Skip to main content

सुषुम्ना

लेखक अनन्त्_यात्री यांनी मंगळवार, 06/11/2018 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
H
सुषुम्ना
स्क्रीनवर उमटणारे तुझे शब्द थुई-थुई पिसारू लागताच भानावर ये. भगभगत्या भवतालाचा घसाजाळ आवंढा गीळ नेटाने टंकत जा पुढे मग दोन रस्ते हाकारू लागतील पहिला : कातीव-वळणदार-निवांत सावल्यांचा-टाळ्या-जयजयकारांचा-सुबक (दोन्ही बाजूंना वायफळाचे मळे) दुसरा : सरळसोट-उघडा-बोडका-डोकं वितळवणाऱ्या उन्हाचा (दुर्बोधाच्या खाईत चिरंतन मुक्काम) भरकटू नकोस ह्या इडा-पिंगला रस्त्यांवर परज पहार सर्जनाच्या उत्फुल्ल-अधीर-अदम्य-अतृप्तीची भीड वास्तवाच्या कभिन्न पथ्थराला तसू तसू बनव तुझी पायवाट तुझ्या अस्तित्वाच्या मूलाधारापासून श्रेयसाच्या सहस्रारापर्यंत तुला तेजाळत नेणारी H
दिवाळी अंक वर्ष

वाचने 10556
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

वेगळीच. कविता सुचण्याच्या, स्फुरण्याच्या जाणिवेबद्दल आहे का हे?

काहीच कळल नाही... हा दोष माझाच आहे, शब्द वाचून सरळ काही अर्थबोध होत नसेल तर मी तो समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही, उगाच शब्दांमागे दडलेले अर्थ शोधणे नाही जमत. त्यामुळेच कदाचित काव्य हा प्रकार आवडत नसावा मला.