मनोगत दिवाळीअंक

कौंतेय's picture
कौंतेय in काथ्याकूट
30 Oct 2008 - 7:44 am
गाभा: 

मागच्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षॉ देखिल मनोगताने दिवाळी अंक प्रकाशीत केला आहे. इथे http://www.manogat.com/diwali/2008/index.html पहायला मिळेल.

वैविध्यपुर्ण लेख/ कविता ह्यांची रेलचेल असणारा भरगच्च अंक वाचायला मिळतो आहे. अंकाची सजावट आणि तांत्रिक सफाई देखिल वखाणण्याजोगी आहे. येत्या काही दिवसांसाठीतर ही परवणीच असणारच आहे.

पुढच्या दिवाळी पासुन मिसळपावने देखिल खास त्यांच्याच शैलीत चटपटीत चमचमीत अंक काढून आम्हा वाचकांना मेजवानी द्यावी. तुम्हाला कसा वाटला मनोगतचा दिवाळी अंक ते जरुर कळवा!

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

30 Oct 2008 - 8:45 am | विसोबा खेचर

मनोगती कौंतेयराव,

तुम्हाला कसा वाटला मनोगतचा दिवाळी अंक ते जरुर कळवा!

हो, अवश्य कळवू. संपादक मंडळाला अन् शक्तिवेलूला म्हणावं, 'काळजी करू नकोस..'! :)

पुढच्या दिवाळी पासुन मिसळपावने देखिल खास त्यांच्याच शैलीत चटपटीत चमचमीत अंक काढून आम्हा वाचकांना मेजवानी द्यावी.

तसा प्रयत्न मिपा करेल. मात्र मिपाने जर दिवाळी अंक काढलाच तर तो निमंत्रित लेखकांकडून लेखन मागवूनच काढला जाईल. या अंकात कुंणालाही आपले लेखन पाठवण्याची मुभा नसेल. याचे मुख्य कारण एकच, ते म्हणजे दिवाळी अंकाकरता एखाद्याने उत्साहाने, आपुलकीने पाठवलेले लेखन नाकारले गेलेले मिपाला आवडणार नाही! त्यापरीस, दिवाळी अंकात कुणाचे लेखन आवश्यक आहे ते मिपाच ठरवील आणि त्या त्या मंडळींना मिपा-दिवाळी अंकात लेखन करण्याकरता रीतसर निमंत्रित करेल...

त्याचप्रमाणे अन्य संस्थळावर जाऊन 'दिवाळी अंकाकरता लेखन मागणारे..' मिपाचे कुणीही अधिकृत/अनधिकृत एजंट नसतील! ;)

आम्ही स्वत:च काही लोकांना मिपावर लेखन करण्याकरता येथे मिपावरच निमंत्रण देऊ! :)

असो,

तात्या.

हेरंब's picture

30 Oct 2008 - 9:59 am | हेरंब

तात्या,
लई भारी डोस दिलात राव !

विनायक प्रभू's picture

30 Oct 2008 - 12:48 pm | विनायक प्रभू

जी.के.ड्ब्ल्यु ही एक ब्रिटीश कंपनी होती.(भांडूप स्टेशन)
जी=@@
के= किडे
ड्ब्ल्यु= वळ्वळ्णे
सुलेमानी का ऊस्मानी का सुलतानी हे ज्याने त्याने ठरवावे.

अवलिया's picture

30 Oct 2008 - 12:51 pm | अवलिया

मनमानी ;)

वैशाली हसमनीस's picture

30 Oct 2008 - 12:55 pm | वैशाली हसमनीस

तात्या,भारी प्रतिसाद दिलात.आवडला.
''मात्र मिपाने जर दिवाळी अंक काढलाच तर तो निमंत्रित लेखकांकडून लेखन मागवूनच काढला जाईल. या अंकात कुंणालाही आपले लेखन पाठवण्याची मुभा नसेल. याचे मुख्य कारण एकच, ते म्हणजे दिवाळी अंकाकरता एखाद्याने उत्साहाने, आपुलकीने पाठवलेले लेखन नाकारले गेलेले मिपाला आवडणार नाही! त्यापरीस, दिवाळी अंकात कुणाचे लेखन आवश्यक आहे ते मिपाच ठरवील आणि त्या त्या मंडळींना मिपा-दिवाळी अंकात लेखन करण्याकरता रीतसर निमंत्रित करेल...

त्याचप्रमाणे अन्य संस्थळावर जाऊन 'दिवाळी अंकाकरता लेखन मागणारे..' मिपाचे कुणीही अधिकृत/अनधिकृत एजंट नसतील! ''
एकदम मान्य !तात्या,आपण यापेक्षाही चांगला दिवाळी अंक काढून दाखवू.आपले विचार फार पटले,आवडले.

सुनील's picture

30 Oct 2008 - 4:55 pm | सुनील

सहमत

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

कौंतेय's picture

30 Oct 2008 - 2:30 pm | कौंतेय

तात्या भावना पोहचल्या. प्रतिसादा बद्दल आभारी आहे. बाकिचांच्या प्रतिक्रियेचा रोख मात्र समजला नाही. इतका राग कशावर आहे? कृपया दिवाळी अंकाविषयीच टीप्पणी केली तर विषयाला धरुन होईल.

सुनील's picture

30 Oct 2008 - 4:58 pm | सुनील

दुव्याबद्दल धन्यवाद!

कृपया दिवाळी अंकाविषयीच टीप्पणी केली तर विषयाला धरुन होईल.
हे समजले नाही. दिवाळी अंकातील ज्या कुठल्या लेखाला भर्‍या-बुर्‍या प्रतिक्रिया द्यायच्या त्या तिथे जाउनच देऊ की! इथे कशाला?

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शेणगोळा's picture

30 Oct 2008 - 5:29 pm | शेणगोळा

ओ कौंतेयसाहेब,

आधी मिपासंबंधी, येथील एखाद्या लेखासंबंधी मनोगतावर अशी एखादी चर्चा घडवून आणून दाखवा पाहू! आहे का हिंमत तुमच्या मनोगताची मिपाविषयी काही छापण्याची?

आधी ते करा आणि मग विचारा कुणाचा कशावर राग आहे तो. आज मनोगताच्या दिवाळी अंकाविषयी येथे चर्चा होते आहे तशी उद्या समजा मिपाचा दिवाळी अंक निघला तर त्याची मनोगतावर चर्चा होऊ शकणारे का?

वैविध्यपुर्ण लेख/ कविता ह्यांची रेलचेल असणारा भरगच्च अंक वाचायला मिळतो आहे. अंकाची सजावट आणि तांत्रिक सफाई देखिल वखाणण्याजोगी आहे. येत्या काही दिवसांसाठीतर ही परवणीच असणारच आहे.

अरे अरे अरे! मनोगताला आपल्या दिवाळीअंकाची मिपावर जाहीरात करण्याची वेळ यावी? ए तात्या, मनोगताकडून या जाहिरातीचे पैसे घे रे! -: )

सर्वांचाच लाडका,
शेणगोळा.

यशोधरा's picture

30 Oct 2008 - 6:36 pm | यशोधरा

>>ए तात्या, मनोगताकडून या जाहिरातीचे पैसे घे रे! -: )

:D सही आहे सूचना!

आनंद's picture

30 Oct 2008 - 10:14 pm | आनंद

सध्या मिपा वरचे लेख ,कथा पाहता( प्रियाली,अदिती,आणि बरेच) वेगळ्या काही दिवाळी अंकाची खरच काही गरज आहे असे वाटत नाही.

विसोबा खेचर's picture

31 Oct 2008 - 1:50 am | विसोबा खेचर

सहमत आहे..

मिपावर तसे एखाद्या उत्तम दिवाळी अंकात शोभावे असे लेख वर्षभरच पडत असतात! :)

तात्या.