✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

प्रेमाचा डाव बघता बघता उधळला

ख — खिलजि, Mon, 03/19/2018 - 13:27
ती आली होती फक्त एकदाच घरी एक वाटी दूध मागायला मला वाटले तिला दूध आवडते म्हणून गेलो म्हशी पाळायला खरी पंचाईत तेव्हा झाली जेव्हा कळले म्हैस व्यायल्याशिवाय दुध देतच नाही म्हशींसोबत एक रेडा बघितला बाप माझ्यावर जाम भडकला शिव्या देउनी खूप बुकलला व्यक्त केले मग मी पुढचे पत्ते सांगून टाकले त्यांना , भावी सुनेला दूध आवडते इकडे झाला उलट गेम रेड्याने धरला म्हशीवर नेम रेडा असा काही चौखूर धावला प्रेमाचा डाव बघता बघता उधळला बाप माझ्यावर भरपूर पिसाळला सुरु झालं घरी भलतंच महाभारत कसलं दूध अन कसलं प्रेम ? सरळ गेलो माघारी अन म्हशी दिल्या परत सिद्धेश्वर विलास पाटणकर

प्रतिक्रिया द्या
2413 वाचन

💬 प्रतिसाद (4)

का?

उपयोजक
Mon, 03/19/2018 - 16:38 नवीन
तुम्ही कविता का करता?
  • Log in or register to post comments

तुमीबी ना राव , काईच्याकाही इचारताय..

खिलजि
Tue, 03/20/2018 - 12:05 नवीन
तुमीबी ना राव , काईच्याकाही इचारताय...हि कविता थोडीच हाय ,, हि तर कल्पना हाय ... ह्ये मंजी असं झालं , कि रजनीला इचारायचं ,, कि बाबा तू पिच्चरमंदी काय करतो आणि तुझं हे असलं काम कोण बघतं ... त्याला ऑस्कर सोडा ,, इतर कुठलाही पुरस्कार नाही मिळाला तरी त्यो काम करणारच .. ब्लेडने गोळी कापून दहाबारा जणांना मेलेलं कधी बघितलंय का हॉलिवूडच्या पिच्चरमंदी ..न्हाय ना .. इथे रजनीचे पिच्चर दाखवा त्यांना .. ऑस्करच बंद करून टाकतील .... सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपयोजक

चला हरकत नाही

राजेंद्र मेहेंदळे
Mon, 03/19/2018 - 17:39 नवीन
त्यानिमित्ताने तुमचे ज्ञानवर्धन झाले ( म्हैस व्यायल्याशिवाय दुध देत नाही) पण मी काय म्हणतो...पुढच्यावेळी दुसर्‍या कुणीतरी ताक, दही,गुळ,साखर,चहा,तेल,तुप वगैरे वाटीभर मागितले तर तुम्ही काय कराल?
  • Log in or register to post comments

" केअशु साहेब "

खिलजि
Mon, 03/26/2018 - 13:15 नवीन
अरे हे काय बघतोय मी ... चक्क नाव बदललेत " केअशु साहेब " ... तो राजनीकांतचा फोटोपण गायब .. असो ... कुठे दुखावला गेला असलात तर माफी असावी ... पण नाव बदलू नका ... नावावर नितांत प्रेम करा ... या आभासी जगात तुम्हाला नावाशिवाय ओळख नाही ... सिद्धेश्वर विलास पाटणकर
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा