्त्रीय किंवा अजून दुसरे काही , पण मत मांडावी हि अपेक्षा ...
सिद्धेश्वर विलास पाटणकर
प्रतिक्रिया
असो
Ya विषयावर खूप वेळा काथ्याकूट
बाप्पू साहेब , मला माहित
आधी चर्चा झाल्या असल्यास दुवे
मासिक पाळीचा चा धर्माशी काही ही संबंध नाही
धर्मा च्या नावावर जे काही
मला अजून एक शंका आहे , ते
बरोबर !!!!!
90%?? आकडा कुठून काढला?
सेम प्रश्न..
सुरनीस !!!
माझ्या मते स्थिती खूप गंभीर
4 दिवस पगारी सुट्टी सुधा स्त्रियांना द्यावी प्रत्येक महिन्यात
4/5 दिवस पगारी सुट्टी सरकारनी
मी तरी अजून कुठलाही देव देवता
म्हणजे नेमके काय म्हणावयाचे आहे ?
मागाकाका , उशिरा प्रतिसाद देत आहे ..
अद्याप प्रश्न अनुत्तरीत आहे
देवी
हम्म