मराठी दिवस २०२०

मुलाखत अंश: गव्हर्नन्स ववर्नन्स आणि बोलाचीच् कढी

Primary tabs

mrcoolguynice's picture
mrcoolguynice in राजकारण
28 Dec 2018 - 12:32 pm

मुलाखत : सुब्रमण्यम स्वामी (भाजप / बीजेपी राष्ट्रीय नेते)
मुलाखतकर्ता : संजय पुगलिया

सु स्वा : आज नरेंद्र मोदींना हेच सांगतोय, निवडणुका ह्या कधीही इकॉनॉमिक परफॉर्मन्सवर जिंकता येतच् नाही. ना नरसिंहा राव जिंकले, ना वाजपेयी जिंकले (इंडिया शायनींग च्या नावाने), ना मोरारजी जिंकले (भाववाढ रोखाण्याच्या मुद्द्यावरून)... या दुनियेत , लोकांच्या भावनांना हात घालूनच् (जागं करून) जिंकतात (निवडणुका)...

सं पु: सर मग् हे जे क्रिटिक्स आहेत, त्यांचाच मुद्दा तुम्हीखरा सिद्ध करत आहात...
(तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ) गव्हर्नसने (सुशासन) , परफॉर्मन्सने, आश्वासनाच्या पूर्ततेने निवडणुका जिंकता येत नाहीत ...

सु स्वा : होय

सं पु: तर इमोशन्स व भावनेला हात घालूनच् निवडणुका जिंकता येतात ...

सु स्वा : होय

सं पु: असे म्हणुन , ज्या सरकावर (मोदी सरकार), तुम्ही पॉसिटीव्ह समालोचना करता, ... त्याच सरकारला तुम्ही असे म्हणुन (खुललंमखुल्ला ) लायसन्स देत आहात की , काम-वाम करू नका .... फक्त हिंदुत्वावर फोकस करा ... (फक्त)निवडणुका जिंकणेंच् जरुरी आहे.... हे म्हणजे फक्त सत्ता सुंदरीच्याच मागे धावण्यासारखे आहे ...

(पत्रकाराला मधेच काटून .... )

सु स्वा : नाही नाही , हे बघा , निवडणुका कश्यासाठी असतात .... सत्तेसाठी नसतात ? आम्ही काय आश्रमात जायला काय परवानगी मागण्यासाठी
लढतो का ? सत्तेतूनच जास्तीतजास्त कामे होऊ शकतात.
भावना भडकावणे हे वाईट नियतचे काम नाहीये.
हिंदूंची प्रभुसत्ता व अस्मिता त्याला आपल्याला उजळायला पाहिजे. आजपर्यंत काय राजकारण झालेय ७० वर्ष्यात .. हिंदूंना जातीत विभागा प्रांतात विभागा भाषेत विभागा वर्णात विभागा ... हिंदूंचे विभागुन ... अल्पसंख्याक यांना एकत्र करा. ख्रिश्चन मुस्लिम त्यांचे १५-१६% आणि एससी ओबीसी यांना बरोबर घेऊन , उमेदवार त्याप्रमाणे देऊन , ते त्यांची मेजॉरिटी बनवायचे , हेच चालत होते (परंतु)...
बीजेपीने २०१४ मध्ये पहिल्यांदा .... आणि मी आर एस एस चे आभार मानू इच्छितो की ... ते पहिल्यापासूनच याच् विचारांचे होते (भावना भडकवण्याचा), परंतु आम्ही लोकं (बहुदा त्यांना राजकीय विंग म्हणायचे असावे)मानत नव्हतो ... आम्ही म्हणजे जनसंघाचे लोक सुद्धा मानत नव्हतो ... वाजपेयींनी तर त्या (भावना भडकवण्याचा आयडियेला ), एकदमच ठोकरून दिलेले २००४ मध्ये , त्यामुळे (वाजपेयी) पराभूतदेखील झालेले.

ही नवी रणनीती बनली (2014 बीजेपी + आर एस एस ची) ,की ह्याच्या (आतापर्यंत चालत आलेल्या पद्धतीच्या) बर्रोब्बर उलट करूया आपण , हिंदूंचे कन्सॉलिडेशन करण्यासाठी , आपण हिंदूंच्या (भावना भडकवण्याचा) अश्या गोष्टी केल्या पाहिजे की हिंदू एकत्र (पोलराइज) झाला पाहिजे , विभागला न जावा ... (मात्र त्याचवेळी) मुस्लिमांच्यात महिलांना वेगळं पाडा ... ट्रिपल तलाक देऊन (मुद्दा पुढे आणून) इतर गोष्टी करून ... बोहरा शिया यांना सुद्धा वेगळं वेगळं पाडा , आणि हे सुन्नी जे आहेत खास करून वहाबी सुन्नी यांना वेगळं वेगळं पाडा ... तर आपण जिंकू ... आणि त्याच फॉर्मूलाने आम्हाला मेजॉरिटी मिळाली ... हे गव्हर्नन्स ववर्नन्स हे सगळं बोलाचीच् कढीआहे (बोलबच्चन आहे), त्याच्यामुळे (गव्हर्नन्समुळे) नाही जिंकलो.
(पत्रकाराला हसायला आलं... )
दोनच गोष्टींवर ९०% (निवडणुकीत २०१४ च्या )विजय मिळाला .

१. नरेंद्र मोदींची प्रतिमा , प्रचारासाठी एका प्रतिमेची (मुखवट्याची ) गरज होती , ती मिळाली (नरेंद्र मोदींच्या रूपाने), आणि २
नरेंद्र मोदींना देशभर फिरवलं , त्यातून एक विश्वास निर्माण करता आला , की गुजरातेत त्यांनी (जे काही(कदाचित त्यांना २००२ म्हणायचे असावे चूभूदेघे))
जे केलंय ते इथेही करता येईल.

प्रतिक्रिया

सुबोध खरे's picture

28 Dec 2018 - 12:34 pm | सुबोध खरे

ब्वॉर्र

ट्रम्प's picture

28 Dec 2018 - 2:36 pm | ट्रम्प

तुमच्या दिव्यदृष्टिला मोदी सरकार बद्दल अजुन काय ? काय ? नकारात्मक दिसेल ते शोधून इथे टाकत रहा , कदाचित तुमच्या या परिश्रमा मुळे किमान मिपावरिल तरी एखादे भाजप चे मत कमी होईल =) = )
लगे रहो !!!!

भले शाब्बास!! तुमच्यासारखे लोक मिळाले तर बहुधा भाजपाला 2019 चा प्रचार करायची गरजच नाही

बहुधा भाजपाला 2019 चा प्रचार करायची गरजच नाही

यु मिन "विकास,.गव्हर्नन्स " याच्या गोंडस नावाखाली प्रचार करण्याची गरज उरणार नाही ?

माहितगार's picture

30 Dec 2018 - 9:17 am | माहितगार

सुब्रमण्यन स्वामींची कथित मुलाखत युट्यूबवर जून २०१८ पासून उपलब्ध आहे. या मुलाखतीची सुरवात पत्रकारानेच वन मॅन आर्मी अशी करून दिली, ति व्यक्ती मुलाखतीतील शेवटत्च्या वाक्यात मोदींनंतर आपण दोन क्रमांकचे लोकप्रीय व्यक्ती असल्याचा अतीरंजीत आणि विनोदी दावा करते. स्पष्टच म्हणायचे तर हुशार पण फटकळ, उथळ कुंपणावरचा प्रसिद्धीलोलूप शिलेदार सुब्रमण्यन स्वामी केवळ गांधी परिवाराच्या फटकळपणे विरोध करत रहातो म्हणून भाजपा सांभाळून आहे. कधी अती रंजन तर कधी फटकळपणा करत हा माणूस आपल्या बोलण्याचे काय अर्थ काढले जाऊ शकतात याची पर्वा न करता खरेही बोलतो. आपल्या बोलण्याचे काय अर्थ होऊ शकतात याची पर्वा न करणारी मंडळींच्या राजकिय लोकप्रीयतेला मर्यादाही रहातात. गूगल ट्रेंड शोधले तर महाराष्ट्रात फटकळपणासाठी परिचित राज ठाकरे हे सर्वाधीक लोकप्रीय राजकीय व्यक्तिमत्व ठरावे पण फटकळ व्यक्तिमत्वांच्या सत्तेचे राजकारणात यश संपादन करण्यात संसदीय लोकशाहीत तरी बर्‍यापैकी मर्यादा येतात. (अध्यक्षीय पद्धतीत ट्रंप जे सहज साध्य करू शकला ते संसदीय पद्धतीत फटकळ लोकांना सहज साध्य नसावे)

सुब्रमण्यन स्वामी भाजपाचे प्रमुख स्ट्रॅटेजीस्ट किंवा प्रचारक म्हणून मला तरी परिचीत नव्हते. जगात निष्पक्ष लोकही असतात पण सुब्रपण्यन स्वामींना निष्पक्ष स्वभावाचा म्हणणे निष्पक्ष शब्दाचा अपमान केल्यासारखे होईल. सत्तेचे फायदे पदरात पाडून घेण्याच्या प्रयासात प्रसिद्धीलोलूप काही वक्तव्ये ज्या पक्षात आहोत त्या बाजूची करायची आणि काही अशीही वक्तव्ये करून ठेवायची कि सध्याचा पक्ष सोडून वेगळ्या पक्षात जावे लागले तर तिथेही पाय ठेवण्याची जागा राहीली पाहिजे. एवढे सारे करून सरते शेवटी सत्ता स्पर्धेत सुब्रमण्यन स्वामींना काय साध्य होईल ते काळच सांगेल.

माहितगार's picture

30 Dec 2018 - 10:21 am | माहितगार

क्रमांक १ मध्ये सुब्रमण्यान स्वामींचे व्यक्तीमत्व बघीतल्या नंतर आपण ह्या धागा लेखातील दाव्यांकडे येऊ साधारणतः सदर मुलाखतीतील विसाव्या मिनीटापासून सुरु होणार्‍या मुलाखतीत सदर धागा लेखकाने स्वतःच्या तोंडचे शब्द आणि अन्वयार्थ जोडण्याचे बर्‍यापैकी प्रयत्न केले आहेत. स्वतःची राजकीय बाजू मांडण्यासाठी हे सर्व केले जाऊ शकते पण जून २०१८ मध्ये झालेल्या मुलाखतीची तेव्हाच चर्चा न करता मिपावर तिहेरी तलाक बद्दल धागा आल्यावर लगोलग करणे - मी जर तलाक पिडीत स्त्रीयांबद्दल चर्चा धागे काढले असतील तर त्या आधी डझनापेक्षा आधिक स्त्री विषयक समस्यांवर लेखन केले आहे आणि तेही राजकीय चष्म्यांची पर्वा न करता याची सदर धागा लेखकास कल्पना नसावी - सदर धागा लेखकाने अशा पद्धतीने सुब्रमण्यन स्वामींच्या फोडणीवर पुन्हा फोडणी देणे तिहेरी तलाक पिडीत महिलांच्या व्यथांचा करपट अपमान आहे ह्याचे भान सदर धागा लेखकास कितपत आहे याची साशंकता वाटते पण ते असो.

आपण सुब्रमण्यान स्वामींच्या दाव्यांक्डे उलट्या क्रमाने येऊ. नरेंद्र मोदींनी २०१४ च्या निवडणूकीत गुजरात मॉडेलचा प्रचार केला हे खरे पण ते गुजरातच्या विकासाचे मॉडेल होते . इंडिया टिव्हीवरील आपकी अदालत नंतर नरेंद्र मोदींना लोकप्रीयता मिळून पारडे फिरले तेव्हा त्यांची घोषणा 'सबका साथ सबका विकास होती' . अरविंद केजरीवाल कृपे युपिए सरकारची प्रतिमा भ्रष्टतेची झालेली होती तर घरातल्या रोजच्या भाजीपाल्याचे दर शंभर रुपये किलोच्यावर पोहोचून अर्थशास्त्री मनमोहनी सरकारचे महागाईवर नियंत्रण स्वतःहून सुटलेले होते या दोन बाबींसाठी मोदी आणि भाजपाला काही करावे लागलेले होते असे वाटत नाही. लोकशाही बहुतांश मासपॉलीटीक्सवर चालते आणि मास पॉलीटीक्स भावनांवर चालते ते केवळ भारतात नाही भारतातही केवळ भाजप भावनांवर मास पॉलीटीक्स करते असे नाही जवळपास प्रत्येक राजकारणी आणि राजकीय समर्थक ते करतच असतो, श्री कुलगायांचा हा सदर लेख देखिल त्याचेच उदाहरण आहे. लोकशाहीत लोक 'सबका साथ सबका विकास' या घोषणेतही भावना गुंतवत असतातच त्याला भावनांमध्ये गुंतवणे म्हणजे प्रत्येकवेळी भावना भडकावणे नसावे - किंवा असले तरी सब्जेक्टीव्ह कोणत्या तीरावरून पहाता त्या नुसार असावे.

मुख्य म्हणजे फटकळ सुब्रमण्यान स्वामी लोकशाही राजकारण भावनांवर चालते म्हणाले त्यात तथ्य आहे, भावनांची गुंतवणूक ही सबका साथ सबका विकास सारखी रचनात्मक आणि सकारात्मक सुद्धा असू शकते. ह्या शब्द प्रयोगास बदलून भावन म्हणजे केवळ भावना भडकावणे हा शब्द प्रयोग सुब्रमण्यान स्वामींच्या तोंड घुसवण्याचा प्रयत्न मुलाखत काराने जरासा केला असेल तर त्याच्या फार अधिक पटीने सदर धागा लेखक करु इच्छितात असे दिसते. अल्पसंख्यांकाच्या असुरक्षिततेची भावना भडकावून त्यावर पोळी भाजणारे तथाकथीत पुरोगामी धर्मनिरपेक्षतावादी सुद्धा भावना भडकावण्याच्या राजकारणात कुठे मागे नसतात. किंबहूना अशा भावना भडकवण्याचा अभ्यासकरूनच उत्पातमुल्ये जपून शहाबानो केसमधील सुप्रीम कोर्टाचे निर्णय उअलथवता येतात. आणि मुस्लिम स्त्रीयांवरचा अन्याय झाकता येतो. अन्यायला वाचा फोडण्याचे एका बाजूचे राजकारण अधिक चांगले आणि दुसर्‍या बाजूचे अधिक वाईट असे काही असते का किंवा कसे .

तलाक पिडीताम्ची व्यथा तशी १४०० वर्षे जुनी आहे, भारतीय न्यायसम्स्थे समोर १९८६ पासून आहे, एकतर तो सुब्रमण्यन स्वामींच्या फार आधीपासून आहे किंवा शायराबानो केस नंतरची म्हणजे २०१४च्या निवडणूकी नंतरची आहे. २०१४ च्या निवडणूकीत ना तलाक विषयाचा समावेश होता ना मुस्लिमाम्मधील दुहीचा. मुस्लिमांमधील दुही त्यांच्या प्रेषिताच्या मृत्यू क्षणापासून चालू झाली अथवा गेल्या १४०० वर्षात किमान ७३ फिरके तयार झाले त्यावेळी कोणत्याही हिंदू संघटनेचा जन्मही झाला नव्हता. ९९.९९ टक्के हिंदू आणि हिंदूत्ववाद्यांना असे काही फिरके असतात दुही असते याची कल्पनाही नसते. दुहीचा फायदा घ्यायचा असेल तर दुही कोणत्या मुद्द्यांवरून आहे याचा अभ्यास असावा लागतो असा कोणताही अभ्यास हिंदू अथवा हिंदूत्व वाद्यांनी कधी केला होता की दुहीचा फायदा घेतील. बरे हिंदू आणि हिंदूत्ववादी काही बोलते झाले तरी मुस्लीमांवर पगडा ठेऊन असलेल्या माध्यमांनी त्यांची कधी सकारात्मक प्रतिमा रंगवली असण्याच्या शक्यताही जवळपास दिसत नाहीत. हिंदू आणि हिंदूत्ववाद्यांची एवढी क्षमता असती तर युनिफॉर्म सिव्हील कोड १९५० मध्येच अमलात आला असता त्या साठी अजून किती शतकाम्च्या प्रबोधनाची गरज आहे यावर काथ्याकुट करण्यची वेळच आली नसती.

बाकी अनेक जण आपापली पोळी भाजतात त्यात सुब्रमण्यन स्वामी आणि सदर धागा लेखकाने आपापली पोळी भाजली तर विशेष नवल नाही.

काही लोकांच्या डोळ्यात सर्व काळा साथी धूळ फेक करता येत असेल सर्व लोकांच्या डोळ्यात सर्वकाळासाठी धूळफेक करता येत नाही.

या निमीत्ताने सदर धागा लेखकाच आमचे तिहेरी तलाक विषयक बोचलेल्या धाग्यांची जाहीरात

* सुप्रीया सुळेंच्या मांडणीतील निसटत्या बाजू

* वों' च्या ऐस्या (निसटत्या) बाजू

* श्रीयूत ब्ल्याक क्याटांच्या पोस्टराचे समिक्षण

माहितगार's picture

30 Dec 2018 - 10:24 am | माहितगार

'मुस्लीमांवर पगडा ठेऊन असलेल्या उर्दू माध्यमांनी' असे वाचावे