सचिनला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
24 Apr 2018 - 10:37 am
गाभा: 

आपला सर्वांचा लाडका सचिन आज ४५ वर्षांचा झाला. सचिनला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सलग २४ वर्षे आपल्या खेळाने क्रिकेटरसिकांना मंत्रमुग्ध करून निखळ आनंद देणा-या सचिनला मानाचा मुजरा!!!

प्रतिक्रिया

प्रसाद_१९८२'s picture

24 Apr 2018 - 12:24 pm | प्रसाद_१९८२

Happy Birthday सचिन.

चांदणे संदीप's picture

24 Apr 2018 - 12:28 pm | चांदणे संदीप

सचिन!! सचिन!!

सचिनला वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा!! :)

Sandy

कबीरा's picture

24 Apr 2018 - 2:54 pm | कबीरा

क्रिकेट च्या देवास वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!
सचिन!! सचिन!!
सचिन!! सचिन!!

दुर्गविहारी's picture

24 Apr 2018 - 7:00 pm | दुर्गविहारी

तूच होतास…तूच आहेस…तूच राहशील !!!

आचरेकर सरांच्या शाळेतील सर्वात हुशार विद्यार्थी …
तमाम क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवत …
चोवीस वर्ष स्वप्नवत समाधान देणारा जादुगार फक्त तूच होतास ….

निम्मे आयुष्य आणि संपूर्ण बालपण …
आम्हाला दत्तक घेऊन मनमुराद आनंद देणारा फक्त तूच होतास ….

नव्वदच्या दशकात क्रिकेट जगताच्या तोफखान्यासमोर…
अखंड भारताची 'Batting Order' तूच होतास ….

प्रतिस्पर्ध्याच्या विजयातील अडसर …
आपल्या विजयाचा शिल्पकार …
सामना पाहण्याचे आणि न पाहण्याचे कारण फक्त तूच होता…

चोवीस वर्ष झाली…दोन पिढ्या खेळल्या …
शेकडो आले… शेकडो गेले…
निळ्या कपड्यातील नंबर 'एक'…
शुभ्र कपड्यातील नंबर 'चार' कायम तूच होतास….

'Bradman'ची प्रतिमा…'Shane Warne' चे भयस्वप्न….
'Lara' चा हिरो … आणि…क्रिकेटचा मानदंडही तूच होतास….

'MacGrath' चे टार्गेट…'Akram' ची शिकार …'Donald' चा गोल….आणि 'Murali' चा Aim…
समोरच्या टीम मिटिंगचा 'Agenda' फक्त तूच होतास…

कसोटी हरल्यामुळे 'Man of The Match' घ्यायला न येणारा…
रणजी सामना जिंकल्यावरही लहान मुलासारखा नाचणारा क्रिकेटवेडा तूच होतास….

'कौतुक' करणे असो…'बाजू' घेणे असो…कि 'Defend' करणे असो…
आमच्या चर्चेचा 'गाभा' फक्त तूच होतास….

'Sharjah' चे वाळवंट असो कि 'Merlbourne' चे ग्रास …
'Old Trafford' ची थंडी असो कि 'नागपूर' ची गरमी…
'Carebian' ड्रम्स चा गजर असो कि 'Premadasa' चा सागर
'Auckland' चे हिमपर्वत असो कि 'Johansburg' चे सौंदर्य…
सगळीकडे आपला ठसा उमटविणारा फक्त तूच होतास….

वडिलांच्या निरोपाला धैर्याने तोंड देवून…
पुढच्या क्षणाला देशासाठी धावणारा…
आमच्या देशाचा खरा 'Family Man' तूच होतास….

'Cover Drive' चे पहिले प्रेम…'Upper Cut' चा जन्मदाता…
'Paddle Sweep'चा कलाकार …'Straight Drive'ची ओळख फक्त तूच होतास….

मुंबईचा 'तेंडल्या'…क्रिकेटप्रेमींचा 'God'…
भारताचा 'कोहिनूर'…
आणि क्रिकेट जगताचा 'मास्टर'..
२२ यार्डांचा सर्वेसर्वा फक्त तूच होतास ….

जगाच्या पाठीवर हा खेळ किती ओळखीचा असेल माहित नाही…पण…
आमच्यासाठी खेळाची ओळख फक्त तूच होतास….

इथून पुढेही खेळ चालूच राहील…खेळाडू होतील…विक्रमही होतील…
पण तुझी सर त्याला कधीच येणार नाही…
कारण तुझ्यासारखा फक्त तूच होतास…

...वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मास्टर,ब्लास्टर !!!

Happy birthday God of Cricket

श्रीगुरुजी's picture

24 Apr 2018 - 8:20 pm | श्रीगुरुजी

मस्त लिहिलंय.

अभिदेश's picture

24 Apr 2018 - 7:17 pm | अभिदेश

खूप छान ..अचूक शब्दात मांडलंय..

जेम्स वांड's picture

24 Apr 2018 - 9:01 pm | जेम्स वांड

विक्रमादित्य सचिन ह्यास वाढदिवसाचे अभिष्टचिंतन

अमित खोजे's picture

24 Apr 2018 - 11:01 pm | अमित खोजे

कविता खूपच छान लिहिली आहे. मस्त

फारएन्ड's picture

25 Apr 2018 - 9:24 am | फारएन्ड

वाढदिवसाची आठवण म्हणजे शारजा फायनल ची आठवण! आज २० वर्षे झाली त्या बॅक टू बॅक शतकांना :)