डेव्ह फर्नांडिस बुलेटिन - २
१. मागच्या बुलेटिन मध्ये मी भाकीत केले होते कि फर्नांडिस सरकारची अल्पसंख्यांक कॉलेजांत SC/ST ला आरक्षण द्यायची याचिका सुप्रीम कोर्ट फेटाळून लावेल. प्रत्यक्षांत सुप्रीम कोर्टने हि याचिका २० मिनिटांत १५ ओळीच्या निवाड्यात रद्द केली. पण हि शोभा करून घेण्यासाठी महाराष्ट सरकारने अनेक आठवडे लक्षावधी विद्यार्थ्यांना वेठीस धरले होते.
२. अनेक लोक आरक्षणा मुळे देशाची कशी वाट लागली आहे इत्यादी ओरड करत असतात. ह्या निर्णयामुळे स्पष्ट झाले आहे कि जर कॉलेज मॅनेजमेंट ख्रिस्ती/मुस्लिम/शीख/पारसी/बौद्ध/जैन असेल तर कसलेही आरक्षण द्यायची गरज नाही. देशांतील आरक्षण मोदी सरकारने रद्द करायची गरज नाही, हळू हळू अल्पसंख्यांक कॉलेजस ची संख्या वाढली कि ते स्वतः इरेलेवंट ठरेल. मुंबई शहरांत माझ्या माहिती प्रमाणे ८०० कॉलेजस असून त्यातील ३०० म्हणजे सुमारे ४०% कॅपॅसिटी अल्पसंख्यांक कॉलेजस ची आहे. त्यामुळे सुमारे ४०% सीट्स आधीपासून आरक्षण मुक्त आहेत.
आरक्षण मुक्त आहेत म्हणजे मेरिट लिस्ट वर प्रवेश होतो असे मात्र नाही. ह्या कॉलेजस ना प्रवेशाचे १००% स्वातंत्र्य आहे त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याने मॅनेजमेंटला खुश केले तरी पुरेसे आहे.
३. फर्नांडिस सरकाने फक्त अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी ५०% फी माफी स्कीम काढली आहे. त्यामुळे एखाद्या गरीब विद्यार्थ्याला फी वगैरे परवडत नसेल तर तर धर्म परिवर्तन करून तो ह्या स्कीम चा फायदा उठवू शकतो.
४. फर्नांडिस जी च्या तर्कबुद्धीला काही रोग झाला आहे असे वाटते. एकाच ट्विट मध्ये ते आधी "फक्त अल्पसंख्यांक" लोकांसाठी एक स्कीम जाहीर करतात आणि त्याच ट्विट मध्ये "आम्ही अल्पसंख्यांक आणि इतरांत फरक करत नाही" असे सुद्धा धंदांत पाणे सांगतात. अंध मतदाते असेल तर काहीही तर्क चालतो !


वर्गीकरण
प्रतिक्रिया
' कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ
एक दोन लोकांनी सुद्धा ह्या
सगळ्यांनाच हव ते हव तेवढ
> त्या पेक्षा सर्व
कायदा सर्वांना असावा आणि
साहना जी शिक्षण सोडा नोकरभरती
ते संपणार नाही पण सुदैवाने ते
फक्त 365 वाचन , बऱ्याचशा