मिसळपाव साइट - लेख शोध - Template

Primary tabs

कंजूस's picture
कंजूस in तंत्रजगत
2 Aug 2018 - 11:38 am

मिसळपाव 'शोध' Template

मिसळपाव या आपल्या वेबसाइटवर लेख कसे शोधावेत असा प्रश्न 'प्रसाद_१९८२' या वाचक सभासदाने विचारल्यावर " मिपा Android App" आहे त्यातले "शोध" चांगले चालते असे उत्तर दिले. परंतू गुगल प्ले_स्टॅार'वर असे अॅप नाही म्हटल्यावर मी शोधले तर सापडले नाही. माझ्या मोबाइलमध्ये असलेले अॅप उघडून चालते का पाहिल्यावर ते चालत आहे हे कळले. म्हणजे तो कोड अॅक्टिव/व्हॅलिड आहे. ठीक आहे.

मागे एकदा HTML CODE नेटवरच्या साइटवरून शिकत होतो तेव्हा एका साइटवर ( html dog?) असं लिहिलं होतं की html शिकता येत नसेल तर चांगला सोपा उपाय म्हणजे दुसऱ्याने लिहिलेला "कॅापी करा." परीक्षांसाठी हे कॅापी अयोग्य असले तरी इंटरनेटवापरकर्ते यांसाठी फारच उपयुक्त आहे.

मुद्द्यावर येऊन - त्या अॅपमधल्या 'शोध'चा कोड कॅापी करून नेहमीच्या ब्राउजरमध्ये काम करतो का पाहाणे. अॅपमधली शोध सोय ही कोणत्यातरी ब्राउजरमध्येच उघडते ना!!

दोन चार शोध घेऊन त्या कोडमध्ये दुसरे शब्द फिरवून पुन्हा शोध घेतला तर काम करतो कोड. त्याचे Templates इथे देत आहे. करून पाहा.

१) Android Chrome browser'मधून शोध करण्याचे Template
नेपाळ भटकंती (ओपन इन क्रोम)

_________chrome_template_ start___________

https://cse.google.com/cse?cx=012513939201584128338:laa5kbp4cog&q=नेपाळ%20भटकंती&oq=नेपाळ%20भटकंती&gs_l=partner-generic.12...29482.52595.0.53336.0.0.0.0.0.0.0.0..0.0.gsnos%2Cn%3D13...0.23131j68032495j

__________chrome_template_ stop___________

समजा आपल्याला "आधार कार्ड " यासाठीचे लेख क्रोम ब्राउजरमध्ये शोधायचे आहेत.
प्रथम हे template एका नोटमध्ये कॅापी करा.

तर template मध्ये जिथे "नेपाळ" शब्द दिसतो आहे तो काढून तिथे "आधार" लिहा. आणि जिथे "भटकंती" आहे तो शब्द काढून " कार्ड" लिहा.

कोडमधली इतर अक्षरे न घालवता अथवा स्पेसवगैरे भर न घालता बदल केलेला संपूर्ण कोड httpsपासून 495jपर्यंत कॅापी करा आणि ब्राउजर विंडोमध्ये पेस्ट करून शोधा.

*" निवडणुका" शोधायचे झाल्यास "नेपाळ"च्या जागी "निवडणुका" आणि "भटकंती"च्या जागी "लेख" हा शब्द बदलून शोधता येईल.

__________________________________________

२) ओपन इन एज माइक्रोसॉफ्ट ब्राउजर

____ माइक्रोसॉफ्ट_ब्राउजर_template_start___

https://cse.google.com/cse?cx=012513939201584128338:laa5kbp4cog&q=व्हिटामिन&oq=व्हिटामिन&gs_l=partner-generic.12...222033.280566.1.281856.0.0.0.0.0.0.0.0..0.0.gsnos%2Cn%3D13...0.58549j2256246065j26j11..1ac.1j4.25.partner-generic..0.0.0.

____ माइक्रोसॉफ्ट_ब्राउजर_template_stop___

हे template एका नोटमध्ये कॅापी करून घ्या. आता आपल्याला "भिमाशंकर" लेख शोधायचे आहेत तर "व्हिटामिन"च्या जागी "भिमाशंकर" बदला.
बदल केलेला कोड Edge browser windowमध्ये टाकून शोधा.
समजा "आधार कार्ड" लेख शोधायचे आहेत तर "व्हिटामिन"च्या जागी "आधार कार्ड" टाकून शोधा.

३) फायरफॅाक्स ब्राउजरचा शब्द बदलता येणारा कोड दिसत नाही.

करून पाहा.
जुन्या मिपा अॅप'चे फोटो.

फोटो १

फोटो २

फोटो ३

---------------------------------------
हे पाहा. गुगल आता साइटसर्च फुकट देत नाही! हा कोड किती महत्त्वाचा आहे!

प्रतिक्रिया

पिलीयन रायडर's picture

2 Aug 2018 - 1:01 pm | पिलीयन रायडर

कंजूस काका काय काय करतील ह्याचा नेम नाही! ग्रेट!

आता काकांनी इतकं केलंय तर नीलकांत प्रशांत राव मुदलात साईटवर दुरुस्ती करतील काय?

मी गुगल वर जाऊन site:misalpav.com निवडणूक असा सर्च करते. बहुतांश वेळा जे हवं ते सापडतच.

सतिश गावडे's picture

2 Aug 2018 - 1:16 pm | सतिश गावडे

कंजूस काकांचं प्रकरण भलतंच किचकट आहे.

मी गुगल वर जाऊन site:misalpav.com निवडणूक असा सर्च करते.
हा गुगलचा अधिकृत असलेला सर्वात सोपा पर्याय आहे.

मग इनपुट फॅार्म कोड टाका. सर्चमधले शब्द त्या कोडमध्ये जातील आणि थेट रिझल्टच येईल.

या शोधाने फक्त मिपासाइटच शोधली जाते - तेच हवय ना?

डॉ सुहास म्हात्रे's picture

2 Aug 2018 - 1:22 pm | डॉ सुहास म्हात्रे

कंजूस साहेब मिसळपाववरील जुगाडसम्राट आहेत असे आम्ही आनंदाने आणि अभिमानाने जाहीर करत आहोत !

प्रकाश घाटपांडे's picture

3 Aug 2018 - 11:39 am | प्रकाश घाटपांडे

फक्त एखाद्या व्यक्तिच्या प्रतिक्रिया पहायच्या असल्यास काय करता गूगल सर्च वर?

माहितगार's picture

3 Aug 2018 - 12:02 pm | माहितगार

मला माझ्या स्वतःच्या पुर्वीच्या धाग्यांचे संदर्भ द्यायचे असतात तेव्हा,वर पि.रा.ताई म्हणतात तसे गुगल वर जाऊन, हवा तो शब्द + माहितगार site:misalpav.com निवडणूक असा सर्च करतो. याने धागा शोध सुलभ होतो. शोधात प्रतिसाद येत नाहीत असे नाही पण मला माझे जुने प्रतिसाद शोधणे अद्याप तरी जिकिरीचे जाते.

परमेश्वरा! तुझे आभार कसे मानू!

भीडस्त's picture

21 Aug 2018 - 12:02 am | भीडस्त

नुक्ताचीं है ग़म-ए-दिल उस को सुनाए न बने
क्या बने बात जहाँ बात बताए न बने

कंजूस's picture

3 Aug 2018 - 3:28 pm | कंजूस

माइक्रोसोफ्ट एज ब्राउजरमध्ये आताच चेकिंग केले -
व्हिटामिन'च्या जागी
"माहितगार, मुस्लिम स्त्रिया" हा बदल करून सर्च केले.
६४ रिझल्टस आले. तारीख वेळेसह.
तुम्ही दुसरे शब्द टाकून पाहा.

ओपन इन एज माइक्रोसॉफ्ट ब्राउजर)
लिंक:https://cse.google.com/cse?cx=012513939201584128338:laa5kbp4cog&q=माहितगार, मुस्लिम स्त्रिया&oq=माहितगार, मुस्लिम स्त्रिया&gs_l=partner-generic.12...222033.280566.1.281856.0.0.0.0.0.0.0.0..0.0.gsnos%2Cn%3D13...0.58549j2256246065j26j11..1ac.1j4.25.partner-generic..0.0.0.

पंतश्री's picture

4 Aug 2018 - 12:41 pm | पंतश्री

हे मिपा अॅप कसे करायचे??
लिन्क कुठे मीळेल??

कंजूस's picture

4 Aug 2018 - 4:49 pm | कंजूस

हे करून पाहा.
* आता स्टोरवर नसलेले/ असलेले अॅप दुसऱ्या फोनला पाठवणे -( शेअर)

एका Android phone मधून त्यात असलेले App दुसऱ्या एका Android phone ला कसे पाठवायचे ते इथे wikihowDOTtech/Share-Apps-on-Android-Bluetooth WiKiHowमध्ये दिलं आहे.

परंतू जे app आता google_play_store वरच नाही ते पाठवता येते का पाहायला हवे.

-------------------
चेकिंग
प्रथम जे अॅप आता स्टोरवर आहे त्याची apk file काढली ती वाटसपवर दुसऱ्या कुणाला पाठवता येते. ती फाइल इथे माझ्या एका शेअरिंग साइटवरून देत आहे. डाउनलोड करून ते कॅम्रा अॅप ( १) तुमच्या फोनमध्ये येते का पाहा.

१ ) EasySelphi ( 2.8 MB )
Camera App
Link:https://jumpshare.com/v/dntTerfFxxTn2spDu8YP?b=qwkgSgns5aUjgVK1lYlQ

आता आपले मिपा अॅप येते का पाहा. ते स्टोरवर नाही.
२ ) Misalpav dot com ( 2 MB )
link:https://jumpshare.com/v/9Jq9g7OR0lYOjWKKOtwz?b=qwkgSgns5aUjgVK1lYlQ

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Aug 2018 - 3:50 pm | डॉ सुहास म्हात्रे

गुगल किंवा गुगल क्रोम या दोन्हींच्या address bar / location bar / URL bar मध्ये खालील शब्द टाकून मिपावरील "हव्या त्या लेखकाच्या हव्या त्या विषयावरच्या लेखनाची यादी" समोर येते.

उदाहरणार्थ...

१. मिसळपाव डॉ सुहास म्हात्रे ड्रॅगनच्या देशात

किंवा

२. misalpav.com डॉ सुहास म्हात्रे ड्रॅगनच्या देशात

हे इतर कोणत्याही संस्थळामधील लेखनाचा शोधासंदर्भातही हे करता येते. त्यासाठी वापरायच्या शब्दसमूहाचे स्वरूप असे आहे...

(संस्थळाचे नाव) (लेखकाचे नाव) (शीर्षकातील एक/काही/सर्व शब्द)

प्रसाद_१९८२'s picture

4 Aug 2018 - 4:12 pm | प्रसाद_१९८२

उपयुक्त माहिती देणार्‍या सर्व सदस्यांचे आभार !

मायबोली संस्थळाने गुगल_साइट_शोध ही सोय पुर्वीच त्यांच्या साइटमध्ये घेतली आहे आणि लेखात दिलेले गुगलचे नोटिफिकेशन ( शेवटचा फोटो) पाहता आता ती सोय मिपात आणणे खर्चाचे वाटतेय. शिवाय मिपा अॅपही स्टोरवर नाही, यादृष्टिने एक अधिकृत उपाय सापडला आहे. उद्या जर याचा इनपुट फॅार्म कोड बनवला तर अगदीच सोपे काम होईल. आइटीवाल्यांना तो करता येईल.

kulpras's picture

4 Aug 2018 - 7:12 pm | kulpras

I have crated chrome extension, let me know if this works for you
Its basic one more features can be added
extension screen

Sample screen

मंदार कात्रे's picture

27 Aug 2018 - 7:38 pm | मंदार कात्रे

ज्यांच्याकडे हे मिसळपाव चे जुने अ‍ॅप आहे ते इतराना टेलिग्राम वरून पाठवता येइल