गाभा:
व्हॉट्स अॅपच्या वाढत्या लोकप्रीयते बद्दल अलिकडेच एखाद दोन चर्चा चालू असताना मी गूगल ट्रेंडस अभ्यासले असता , मराठी व्हॉट्स अॅप स्टेटस Marathi Whats App status हि एक लोकप्रीय गूगल सर्च टर्म दिसली. व्हॉट्स एप स्टेटस या प्रकारा बद्दल माझी व्यक्तिगत रुची मर्यादीत असली तरी ज्यांना या विषयात रुची आहे त्यांना मिपावरुन माहिती घेता यावी . आणि हि मंडळी मिसळपाव संकेतस्थळाशी या निमीत्ताने जोडली जावीत या सदहेतून चर्चा सुरु करत आहे. आपण मराठी व्हॉट्स अॅप स्टेटस Marathi Whats App status मध्ये रुची असणार्यांनी चर्चेत सहभागी होऊन ऊपयूक्त माहिती द्यावी हि विनंती.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे आणि व्यक्तिगत टिका टाळण्यासाथी अनेक आभार.
प्रतिक्रिया
31 Jul 2018 - 11:39 am | उपयोजक
आपल्याकडे लक्ष वेधून घेऊन येनकेनप्रकारे प्रसिद्ध होणे किंवा चर्चेत राहणे यासाठी व्हॉटसअॅप स्टेटस हा प्रकार अस्तित्वात आला असावा.इथे लिहिता येतं,फोटो किंवा कमी लांबीचा व्हिडिओ स्टेटस म्हणून ठेवता येते.थोडक्यात 'मला पहा फुले वाहा!' :)
काही स्टेटस वैचारीक असतात तर काही खुसखुशीत.काही जीवनविषयक तत्वज्ञान सांगणारी किंवा कधी एखाद्या सिनेमातलं,मालिकेतलं दृश्य आवडलं म्हणूनही ठेवलं जातं.पूर्वी मिपावर स्वाक्षरी हा प्रकार होता.त्याचंच हे आधुनिक रुप!
31 Jul 2018 - 11:57 am | यशोधरा
काहीही धागा. कुठे नेऊन ठेवताय मिपाला!! :((
31 Jul 2018 - 12:37 pm | माहितगार
__/\__
31 Jul 2018 - 12:33 pm | गणामास्तर
तुम्हाला गूगल ट्रेंड्स वर काहीही सापडलं तर ते इथं येऊन टाकून चर्चा सुरु करायची काही आवश्यकता आहे का?
तुमचा असा काही समज झालाय का कि लोकं इथं येऊन व्हॉट्स ऍप स्टेटस काय ठेवायचा हे शोधत बसतील ?
बास करा कि राव आता. . उगाच बोर्डावर राहायचा किती तो खटाटोप. कधीही या बोर्डावर तुमचेच धागे अन त्यावर तुमचेच प्रतिसाद.
वाचनीय काही असतं तर सदस्यांनी आक्षेप हि घेतला नसता एक वेळ, पण हे असले दोन चार ओळीचे काही तरी फालतू धागे टाकून जर का त्यावर तुम्हीच निरर्थक पोकळ जडबंबाळ शब्दांचे पिसारे फुलवत बसणार असाल तर काय मतलब अन कसल्या डोम्बल्याच्या चर्चेची अपेक्षा ठेवता तुम्ही.
इतके सगळे सदस्य सांगत असतील तर थोडा तुम्ही पण विचार करा आणि कीबोर्ड आवरता घ्या हि विनंती.
उपप्रतिसाद दिला नाहीत तर संध्याकाळी तुम्हाला अंगारकी स्पेशल उपवास थाळी घाऊ घालेन फक्त त्यावर परत धागा टाकायचा नाही हे सांगून ठेवतो आधीच.
31 Jul 2018 - 12:36 pm | माहितगार
__/\__
31 Jul 2018 - 7:03 pm | सोमनाथ खांदवे
" उपप्रतिसाद दिला नाहीत तर संध्याकाळी तुम्हाला अंगारकी स्पेशल उपवास थाळी घाऊ घालेन फक्त त्यावर परत धागा टाकायचा नाही हे सांगून ठेवतो आधीच. "
त्याच बरोबर त्यानां माहेरची साडी , लेक चालली सासरला , हळद रुसली कुंकू हसले हे मराठी सिनेमे चार चार वेळा दाखवा
=) =)